(निकालपत्र अध्यक्ष, श्री. विनायक रा.लोंढे यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये, सामनेवाला यांनी बेकायदेशीर विदयुत देयके देवून दयावयाच्या सेवेत त्रृटी ठेवलेली आहे म्हणुन विदयुत देयके व नुकसान भरपाई मिळावी म्हणुन दावा दाखल केला आहे.
02. आज रोजी तक्रारदार व त्यांचे वकील हजर, सामनेवाले वकील हजर तक्रारदार यांनी या मंचासमोर पुरसीस दाखल केली व त्यामध्ये नमूद केले की, सामनेवाला यांनी लेखी कैफियत मध्ये तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाही सामनेवाला यांनी व्यापारी कारणास्तव विदयुत प्रवाह घेतला आहे असा बचाव घेतला आहे.
03. विदयुत कायदा कलम 2003 चे कलम 42 (5) (6) (7) नुसार सदरील तक्रार योग्य त्या मंचापुढे दाखल करणे अभिप्रेत आहे. सदरील तक्रार या मंचाच्या समोर चालविण्यास पात्र नसल्यामुळे तक्रारदार यांना सदरील तक्रार यापुढे या मंचासमोर चालविणे नाही.
04. सामनेवाला यांच्या वकीलांनी हरकतीचा मुदा उपस्थित करुन खर्च दयावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार व सामनेवाला यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदार यांना सदरील तक्रार चालविणे नसल्यामुळे ती निकाली काढण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
दिनांक - 24/07/2015
(श्रीमती. कविता जगपती) (श्री. विनायक रा.लोंढे)
सदस्या अध्यक्ष