जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 161/2008. प्रकरण दाखल तारीख - 02/05/2008 प्रकरण निकाल तारीख - 07/08/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. प्रेमचंद पि. वेलजीभाई नागडा अर्जदार. वय वर्षे 61, धंदा सेवानिवृत्त रा.महात्मा गांधी रोड, नांदेड. विरुध्द. 1. कंपनी सेक्रेटरी एच.ई.जी.लिमिटेड, भीलवाडा भवन, 40,41, कम्यूनिटी सेंटर न्यू फेन्डस कॉलनी, नवी दिल्ली-110 065 गैरअर्जदार 2. मॅनेजर, एम.सी.एस. लिमिटेड, (एम.ई.जी. लि. या कंपनीचे युनिट) श्री. व्यकंटेश भवन, डब्ल्यू-40 ओखला इंडस्टि्रयल एरिया, फेज-11, नवी दिल्ली. अर्जदारा तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे 200 शेअर्स नांदेड येथील ग्रोवेल इन्वेस्टमेंट कंपनी यांच्यामार्फत दि.11.10.1999 रोजी खरेदी केले व दि.07.01.2001 रोजी सदर भाग हे त्यांचे नांवे हस्तांतरीत करण्यासाठी मेसर्स जोशी कन्सलटंसी नांदेड यांच्यामार्फत पाठविले. अर्जदाराने खरेदी केलेल्या भागाचे फोलीओ क्र.52532 व 65061 असे होते. या आधी हे सदरील भाग मूरलीधर व्होरा यांच्या मालकीचे होते. अर्जदाराने ते खरेदी केले व गैरअर्जदाराकडे हस्तांतरणासाठी पाठविले. परंतु अद्यापपर्यत त्यांने खरेदी केलेले भाग अर्जदाराच्या नांवे हस्तांतरीत न झाल्यामुळे ही तक्रार दाखल करावी लागली. गैरअर्जदार क्र.2 ही रजिस्ट्रर कंपनी असून गैरअर्जदार क्र.1 यांचे भाग हस्तांतरणाचे अभिकर्ता आहेत. यानंतर अर्जदार 2005,2006,2007 मध्ये गैरअर्जदारांना पञे पाठविले व त्यांचेही उत्तर त्याने दिले नाही. अर्जदार हा त्यांने गूंतवलेलया पैशाचा उपभोग घेण्यापासून गैरअर्जदाराच्या कृत्यामूळे वंचित राहीला आहे. अर्जदाराने त्यांने वर उल्लेख केलेले शेअर्स व या कालावधीमध्ये शेअर्सवर देण्यात आलेला बोनस शेअर्स व लाभाशांची रक्कम त्यांना मिळावी. तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- देखील मिळावेत म्हणून तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दि.23.6.2008 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांनी अर्जदार यांचे 200 शेअर्स हस्तांतरीत डिड दि.18.1.2001 रोजी जोशी कन्सलटंसी यांच्यामार्फत मिळाल्याचे मान्य केले आहे परंतु छाननी केल्यानंतर त्यांचे असे लक्षात आले की, हस्तांतरीत डिड ही अपूरी आहे. कारण त्यामध्ये अधिकृत अथेंटीकेशन व विकणा-याची व घेणा-याची अथोरिटी नाही. या कारणामुळे त्यांने हस्तांतरीत डिड व शेअर्स प्रमाणपञ अर्जदार यांना मेमो नंबर HEG/SECTT/REJ/4853 द्वारे परत दि. 12-02-2001 रोजी नोंदणीकृत पोस्टाद्वारे पाठविले आहे. यानंतर कंपनीस अर्जदाराकडून कूठलेही कागदपञ व वर उल्लेख केलेल्या कागदपञामध्ये दूरुस्ती करुन परत मिळालेले नाहीत. त्यामुळे आज जी त्यांने तक्रार दाखल केली आहे ती खोटी आहे अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या पूराव्यासाठी कूठलेही शपथपञ दाखल केलेले नाही. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकूण खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 एचईजी लि. यांचे मालकीचे शेअर्स दि.11.10.1999 रोजी खरेदी केले होते व ते हस्तांतरणासाठी गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविले होते. गैरअर्जदार यांनी अशा प्रकारचे शेअर्स हे अपूरी ट्रान्सफर डिड असल्या कारणाने शेअर्स प्रमाणपञ पूर्ण करण्यासाठी वापस अर्जदाराकडे पाठविले होते. त्या बददलचा पूरावा म्हणून गैरअर्जदार यांनी एचईजी लि. यांचे दि.12.02.2001 चे पञ या प्रकरणात दाखल केलेले आहे. या पञातील अनूक्रमे नंबर 3 नुसार ट्रान्सफर डिड मध्ये दूरुस्ती करुन, घेणा-या व विकणा-या यांचे सहया करुन पाठवावे असे म्हटले आहे. व 200 शेअर्सचे चार प्रमाणपञ या सोबतच पाठविल्याचा उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारचे पञ व कागदपञ रजीस्ट्रर नोंदणीकृत पोस्टाने पाठविल्या बददलचा पूरावा म्हणून पोस्ट ऑफिसचे डिस्पॅच शिट यावर केटी-23-73 वर अर्जदार यांची नांवे आहेत. हे पाठविल्याचा पूरावा म्हणून दाखल केलेले आहे. यांचाच अर्थ अर्जदारांना हे शेअर्स प्रमाणपञ व काय दूरुस्ती करायची यांची माहीती होती व प्रमाणपञही मिळाले होते असा निष्कर्ष काढता येईल. कारण 1999 पासून ते 2008 पर्यत अर्जदाराने याविषयी कूठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या शेअर्सपासून होणारे उत्पन्न किंवा नूकसान जे काही होईल ते अर्जदाराच्या चूकीमूळे त्यांनाच भोगावे लागतील. शेअर्स खरेदी केल्या बाबतचा पूरावा म्हणून मे. ग्रोवेल इन्व्हेस्टमेंट यांचे स्टेटमेंट दाखल केलेले आहे. आज अर्जदारांना मानसिक ञास किंवा नूकसान भरपाई देखील मागता येणार नाही. कारण त्यांनी योग्य वेळेस योग्य ती पावले उचलले नाहीत. अर्जदाराचा जो पञव्यवहार सूरु झालेला आहे तो 2005 पासून यानंतर 2006,2007 या दरम्यान केलेला पञव्यवहार त्यांनी दाखल केलेला आहे. आज देखील गैरअर्जदार हे अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे शेअर्स प्रमाणपञ अर्जदारानी योग्य जर कारवाई केली तर ते हस्तांतरीत करुन देण्यास तयार आहेत. अर्जदार यांनी फोलीओ क्रमांक, शेअर्स नंबर व डिस्टीनेंटीव्ह नंबर दिलेले आहेत. शेअर्सची संख्या याप्रमाणे 200 आहे. त्यामुळे अर्जदार यांच्याकडून जर हे शेअर्स गहाळ झालेली असतील तर गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराकडून योग्य ती कारवाई करुन घेऊन यांचे डूप्लीकेट शेअर्स इश्यू करावेत व यानंतर ते अर्जदाराच्या नांवे गैरअर्जदार यांना हस्तांतरीत करता येतील. दोन्ही पक्षाची यामध्ये थोडी थोडी चूक दिसून येते परंतु कोणाकडून जरी प्रमाणपञ गहाळ झाले असले तरी यांचा अर्थ अर्जदार हा त्यांच्या हक्कापासून दूर जाऊ शकत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदार यांचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 1. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांनी फोलिओ नंबर 52532, 65061, प्रमाणपञ नंबर 314607, 149146, 164355, 329570 असे 50-50 शेअर्सचे 200 शेअर्स व योग्य प्रकारे करण्यात आलेले ट्रान्सफर डिड ज्यांचे वर ट्रान्सफर व ट्रान्सफरी यांच्या सहया करुन गैरअर्जदार क्र.1 एचईजी लि. नंददीप, निअर भोपाल यांच्याकडे योग्य त्या कारवाईसाठी पाठवावेत. वरील दस्ताऐवज मिळाल्या बरोबर गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांच्या मागणीप्रमाणे सध्या मूरलीधर व्होरा यांच्या नांवे असलेले शेअर्स अर्जदार यांच्या नांवे हस्तांतरीत करावेत. किंवा एचईजी या कंपनीचे शेअर्स जर गहाळ झाले असतील तर असे शेअर्स अर्जदार यांच्याकडून योग्य तो अर्ज व फिस घेऊन डूप्लीकेट शेअर्स दयावेत व यानंतरची पूढील कारवाई करुन सदरील शेअर्स हे अर्जदारांच्या नांवाने यानंतरच्या 30 दिवसांचे आंत हस्तांतरीत करावेत व तसे प्रमाणपञ अर्जदारांना दयावेत. 2. मानसिक ञासाबददल व नूकसान भरपाई बददल आदेश नाहीत. 3. दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.विजयसिंह राणे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |