Maharashtra

Nagpur

CC/209/2017

Mr. Shashank Sharad Joshi - Complainant(s)

Versus

Country Vacations - Opp.Party(s)

Adv. S.K.Paunikar

30 Sep 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/209/2017
( Date of Filing : 04 May 2017 )
 
1. Mr. Shashank Sharad Joshi
R/o. 57, Amba Nagar, Manewada Besa Road,Nagpur 440027
Nagpur
Maharashtra
2. Sau. Manjusha Shashank Joshi
R/o. 57, Amba Nagar, Manewada-Besa Road, Nagpur 440027
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Country Vacations
Regd.Office-5-9-16, Saifabad, Opp. Secretariat, Hyderabad 500063
Hyderabad
Andhra Pradesh
2. Country Vacations
Branch Office - Flat No. 337, First floor, Rathi Commercial Complex, Bhagwaghar Layout, Near Ajit Bakery, Dharampeth Opp. Kalidas Apartment, Nagpur 440010
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 30 Sep 2019
Final Order / Judgement

 )आदेश पारित व्‍दारा- श्रीमती चंद्रिका बैस, मा. सदस्‍या )

 

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केलेली आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही एक नोंदणीकृत संस्‍था असून त्‍याचा पत्‍ता वरीलप्रमाणे नमुद आहे व विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे शाखा कार्यालय आहे. विरुध्‍द पक्ष हे याञा आयोजनाचे काम करतात.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यांना दिनांक २६/०४/२०१६ रोजी फोन करुन बोलविले व त्‍यांना कंन्‍ट्री वॅकेशन क्‍लब संबंधीत माहिती दिली. तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्षाची ही योजना पसंत पडली व त्‍यानुसार त्‍यांनी दिनांक २७/४/२०१६ रोजी विरुध्‍द पक्षा  सोबत सदस्‍य बनण्‍यासंबंधी करार केला. विरुध्‍द पक्षाने त्‍यांना रुपये १,८०,०००/- जमा करण्‍याकरीता सांगितले. परंतु वाटाघाटी दरम्‍यान सदरच्‍या योजनेमध्‍ये विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास रुपये ५०,०००/- सुट देण्‍याचे निश्‍चीत केले.  त्‍यामुळे सदरची हॉलिडे पॅक ची योजना तक्रारकर्त्‍याने १० वर्षाकरीता रुपये १,३०,०००/- मध्‍ये घेण्‍याचे निश्‍चीत केले. ठरल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाला मोफत लग्‍नाकरीता लागणारा हॉल, हेल्‍थ क्‍लब, जिम, स्‍पा व मोफत हॉटेलींग १० वर्षाकरीता व भारतामध्‍ये ३ वर्षातुन एकदा या सुविधा देणार असल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुपये १,३०,०००/- जमा केले. त्‍यामुळे  विरुध्‍द पक्षाने एकुण ४ कार्ड तक्रारकर्त्‍याच्‍या नावे व त्‍यांच्‍या मुलींच्‍या नावे दिली परंतू आजतागायत विरुध्‍द पक्षाने हे कार्ड कार्यान्‍वीत  केले नाही व त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांना या कार्डावरील सुविधांचा उपभोग घेता आला नाही. अशाप्रकारे त्‍यामुळे  या सर्व कार्डांचा तक्रारकर्त्‍याला कोणताही फायदा झाला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास जुने कार्ड रद्द करुन नविन सदस्‍यता कार्ड देण्‍यासंबंधी सांगितले व दिनांक ७/२/२०१७ रोजी हे सर्व कार्ड तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयात श्री भुषण यांना नेऊन दिले व तशी पोचपावती घेतली परंतू विरुध्‍द पक्षाने आजतागायत तक्रारकर्त्‍यांच्‍या नावे नविन सदस्‍य कार्ड बनवून दिले नाही. करारपञात ठरल्‍याप्रमाणे रुपये ५०,०००/- सुट दिली होती तरीसुद्धा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास वारंवार रुपये ५०,०००/- ची मागणी केली. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यासोबत अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करुन दोषपूर्ण सेवा दिली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ग्राहक मंचात दाखल केली.
  3. दिनांक ३१/७/२०१७ रोजी मंचात उपस्थित राहण्‍याकरीता विरुध्‍द पक्षास मंचाद्वारे नोटीस पाठविली होती विरुध्‍द पक्षाने मंचात उपस्थित राहुन दिनांक ३१/७/२०१७ रोजी आपले लेखी जबाब दाखल केले. त्‍यात म्‍हटल्‍याप्रमाणे तक्रारकर्ता हा स्‍वतः विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात त्‍यांच्‍या नवनविन योजना जाणून घेण्‍याकरीता आला होता. विरुध्‍द पक्षाने त्‍यांना कोणत्‍याही प्रकारची  जबरदस्‍ती पैसे भरण्‍याकरीता केली नव्‍हती. स्‍वखुशीने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रक्‍कम रुपये १,३०,०००/- भरले व त्‍यांच्‍या क्‍लब ची सदस्‍यता स्विकारली. करारपञावर तक्रारकर्ते व विरुध्‍द पक्ष यांची स्‍वाक्षरी आहे. या करारपञात नमुद शर्ती व अटी प्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली सदस्‍यता रक्‍कम ही बिना परताव्‍याची रक्‍कम (Non Refundable) होती. तरीदेखील तक्रारकर्ते वारंवार त्‍यांच्‍याकडे  जमा केलेली सदस्‍यता रक्‍कम परत मागत होते. आणि करारपञाप्रमाणे ही रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करता येऊ शकत नाही. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला (Annual Maintenance Charge) वार्षिक देखभाल खर्च सुद्धा दिला नाही. यामध्‍ये विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करुन सेवेत ञुटी करण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली आहे.
  4. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दाखल केलेल दस्‍ताऐवज, प्रतिउत्‍तर व विरुध्‍द पक्ष यांचा निशानी क्रमांक ७ वरचा लेखी जबाब तसेच तक्रारकर्त्‍याचा वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकून मंचाने खालिल मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविली

 अ.क्र.         मुद्दे                                                                   उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                    होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

दिली काय ?                                                                             होय

  1. काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडील कंन्‍ट्री वॅकेशन क्‍लबयांचेकडे सदस्‍य बनण्‍याकरीता रुपये १,३०,०००/- दाखल निशानी क्रमांक २ वरील दस्‍ताऐवजाप्रमाणे वेळोवेळी विरुध्‍द पक्षास दिले आहे. त्‍याकरीता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास कंन्‍ट्री वॅकेशन क्‍लबतर्फे सदस्‍यता कार्ड दिले आहे. त्‍याचा नंबर CVNP1CLUB10LB219624 असा असून त्‍यानूसार तक्रारकर्त्‍यास १० वर्षाकरीता, वर्षातुन एकदा, सहा राञी सात दिवस, सिजन- ब्‍ल्‍यु, रुम टाईप स्‍टुडीओ देणार असे लिहुन दिले आहे. या सदस्‍यता कार्डचा उपयोग सदस्‍य, त्‍याची पत्‍नी व त्‍याची दोन मुले करु शकत होते व त्‍याकरीता तक्रारकर्त्‍यास वार्षिक देखभाल खर्च रुपये ८,५००/- विरुध्‍द पक्षास द्यावयाचा होते. हे मुळ सदस्‍यता कार्ड तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयात दिनांक ७/२/२०१७ रोजी नेऊन दिले व ते मुळ कार्ड श्री भुषण यांनी स्विकारल्‍याचे निशानी क्रमांक २ वर नमुद आहे. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यावर दोघांची स्‍वाक्षरी असलेल्‍या करारपञाप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली रक्‍कम ही बिना परताव्‍याची आहे. (Non Refundable). परंतू या करारपञात नमुद असल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍यास १० वर्षाकरीता, वर्षातुन एकदा सहा राञी सात दिवस, सिजन- ब्‍ल्‍यु, रुम टाईप स्‍टुडीओ देणार असे लिहुन दिले आहे. या सदस्‍यता कार्डचा उपयोग सदस्‍य, त्‍याची पत्‍नी व त्‍याची दोन मुले करु शकत होते. परंतु विरुध्‍द पक्षाने कधीच तक्रारकर्त्‍यास या योजनेचा लाभ दिला नाही व त्‍यांचे सदस्‍यता कार्ड कार्यान्‍वीत केले नाही. तक्रारकर्त्‍याने वारंवार विरुध्‍द पक्षास या संबंधी विचारणा केली परंतु त्‍यावर विरुध्‍द पक्षाने कोणतेही समाधानकारक उत्‍तर न दिल्‍यामुळे कंटाळून तक्रारकर्त्‍याने दिनांक २३/०३/२०१७ रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठविली त्‍यावर विरुध्‍द पक्षाने दिनांक १४/०४/२०१७ रोजी उत्‍तर पाठविले. त्‍यात त्‍यांनी कळविले की, तक्रारकर्त्‍याची सदस्‍यता रक्‍कम ही बिना परताव्‍याची आहे त्‍यामुळे सदस्‍यता रक्‍कम करारात ठरल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍यास वापस करता येणार नाही. म्‍हणजेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून भरपूर प्रमाणात रक्‍कम रुपये १,३०,०००/- स्विकारुन देखील त्‍याची सदस्‍यता कार्यान्‍वीत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने भारतात किंवा भारताच्‍या बाहेर कोठेही परिवारासह याञा करण्‍यास जाऊ शकले नाही व तक्रारकर्त्‍याची जमा रक्‍कम देखील विरुध्‍द पक्ष परत करण्‍यास तयार नाही. यावरुन विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केला असून सेवेत ञुटी केल्‍याचे निष्‍पन्‍न होते. सबब अंतिम आदेश खालिलप्रमाणे..

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची जमा रक्‍कम रुपये १,३०,०००/- दिनांक २७/०४/२०१६ पासून ते तक्रारकर्त्‍यास प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज दराने द्यावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासाकरीता रुपये २५,०००/- द्यावे व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.