Maharashtra

Sangli

CC/12/8

Shri.Surgonda Devgonda Patil - Complainant(s)

Versus

Commissioner, Provident Fund Office - Opp.Party(s)

13 Feb 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/12/8
 
1. Shri.Surgonda Devgonda Patil
Punam Plaza, B-3 Wing, Dadge Highschool Road, North Shivajinagar, Sangli, Tal.Miraj
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Commissioner, Provident Fund Office
165A, Suravase Towers, Railway Lines, Solapur - 413 001.
Solapur
Maharashtra
2. Provident Fuind Office, through Asst.Provident Fund Commissioner
165A, Suravase Towers, Railway Lines, Solapur - 413 001.
Solapur
Maharashtra
3. Provident Fund Office, Pune, through Asst.Commissioer
Chhavani Road, Golibar Maidan, Pune - 1.
Pune
Maharashtra
4. Provident Fund Office through Asst.Commissioner
Plot No.C-11, Nr.Imma House, MIDC, Satpur, Nashik - 422 007.
Nasik
Maharashtra
5. Maharashtra State Agri.Corp.Ltd., through Estate Manager
Shripur Mala, Tal.Malshiras, Dist.Solapur
Solapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रार अर्ज क्र.८/२०१२
 
नि.१ वरील आदेश
 
 
व्‍दारा मा.सदस्‍या, सौ सुरेखा अ. बिचकर 
 
तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज आपल्‍या प्रॉव्हिडंड फंडातील रकमेबाबत दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्ज दाखल केलेनंतर भौगोलिक अधिकारक्षेत्राबाबत युक्तिवाद करणेत यावा असा आदेश नि.१ वर करण्‍यात आला. तक्रारदार यांचा याबाबत युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांनी आपल्‍या युक्तिवादामध्‍ये या मंचाचे अधिकारक्षेत्रामध्‍ये तक्रारदार यांचे बॅंकेतील खात्‍यावर रक्‍कम जमा झाल्‍याने या मंचास अंशत: भौगोलिक अधिकारक्षेत्र आहे असे नमूद केले. तक्रारदार हे महाराष्‍ट्र राज्‍य शेती महामंडळ यांचे कार्यालयामध्‍ये नोकरीस होते. तक्रारदार जाबदार महाराष्‍ट्र राज्‍य शेती महामंडळ यांचे औरंगाबाद येथील कार्यालयातून सेवानिवृत्‍त झाले आहेत. तक्रारदार हे नोकरीस असताना सोलापूर व नाशिक येथील कार्यालयामध्‍ये कार्यरत होते. सोलापूर व नाशिक येथील कार्यालयातून प्रॉव्हिडंड फंड खात्‍यावरील दि.१/१२/१९९५ रोजी वर्ग झालेली रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यासाठी तक्रारदारांनी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील सरनाम्‍याचे अवलोकन केले असता सर्व जाबदार हे या मंचाचे भौगोलिक अधिकारक्षेत्रामधील नाहीत ही बाब स्‍पष्‍ट होते. तक्रारदार यांनी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या मंचाचे भौगोलिक अधिकारक्षेत्रामध्‍ये येतो हे दर्शविण्‍यासाठी तक्रारदार यांच्‍या बॅंक ऑफ बरोडा सांगली येथील खात्‍यावर जाबदार क्र.१ यांनी जानेवारी २०१० मध्‍ये रक्‍कम जमा केली त्‍यामुळे या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र येते असे नमूद केले परंतु तक्रारदार जेथे राहतात त्‍या क्षेत्रात त्‍यांच्‍या बॅंकेत असलेल्‍या खात्‍यावर रक्‍कम जमा होण्‍याने सदर तक्रारअर्जास अंशत: कारण घडले या तक्रारदार यांच्‍या युक्तिवादामध्‍ये कोणतेही तथ्‍य नाही. जाबदार यांचे पत्‍त्‍यावरुन त्‍यांचे कार्यालय या मंचाच्‍या भौगोलिक अधिकारक्षेत्रात असलेने दिसून येत नाही व तक्रारअर्जास कारण पूर्णत: वा अंशत: या मंचाचे अधिकारक्षेत्रात घडले असलेने दिसून येत नसलेने तक्रारअर्ज दाखल करण्‍यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र नाही असे या मंचाचे मत झाले आहे.
वरील सर्व विवेचनावरुन प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे. 
 
 
दि.१३/०२/२०१२.
सांगली.
                              सदस्‍या                  अध्‍यक्ष
                         जिल्‍हा मंच, सांगली        जिल्‍हा मंच, सांगली
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.