(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार हे गैरअर्जदार यांच्या बँकेचे ग्राहक असून, त्यांना देण्यात आलेल्या सेवेतील त्रुटीमुळे मंचात तक्रार दाखल केली आहे. (2) त.क्र.89/10 अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार अर्जदाराचे गैरअर्जदार क्र.1 यांच्या बँकेत खाते असून, गैरअर्जदार क्र.2 हे बँकेचे कर्मचारी आहेत. अर्जदाराने एन.आर.अग्रवाल यांच्या नावे 10,000/- रुपयाचा धनादेश दिला होता. सदरील धनादेश वटवू नये यासाठी त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे अर्ज केला. दिलेल्या धनादेशाचा क्रमांक आठवत नसल्यामुळे त्यांनी, त्यांच्या खात्याचे व्यवहार थांबवावे अशी विनंती गैरअर्जदार क्र.1 यांना केली. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराचे विनंती पत्र न स्विकारता त्यांनी दिलेला धनादेश वटविला. अर्जदाराने या प्रकरणी बँकींग ओम्बुट्समनकडे तक्रार दाखल केली, पण तिथे ती अमान्य करण्यात आली. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, नुकसान भरपाईची मागणी केली. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांची बँक ही ऑन लाईन बँकींग असणारी बँक आहे. यातील सिस्टीम नुसार चेकचे स्टॉप पेमेंट करावयाचे असल्यास, चेक नंबर नमूद करणे आवश्यक असते. अर्जदाराने दि.02.09.2009 रोजी चेकचे, स्टॉप पेमेंट करण्यासाठी दिलेले पत्र हे चेक नंबर लिहिलेले नसल्यामुळे स्विकारण्यात आले नाही, व ऑन लाईन बँकींग सिस्टीमनुसार अर्जदाराने दिलेला 10,000/- रुपयाचा चेक पास करण्यात आला. अर्जदाराने या प्रकरणी बँकींग ओम्बुट्समनकडे तक्रार केली असून, त्यांनीही अर्जदाराची तक्रार चुकीची असल्याचे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदार यांचे गैरअर्जदार बँकेत खाते असून, ते बँकेचे ग्राहक आहेत. अर्जदाराने श्री.एन.आर.अग्रवाल यांया नावे दि.27.08.2009 रोजी 10,000/- रुपयाचा चेक दिला व दि.28.08.2009 रोजी सदरील चेकचे स्टॉप पेमेंट करण्याची विनंती केली. या अर्जावर चेक नंबर न टाकल्यामुळे गैरअर्जदार यांनी तो स्विकारला नसल्याचे दिसते. अर्जदाराने दि.02.09.2009 रोजी गैरअर्जदार यांना पुन्हा पत्र लिहून चेक नंबर आठवत नसल्याचे सांगून चेकचे पेमेंट थांबविण्याची, तसेच संपूर्ण खात्याचा व्यवहार थांबविण्याची सूचना केली. गैरअर्जदार यांनी चेक नंबर नसल्यामुळे 10,000/- रुपयाचा चेक वटवून पाठविला, व अर्जदाराच्या खात्यातून 10,000/- रुपये डेबीट केले. अर्जदाराने बँकेच्या या कृती विरुध्द दि.03.09.2009 रोजी बँकींग ओम्बुट्समन यांच्याकडे तक्रार केली, त्यांनी दि.21.12.2009 च्या पत्राद्वारे, अर्जदाराने केलेली तक्रार खारीज केली. (3) त.क्र.89/10 अर्जदाराने, गैरअर्जदार यांना चेक पेमेंट स्टॉप करण्यासाठी केलेल्या अर्जाची पोच पावती दाखल केलेली नाही. त्याचप्रमाणे गैरअर्जदार यांना सदरील चेकचा नंबर दिलेला नाही. ऑन लाईन बँकींग सिस्टीममध्ये चेकचे पेमेंट स्टॉप करावयाचे असल्यास चेक नंबर देणे जरुरी आहे, हे गैरअर्जदार यांचे म्हणणे मंच मान्य करीत आहे. गैरअर्जदार यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्यामुळे मंच सदरील तक्रार खारीज करीत आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |