DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/284/2018 | ( Date of Filing : 09 Apr 2018 ) |
| | 1. SHRI. SHIVPRASAD LAXMANLAL BISEN | R/O. PLOT NO. 56, YESHA NAGAR, NEAR PRAKRUTIK CHIKITSALAYA, NEAR GODHNI RAILWAY STATION, BOKHARA, GODHNI, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. COUNTRY VACATION, INTERNATIONAL HOLIDAY CLUB, A DIVISION OF COUNTRY CLUB (INDIA LTD.) | 6-3-1219, BEGAMPETH, HYDERABAD-500016 | HYDERABAD | ANDHRA PRADESH | 2. COUNTRY VACATIONS, THROUGH CUSTOMER CARE MANAGER | BRANCH OFF. AT, FLAT NO. 337, RATHI COMMERCIAL COMPLEX, DHARAMPETH, NAGPUR-10 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | | HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER | |
|
For the Complainant: | ADV. ANURADHA DESHPANDE, Advocate | For the Opp. Party: | |
Dated : 24 Jun 2020 |
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये - - तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात असे नमूद केले की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला क्लबची सदस्यता, हॉली डे पॅकेज व विमा इत्यादी करिता रुपये 2,00,000/- चा पॅकेज असल्याचे सांगितले होते. तसेच त्यात कम्युनिटी हॉल, संपूर्ण परिवाराची सदस्यता, हॉली डे पॅकेज इत्यादी समाविष्ट होते. विरुध्द पक्षाच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे रुपये 32,000/- नगदी स्वरुपात आणि रुपये 47,200/- चा धनादेश दिला होता. त्याप्रमाणे उभय पक्षांमध्ये दि. 06.02.2012 रोजी स्टॅम्प पेपरवर करारपत्र करण्यात आला. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सेवा देण्याकरिता दोन कार्ड दिले होते. परंतु तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे सदस्यत्वाची संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास कोणत्याही प्रकारची सेवा पुरविली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे जमा केलेली रक्कम परत करण्याची विनंती केली. सदरची रक्कम विरुध्द पक्षाने परत न केल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 06.01.2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. त्यानुसार विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नोटीसला दि. 23.01.2017 रोजी उत्तर दिले व त्यात नमूद केले की, तक्रारकर्त्याची ही मागणी कायदेशीररित्या अवैध असल्यामुळे अमान्य करण्यात येते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून स्विकारलेली रक्कम परत न केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने सेवेत त्रुटी केली असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे घोषित करावे. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्या द्वारे घेतलेली रक्कम रुपये 77,200/- 24 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्याला परत करण्याचा आदेश द्यावा. तसेच विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 1,50,000/- देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष 1 यांना मंचामार्फत नोटीस बजाविण्यात आली होती. सदरची नोटीस प्राप्त होऊन ही विरुध्द पक्ष 1 हे मंचासमक्ष हजर झाले नाही अथवा आपले म्हणणे अथवा लेखी उत्तर सादर न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 01.11.2018 रोजी पारित करण्यात आला.
- विरुध्द पक्ष 2 यांचे नांव तक्रारीतून वगळण्याकरिता तक्रारकर्त्याने दि. 19.10.2019 रोजी अर्ज सादर केला होता. सदरच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली व त्यानंतर तक्रारकर्त्याचा सदरचा अर्ज मंजूर करण्यात आल्यामुळे विरुध्द पक्ष 2 चे नांव सदरच्या तक्रारीतून वगळण्यात आल्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद इत्यादीचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
मुद्दे उत्तर - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय? होय.
- विरुध्द पक्षाने सेवेत त्रुटी केली आहे काय? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून वर नमूद केल्याप्रमाणे कम्युनिटी हॉल, क्लबची सदस्यता, हॉली डे पॅकेज व विमा इत्यादीकरिता एकूण रक्कम रुपये 2,00,000/- चा पॅकेज होता. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे एकूण रक्कम रुपये 77,200/- जमा केले होते, हे दाखल दस्ताऐवज व पावत्यांवरुन स्पष्ट होते यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते. तसेच उभय पक्षांमध्ये दि. 06.02.2012 रोजी स्टॅम्प पेपरवर करार करण्यात आला व तक्रारकर्त्याच्या नावाने आणि त्याच्या पत्नीच्या नावाने उपरोक्त सेवा देण्याकरिता क्लबचे कार्ड दिले होते ( सदरचे दस्ताऐवज नि.क्रं. 2 वर दाखल केलेले आहे), परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची सेवा न पुरविल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे जमा केलेली रक्कम परत करण्याची विनंती केली असता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सदरची रक्कम परत केली नाही . म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दि. 06.01.2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली त्यावर विरुध्द पक्षाने सदरच्या नोटीसला दि. 23.01.2017 रोजी उत्तर दिले व तक्रारकर्त्याची ही मागणी कायदेशीररित्या अवैध आहे असे नमूद करुन नामंजूर ही विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी असून त्याने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट दिसून येते.
सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येते. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला योग्य ती सेवा न पुरविल्यामुळे तक्रारकर्त्याकडून स्विकारलेली रक्कम रुपये 77,200/- व त्यावर दि. 31.01.2012 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजसह रक्कम तक्रारकर्त्याला परत करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL] | PRESIDENT
| | | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| | | [HON'BLE MR. SUBHASH R. AJANE] | MEMBER
| | |