नि का ल प त्र :- (दि. 24/11/2011)(द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 व 2 वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला यांचेतर्फे वकिलांनी युक्तीवाद केला. आहेत. (2) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला कंपनीने कोल्हापूर येथे हॉलिडे रिसॉर्ट, पॅकेज व क्लबिंगबाबत सेमिनार आयोजित केले होते. त्यास तक्रारदार हे हजर होते. सदर सेमिनारमध्ये सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना हॉलिडे पॅकेज व 2000 चौ. फू. चा प्लॉट कोलाड, जि. रायगड येथे देणेचे मान्य केले होते. त्याप्रमाणे सदर प्लॉट व मेंबरशिपची रक्कम रु.1,99,500/- इतकी रक्कम असून ती 3 वर्षामध्ये हप्त्याने जमा करणेची होती. तसेच सदर रक्कम 1 वर्षात जमा करणेची झालेस सुट देऊन ती रक्कम रु. 1,67,500/- देणेचे सांगितले. याप्रमाणे इच्छुक ग्राहकांनी तात्काळ रक्कम रु. 25,000/- जमा करणेचे सांगितले. सामनेवाला यांचे सांगणेवरुन तक्रारदारांची लगेच दि. 13/02/2008 रोजी रक्कम रु. 25,000/- जमा केले. उर्वरीत रक्कमेचे हप्ते देण्याचे सांगण्यात आले. तक्रारदारांनी दि. 21/02/2008 रोजी परचेस अग्रीमेंट (खरेदीचे करारपत्र) करुन दिले. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांनी दि. 17/03/2008 व दि. 22/03/2008 रोजी तक्रारदारांना कोलाड, जि. रायगड येथील प्लॉट संदर्भात अलॉटमेंट पत्र दिले. व मेंबरशिप म्हणून सामनेवाला यांनी वेळोवेळी रक्कमा घेतलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत. दि. 31/03/2008 रोजी रुपये 5,000/-, तसेच दि. 31/05/2008 रोजी रुपये 45,000/- व दि. 12/06/2008 रोजी रु. 5,000/- दि. 26/06/2008 राजी रु. 5,000/- , दि. 30/06/2008 रु. 10,000/- दि. 27/08/2008 रोजी रु. 10,000/-, 30/06/2008 रोजी रु. 10,000/- , दि. 27/08/2008 रोजी रु. 10,000/- , दि. 31/08/2008 रोजी रु. 10,000/-, दि.3/11/2008 रोजी रु. 5,000/- दि. 5/12/2008 रोजी रु. 47,500/- तसेच वार्षिक मेंटेनन्स म्हणून दि. 3/11/2008 रोजी रक्कम रु. 3,000/-, असे एकूण रक्कम रु. 1,70,500/- तक्रारदारांकडून जमा करुन घेतलेले आहेत. त्यानंतर दि. 1/01/2009 रोजी मेंबरशिप सर्टीफीकेट तक्रारदारांना दिलेले आहे. तसेच दि. 6/02/2009 रोजी स्मार्ट कार्ड दिलेबाबत तक्रारदार यांना कळविण्यात आलेले आहे. तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना प्लॉटची खरेदी करुन दिलेली नाही. तसेच मेंबरशिप सुधिवा देण्यासही टाळटाळ सुरु केली आहे. तसेच याबाबत चौकशी केली असता तक्रारदारांना सदर प्लॉट व हॉलिडे पॅकेज व रिसॉर्टची सुविधा बाहेरच्या देशात घेण्यास सांगितले. परंतु त्याप्रमाणे आर्थिकदृष्टया , मानसिकदृष्या शक्य नाही असे त्यांना सांगितले. तसेच तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि. 15/01/2011 रोजी नोटीस पाठविली आहे. व तक्रारदारांनी भरलेली रक्कम रु. 1,70,500/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाप्रमाणे परत मागणी केलेली आहे. त्यास सामनेवाला यांनी खोटे उत्तर दिलेले आहे. त्यानंतरही सामनेवाला यांनी दि. 21/02/2011 रोजी व दि. 6/06/2011 रोजी ई-मेल द्वारे वार्षिक मेटेंनन्स खर्चाची रक्कमेची मागणी केली आहे. परंतु तक्रारदारांना हॉलिडे रिसॉर्ट, हॉलिडे पॅकेजची मागणी केली असता त्यास नकार दिलेला आहे. सबब, सामनेवाला यांचेकडे एकूण रक्कम रु. 1,47,500/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने देण्याचे आदेश व्हावेत. किंवा कोलाड, जि. रायगड येथील 2000 चौ.फूटाचा प्लॉट नोंद खरेदीपत्र करुन देणेचे आदेश व्हावेत. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,00,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे अनुक्रमे रक्कम रु. 25,000/-, रु. 5000/-, रु. 45,000/-, रु. 5,000/-, रु. 5,000/- ,रु. 10,000/- रु. 10,000/-, रु. 10,000/- रु. 5,000/- रु. 47,500/-, रु. 3,000/- जमा केलेबाबत पावती व अनुक्रमे (रिसिट क्र. 139, 186, 271, 282, 294, 307, 366, 390, 460, 498, 461), सामनेवाला यांनी मेंबरशिप दिलेबाबत तक्रारदार यांना दिलेले सर्टीफीकेट, सामनेवाला यांनी तक्रारदारांना यांना प्लॉट अलॉट केलेबाबत दिलेले पत्र , सामनेवाला यांनी मेंटेनन्स मागणी केलेले पत्र, तक्रारदारांनी वकिलामार्फत पाठविलेली वकील नोटीस, सामनेवाला यांचे वकिलांनी नोटीसीस उत्तर, सामनेवाला क्र. 1 यांनी दिलेले अलोटमेंट पत्र, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना स्मार्ट कार्ड दिले त्याबाबतचे पत्र ,सामनेवाला यांनी तक्रारदार यांना वार्षिक मेटेंन्नस मागणी केलेबाबतचे इ-मेल इत्यादीच्या प्रती व शपथपत्रे दाखल केलेली आहेत. (4) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचे एकत्रितरित्या म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रारीतील कथने परिच्छेदनिहाय नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांची तक्रार ही ग्राहक सरंक्षण कायद्याच्या तरतुदीबाहय आहे. तसेच तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे सेमिनार आयोजित केलेले होते परंतु तक्रारदारांना हॉलिडे पॅकेज व 2000 चौ.फू. चा प्लॉट कोलाड, जि. रायगड येथे देण्याचे मान्य केलेले नव्हते. ठरावाप्रमाणे तक्रारीत उल्लेख केलेली रक्कम प्रदत्त सभासदत्व शुल्क असून त्याचे प्लॉटशी काहीही घेणे देणे नाही. करारपत्र प्लॉट खरेदी करण्याचे नसून सहलीकरिता सभासदत्वता खरेदी करण्याचे आहे. विनामुल्य वा फुकट सौजन्य भुखंड करिता असणारे अटी व आश्वासन पत्रक प्रदान केले ज्याला भुखंडाकरिता अलसेले अलॉटमेंट लेटर किंवा निर्गमन पत्र समजणे चुकीचे आहे. कराराच्या परिधी बाहय कोणते कार्य करण्यास सामनेवाला बाध्य नाही. ग्राहक सरंक्षण कायदा, कलम II(o) शिवाय तक्रारदारांना तक्रार दाखल करता येणार नाही. सदरची वस्तुस्थिती करारात्मक असल्याने प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक सरंक्षण कायदा कलम II(o) प्रमाणे न्यायिकदृष्टया बाधित आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकला आहे. तसेच उपलब्ध कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी तक्रारीत उल्लेख केलेली रक्कम मेंबरशिप पेमंट म्हणून सामनेवाला यांनी जमा केलेली होती. युक्तीवादाच्या वेळी कराराच्या अटी व शर्ती सामनेवाला यांचे वकिलांनी मंचाचे निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही या वस्तुस्थितीकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. तक्रारदारांनी उपस्थित केलेला वाद तसेच त्या अनुषंगाने दोन्ही बाजूंमध्ये झालेला करार विचारात घेता सदरचा वाद हा time share propertyबाबत दिसून येतो. व तो ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीखाली येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. त्यासाठी पूर्वाधार म्हणून- 1) 2003 (3) CPR 137 UNION TERRITORY CONSUMER DISPUTES RSEDRESSAL COMMISSION, CHANDIGARH Sterling Holiday Resort (i) Ltd. & Ant…….. Appellants V/S. V.P. Gupta …….. Respondent Appeal Case NO. 24 of 2003 Decided on 12/05/2003 Consumer Protection Act, 1986 – Sections 2 & 14 – Consumer—Under a scheme complainant made a deposit of Rs. 59,000/- with appellant to avail holidays at specified resorts in India. Every year—Resort facility asked for in 1998 not made available—Claim for compensation—Complainant having purchased time share in immovable property could not be said to be a consumer—Averments in complaint did not amount to Consumer Dispute Impugned order of Distt. Forum awarding compensation was liable to be set aside. Result: Appeal allowed. Complainant having obtained membership of resort scheme to avail resort facility every year would be a purchaser of time share in immovable property of resort company & would not be a consumer. 2) II (2011) CPJ 28 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI. DINAKAR RAO …… Petitioner V/S. GREEN FIELDS (INDIA) PVT. LTD.& ORS. ...... Respondent Revision Petition No. 1474 of 2007 against Order dated 14/02/2007 in Appeal No. 236 of 2007 Decided on 22/02/2011. Consumer Protection Act, 1986—2(1)(g), 14(1)(d), 21(b) – Prize—Time Share Property – Membership—Agreement—Facilities not provided—No refund—Complainant got prize on entry ticket—OP offered time share property—Complainant accepted offer and paid amount—Entered into purchase agreement --OP resort did not come with functional existence even after 5 years—Complainant after 5 years again booked a room with OP – No facility provided by OP—Alleged deficiency in service – District Forum allowed complaint—Complainant not satisfied approached State Commission—State commission dismissed appeal—Hence revision—No refund of membership fee—Purchase agreement signed by complainant provided no refund of membership fee—Orders of For a below upheld. Result: Revision Petition dismissed. ---------- 3) I (1997) CPJ 63 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI DALMIA RESORTS INTERNATIONA( P) LTD. ……. Appellant V/S. DR. RANJANA GUPTA & ANR. …….. Respondents First Appeal No. 729 of 1993—Decided on 17/06/1996 (i) Consumer Protection act, 1986—Section 2(1)(b)—“Consumer disputes—“Holiday Resort”—“Civil Suit”—Complainant purchased the time-share in a Holiday Resort—FOR A below allowed the complaint—Hence revision—Whether there is a consumer dispute ? – (No_ Held: We are clearly of opinion that the approach approach made by the respondents herein who are the complainants before the State Commission, Delhi for the grant of relief under the Consumer Protection Act was clearly misconceived because the transaction between the parties is one of purchase of time share in immovable property and any dispute between the parties arising out of the said transaction cannot be regarded as a consumer dispute. (ii) Consumer Protection Act, 1986—Section 2(1)(d)—“ Consumer”—Whether the complainant is a consumer in a purchase of a time-share in immoveable property ? Held: One of the principal pleas raised by the petitioner is regarding the alleged unconscionable nature of the one of the conditions of the agreement entered into between the parties which entitles that the person who has purchased the time-share in the holiday resort should give a prior notice of at least three weeks before he deputes a guest of his to stay in the particular apartment in the time-share unit. The question also can be agitated only before a Civil Court and not before the Consumer Forum. Such being the position we consider that the State Commission was clearly in error in granting any relief to the complainant and the order appeal, set aside the Order passed by the State Commission and reserve liberty to the complainants(respondent herein) to agitate all their contentions before a competent Civil Court having jurisdiction to adjudicate over the matter. Since the proceedings instituted by the complainants before the State Commission have failed only on the technical ground that the complainants are not consumers entitled to invoke the jurisdiction of the Consumer Forum. Result : Complaint dismissed. ----------------- 4) 2002 (2) CPR 399 STATE CONSUMER DISPUSTES REDRESSAL COMMISSION, MADHYA PRADESH : BHOPAL Bushbeta Holida Ownership world Life and Adventure Resorts Mangala &Ors ……….. Appellants V/S/ Abhay Chaurasia & Ors. ………… Respondents Appeal No. 994/99 Decided on 15/04/2002 Consumer Protection Act, 1986—Sections 12 and 17 – Purchase of Holiday Tourist Resort – Despite payment of the amount, accommodation not provided to complainant every year for a week at different places—District Forum ordered refund of the amount with interest and awarded compensation—Appeal – Transaction is one purchase of time share in immovable property which is not a consumer dispute—Impugned order was liable to be set aside. Result : Appeal allowed. Purchase of Holiday Tourist Resorts whereby accommodation in Holiday resorts is to be provided every year is a transaction for purchase of a time share in immovable property which is not a consumer dispute. ------------- तक्रारदारांनी दाखल केलेला पूर्वाधार हे बंगलोर येथील ग्राहक तक्रार निवारण मंचाचे दिलेले निर्णय दाखल केलेले आहेत. परंतु सदरचे निष्कर्ष हे बंधनकारक नाहीत. परंतु सामनेवाला कंपनीने उपरोक्त दिलेले पूर्वाधार व वस्तुस्थितीचा विचारात घेता सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आ दे श 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात येते. 2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |