::: आदेश निशाणी क्र.1 वर ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 7.10.2011) 1. अर्जदार हीने, सदर दरखास्त, ग्राहक संरक्षण कयद्याचे कलम 27 अन्वये गैरअर्जदार क्र.1 ते 6 विरुध्द दाखल केले असून, कायदेशीर कारवाई करुन, गैरअर्जदारांना जास्तीत-जास्त दंडात्मक शिक्षा देण्यात यावी. अर्जदार बाईला मिळणारी कुंटूंब निवृत्ती वेतनाची रक्कम लवकरात-लवकर द्यावी, असे निर्देश गैरअर्जदारांना द्यावे. गै.अ.ने शारीरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रुपये 25,000/- व तक्रारीस लागणारा खर्च रुपये 5000/- गै.अ.कडून वसूल करण्यांत यावा, याकरीता दाखल केली. 2. सदर दरखास्त नोंदणी करुन, गैरअर्जदारांविरुध्द समन्स काढण्यात आले. सदर दरखास्त मध्ये अर्जदार व त्यांचे वकील सतत गैरहजर. अर्जदाराचे हजेरी करीता दि.17.6.11, 30.6.11, 14.7.11, 26.7.11, 6.8.11 रोजी ठेवण्यात आले, परंतु अर्जदार हजर झाले नाही. त्यानंतर सदर दरखास्त, डिसमीसल फॉर डिफाल्टकरीता दि.10.8.11, 16.8.11, 29.8.11, 6.9.11, 16.9.11, 23.9.11, 1.10.11 रोजी ठेवण्यात आले, परंतु या तारखांनाही अर्जदार व त्यांचे वकील हजर झाले नाही. यावरुन, अर्जदार हिला दरखास्त गै.अ. यांचे विरुध्द चालवावयाचे नाही असेच दिसून येतो. गै.अ.क्र.1 यांनी अर्जदारास निवृत्ती वेतनाची थकीत रक्कम दिलेली असल्याचे पञ सादर केले. अर्जदार ही, आदेशाचे पालन झाले असल्यानेच सतत गैरहजर आहे, असेच दिसून येतो. 3. सदर दरखास्त अर्जदाराचे हजेरीकरीता प्रलंबित आहे. अर्जदार यांना संधी देऊन सुध्दा हजर झाले नाही. यावरुन, अर्जदाराला दरखास्त पुढे चालवायचे नाही, असे दिसून येत असल्याने व अर्जदार सतत गैरहजर असल्याने, दरखास्त फौजदारी प्रक्रियेच्या कलम 258 नुसार प्रोसीडींग बंद (Stop of proceeding) करुन दरखास्त काढून टाकण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची दरखास्त काढून टाकण्यात येत आहे. ( for want of non-prosecution) (2) आरोपी/गैरअर्जदार क्र.1 यांनी दिलेले बेल बॉंन्ड रद्द करण्यात येत आहे. (Their Bail Bond Stand Cancelled) चंद्रपूर, दिनांक :7/10/2011. |