निकालपत्र
(पारित दिनांक 03 जानेवारी, 2011)
व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा.
तक्रारकर्ता श्री.सुरेश सदाशिव लांजेवार व इतर यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा थोडक्यात आशय असा की,
1. तक्रारकर्ता यांच्या पत्नी श्रीमती सुनंदा उर्फ भुमेश्वरीबाई या दिनांक 10/03/2006 ला शेळया चारण्यासाठी जंगलात गेल्या असतांना विज पडल्याने जागीच मरण पावल्या.
2. मृतक सुनंदा या शेतकरी असल्याने तक्रारकर्ता यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- नुकसानभरपाई मिळण्यासाठी तलाठी यांचे मार्फत विरुध्दपक्ष क्रमांक 2 याना विमादावा हा संबधीत आवश्यक त्या दस्ताऐवजासह पाठविला होता.
3. विमादाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडून प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्ता यांनी सदर ग्राहक तक्रार दाखल केली असून मागणी केली आहे की, त्यांना विरुध्दपक्ष यांचेकडून रुपये 1,00,000/- ही रक्कम व्याजासह मिळावी.
4. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना विद्यमान मंचाचा नोटीस प्राप्त होवून ही ते मंचात हजर न झाल्यामुळे त्यांचे विरोधात प्रकरण एकतर्फी पुढे चालविण्याचा आदेश दिनांक 14/12/2010 रोजी करण्यात आला.
5. विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी त्यांचे लेखी जबाबात म्हटले आहे की, ते केवळ शासनाचे सल्लागार असल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार ही खारीज करण्यात यावी.
..3..
..3..
6. विरुध्दपक्ष क्रमांक 4 यांनी लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांचे विरोधात प्रकरण लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश दिनांक 14/12/2010 रोजी करण्यात आला.
कारणे व निष्कर्ष
7. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले शपथपत्र, दस्ताएवज व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचे प्रस्ताव शुल्लक कारणावरुन नाकारल्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे मार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला व विरुध्दपक्ष क्रमांक 3 याना विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी नाकारलेले व प्रलंबित सर्व प्रकरणे ताब्यात घेवून गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले. त्याप्रमाणे विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी प्रत्येक प्रकरण तपासून शासनास अहवाल सादर केला व शासनामार्फत दिनांक 10/03/2008 रोजी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचे विरोधात 2232 तक्रारकर्तांकरिता दावा दाखल करण्यात आला आहे.. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या या दाव्यात सदर प्रकरणातील तक्रारकर्ता हे सुध्दा तक्रारकर्ता आहेत.
8. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सुरु असलेली ग्राहक तक्रार ही शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम मिळण्यासाठी आहे. सदर प्रकरणातील विरुध्दपक्ष क्रमांक 2 आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्श्युरंस कंपनी लिमी. त्या प्रकरणात सुध्दा विरुध्द पक्ष आहेत. विद्यमान मंचाचे असे निदर्शनास येते की, राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे या कारणासाठी ग्राहक तक्रार दाखल करण्यात आलेली असतांना सुध्दा परत त्याच कारणावरुन त्याच विरुध्द पक्षा विरुध्द विद्यमान मंचात सदर ग्राहक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
असे तथ्य व परिस्थिती असतांना खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांची सदर ग्राहक तक्रार खारीज करण्यात येत आहे.