आदेश (दि.28/02/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगांवकर , 1. तक्रार क्र. 475/2010 व 476/2010 यातील विरुध्द पक्ष एकच आहे तसेच उभयपक्षातील वादाचा विषय समान आहे. दोन्ही प्रकरणातील सुनावणी एकत्रीतरित्या घेण्यात आली. त्यामुळे सदर एकत्रीत आदेशान्वये दोन्ही प्रकरणे निकाली काढण्यात येत आहे ही बाब सर्वप्रथम स्पष्ट करण्यात येते.
2. वादग्रस्त सदनिकांमध्ये तक्रारदारा व्यतीरिक्त इतर कोणत्याही त्रेयस्थ व्यक्तीचा अधिकार निर्माण करण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश मंचाने पारित करावा असा अर्ज प्रतीज्ञापत्रासह दोन्ही प्रकरणात दाखल करण्यात आला. मंचाने तक्रार प्रकरणांची नोटिस जारी केली. विरुध्द पक्षाने आपले लेखी म्हणणे दाखल केले. सुनावणीचे वेळेस हजर असणा-या उभय पक्षांचा युक्तीवाद मंचाने विचारात घेतला. तसेच त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले.
... 2 ... (तक्रार क्र. 475/2010 व 476/2010) 3. तक्रार क्र475/2010 (श्री. कल्पेश शहा व श्रीमती चंपावती शहा विरुध्द कावटाऊन लॅन्ड डेव्हलपमेंट प्रा. लि.,)या प्रकरणात तक्रारदारांनी अंतीम मागणी ही वादग्रस्त सदनिकांचा ताबा विरुध्द पक्षाने त्यांना द्यावा, तसेच रु.5,00,000/- नुकसान भरपाई मिळावी व वेळोवेळी त्यांनी विरुध्द पक्षाला दिलेल्या रक्कमेवर ताबा मिळेपावेतो 18% दराने व्याज मिळावे अशी आहे. तक्रार क्र. 476/2010 (श्री.हसमुख शहा व श्रीमती निलम शहा विरुध्द कावटाऊन लॅन्ड डेव्हलपमेंट प्रा. लि.,) यात तक्रारकदारांची अंतीम मागणी अशी आहे की मंचाने विरुध्द पक्षाला वादग्रस्त सदनिकेचा ताबा त्यांना देण्याचा आदेश पारित कराव, रु.5,00,000/- नुकसान भरपाई मिळावी तसेच विरुध्द पक्षाला दिलेल्या सदनिका खरेदीच्या रकमेवर भरणा तारखेपासुन ते सदनिकेचा ताबा देईपावेतो द.सा.द.शे 18% व्याज मिळावे.
4. लेखी जबाबात उभय प्रकरणी विरुध्द पक्षाने वेगवेगळे आक्षेप उपस्थित केलेले आहेत, त्याचाही विचार मंचाने केला. सर्वप्रथम सदर प्रकरणाचे निराकारणार्थ खालील प्रमुख मुद्दा विचारात घेणे क्रमप्राप्त आहे असे मंचाचे मत आहे. मुद्दा क्र. 1. सदर तक्रारीचे निराकरण करणे या मंचाचे कार्यकक्षेत येते काय? उत्तर – नाही. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1 - तक्रार क्र. 475/2010 यात ज्या वादग्रस्त सदनिकेचा करारनामा विरुध्द पक्षासोबत तक्रारकर्त्यांनी केला त्याची किंमत रु.55,92,483/- रुपये असल्याचे स्पष्ट होते. दि.30/09/2009 रोजी सदनिका क्र. 1203, 12वा मजला, बि विंग, आरटिकाची मागणी विरुध्द पक्षाकडे नोंदविली. या सदनिकेची किंमत रु.55,92,423/- ठरली. कालांतराने उभय पक्षातील करारानामे नोंदविण्यात आले. मंचाच्या मते जिल्हा ग्राहक मंचाला रु.20,00,000/- पर्यंतच्या तक्रारीचे निराकरण करण्याचे अधिकार आहेत. या दोन्ही प्रकरणातील वादग्रस्त सदनिकांची किंमत 55,00,000/- पेक्षा जास्त आहे. तसेच या सदनिकांचे ताबे मिळावेत व त्या व्यतीरिक्त रु.5,00,000/- नुकसान भरपाई व व्याज मिळावे अशी त्यांची मागणी आहे. रु.20,00,000/- या रकमेच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम सदनिकांची किंमत आहे. त्यामुळे जिल्हा मंचाच्या आर्थिक कक्षे पलिकडील ही प्रकरणे असल्याने त्यांचे निराकरण करणे मंचाच्या मते योग्य ठरणारे नाही. तक्रारदार हे योग्य त्या न्यायालयासमोर/आयोगासमोर आपले प्रकरण दाखल करण्यास स्वतंत्र आहेत. त्यांनी तसे केल्यास या मंचासमोरील या प्रकरणांचा प्रलंब कालावधी कालगणनेतुन वगळण्यात येतो. उपरोक्त विवेचनाच्या आधारे तक्रारींचे निराकरण करणे मंचाच्या आर्थिक कार्यकक्षेत येत नसल्याने गुणवत्तेच्या आधारे तक्रारीत उपस्थित होणा-या इतर मुद्दयांचा विचार करण्याचे कोणतेही प्रयोजन नाही असे मंचाचे मत आहे. सबब अंतिम आदेश पारित करणेत येतो-
... 3 ... (तक्रार क्र. 475/2010 व 476/2010) अंतिम आदेश 1.तक्रार क्र.475/2010 व 476/2010 खारीज करण्यात येते. 2.आवश्यक वाटल्यास तक्रारकर्ते आपल्या तक्रारी योग्य त्या न्यायालयासमोर दाखल करण् यास पात्र राहतील. 3.न्यायिक खर्चाचे वहन उभय पक्षांनी स्वतः करावे. दिनांक – 28/02/2011 ठिकाण - ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |