नि का ल प त्र :- (दि.25/08/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोंद पोच डाकेने नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 व 3 यांना नोंद पोच डाकेने नोटीस पाठविल्याबाबत पोस्टाची पोहच प्रस्तुत कामी दाखल आहे. सामनेवाला क्र. 2 यांना नोटीस बजावणी न झालेने दैनिक वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस प्रसिध्द केली. उपरोक्त प्रमाणे बजावणी होऊनही सामनेवाला हे प्रस्तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत. सुनावणीच्यावेळी तक्रारदारांचे वकिलांनी युक्तीवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे सामनेवाला क्र. 1 चे कंट्री व्हेकेशन इंटरनॅशरल हॉलिडे क्लब सभासद असून सामनेवाला क्र. 2 व 3 हे सदर कंपनीचे जबाबदार अधिकारी आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारांना सभासद करुन घेत असताना रक्कम रु. 30,000/- व तदनंतर रक्कम रु. 3,000/- अशी एकूण रक्कम रु. 33,000/- भरुन घेतली आहे. व त्याची रितसर पावती दिलेली आहे. व दि. 4/06/2007 रोजी परचेस अग्रीमेंट केलेले आहे. सामनेवाला यांनी कराराप्रमाणे तक्रारदारांना कोणतीही सेवा दिलेली नाही याची सामनेवाला यांना जाणीव करुन दिली असतानाही त्यांनी प्रतिसाद न दिलेने तक्रारदारांनी गुंतविलेल्या रक्कमेची मागणी केली व सदर रक्कम दिली नाही. सबब, सदर रक्कम रु. 33,000/- व शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्चापोटी रक्कम रु. 7,000/- अशी एकूण रक्कम रु. 45,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (2) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी तक्रारदार यांना पाठविलेले पत्र, व तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्कमा भरलेल्या पावत्या, व तक्रारदार व जाबदार यांचेमधील पर्चेस अग्रीमेंट, तक्रारदार यांनी सामनेवाला यांपस पाठविलेली नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्राचे अवलोकन केले आहे. तसेच तक्रारदारांच्या वकिलांचा युक्तीवाद विस्तृत व सविस्तरपणे ऐकला. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि. 7/06/2007 रोजी केलेला पत्रव्यवहार विचारात घेता तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीने सभासद करुन घेतलेले आहे. व तक्रारदारांचेकडून दि. 4/06/2007 रोजी रक्कम रु. 30,000/- स्विकारलेबाबत स्वतंत्रपणे करार केलेला आहे. तसेच रक्कम रु. 3,000/- स्विकारलेबाबत पावती दिलेली आहे. सदर परचेस अग्रीमेंटचे अवलोकन केले असता सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना कंट्री व्हेकेशन इंटरनॅशरल हॉलिडे क्लब चे सभासद करुन घेतलेले आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. तक्रारदारांचे वकिलांनी युक्तीवादाचे वेळेस सदर करारातील अटीप्रमाणे कंट्री व्हेकेशन इंटरनॅशरल हॉलिडे क्लब मेंबरशिपच्या सुविधा दिल्या नसल्याचे प्रतिपादन केले आहे. सदरचा युक्तीवाद व तक्रारदारांनी दाखल केलेले शपथपत्र याचा विचार करता सामनेवाला कंपनीने तक्रारदारांकडून रक्कम रु. 33,000/- स्विकारुन करारातील अटीप्रमाणे सेवा-सुविधा दिल्या नसल्याने सामनेवाला कंपनीने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला आहे असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सबब, तक्रारदार हे रक्कम रु. 33,000/- मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. सबब, आदेश. आ दे श (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना रक्कम रु. 33,000/- (अक्षरी रुपये तेहतीस हजार फक्त) द्यावी. तसेच, सदर रक्कमेवर दि. 4/06/2007 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याज द्यावे. (3) सामनेवाला क्र.1 संस्थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1000/- /-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |