Maharashtra

Nagpur

CC/10/614

Shri Shridhar Gajanan Ranade - Complainant(s)

Versus

Cox & Kings (India) Ltd. - Opp.Party(s)

Adv. S.V.DANGORE

19 Jan 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/614
 
1. Shri Shridhar Gajanan Ranade
Pragati Colony, Shendurwafa, Sakoli, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Cox & Kings (India) Ltd.
UG/18, Pushpakunj Commercial complex, Central Bazar Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. S.V.DANGORE, Advocate for the Complainant 1
 ADV.SAGAR ASHIRGADE, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्‍यक्ष )     
                आ दे श
                        ( पारित दिनांक : 19 जानेवारी, 2012 )
 
यातील तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी आहे की, त्‍यांनी गैरअर्जदार जे ग्रुप पर्यटकाचा व्‍यवसाय करतात व विविध देशात पर्यटक घेवुन जाण्‍याची सुविधा करतात व त्‍यासाठी ते जाहिरात देउुन पर्यटकांना आकर्षित करतात. त्‍यासाठी त्‍यांनी नागपूर येथे मेळावा आयोजीत केला असता तक्रारदारांना पर्यटनावर जाण्‍याची इच्‍छा झाली म्‍हणुन त्‍यांनी गैरअर्जदाराचे कर्मचा-यांने सर्व माहिती दिल्‍यावर त्‍यांचे मागणीनुसार रुपये 500/- प्रत्‍येकी बुकींग करुन मेळाव्‍यात जमा करण्‍यात आली व उर्वरित रक्‍कम गैरअर्जदाराचे मागणीनुसरर 23 व 24 फेबुवारी पर्यत नागपूर येथे जमा करण्‍याबाबत सांगीतले. गैरअर्जदाराचे सांगण्‍यानुसार तक्रारदारांनी दिनांक 23 व 24 फेब्रुवारी ला गैरअर्जदाराकडे रुपये 35,000/- व 40,000/- असे एकुण 75,000/- पर्यटनासाठी जमा केले त्‍यात बुकींगचे रुपये 1,000/- वळते केले. सदर दौरा हा कोस्‍ट टु कोस्‍ट च्‍या अनुषंगाने होता. गैरअर्जदाराने तक्रारदारकडुन सर्व माहीती घेऊन लिहुन घेतली व 45 दिवसात टुरिस्‍ट व्हिसा प्राप्‍त होईल असे आश्‍वासन दिले व आवश्‍यक अर्ज स्‍वाक्षरी करुन घेतला. परंतु दिनांक 24/2/2010 रोजी गैरअर्जदसार क्रं.2 यांनी फोनवर माहिती मागीतली परंतु तक्रारदार क्रं.1 ने आम्‍ही याअगोदरच माहीती दिली आहे व व्हिसाकरिता 45 दिवसात बोलावणार आहे असे सांगीतले परंतु अधिक माहिती गरज आहे व हा अर्ज आधी केलेल्‍या अर्जाला पुरक अर्ज असेल असे सांगीतले. पुढे दिनांक 13/5/2010 रोजी व्हिसा कार्यालयातुन मुलाखतीसाठी बोलावणे आले व त्‍यात मुलाखतीचा तारीख 24/5/2010 ठरविण्‍यात आली होती. सदर मुलाखतीबाबत गैरअर्जदार क्रं.1 यांचेशी संपर्क साधला असता त्‍याअर्जात दिनांक 30/9/2010 चा प्रोग्राम असल्‍याबाबत त्रुटी सांगीतली तेव्‍हा गैरअर्जदाराने दिनांक 5.6.2010 च्‍या टुरची माहिती आम्‍हाला दिली होती व त्‍यात तक्रारदाराचा फायदा आहे म्‍हणुन त्‍यांना अशी माहीती सादर करावी लागल्‍याचे गैरअर्जदाराने सांगीतले.
तक्रारदाराने दिनांक 24/2/2010 रोजी गैरअर्जदाराकडे पर्यटनाकरिता व्हिसा प्राप्‍त करण्‍यासाठी रक्‍कम जमा करुनही गैरअर्जदाराने दिनांक 21/4/2010 व्हिसा करिता अर्ज केला जो तब्‍बल 45 दिवसानंतर दिला. ही गैरअर्जदाराची चुक आहे. याबाबत तक्रारदाराने आक्षेप घेतला असता टुरीस्‍ट व्हिसा आहे त्‍यामुळे व्हिसा मंजूर होण्‍यास त्रास होणार नाही असे सांगीतले. त्‍यावर विश्‍वास ठेवुन तक्रारदाराने उर्वरित रक्‍कम गैरअर्जदाराकडे जमा केली त्‍याची पावती गैरअर्जदाराने तक्रारदारास दिली.
गैरअर्जदाराने सांगीतल्‍याप्रमाणे दिनांक 24/5/2010 रोजी मुंबई येथे व्हिसा कार्यालयात मुलाखतीकरिता हजर झालो असता व्हिसा कार्यालतर्फे काही क्षणातच व्हिसा नाकारण्‍यात आला व त्‍याबाबत पत्र ही दिले. त्‍याबाबत गैरअर्जदार क्रं.1 यांचेशी संपर्क साधला असता दिनांक 25/5/2010 रोजी कळवु असे सांगीतले. पुढे दोन दिवस तक्रारदार वारंवार गैरअर्जदारा क्रं.1 शी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न करीत होती परंतु गैरअर्जदाराने त्‍याना प्रतिसाद दिला नाही शेवटी तक्रारदार निराश होऊन नागपूरला परत आले. पुढे दिनांक 27/5/2010 रोजी गैरअर्जदारास नागपूर येथे भेटले असता वरिष्‍ठ कार्यालयाशी संपर्क करुन 28/5/2010 पर्यत निर्णय कळवु. परंतु गैरअर्जदाराकडुन कोणतेही उत्‍तर न आल्‍याने दिनांक 29/5/2010 रोजी गैरअर्जदारास प्रत्‍यक्ष अर्ज दिला व त्‍याची प्रत गैरअर्जदार क्रं.1 यांना पाठविली. त्‍यास गैरअर्जदाराने कोणतेही उत्‍तर दिले नाही म्‍हणुन दिनाक 10/7/2010 रोजी वकीलामार्फत नोटीस दिली. सदर नोटीसला गैरअर्जदाराने दिनांक 14/7/2010 रोजी संदीग्‍ध उत्‍तर दिले.
तक्रारदार पु्ढे नमुद करतात की गैरअर्जदाराकडे संपुर्ण रक्‍कम जमा करुनही केवळ गैरअर्जदाराचया निष्‍काळजीपणामुळे तक्रारदार अमेरिका दौ-याला जाऊ शकला नाही. तसेच दुस-यांदा व्हिसा मिळण्‍याकरिता अर्ज केल्‍यास तो 5 जुन पर्यत अर्जाची छाननी होणार नाही याची गैरअर्जदारांना माहिती असुन देखील गैरअर्जदारोन निष्‍काळजीपणा केला म्‍हणुन तक्रारदारांनी वेळोवेळी अर्ज केले परंतु गैरअर्जदाराने कोणतेही उत्‍तर न देता दिनांक 23/8/2010 रोजी सर्व दोष तक्रारदाराचा दाखविला. म्‍हणुन तक्रारदारांनी ही तक्रार दाखल करुन दौ-यासाठी जमा केलेली रक्‍कम रुपये 3,33,350/- परत करावी सदर रक्‍कमेवर द.सा.द.शे.18टक्‍के दराने व्‍याज द्यावे. गैरअर्जदाराचे कार्यालयात वारंवार येण्‍याकरिता आलेला खर्च रुपये 5,000/- मिळावा.   मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 35,000/-प्रत्‍येकी मिळावे. नोटीस खर्च रुपये 2,000/- व इतर खर्च रुपये 5,000/- तक्रारीची खर्च रुपये 6,000/- मिळावा अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस प्राप्‍त होऊन गैरअर्जदार हजर झाले व त्‍यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. 
गैरअर्जदार आपले जवाबात तक्रारदाराने एका तटवर्ती ते दुसरे तटवर्ती क्षेत्र याकरिता बुकींग केले होते व त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने रुपये 1000/- व रुपये 34,000/- रोड शोचे दरम्‍यान भरल्‍याचे मान्‍य केले. बुकींग करतेवेळी तक्रारदारास सहलीची विवरणपत्रिका,मुल्‍य पत्रिका यासहीत बुकींग फार्म व सहलीची वि‍वरणपत्रिका देण्‍यात आलेल्‍या होत्‍या. तकारदारांनी व्हिसा आवेदनावर कार्यवाही करण्‍याकरिता रुपये 40,000/- चा भरणा केला व दस्‍तऐवजांची पुर्तता केली. त्‍यांनतर गैरअर्जदाराने व्हिसा शुल्‍क भरले. तक्रारदाराने व्हिसा मुलाखतीकरिता प्रादेशिक भाषा हिंदी अथवा मराठीला पसंती देतील असे कळविले. त्‍यानंतर दिनांक 21 एप्रिल 2010 रोजी ऑनलाईन अर्ज केला असता त्‍याबाबत पावती मिळाली. मध्‍यंतरी तक्रारदाराने ते निवडणुकीच्‍या कार्यावर नियुक्‍त असल्‍याने दिनांक 10 मे 2010 नंतरची मुलाखतीची तारीख घेण्‍यात यावे असे कळविले. व्हिसा मुलाखतीबाबत जाणुन घेण्‍याकरिता तक्रारदारांना फोन केला असता व्हिसा नाकारल्‍याचे तक्रारदाराने सांगीतले. त्‍यामुळे तक्रारदाराने प्रस्‍थानाचे 15 दिवस अगोदर सहल रद्द केली. त्‍यामुळे अटी व शर्तीनुसार शुल्‍क कमी करुन येणा-या निरस्‍तीकरण रक्‍कम मिळण्‍यास तक्रारदार पात्र होते. व त्‍यानुसार तक्रारदारांना रुपये 2,33,350/- रुपये देऊ केलेली होती.
 
गैरअर्जदार पुढे नमुद करतात की तक्रारदारास व्हिसा 45 दिवसाचे आत मिळवुन देण्‍याचे कोणतेही आश्‍वासन दिले नव्‍हते. व्हिसा प्रदान करणे किंवा नाकारणे हे पुर्णतः दुतावासाचे अखत्‍यारीमधे असते. तक्रारदाराने सहलीचे 15 दिवस अगोदर सहज रद्द केल्‍यामुळे तक्रारदाराला प्रतीव्‍यक्ति रुपये 50,000/- निरस्‍तीकरण शुल्‍क लागु झाले. त्‍याप्रमाणे तक्रारदारांना परतावा देऊ केला असता त्‍यांनी तो नाकारला. त्‍यामुळे गैरअर्जदाराचे सेवेत कोणतीही त्रुटी नाही म्‍हणुन तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्‍तऐवज यादीनुसार एकुण 11 कागदपत्रे दाखल केलीत. त्‍यात ट्रॅव्‍हल कल्‍बची पावती, तक्रारदाराने पाठविलेल्‍या पत्राची प्रत व पोस्‍टाची पावती व कायदेशर नोटीस , गैरअर्जदाराचे नोटीसला उत्‍तर, व्हिसा मिळण्‍यासाठी झालेली कार्यावाहीची कागदपत्रे, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केले.
गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला व सोबत दस्‍तऐवज यादीनुसार कागदपत्रे दाखल केली.
 #####-    का र ण मि मां सा    -#####
 यातील गैरअर्जदाराने या मंचास अधिकार क्षेत्र नाही असा प्राथमिक आक्षेप घेतला आहे. दोन्‍ही पक्षातील कराराप्रमाणे मुंबई येथे अधिकारक्षेत्र देण्‍यात आलेले आहे म्‍हणुन ही तक्रार खारीज करावी असा उजर घेतला आहे. यापुर्वी मा.राष्‍ट्रीय आयोगाने दिलेले निकाल यासंबंधी स्‍वयंस्‍पष्‍ट आहेत. ग्राहक सरंक्षण कायद्याच्‍या कलम 11 मधे जेथे गैरअर्जदार यांची शाखा आहे व व्‍यवसाय आहे वा जेथे अंशतः कारण घडलेले आहे त्‍याठिकाणी अधिकार क्षेत्र येते.
त्‍याशिवाय गैअर्जदाराने योग्‍य ती कार्यवाही न केल्‍याने तक्रारदाराची सहल व्हिसा न मिळाल्‍याने रद्द झाली हे स्‍पष्‍ट आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचे व्हिसा मिळण्‍याकरिता वेळेत अर्ज न पाठविणे, तो फेब्रुवारीमध्‍ये न पाठविता एप्रिलचे शेवटी सदर अर्ज करणे व मुळात स्‍वतः गोंधळ करणे. गैरअर्जदाराचे कर्मचा-यांनी उशीरा अर्ज करणे. गैरअर्जदाराने प्रथम अर्जास पुरक अर्ज केला असे तक्रारदाराला सांगणे चूकीची सुचना तक्रारदारास देऊन त्‍यांच्‍याच फायदा आहे असे सांगणे त्‍यांना भ्रमीत करणे यासर्व बाबी गैरअर्जदारामुळे घडलेल्‍या आहे. परिणामी तक्रारदारास आपला दौरा रद्द करावा लागला. तक्रारदाराने यासंबंधी सुचना देऊन वस्‍तूस्थिती स्‍पष्‍ट करणारे पत्र गैरअर्जदारास त्‍वरीत दिलेले आहे व पोस्‍टाने मुंबई कार्यालयात पाठविलेले आहे. त्‍याची दखल गैरअर्जदाराने घेतलेली नाही. उत्‍तरही दिले नाही. गैरअर्जदाराने नोटीसला सुरवातीला त्रोटक उत्‍तर दिले. परंतु तकारदाराने तारेद्वारे सुचना दिल्‍यानंतर गैरअर्जदाराने तक्रारदाराची नोटीस नाकारली. मात्र तक्रारदाराने सुरुवातीपासुन केलेल्‍या तक्रारीची योग्‍य दखल घेतली नाही. त्‍यामुळे सर्व गोंधळ झालेला आहे हे स्‍पष्‍ट झालेले आहे. व्हिसा रद्द होऊन शकतो मिळेलच असे नाही हे गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे.  त्‍याबाबत दौरा रद्द झाल्‍यास गैरअर्जदाराने तक्रारदारांचे  पैसे कापणे सर्वथा अयोग्‍य आहे व त्‍यासंबंधी गैरअर्जदाराने घेतलेला उजर व तथाक‍थीत अटी व शर्ती ग्राहकावर अन्‍याय करणा-या आहे व अनूचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणा-या आहेत.  हे स्‍वयंस्‍पष्‍टच आहे. यात गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी व अनूचति व्‍यापारी प्रथा दिसुन येते. यास्‍तव आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
       -// अं ति म आ दे श //-
1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2.    गैरअर्जदार यांनी तक्रारदारांकडुन स्विकारलेले रक्‍कम रुपये 3,33,350/- ती स्विकारल्‍याचे तारखेपासुन द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह परत करावे. 
3.   गैरअर्जदारानेतक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी  5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) तक्रारीचा खर्च प्रत्‍येकी रुपये 2,000/- (केवळ दोन हजार रुपये) असे एकुण 7000/- रुपये तक्रारदारांना द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्‍त
झाल्‍यापासुन 30 दिवसांचे आत करावे न पेक्षा वरील रक्‍कमेवर 12 टक्‍के ऐवजी 18 टक्‍के व्‍याज देय लागतील.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.