Maharashtra

Satara

CC/14/141

shri sahjram narayandas chhabda - Complainant(s)

Versus

Comn pelth off housigsosati - Opp.Party(s)

07 Mar 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/14/141
 
1. shri sahjram narayandas chhabda
shahupuri satara
SATARA
MAHARASTRA
...........Complainant(s)
Versus
1. Comn pelth off housigsosati
satara
SATARA
m
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
 HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

-ः न्‍यायनिर्णय ः-

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा यानी पारित केला)

 

1.   तक्रारदारानी सदर तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केलेला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे-

      तक्रारदार हे सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत तर जाबदार क्र.1 हे कॉमनवेल्‍थ को.ऑ.हौ.सोसायटी, बंडगार्डन पुणेचे चेअरमन असून जाबदार क्र.2 हे सदर सोसायटीचे सेक्रेटरी आहेत.  सदर जाबदार हौसिंग सोसायटीमध्‍ये तक्रारदारांचे मालकीचा फ्लॅट क्र.4 आहे.  प्रस्‍तुत जाबदार हौसिंग सोसायटीने सन 2002 पासून सदर फ्लॅट क्र.4 या मिळकतीवर मेंटेननस आणि वॉटर चार्जेसची मनमानी व अनाधिकृत बील आकारणी करुन त्‍यामध्‍ये व्‍याजावर व्‍याज लावून माहे डिसेंबर 2013 चे मागणी बील पाठविले.  तक्रारदार हे फ्लॅट क्र.4 चे मालक व सरकारी ठेकेदार असून व्‍यवसायानिमित्‍त पुणे येथे वरचेवर येत जात असतात.  तक्रारदार पुणे येथे आल्‍यावर सदर फ्लॅट क्र.4 मध्‍ये रहात असतात.  जाबदार सोसायटीचे संचालक मडळातील पदाधिका-यांनी माहे जुलै 2002 पासून जाबदार सोसायटीचे मेंटेनन्‍सचार्जेस पोटी रक्‍कम रु.950/- घेणेचे ठरवून त्‍याप्रमाणे माहे जुलै 2002 ते डिसेंबर 2002 चे बील क्र.868, दि.4-1-2003 रोजी एकूण रक्‍कम रु.5,700/- या रकमेचे बील तक्रारदारास सातारा येथील पत्‍त्‍यावर पाठविले. सदर बिल चुकीचे असल्‍यासंबंधीचे पत्र क्र.519, दि.10-1-2013 अन्‍वये सदर जाबदार सोसायटीला पाठविले असून चुकीचे असल्‍याचे दाखवले आहे.  परंतु त्‍यानंतरही जाबदार सोसायटीने वाढीव चार्जेस लावून वेळोवेळी वेगवेगळी बिले तक्रारदारास पाठविली आहेत.  सप्‍टेंबर 2003 पासून या बिलांमध्‍ये मूळ मेंटेनन्‍सची रक्‍कम जास्‍त आकारुन तसेच त्‍यावर व्‍याज याप्रमाणे प्रत्‍येक महिन्‍याला मूळ मेंटेनन्‍स चार्जेस, रेंट चार्जेस व त्‍यावर व्‍याज तसेच मागील बिलावरील व्‍याजदर असे मिळून वेळोवेळी वाढीव रकमेची बिले जाबदाराने तक्रारदारास पाठविली आहेत.  तक्रारदाराने जाबदाराला मूळ मेंटेनन्‍स चार्जेसप्रमाणे बिले मिळावीत अशी विनंती करुनही जाबदाराने मूळ मेंटेनन्‍सप्रमाणे बिलाची आकारणी केली नाही तर जाबदाराने जुलै 2002 ते मार्च 2009 पर्यंत रिव्‍हाईज्‍ड मेंटेनन्‍सची देय रक्‍कम दाखवणारा चार्ट तक्रारदाराचे सातारा येथील पत्‍त्‍यावर पाठविला आहे.  त्‍यामध्‍ये दंडाची रक्‍कम रु.51,981/- इतकी दाखवली आहे.  हे व्‍याज बेकायदेशीररित्‍या जाबदाराने आकारले आहे.  तसेच जाबदाराने बिल क्र.1952 अन्‍वये माहे जून 2009 मध्‍ये जाबदाराने तक्रारदाराकडून रक्‍कम रु.30,000/- बिल्डिंग रिपेअर वर्क फंड म्‍हणून वेगळी मागणी केली आहे.  प्रस्‍तुत मागणी ही बेकायदेशीर आहे.  तसेच जाबदाराने तक्रारदाराविरुध्‍द माहे 2002 पासून माहे ऑगस्‍ट 2004 पर्यंत रेंटल चार्जेस प्रतिमाह रक्‍कम रु.950/- प्रमाणे मेंटेनन्‍स चार्जेसव्‍यतिरीक्‍त लावले आहेत, हे नियमबाहय आहे.  सन 2004 पासून रक्‍कम रु.950/- ऐवजी फक्‍त रु.50/- प्रतिमाह माहे फेब्रुवारी 2005 पर्यंत लावलेले आहेत, परंतु सन 2005 पासून 2013 पर्यंत रेंटल चार्जेस म्‍हणून काहीही चार्जेस लावलेले नाहीत, तसेच सन 2003 पासून जाबदार सोसायटीने रेंटल चार्ज लावणे बंद केले, परंतु जाबदार सोसायटीने मुद्दल, व्‍याज तसेच त्‍यावर व्‍याज प्रत्‍ये‍क बिलात दर महिन्‍याला लावलेले आहे.  जाबदार सोसायटीने तक्रारदाराला सांगितल होते की, मेंटेनन्‍स व वॉटर चार्जेसची रक्‍कम एक रकमी भरा म्‍हणजे आम्‍ही व्‍याज कमी करु, त्‍यामुळे तक्रारदाराने रक्‍कम रु.59,470/- जाबदार सोसायटीकडे दि.22-11-2010 रोजी चेकद्वारे जमा केले, परंतु आजअखेर जाबदार सोसायटीने व्‍याजाची रक्‍कम बिलामधून कमी करुन न देता उलट व्‍याज व व्‍याजावर व्‍याज लावत आहेत.  तसेच रक्‍कम रु.30,000/- मेंटेनन्‍स माहे जून 2009च्‍य बिल क्र.1952 मध्‍ये नमूद केले आहे.  तदनंतरची सर्व मेंटेनन्‍स व वॉटर चार्जेस प्रति महिना तक्रारदाराने भरुनही जाबदाराने आजअखेर व्‍याजाची रक्‍कम कमी केली नाही.  तक्रारदार हे जाबदार सोसायटीस मेंटेनन्‍स व वॉटरचार्जेसपोटी काहीही रक्‍कम देणे लागत नाहीत.  सबब जाबदारानी तक्रारदाराला डिसेंबर 2013च्‍या बिलात दाखवलेली व्‍याजाची रक्‍कम व मेंटेनन्‍स चार्जेस रक्‍कम रु.30,000/- हे चुकीचे असून त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदारास सेवेत त्रुटी दिली आहे, त्‍यामुळे सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे.

 

2.     तक्रारदारानी सदर कामी जाबदाराने तक्रारदारास पाठवलेली मेंटेनन्‍स व वॉटरचार्जेसपोटी आकारलेली बिले ही अनाधिकृत व बेकायदेशीर असल्‍याने ती रद्द व्‍हावीत, जाबदाराने तक्रारदाराला चुकीची व बेकायदेशीर बिले दिल्‍यामुळे झालेल्‍या मानसिक त्रासाबाबत जाबदाराकडून रक्‍कम रु.50,000/- वसूल होऊन मिळावेत, तसेच अर्जाचा खर्च म्‍हणून रु.5,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने या कामी केली आहे.

 

3.       तक्रारदारानी सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/37 कडे जाबदाराने तक्रारदाराला पाठवलेली बिले व जाबदाराला तक्रारदाराने पाठवलली पत्रे, तसेच नि.5/38 कडे तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेली नोटीस, नि.5/39 व 5/40 कडे नोटीसची पोस्‍टाची पावती व पोहोचपावत्‍या, नि.6 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.7 कडे तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. 

 

4.      प्रस्‍तुत कामी जाबदाराना तक्रारअर्जाची नोटीस पोहोचलेची रजि.पोस्‍टाची पोहोचपावती नि.5/45 कडे दाखल आहे.  जादबार हे नोटीस मिळूनही मे.मंचात गैरहजर असलेने जाबदार 1 विरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित करणेत आलेला आहे.  प्रस्‍तुत जाबदाराने मे.मंचात हजर राहून तक्रारअर्जास म्‍हणणे/कैफियत दाखल केलेली नाही व तक्रारअर्जातील कोणतेही कथन जाबदाराने खोडून काढलेले नाही. 

 

5.      वर नमूद तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.          मुद्दा                                               उत्‍तर

1. तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत काय?                           होय.

2. जाबदाराने तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे काय?                   होय.

3. अंतिम आदेश काय?                         खालील आदेशात नमूद केलेप्रमाणे.    

 

विवेचन-

6.     वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  तक्रारदारांचा जाबदारांचे हौसिंग सोसायटी कॉमनवेल्‍थ को.ऑ.हौ.सोसायटी, बंडगार्डन, पुणे येथे बी बिल्डिंग मध्‍ये फ्लॅट क्र.4 आहे तर जादबार क्र.1 हे प्रस्‍तुत हौसिंग सोसायटीचे चेअरमन व जाबदार क्र.2 हे सेक्रेटरी असून तक्रारदार हे फ्लॅटधारक आहेत.  ही बाब तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत दाखल सर्व कागदपत्रावरुन सिध्‍द केली आहे म्‍हणजेच तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत.  त्‍याचप्रमाणे तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता जाबदार हौसिंग सोसयटीने जास्‍त व अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्‍या मेंटेनन्‍स व वॉटर चार्जेसची बिले आकारलेली आहेत हे स्‍पष्‍ट होते.  तसेच प्रस्‍तुत तक्रारअर्जातील कोणतेही कथन जाबदाराने खोडून काढलेले नाही, त्‍यामुळे तक्रारदाराने केलेल्‍या तक्रारअर्जात तथ्‍य आहे असे या मे.मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  तक्रारदाराने वारंवार विनंती करुनही जाबदाराने वाढीव बिले व व्‍याज कमी केलेले नाही व अकारण जादा चार्जेस लावलेले आहे असे दिसते.  म्‍हणजेच तक्रारदाराना जाबदाराने सदोष सेवा पुरवली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

 

7.        सबब आम्‍ही खालीलप्रमाणे प्रस्‍तुत कामी अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                           -ः आदेश ः-

1.    तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2.   जाबदारानी तक्रारदारास दिलेली मेंटेनन्‍स व वॉटरचार्जेसची बिले रद्द करणेत येतात.

3.  जाबदारानी तक्रारदाराना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- तर तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-अदा करावेत.

4.   वरील आदेशाचे पालन जाबदारानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.

 

5.   जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील.

 

6.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

 

7.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

 

ठिकाण- सातारा.

दि. 7-3-2015.

 

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.