जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/129 प्रकरण दाखल तारीख - 29/04/2010 प्रकरण निकाल तारीख – 20/09/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. प्रसन्नकूमार पि. हूकूंमचंद रायबागकर वय 41 वर्षे, धंदा व्यवसाय अर्जदार रा.जयप्रकाश नगर,असजरन नांदेड विरुध्द. 1. मा.आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालीका गैरअर्जदार नांदेड. 2. सहायक आयुक्त क्षेञिय कार्यालय क्र.5, सिडको, नांदेड वाघाळा महानगरपालीका, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.चौधरी ऐ.व्ही. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.एस.व्ही.राहेरकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार नांदेड वाघाळा महानगरपालीका यांचे सेवेच्या ञूटीबददल अर्जदार यांनी तक्रार केली असून ते आपल्या तक्रारीत म्हणतात की, अर्जदार यांचे घर नंबर 10-1-459 येथे ते ब-याच वर्षापासून राहतात व गैरअर्जदार यांनी आकारलेला कर दरवर्षी नियमितपणे भरतात. दि.27.11.2007 रोजीच्या मागणी बिलाप्रमाणे अर्जदाराने रु.5104/- गैरअर्जदार यांना दिले व यानंतर दि.31.3.2008 रोजीच्या बिलातील रु.3,000/- पावती नंबर 75/5127 नुसार अदा केले. परंतु यानंतर दूस-या मागणी बिल दि.27.6.2008 रोजीचे अर्जदारास प्राप्त झाले त्यात रु.5104/- मागण्यात आले.मागील बाकी धरुन रु.7120/- चे मागणी बिल प्राप्त झाले. यात रु.3,000/-ची रक्कम अर्जदार यांनी अदा केलेली आहे. ती या बिलातून वजा झाली नाही. अर्जदाराने बिल कलेक्टर श्री. वामन पारेकर यांचेशी चर्चा करुन व रक्कम भरल्याची पावती दाखवून सूध्दा त्यांनी ती रक्कम मागील बिलातून कमी न करता तूम्हाला ती भरावीच लागेल व यानंतर चालू बिल लवकरात लवकर येईल असे सांगितले. अर्जदार यांनी ताबडतोब रु.8824/- रक्कम अदा केली. अर्जदार यांना पूढील बिलामध्ये प्रस्तूत रक्कम हीशोबात धरुन ही रक्कम समायोजित करतील या विश्वासावर ते राहीले. परंतु अर्जदार यांनी दि.29.09.2009 रोजी जे बिल मिळाले त्यात बाकी रक्कम रु.7120/- दाखवून एकूण थकबाकीसह रक्कम रु.9313/- बिल देण्यात आले. यात वर्ष 2008-09, 2009-10 या दोन वर्षाचे काळासाठी बिल न भरल्यामूळे शास्तीची रक्कम रु.2,565/- लावण्यात आली, जे की चूक आहे. त्यामूळे अर्जदार यांना प्रचंड मानसिक ञास झाला. गैरअर्जदार यांचेकडे यावीषयी तक्रार ही केली, तेव्हा गैरअर्जदाराने आपण ती रक्कम भरलीच नाही कारण भरली असती तर ती वजा झाली असती असे म्हणून अर्जदार यांचेवरच जबाबदार टाकली. अचानक दि.30.01.2010 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचेमार्फत अर्जदारास त्यांचेवर लावलेली शास्तीची रक्कम रु.1200/- व जास्तीची वसूल करण्यात आलेली रक्कम रु.3000/- ही आपल्या पूढील मालमत्ता कराच्या बिलातून कमी करण्यात येईल अशा आशयाचे पञ आहे. हा गैरअर्जदार यांचे चूकीच्या सेवेचा पूरावाच म्हणावा लागेल. यानंतर दूसरी तक्रार अर्जदार यांनी चूकीचे शौचालय प्रमाणपञ दिले यासाठी अर्जदार यांनी दि.05.12.2009 रोजी मागणी केली होती तेव्हा रु.100/-भरुन घेऊन पावती नंबर 10 नुसार दि.10.02.2009 रोजीचे शौचालय प्रमाणपञ देण्यात आले पण हे प्रमाणपञ चूकीचे असून यात शौचालय या शब्दाचा वापरच केला नाही. यानंतर अर्जदार यांनी तिसरा मानसिक धक्का अर्जदार यांचे भगिनी श्रीमती व्ही.एच. रायबागकर यांचे नांवाने त्यांनाही शौचालय प्रमाणपञ दिले. यासाठी दि.04.11.2009 रोजीच्या त्यांचे अर्जानुसार रु.100/- भरुन ही घेतले. अर्जदार यांचे भगिनी यांना अर्जदार यांची संमती नसताना त्यांना परस्पर शौचालय प्रमाणपञ का दिले ? अर्जदार यांचे नांवाने मालमत्ता असताना दूस-यास हे प्रमाणपञ कसे काय देऊ शकतात. या संबंधी तक्रार करण्यात आली तेव्हा त्यांनी अर्जदार स्वतः प्रमाणपञ घेऊन गेले असे सांगितले. तेव्हा अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे रु.8824/- वर्ष 2009 रोजी भरले आहेत यात आपल्या बिलामध्ये रु.3,000/- वसूल केलेले आहे ती रक्कम गैरअर्जदाराकडून व्याजासह वापस मिळावी म्हणून लेखी स्वरुपात दि.15.2.2010 रोजी पञ लिहीले त्यात गैरअर्जदार यांचे कार्यालयात त्यांनी अर्जदारास दि.24.2.2010 रोजी उपस्थित राहून कागदपञासह म्हणणे माडंण्याचे सांगितले. त्यादिवशी अर्जदार उपस्थित झाले असताना गैरअर्जदाराने त्यांचे कक्षात त्यांना बोलावलेच नाही व काही म्हणणेही ऐकून घेतले नाही. बहूतेक काही तरी कारवाई करण्यासाठी नाटक केले. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, दि.31.3.2010 रोजी वसूल केलेले रु.3,000/- परत करण्याचे आदेश करण्यात यावे, तसेच जास्तीची आकारलेली रक्कम रु.1200/- परत करावी, झालेल्या मानसिक ञासाबददल रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु,5,000/- मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदाराकडून सेवेत कोणतीही कमतरता झाली नाही. वस्तूतः अर्जदाराचे जे काही म्हणणे आहे त्यात गैरअर्जदाराने त्यांना दि.15.02.2010 रोजीच्या पञाद्वारे कळविले आहे की, त्यासाठी दि.24.2.2010 रोजीला त्यांचे कार्यालयात हजर राहून सूनावणीसाठी बोलाविले होते परंतु अर्जदार हे त्यादिवशी हजर झाले नाहीत. वस्तूस्थिती अशी आहे की,अर्जदाराच्या तक्रारप्रमाणे गैरअर्जदाराने जास्तीचा कर वसूल केला. त्यासाठी मालमत्ता करात भरलेली रक्कम रु.3,000/- व 2008-09 साठी रु.600/- + वर्ष 2009-10 साठी रु.600/- असेएकूण रु.1200/- पूढील वर्षाच्या मालमत्ता करात समायोजित करण्यात येईल असे सांगितले कारण पूढच्या वर्षाचा टॅक्स त्यांना भरावयाचा होता. अर्जदाराचा अर्ज त्यांनी प्रतिवादी कडे केलेला पञव्यवहार वीशेष म्हणजे वादग्रस्त मालमत्ते संबंधीत शौचालयाचे प्रमाणपञ त्यांची बहीन विना रायबागकर यांना दिल्यामूळे नाराजीने हे प्रकरण दाखल केलेले आहे. वस्तूतः सदरील प्रमाणपञ हे अर्जदाराच्या नांवे निर्गमित करण्यात आलेले आहे. अर्जदाराने दिलेला अर्ज दि.5..12.2009 रोजी कूटूंबातील व्यक्ती म्हणून अनूक्रमांक 04 वर विना रायबागकरचा उल्लेख केलेला आहे. त्यामूळे फक्त प्रतीनीधी म्हणून अर्जदाराच्या नांवाचे प्रमाणपञ विना रायबागकर यांना दिलेले आहे यात काही दोष नाही. अर्जदाराला वादग्रस्त रक्कम भरण्यासाठी कोणतीही जबरदस्ती केलेली नाही उलट अर्जदाराने समजून घेऊनच वरील रक्कम भरलेली आहे. ही गोष्ट खोटी आहे की, श्री. वामन पारेकर यांनी रक्कम भरल्याची पावती दाखल केल्यानंतर ही परत पैसे भरल्याचे सांगतात.सदरील रक्कम ही चूकीने भरण्यात आलेली आहे, असे नसेल तर अर्जदार दोन वर्षापर्यत गप्प राहीले नसते. त्यामूळे अर्जदाराने जास्तीची भरलेली रक्कम रु.4200/- पूढील वर्षातील मालमत्ता करात समायोजीत करण्यात येईल अशी तयारी गैरअर्जदारांनी दाखवलेली होती. त्यामूळे गैरअर्जदार यांचे सेवेत कोणतीही ञूटी झालेली नाही म्हणून तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांचा मालमत्ता घर नंबर 10-1-459 या कराची रक्कम रु.5104/- दि.27.11.2007 रोजी पूर्णतः भरली आहे. म्हणजे मागील रक्कम काही शिल्लक नाही. दि.31.3.2008 रोजी रु.3,000/-पावती नंबर 75/5127 नुसार अदा केली आहे. पूढे अर्जदारांना रु.7120/- चे मागणी बिल दि.27.6.2008 रोजी प्राप्त झाले यात त्यांनी भरलेली रु.3000/- ची रक्कम वजा न झाल्यामूळे जास्तीची मागणी करण्यात आली. ही रक्कम उशिरा भरल्याकारणाने गैरअर्जदाराने वर्ष 2008-09 रु.600/- वर्ष 2009-10 साठी रु.600/- असे एकूण रु.1200/- जास्तीचे लावले. अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात रु.2565/- सांगितलेले आहेत. यासंबंधी आयूक्त, महानगरपालीका यांचेशी अर्जदार यांनी बराच पञव्यवहार केला तो पञव्यवहार या प्रकरणात दाखल आहे. अर्जदाराची ही तक्रार गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्हणण्यात मान्य केलेली आहे. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे नांवे दि.30.01.2010 रोजी एक पञ लिहीले आहे त्यात जास्तीची भरलेली रक्कम रु.3,000/- व दोन वर्षाची जास्तीची रक्कम रु.1200/- असे एकूण रु.4200/- पूढील वर्षाचे मालमत्ता करात समायोजित करण्यात येईल असे पञ पाठविले आहे. अर्जदार म्हणतात जास्तीचे रु.2565/- लावण्यात आले पण यावीषयी पूरावा नाही म्हणून गैरअर्जदार यांनी मान्य केलेली रक्कम रु.4200/- एवढीच रक्कम जास्त वसूल केलेली दिसून येते. आपली चूक गैरअर्जदार यांनी पञाद्वारे कबूल केलेली आहे परंतु यातही रक्कम वापस करण्याऐवजी पूढील वर्षात समायोजित करण्यात येईल असे म्हणणे चूकीचे आहे. जर गैरअर्जदार यांचेकडून चूक झालेली आहे तेव्हा त्यांनी लक्षात आल्याबरोबर या पञासोबत रु.4200/- चा धनादेश देणे अपेक्षीत होते. परंतु असे केले नाही. गैरअर्जदारांनी अर्जदाराकडून रक्कम रु.3,000/- चे जास्तीचे वसूल केले व लक्षात केल्यानंतर देखील ती रक्कम कमी केली नाही. हे नक्कीच सेवेतील ञूटी म्हटल्या जाऊ शकते. दूसरी अर्जदाराची तक्रार अर्जदार यांचे नांवे मालमत्ता असताना गैरअर्जदार यांनी त्यांची बहीण विना रायबागकर हयांना शौचालय प्रमाणपञ कसे दिले ? व शौचालय प्रमाणपञात शौचालय हा शब्दच नाही. तेव्हा हे प्रमाणपञ चूकीचे आहे असे म्हटले आहे. अर्जदाराने दाखल केलेले रेकार्ड पाहिले असता यात दि.5.12.2009 रोजीचा अर्जदार यांचा अर्ज आहे व त्यानुसार रु.100/- भरुन घेऊन शौचालय प्रमाणपञ अर्जदारास देण्यात आलेले आहे. हे प्रमाणपञ प्रसन्नकूमार हूकूंमचंद रायबागकर यांच्याच नांवे आहे. यावर शौचालय प्रमाणपञ लिहीलेले आहे. त्यांचे राहते घरी शौचालय बांधलले आहे तेव्हा त्यांचा वापर सूरुवातीपासून आहे असे प्रमाणपञ करण्यात आलेले आहे. त्यामूळे यात काही चूक आहे असे आम्हास वाटत नाही. यात शौचालय शब्द न लिहीणे त्यांचा नियमित वापर सूरु आहे असे लिहीले आहे. तेव्हा यात काही फार मोठी चूक आहे असे आम्हास वाटत नाही. वरच्या हेंडीग वरुनच प्रमाणपञाचा अर्थ स्पष्ट होतो. दूसरी गोष्ट अर्जदाराच्या बहीणीस प्रमाणपञ देण्यात आलेले आहे ते प्रमाणपञ अर्जदार प्रसन्नकूमार यांचे नांवाचे होते फक्त प्रतीनीधी म्हणून श्रीमती रायबागकर व्ही.एच. यांचे नांव त्यावर आलेले आहे. श्रीमती रायबागकर यांचे अर्जाप्रमाणे गैरअर्जदाराने रु.100/- भरुन घेऊन प्रमाणपञाची मागणी केलेली आहे त्यानुसार गैरअर्जदार यांनी ते कूटूंबातीलच व्यक्ती आहेत हे गृहीत धरुन त्यांना शौचालय प्रमाणपञ दिले आहे. मूळ प्रमाणपञात कोणताही बदल केलेला नाही तेव्हा यात काही गैर आहे असे आम्हास वाटत नाही. त्यामूळे ही अर्जदार यांची तक्रार आम्ही मान्य करणार नाही. गैरअर्जदार यांनी चूक केली आहे, जास्तीची रक्कम घेतलेली असेल तर ती वापस करणे आवश्यक आहे व अशी रक्कम अर्जदाराच्या संमतीविना त्यांना पूढील वर्षात समायोजीत करु असे म्हणता येणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना घर नंबर 10-1-459 यासाठी मालमत्ता कराची जास्तीची घेतलेली रक्कम रु.3000/- व जास्तीची रक्कम रु.1200/- असे एकूण रु.4200/- व त्यावर दि.29.07.2009 पासून 12 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.1,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |