मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 49/2011 तक्रार दाखल दिनांक – 16/02/2011 अंतिम आदेश दिनांक – 28/04/2011 1) श्री. श्रीकांत रमेश गडवाल, 213/बी, 23 हुरमुसजी कावसजी हाऊस, एन. एस. मणकीकर मार्ग, सायन, चुन्नाभट्टी, मुंबई 4000 022. 2) श्री.राजीव रमेश गडवाल, 213/बी, 23 हुरमुसजी कावसजी हाऊस, एन. एस. मणकीकर मार्ग, सायन, चुन्नाभट्टी, मुंबई 4000 022. ........ तक्रारदार क्रमांक 1 व 2 विरुध्द
1) क्रोमा- अ टाटा एंटरप्राईज, सायन गॅरेज बिल्डींग, प्लॉट क्रं. 112, सायन कोळीवाडा रोड, मुंबई 4000 022. 2) क्रोमा – अ टाटा एंटरप्राईज, वुलवर्थ इंडीया प्रा. लि., युनिट क्रमांक 203, 2 रा माळा, आकृती सेंटर पॉईंट, एम.आय.डी.सी., टेलिफोन एक्सचेंजजवळ, एम.आय.डी.सी., अंधेरी(पूर्व), मुंबई 4000 093 3) एसर इंडिया प्रा. लि., ए/503, रेमीब कोर्ट, शाह इंडिस्ट्रील इस्टेट, प्लॉट क्रमांक 9, . वीरा देसाई मार्ग, अंधेरी (पश्चिम), अंधेरी (पश्चिम), मुंबई 400 053. 4) एसर इंडीया प्रा. लि., एक्सप्रेट, एक्सप्रेट लॉगीसटीक्स पार्क, सर्वे क्रमांक 44, सौक्य मार्ग, बँगलोर 560 067. ......... सामनेवाले क्रं. 1 ते 4
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – तक्रारदार हजर - आदेश - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार प्रकरण ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केले असून तक्रारदार यांनी अर्ज दाखल करुन तक्रार परत मागे घेण्याबाबत अर्जात विनंती केलेली आहे. तसेच नमूद केले आहे की, तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यात आपसी तडजोड झालेली आहे, व त्यांचा वाद मंचाच्या बाहेर सोडविण्यात आलेला आहे. सबब मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.- - अंतिम आदेश - 1) तक्रारदार व गैरअर्जदार यांचा वाद हा मंचाबाहेर सोडविण्यात आल्यामुळे व तक्रारदार यांनी तक्रार मागे घेतल्यामुळे तक्रारदाराची तक्रार क्रमांक 49/2011 या प्रकरणाची नस्ती बंद करण्यात येते.
2) उभयपक्षांनी आपापला खर्च सोसावा. 3) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 28/04/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |