Maharashtra

Chandrapur

CC/19/7

Sushila Mahadeo Pimpalshende Through Shri. Umakant Mahadeo Pimpalshende - Complainant(s)

Versus

Commissioner Mahanagar Palika Chandrapur - Opp.Party(s)

Adv.Itankar

10 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/19/7
( Date of Filing : 04 Jan 2019 )
 
1. Sushila Mahadeo Pimpalshende Through Shri. Umakant Mahadeo Pimpalshende
R/o Ghutkala ward Sidharth School Near, Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Commissioner Mahanagar Palika Chandrapur
Mahanager Palika Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
2. Ujwal Constriction Company Through Sanchalak Yogesh Samarit
Main Water tank, Ramnagar Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 10 Mar 2022
Final Order / Judgement

   ::: नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्‍पना जांगडे (कुटे), मा. सदस्‍या,)

      (पारीत दिनांक १०/०३/२०२२)

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२  अन्‍वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे.
  2. तक्रारकर्ती तर्फे आममुखत्‍यार श्री उमाकांत महादेव पिंपळशेंडे यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्ती ही आपल्‍या कुटुंबासमवेत राहत असून तिने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडून निवासी वापराकरिता नळ कनेक्‍शन घेतले आहे आणि ती नियमितपणे पाण्‍याचे बिल विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडे करीत आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना नळ कनेक्‍शन देण्‍याकरिता कंञाटदार म्‍हणून नियुक्‍त केले आहे. तक्रारकर्तीस नियमीत पाण्‍याचा पुरवठा होत असतांना विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांच्‍या आदेशानुसार विरुध्‍दपक्ष क्रमांक २ यांनी रस्‍त्‍याच्‍या कामाकरिता खोदकाम करतांना तक्रारकर्तीकडील घरघुती वापराकरिता असलेले नळ कनेक्‍शनचे अर्धा इंच पाईपलाईन फोडली व त्‍यामुळे तक्रारकर्तीकडील पाण्‍याचा पुरवठा बंद झाला. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना दुरध्‍वनी व्‍दारे कळविले असता त्‍यांनी लेखी अर्ज देण्‍यास सांगितले. त्‍यामुळे तक्रारकर्तीने अनुक्रमे दिनांक १४/१२/२०१८, १८/१२/२०१८, २४/१२/२०१८ आणि ३१/१२/२०१८ रोजी लेखी पञ देवून उपरोक्‍त नळाची पाईपलाईन दुरुस्‍त करण्‍याकरिता विनंती केली. सदर पञ विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना प्राप्‍त झालेले असून सुध्‍दा त्‍यांनी तक्रारकर्तीकडील पाण्‍याचा पुरवठा पुर्ववत करुन दिला नाही, ही विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्तीप्रति  दिलेली न्‍युनतम सेवा आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीने आममुखत्‍यार तर्फे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व२ यांनी तक्रारकर्तीकडील पाण्‍याचा पुरवठा पुर्ववत करुन द्यावा तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये ५०,०००/- तक्रारकर्तीस देण्‍याचे आदेशीत व्‍हावे.
  3. तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस काढण्‍यात आले. नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे आयोगासमक्ष हजर होवून आपल्‍या लेखी उत्‍तर दाखल करुन त्‍यामध्‍ये तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडून निवासी वापराकरिता नळ कनेक्‍शन घेतले असून ती त्‍याचा बिल भरणा करते आणि विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी नळ कनेक्‍शन देण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना कंञाटदार म्‍हणून नियुक्‍त केले आहे. तसेच तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष यांना दिनांक १४/१२/२०१८, १८/१२/२०१८, २४/१२/२०१८ आणि ३१/१२/२०१८ रोजी लेखी पञ दिले आहे या बाबी मान्‍य केलेल्‍या असून उर्वरित कथन नाकबूल करुन नमूद केले की, तक्रारकर्तीची तक्रार प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीकडील पाण्‍याचा पुरवठा पुर्ववत सुरु करुन द्यावे असे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना पञाव्‍दारे कळविले आणि त्‍याप्रमाणे तक्रारकर्तीकडील पाण्‍याचा पुरवठा आता पुर्ववत झालेला आहे आणि तशी दिनांक २०/०१/२०१९ रोजी जलप्रदाय अभियंता, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांनी मौका तपासणी केलेली आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना नळ कनेक्‍शचे काम कंञाटदार पध्‍दतीने दिले असल्‍याने ती जबाबदारी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ची आहे. तरी सुध्‍दा  तक्रारकर्तीकडील तक्रार प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी विरुध्‍द  पक्ष क्रमांक २ यांना कळवून पाण्‍याचा पुरवठा सुरळीत करुन दिला आहे त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीप्रति कोणतीही न्‍युनतापूर्ण सेवा दिली नाही तसेच तक्रारकर्तीस शारीरिक व मानसिक ञास सुध्‍दा दिलेला नाही त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे दिनाक २६/०२/२०१९ रोजी तक्रारीत उपस्थित राहूनही त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल न केल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द दिनांक २२/७/२०१९ रोजी प्रकरण लेखी उत्‍तराशिवाय पुढे चालविण्‍यात यावे असा आदेश निशानी क्रमांक १ वर पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्तीची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ आणि लेखी युक्तिवाद, विरुध्‍दपक्ष क्रमांक १ यांचे लेखी उत्‍तर, दस्‍तावेज, लेखी उत्‍तरालाच त्‍यांचे शपथपञ समजण्‍यात यावे अशी पुरसिस दाखल तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मद्दे आयोगाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमीमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

    अ.क्र.                 मुद्दे                                                     निष्‍कर्षे

 

    १.  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीप्रति           होय                   

       न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ

 २.  आदेश कायॽ                                                   अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

  1. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडून आपल्‍या निवासी वापराकरिता नळ कनेक्‍शन घेतले आहे तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना नळ कनेक्‍शन देण्‍याकरिता कंञाटदाराची नेमणूक केली याबाबत उभयपक्षात वाद नाही. प्रस्‍तुत तक्रारीत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी नळ योजनेअंतर्गत विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना नळ कनेक्‍शन देण्‍याचा कंञाट दिला व त्‍या करिता रस्‍त्‍याचे खोदकाम करुन पाईपलाईन टाकत असतांना तक्रारकर्तीचे घराजवळील खोदकाम करीत असतांना तक्रारकर्तीकडील नळाचे कनेक्‍शन तुटले व  रस्‍त्‍यावर पाणी वाहत होते आणि त्‍यामुळे पिण्‍याच्‍या  पाण्‍याची गैरसोय निर्माण झाली आणि तक्रारकर्तीने याबाबत तक्रार करुन सुध्‍दा  विरुध्‍द पक्षांनी दुरुस्‍त करुन दिली नाही याबाबत वाद आहे. तक्रारीत दाखल दस्‍तावेज, लेखी उत्‍तर यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी दिनांक १९/०१/२०१९ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना पञ देऊन तक्रारकर्तीकडील नळाची पाईपलाईन दुरुस्‍त करुन अहवाल सादर करण्‍यास सांगितल्‍याचे पञ व दिनांक २६/०४/२०१९ रोजी   तक्रारकर्तीकडील नळाला पाणी येत आहे असा तक्रारकर्तीच्‍या स्‍वाक्षरीचा अहवाल दाखल केलेला आहे. तसेच जलप्रदाय अभियंता, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांनी दिनांक २४/०३/२०१९ रोजी तक्रारकर्तीच्‍या घरी प्रत्‍यक्ष पाहणी केली असता त्‍यामध्‍ये तक्रारकर्तीकडील पाणी पुरवठा सुरळीत होत असल्‍याचे त्‍यांच्‍या  निदर्शनास आले आणि याबाबत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी संबंधित  पञ व फोटोग्राफ तक्रारीत दाखल केले आहेत. तसेच विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीकडील पाणी पुरवठा पुर्ववत सुरु केल्‍याचे लेखी उत्‍तरात नमूद आहे. यावरुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी दिनांक २०/०१/२०१९  रोजी तक्रारकर्तीकडील पाईपलाईन दुरुस्‍त करुन पूर्ववत करुन दिली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीकडील पाणी पुरवठा सुरळीत झाल्‍याचे स्‍पष्‍ट होते परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे दिनांक १३/१२/२०१८ रोजी पाण्‍याची पाईपलाईन फुटल्‍यामुळे तक्रारकर्तीकडील पाणी पुरवठा बंद झाला त्‍यामुळे तक्रारकर्तीने अनुक्रमे दिनांक १४/१२/२०१८, १८/१२/२०१८, २४/१२/२०१८ आणि ३१/१२/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना फुटलेली नळाची पाईपलाईन दुरुस्‍त करण्‍याबाबत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना पञान्‍वये सूचित केले होते. सदर पञ त्‍यांना प्राप्‍त झाल्‍याचे त्‍यांनी लेखी उत्‍तरात मान्‍य सुध्‍दा केलेले आहे. परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीकडील पञ प्राप्‍त होऊन आणि पाणी हे जिवनाश्‍यक असून सुध्‍दा  तक्रारकर्तीकडील पाईपलाईन तातडीने दुरुस्‍त करुन पूर्ववत करुन दिली नाही हीच विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्तीप्रती न्‍युनतम सेवा दिल्‍याचे सिध्‍द होते या निष्‍कर्षाप्रत आयोग आले आहे. पाईपलाईन वेळेवर दुरुस्‍त न केल्‍यामुळे तक्रारकर्तीस पाण्‍याची गैरसोय झाली आणि तिला शारीरिक व मानसिक ञास सुध्‍दा झाला. त्‍यामुळे तक्रारकर्तीने दिनांक ४/१/२०१९ रोजी आयोगासमक्ष विरुध्‍द पक्षांचे विरुध्‍द तक्रार दाखल केली आणि आयोगाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतरच विरुध्‍द पक्षांनी दिनांक २०/०१/२०१९ रोजी तक्रारकर्तीकडील नळाची पाईपलाईन दुरुस्‍त करुन दिली. पाईपलाईन फुटल्‍यानंतर ती ताबडतोब दुरुस्‍त करण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्षांची होती परंतु त्‍यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही. विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्तीकडील  पाईपलाईनची दुरुस्‍ती केलेली आहे आणि तक्रारकर्तीकडील पाण्‍याचा पुरवठा सुरळीत सुरु आहे त्‍यामुळे तक्रारकर्ती ही केवळ तिला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी उचित नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

 

मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. मुद्दा क्रमांक १ च्‍या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.  

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची  तक्रार क्र. ७/२०१९ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई  व तक्रारीचा खर्च असे एकञित रक्‍कम रुपये १०,०००/- द्यावे.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावेत.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.