Complaint Case No. CC/135/2020 | ( Date of Filing : 24 Feb 2020 ) |
| | 1. PRAKASH MORESHWARAO DESHPANDE | 203, GOVIND SIDDHI APARTMENTS NAVNATH SOCIETY, NARENDRA NAGAR, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA | 2. POONAM PRAKASH DESHPANDE | 203, GOVIND SIDDHI APARTMENTS NAVNATH SOCIETY, NARENDRA NAGAR, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. COUNTRY CLUB HOSPITALITY AND HOLIDYA LIMITED THROUGH ITS MANAGING DIRECTOR | AMRUTHA CASTLE OPPOSITE SECRETARIAT HYDERABAD 500063 | HYDERABAD | TELANGANA STATE | 2. COUNTRY CLUB HOSPITALITY | DIVISION OFFICE, 305,306, 3RD FLOOR, GERA CHAMBERS, OFF BOAT CLUB ROAD, PUNE-411001 | PUNE | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे.
- वि.प. कन्ट्री क्लब हॉस्पीटॅलीटी आणि हॉलीडेज लि. यांनी तक्रारकर्ते यांना “लकी विनर” चे अंतर्गत “ फ्री गीफ्ट” लागल्याचे सांगीतले. त्यानूसार तक्रारादारांनी वि.प. क्रं.2, श्री अंकन मूजुमदार यांचेकडे दिनांक 2.2.2017 रोजी रुपये 79,000/- ची 5 वर्षाकरिता क्लब मेंबरशिप घेतली त्यात त्यांना असे सांगण्यात आले होते की, तक्रारकर्ते यांना सेटर पॉइंट हॉटेल, ली मेरिडीयन, इत्यादी पंचतारांकीत हॉटेलचे 52 देशांमधील 3 दिवस व 2 रात्र राहण्याकरिता क्लबचे सदस्यत्व देण्यात येत आहे व त्याबाबत उभयपक्षातील करारपत्र अनेक्शर-ए वर दाखल आहे. तक्रारकर्ते यांनी त्यांच्या लग्नाची सिल्हर जुबली साजरी करण्याकरिता मुंबई आणि हैद्राबाद येथील पंचतारांकीत हॉटेलचे बुकींग दिनांक 24.3.2017 रोजी करण्याकरिता वि.प.क्रं. 2 यांना सांगीतले. त्याकरिता त्यांनी तक्रारकर्ते यांना 1,45,000/- अतिरिक्त रक्कम जमा करावी लागेल असे कळविले व सदरची रक्कम तक्रारकर्ते यांनी अनेक्शर-बी वरुन वि.प.ला दिल्याचे दिसून येते. अशाप्रकारे तक्रारकर्ते यांनी वि.प.कडे एकुण रक्कम रुपये 2,24,000/- जमा केले. वि.प.ने तकारकर्ते यांना दिनांक 28.2.2017 व 26.10.2017 रोजी जमा केलेल्या रक्कमेची पावती दिली असुन ती अॅनेक्शर-सी वर दाखल आहे. तसेच वि.प.ने सभासदस्यत्वाचे प्रमाणपत्र क्रमांक–CVNP1TCLUB5SB232566, दिनांक 2.2.2017 रोजी वि.प. ने तक्रारकर्ते यांना दिले व या सभासदत्वाची मुदत फेब्रवारी-2023 पर्यत होती हे अनेक्शर –डी वरुन दिसुन येते. तक्रारकर्ते यांचे म्हणण्यानूसार ही सभासदत्वाची शुल्क नापरतावा असल्याबाबतची माहिती तकारकर्ते यांना दिली नव्हती व सभासदत्व शुल्क स्वीकारल्यानंतर करारपत्राची प्रत वि.प.ने तक्रारकर्ते यांना दिली. तसेच सदरचे करारपत्रावर अत्यावश्यक असणारी साक्षीदाराची सही वि.प.ने घेतलेली नाही त्यामूळे सदरचे करारपत्र तक्रारकर्ते यांना कायद्यानुसार बंधनकारक नाही. यावरुन वि.प.चे आधीपासूनच तक्रारकर्ते यांची फसवणूक करण्याचा विचार होता. तसेच तक्रारकर्ते यांना पून्हा 6 रात्र व 7 दिवसांकरिता प्रशासकीय खर्च रुपये 5,500/- अतिरिक्त मागणी केली याबाबत चे दस्त अनेक्शर-ई वर दाखल आहे.
- तसेच वि.प. ने तक्रारकर्ते यांना खोटे आश्वासन देऊन सांगीतले की, पोहण्याची,जिमची, इंडोअर खेळ, तसेच नागपूर येथील तळवलकर जिम चा उपभोग घेऊ शकता असे खोटे माहितीपत्रक अनेक्शर-एफ वर जोडले आहे. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी मार्च-2017 मधे वि.प.क्रं.2 यांना कळविले की त्यांना जून-2017 मध्ये गंगटोक/दार्जिलिंग येथे फिरावयास जायचे आहे. परंतु त्यांनी बुकींग उपलब्ध नसल्याने व्यवस्था होऊ शकत नसल्याचे वि.प.ने तक्रारकर्ते यांना कळविले. तक्रारकर्ते यांनी गंगटोक येथील हॉटेल मधे फोन केला असता त्यांना असे कळले की कंन्ट्री क्लबचे नावे दोन खोल्या आरक्षीत असुन त्या उपलब्ध आहेत. ही सुचना तक्रारकर्ते यांनी वि.प. यांना दिली असता वि.प.ने तकारर्ते यांचेकडुन अतिरक्त रक्कम भरावी लागेल असे कळविले. ही बाब तक्रारकर्ते यांना न पटल्याने त्यांनी दिनांक 28.10.2017 रोजी वि.प.क्रं.2 यांना पत्राव्दारे विचारणा केली हे अनक्शर- जी वर दाखल आहे. तक्रारकर्ते यांनी वि.प.ला त्याची जमा रक्कम रुपये 2,24,000/- परत मिळण्याकरिता पत्रव्यवहार केला होता याबाबत अॅनेक्शर-एच अभिलेखावर दाखल आहे. परंतु तक्रारकर्ते यांना त्यांची रक्कम परत न मिळाल्यामूळे त्यांनी अॅनेक्शर-आय नुसार वि.प.यांना कायदेशिर नोटीस पाठविली. त्याबाबत पोचपावती अभिलेखावर दाखल आहे. सदर नोटीसला वि.प.चे वकीलांनी उत्तर दिल्याचे अभिलेखावरुन दिसून येते. त्यात असे नमुद आहे की, तक्रारकर्ते यांनी भरलेली रक्कम ही क्लबचे सभासदत्वाचे शुल्क असुन ते नापरतावा आहे कारण हे शुल्क वि.प.ने नफा कमविण्याकरिता कुठेही गुंतविले नाही किंवा ती रक्कम मुदत ठेव म्हणुन देखिल ठेवलेली नाही. त्यानंतर अॅनेक्शर-जे वर तक्रारकर्ते यांनी पोलीस स्टेशन येथे फसवणूकीबाबत तक्रार दाखल केल्याबाबत प्रत दाखल केली आहे.
- त्यानंतर वि.प.ने तक्रारदाराला सुविधा न देता वारंवार रक्केमेची मागणी केली म्हणून तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे की वि.प.ने तक्रारकर्ते यांची जमा रक्कम रुपये 2,24,000/- दिनांक 2.2.2017 पासून द.सा.द.शे 18टक्के दराने रक्कमेच्य प्रत्यक्ष अदासगी पावेतो येणारी रक्कम परत करावी तसेच तक्रारकर्ते यांना झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 75,000/- मिळावे.
- तक्रारकर्ते यांची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षाला आयोगा मार्फत नोटीस पाठविण्यात आली असता वि.प. नोटीस प्राप्त होऊन सुध्दा आयोगासमक्ष हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 25.4.2022 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
का र ण मि मां सा - वि.प.चे कंपनी कडे तक्रारकर्ते यांना “लकी विनर” चे अंतर्गत फ्री गीफ्ट लागल्याचे सांगीतले. त्यानूसार त्यांनी वि.प. क्रं.2 श्री अंकन मूजुमदार यांचेकडे दिनांक 2.2.2017 रोजी रुपये 79,000/- एवढी रक्कम जमा करुन 5 वर्षाकरिता क्लबचे सदस्यत्व घेतले व त्याचे करारपत्र अॅनेक्शर-ए वर दाखल आहे. तसेच रक्कम वि.प. कडे रक्कम जमा केल्याबाबतची पावती अॅनेक्शर –सी वर दाखल आहे.तक्रारकर्ते यांनी त्यांच्या लग्नाची सिल्हर जुबली साजरी करण्याकरिता मुंबई आणि हैद्राबाद येथील पंचतारांकीत हॉटेलचे बुकींग दिनांक 24.3.2017 रोजी करण्याचे वि.प.क्रं. 2 यांना सांगीतले. त्याकरिता तक्रारकर्ते यांनी 1,45,000/- अतिरिक्त रक्कम वि.प.कडे जमा केले व ते (Vacations upgradation agreement) अनेक्शर-बी वरुन वि.प.ला दिल्याचे स्पष्ट होते. अशाप्रकारे तक्रारकर्ते यांनी वि.प.कडे एकुण रक्कम रुपये 2,24,000/- जमा केले. वि.प.ने तकारकर्ते यांना दिनांक 28.2.2017 व 26.10.2017 रोजी जमा केलेल्या रक्कमेची पावती दिली असुन ती अॅनेक्शर-सी वर दाखल आहे. तसेच वि.प.ने तक्रारकर्ते यांना सभासदस्यत्वाचे प्रमाणपत्र क्रमांक –CVNP1TCLUB5SB232566, दिनांक 2.2.2017 रोजी दिले व या सभासदत्वाची मुदत फेब्रुवारी-2023 पर्यत होती हे अनेक्शर –डी वरील दाखल कन्ट्री क्लबचे कार्डवरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्ते यांना पून्हा 6 रात्र व 7 दिवसांकरिता प्रशासकीय खर्च रुपये 5,500/- अतिरिक्त मागणी केली याबाबतचे दस्त अॅनेक्शर-ई वर दाखल आहे.
- अशाप्रकारे वि.प. ने तक्रारकर्ते यांना आश्वासन देऊन सांगीतले की, पोहण्याची,जिमची, इंडोअर खेळ, तसेच नागपूर येथील तळवलकर जिम चा उपभोग घेऊ शकता असे माहितीपत्रक अॅनेक्शर-एफ वर, दाखल आहे. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी वि.प.यांना कन्ट्री व्हॅकेशन, हेड ऑफीस, धरमपेठ नागपूर यांच्याकडे करारात नमुद असणा-या सुविधा मिळण्याबाबत पत्र दिले ते अॅनेक्शर-जी वर दाखल आहे. तसेच अॅनेक्शर-एच वर दाखल दस्तऐवजांवरुन असे दिसून येते की तक्रारकर्ते यांनी वि.प.ला त्याची जमा रक्कम रुपये 2,24,000/- परत मिळण्याकरिता पत्रव्यवहार केला. परंतु तक्रारकर्ते यांना त्यांची रक्कम परत न मिळाल्यामूळे त्यांनी अॅनेक्शर-आय नुसार वि.प.यांना कायदेशिर नोटीस पाठविली. त्याबाबत पोचपावती अभिलेखावर दाखल आहे. सदर नोटीसला वि.प.चे वकीलांनी उत्तर दिल्याचे अभिलेखावरुन दिसून येते. त्यात असे नमुद आहे की, तक्रारकर्ते यांनी भरलेली रक्कम ही क्लबचे सभासदत्वाचे शुल्क असुन ते नापरतावा आहे कारण हे शुल्क वि.प.ने नफा कमविण्याकरिता कुठेही गुंतविले नाही किंवा ती रक्कम मुदत ठेव म्हणुन देखिल ठेवलेली नाही. त्यानंतर अॅनेक्शर-जे वर तक्रारकर्ते यांनी पोलीस स्टेशन येथे फसवणूकीबाबत तक्रारीची प्रत दाखल केली आहे.
- तक्रारकर्ते यांनी मार्च-2017 मधे वि.प.क्रं.2 यांना कळविले की त्यांना जून-2017 मध्ये गंगटोक/दार्जिलिंग येथे फिरावयास जायचे आहे. गंगटोक येथील हॉटेलमधे कन्ट्री क्लबचे नावाने खोल्या उपलब्ध असतांना सुध्दा वि.प.ने तक्रारकर्ते यांना खोटी माहिती देऊन व्यवस्था होऊ शकणार नाही असे सांगीतले. वि.प.ने तक्रारकर्ते यांचे कडुन कल्बचे सभासदत्वापोटी भलीमोठी रक्कम रुपये 2,24,000/- स्वीकारुन त्यांना त्यात 52 देशातील पंचतारांकीत हॉटेलमधे राहण्याची सोय उपलब्ध करुन देणार होते. परंतु तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या सर्व दस्तऐवजांवरुन असे दिसते की वि.प.ने तक्रारर्ते यांचे सोबत धोकाधडी व फसवणूक केली आहे व तक्रारकर्ते यांनी वि.प.यांचेकडे रक्कम जमा केल्याचा दिवसापासून एकाही प्रवासाचे आयोजन करुन दिले नाही ही वि.प.चे सेवेतील त्रुटी आहे. तसेच वि.प. यांनी तक्रारकर्ते यांचेप्रती अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असल्याचे दिसून येते. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 2,24,000/- परत करावे. सदर रक्कमेवर दिनांक 2.2.2017 पासुन द.सा.द.शे. 14 टक्के व्याजासह मिळुनयेणारी रक्कम परत करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांना झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- वरील आदेशाचे पालन वि.प.क्रं.1 व 2 ने संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या करावे.
- विरुध्द पक्षांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |