मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 63/2008 तक्रार दाखल दिनांक – 22/07/2008 आदेश दिनांक – 22/03/2011 श्रीमती चित्रा शहा, 114, लक्ष्मी निवास, 3 रा मजला, हिंदू कॉलली रोड नंबर4, दादर (पूर्व), मुंबई 400 014. ......... तक्रारदार विरुध्द 1) कन्झ्युमर डिपार्टमेंट, बी.ई.एस.टी., अंडरटेकींग नॉर्थ, लोकमान्य टिळक मार्ग, दादर, मुंबई 400 014. 2) कन्झयुमर डिपार्टमेंट (नॉर्थ), एफ/नॉर्थ वार्ड, गेट नंबर 6, वा मजला, न्यू अन्सील्लरी बिल्डींग, वडाळा डीपोट, मुंबई 400 014. ......... सामनेवाले क्रमांक 1 ते 3 समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती - उभयपक्ष हजर - निकालपत्र - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत तक्रार ही तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने नमूद केले की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून घरगुती वापराकरीता विद्युत पुरवठा घेतला होता, व ती त्यांची ग्राहक आहे. तिचा मीटर क्रमांक एन 920009 हा आहे, तसेच ग्राहक क्रमांक 597-061-049-0 आहे. तिने पुढे असे नमूद केले आहे की, तिने गैरअर्जदारांविरुध्द मंचात तक्रार क्रमांक 96/2006 दाखल केलेली होती.
तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांनी तिला रक्कम भरण्याकरीता नोटीस पाठविली होती. परंतु त्यांनी दिनांक 15/05/2008 रोजी इन्स्टॉलेशन (हप्ते) देण्याबाबत विनंतीपत्र पाठविले होते. तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले आहे की, तिचा मीटर क्रमांक एन 066779 हा गैरअर्जदार यांनी बदलून दिला असून त्यांनी नविन क्रमांक एम 018435 हा दिला आहे. तक्रारकर्तीने पुढे नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांनी रुपये 89,406.57/- एवढया रकमेची मागणी केली होती. त्यापैकी रुपये 50,000/- त्यांनी पूर्वीच भरलेले आहेत, व त्यांच्याकडे रुपये 39,406.57/- भरायचे आहेत. तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले आहे की, तिला आर्थिक अडचण असल्यामुळे ती रक्कम भरु शकली नाही.
तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांनी विद्युत पुरवठा खंडित केला होता व नंतर पुन्हा सुरु करण्यात आला होता. तक्रारर्तीने प्रस्तुत तक्रारीत मीटर क्रमांक एम 018435 च्या स्टेटमेंटची मागणी केलेली आहे, तसेच सदर मीटरची चाचणी करण्यात यावी, तसेच मीटर क्रमांक एम 18435 मध्ये येणा-या देयकात दुरुस्ती करुन मिळण्याबाबत विनंती केलेली आहे.
2) मंचामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्यात आली. गैरअर्जदार हे मंचाकडे हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला आहे. त्यांचे लेखी जबाबात म्हणणे खालीलप्रमाणे आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीने लावलेले आरोप हे अमान्य केलेले आहेत, तसेच तक्रारकर्तीने यापूर्वी मंचात दाखल केलेल्या तक्रारीबदद्दल व त्यामध्ये पारित केलेल्या आदेशामध्ये ते कथन मान्य केलेले आहे. गैरअर्जदार यांनी पुढे असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांना सदर प्रकरणात झालेल्या तडजोडीप्रमाणे 50 टक्के रक्कम भरलेली नाही. गैरअर्जदार यांनी पुढे असे नमूद केलेले आहे की, तक्रारकर्तीकडे रुपये 62,651/- थकित आहेत. त्यापैकी त्यांनी 50 टक्के रक्कम भरलेली नाही. गैरअर्जदार यांनी पुढे असे नमूद केले आहे की, त्यांनी सेवेत कोणतीच त्रृटी दिलेली नाही, व त्यामुळे तक्रार खारिज करण्यात यावी.
गैरअर्जदार यांनी नमूद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्तीच्या विनंतीवरुन जुने मीटर काढून नविन मीटर बसवून दिलेले असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारिज करण्यात यावी. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्तीतर्फे त्यांचे अधिकारपत्र धारक श्री. शहा हजर, गैरअर्जदारातर्फे त्यांचे अधिकारी श्री. आर. वाय. हाळुसकर हजर. उभयपक्षांचा मौखिक युक्तीवाद ऐकण्यात आला. उभयपक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे, पुराव्यांचे व मीटर टेस्टींग अहवालाचे अवलोकन केले असता मंच खालीलप्रमाणे निष्कर्षावर येत आहे : निष्कर्ष सदर तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे. तसेच तिने वेळेवर विद्युत पुरवठयाची देयके भरलेली आहेत, तसेच गैरअर्जदार हे विद्युत सेवा देणारी कंपनी आहे. त्यामुळे तक्रारदारकर्ती ही गैरअर्जदार यांची ग्राहक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे a) The Opposite be directed to provide the statement of the bills for meter No. M 018435 from the date of installation till today so as to calculate the average consumption thereon. b) The Opposite party be directed to sand the meter No. M018435 in the Neutral third Party laboratory for official testing. c) The Opposite Party in terms of prayer (b) be also directed to check the cable wiring through which the electricity is supplied to the complainant. d) The Opposite Party be directed to raise the amount of bills as per the average of the neighboring flats. e) That during the pendency of the present complaint the order for payment of bills of the current meter No. M018435 be stayed. f) The Opposite Party be directed to pay the amount of Rs.1,00,000/- towards wrongful disconnection of the electric supply for two days by taking the law in their hands. g) To direct to pay Rs. 25,000/- compensation to the Complainant for mental agony, harassment and inconveniece caused to the Complainant. h) To direct to pay the cost of this proceeding to the complainant and i) Award any other reliefs with this Hon’ble Forum may deemed fit and proper in the interest of justice and fair play. तक्रारकर्तीच्या उपरोक्त मागणीप्रमाणे गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीला नविन मीटर क्रमांक एम 018435 बसवून दिलेले आहे ते फॉल्टी आहे त्यामुळे तिला विद्युत कंन्झम्प्शन जास्त येते व जास्तीचे इलेक्ट्रीक चार्जेस आकारण्यात येतात. मंचाने सदर तक्रारीचे अवलोकन केले असता यापूर्वी तक्रारकर्ती हिचा मीटर क्रमांक 066779 हा होता. तसेच सदर मीटर हा नादुरुस्त असल्यामुळे तो बदलून मिळण्याबाबत तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केली होती. त्यामुळे गैरअर्जदार यांनी मीटर क्रमांक एम 018435 बदलून दिला होता. तक्रारकर्तीने सदर तक्रारीत नमूद केले आहे की, सदर मीटर हा लॅब्रोटरीमध्ये टेस्ट करण्यासाठी थर्ड पार्टी न्युट्रल लॅब्रोटरी फॉर ऑफीसीयल टेस्टींग आणि चेकिंग यांचेकडे करेक्ट रिडींग येणेसाठी पाठविणेबाबत विनंती केली होती. त्यावर मा. पूर्व अध्यक्ष यांनी दिनांक 10/10/2008 रोजी आदेश पारीत केला व सदरिल आदेशाला तक्रारकर्ती व गैरअर्जदार यांनी समंती दिलेली आहे. सदर आदेश हा खालीलप्रमाणे आहे - Heard the Complainant in person of the Law Officer of O.P. so far as this Application is concerned both the parties agreed for the following :- a) The Complainant will pay the amount of 50% of each bill from the month of May 2008 under protest till the report of testing of the Meter will be received. If meter is found correct the Complainant will pay the entire bill of the meter in question. b) The O.P. is ready to send the meter to Government Laboratory for Inspection. The Complainant will bear the expenses of Testing of the Meter. c) The complainant will pay the entire bill of the substituted meter which will be substituted fill the time Testing Report of old meter will be received. d) The Complainant undertakes to pay the 0% of the meter in question upto the month of September 2008 on or before 1st Nove.2008. The O.P. is ready to adjust the excess amount paid by complainant if any towards those bills. e) O.P. undertakes not to disconnect the connection if the Complainant complys the above terms & conditions of the settlement. Hence the following order :- The interim Application is disposed off in terms of above terms and conditions of the settlement. सदर आदेशाचे अवलोकन केले असता माझे पूर्व अध्यक्ष यांनी सदर मीटर हे टेस्टींगकरीता इलेक्ट्रॉनिक रिजनल टेस्ट लॅब्रोटरी(प) भारत सरकार यांचे अंतर्गत सदर मीटर तपासणीकरीता पाठविले होते. त्याचा अहवाल दिनांक 20/02/2009 रोजी दाखल केलेला आहे. आम्ही त्याचे अवलोकन केले असता त्यात मीटर क्रमांक एम 018435 याचा खालीलप्रमाणे उल्लेख आहे - Break up monthly bill amount Mrs. Chitra R. Shah A/c No. 597-061-049*0 Meter No. M018435 Month | Current month bill Rs. | Current bill amount paid Rs. | January-2008 | 6139.76 | 6140.00 | February-2008 | 3893.05 | 3893.00 | March-2008 | 4187.01 | 4187.00 | April-2008 | 11043.79 | 11044.00 | Total……… | 25263.61 | 25264.00 |
Month | Current month bill Rs. | 50% of Current bill amount paid Rs. | Balance to be paid Rs. | May-2008 | 18687.40 | | | June-2008 | 20723.23 | | | Jully-2008 | 12913.81 | * 34913.00 | 34913.00 | August-2008 | 9298.04 | | | September-2008 | 10534.17 | | | Octomber-2008 | 10379.10 | 5190.00 | 5190.00 | November-2008 | 16770.36 | 8385.00 | 8385.00 | December-2008 | 12195.20 | 6098.00 | 6098.00 | January-2009 | 9979.78 | 4990.00 | 4990.00 | February-2009 | 6453.87 | 3227.00 | 3227.00 | | 127934.96 | | | Less excess paid | 2330.0 | | | Total….. | 125604.96 | 62803.00 | 62803.00 |
*Rs.72156.65(May-2008 to Sept.-2008) Less Rs. 2330.57 Excess Paid Rs. 69826.08 Rs. 34913.04(50%) आम्ही सदर अहवालाचे अवलोकन केले असता त्यात जानेवारी 2008 ते फेब्रुवारी 2009 पर्यंत तक्रारदार यांनी वापरलेल्या विजेच्या देयकाची बिले दिलेली आहेत, व त्यात नमूद केले आहे की, तक्रारकर्तीची रुपये 69,826.08/ एवढी थकीत देयक रक्कम आहे. तसेच सदर अहवालामध्ये मीटरची पूर्ण तपासणी करावी. सदर अहवालाप्रमाणे तक्रारकर्तीला तेवढी रक्कम गैरअर्जदार यांना देणे बाकी रहाते. मंचाने वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यात दिनांक 10/10/2008 रोजी मंचाने आदेश पारित केल्यानंतर आपसी तडजोड झाल्याप्रमाणे देयकाची 50 टक्के रक्कम देण्याचे नमूद केले होते परंतु. तक्रारकर्तीने सदर रक्कम भरली नाही. तक्रारकर्ती यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील वस्तुस्थितीचे अवलोकन केले असता तिच्या विनंतीवरुन मीटर टेस्टींगकरीता पाठविण्यात आले होते, व त्याचा अहवाल मिळालेला आहे. त्यामुळे सदर अहवालात नमूद केलेली रक्कम रुपये 69,826.08/- ही भरण्याची जबाबदारी तक्रारकर्तीची आहे. सदर तक्रार ही मंचात सन 2008 पासून प्रलंबित असल्यामुळे सदर रकमेवर आज आदेशापर्यंत तक्रारकर्तीकडून गैरअर्जदार यांनी कोणतेच व्याज, पेनॅल्टी आकारु नये. तक्रारकर्तीने सदर रक्कम आदेश प्राप्त झाल्यापासून 4 महिन्याच्या आत चार समान हप्त्यात न भरल्यास गैरअर्जदार यांना त्यावर व्याज आकारण्याचा अधिकार राहील असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने इतर केलेली मागणी संयुक्तीक वाटत नाही. उभयपक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे, तसेच मीटर तपासणीचा अहवाल इत्यादींचे अवलोकन केले असता मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे - - अंतिम आदेश - 1) तक्रार क्रमांक 63/2008 अंशत: मंजूर करण्यात येते. 2) प्रस्तुत प्रकरणात मीटर तपासणी अहवालाप्रमाणे एकूण रुपये 69,826.08/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 4 महिन्यात समान हप्त्यात भरावी. सदर रक्कम ही 4 समान मासिक हप्त्यात न भरल्यास गैरअर्जदारा यांनी सदर रकमेवर आदेश पारीत तारखेपासून ते प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत 9 टक्के दराने व्याज आकारावे.
3) उभयपक्षांनी आपापला खर्च सोसावा.
4) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी.
दिनांक – 22/03/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |