Maharashtra

Gondia

CC/05/56

Lakhanram Rahangadale - Complainant(s)

Versus

Collector Gondia - Opp.Party(s)

Adv Harinkhede

08 Jan 2007

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGAON ROAD, GONDIA
 
Complaint Case No. CC/05/56
 
1. Lakhanram Rahangadale
Tah Tiroda
Gondia
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Collector Gondia
Gondia
Godnia
Maharastra
2. General Insurance Corporation of India
Mumbai
Mumbai
Maharastra
3. State Bank of India
Tah Tiroda
Gondiya
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. P. B. POTDUKHE PRESIDENT
 HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain Member
 HON'ABLE MRS. MOHINI BHILKAR MEMBER
 
PRESENT:
MR. HARINKHEDE, Advocate
 
 
1. MR. VARMA, Advocate
 
ORDER

 

              --- आदेश ---
                                                                    (रितदि. 14-12-2006 )
   द्वाराश्रीमतीप्रतिभाबा.पोटदुखे, अध्यक्षा
 
अर्जदार श्रीमती दुर्गाबाई भूमेश्‍वर मुरकुटे यांनी दाखलकेलेल्याग्राहकतक्रारीचाआशयअसाकी,..................................
 
1.                   गैरअर्जदार क्रं. 1 यांनी सुचित भागातील (Notified area) गरीब शेतक-यांसाठी काही अटींवर पिक विमा योजना सुरु केली. गैरअर्जदार क्रं. 2 हे सुचित विमा महामंडळ आहे. ते राष्‍ट्रीय शेतकी विमा योजना अंतर्गत शेतक-यांच्‍या पिकांचा विमा काढत असते.  व गैरअर्जदार क्रं. 3 हे  शेतक-यांकडून  विमा हप्‍ता जमा करीत असतात.
 
2.                   गैरअर्जदार क्रं.3  यांनी अर्जदार  यांना शेतीच्‍या कामासाठी सन 2004-2005 मध्‍ये कर्ज दिले  व सक्‍तीचे असल्‍यामुळे कर्ज रकमेतून विमा हप्‍त्‍यांची कपात केली. अर्जदार यांनी रु.40,000/- ही रक्‍कम कर्ज म्‍हणून गैरअर्जदार क्रं. 3 यांचेकडून घेतली होती.
 
 
3           अर्जदार यांनी पुष्‍कळ प्रयत्‍न करुनही शेतातून जास्‍त उत्‍पन्‍न मिळू शकले नाही. कारण त्‍यावर्षी पाऊस हा अत्‍यल्‍प प्रमाणात झाला. अर्जदार यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी  गैरअर्जदार क्रं. 1 व 3 यांचेकडे अनेकदा प्रयत्‍न केले परंतु ती रक्‍कम अर्जदार यांना मिळू शकली नाही.
 
4.                  अर्जदार यांनी  मागणी केली आहे की,  रु.40,000/-  ही रक्‍कम दि. 30.08.04 पासून ती हाती पडेपर्यंत 18% व्‍याजासह मिळावी, शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.5,000/- तर ग्राहक  तक्रारीचा खर्च  म्‍हणून रु.3,000/- ही रक्‍कम  गैरअर्जदारांकडून मिळावे.
 
5.                  गैरअर्जदार क्रं. 1  यांना विद्यमान न्‍यायमंचाचा नोटीस प्राप्‍त झाला. तरी सुध्‍दा ते विद्यमान न्‍यायमंचासमोर हजर झाले नाहीत. म्‍हणून दि. 27.09.2006 रोजी त्‍यांचे विरोधात प्रकरण एकतर्फी चालवण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
 
6.                  गैरअर्जदार क्रं. 2 यांनी त्‍यांचे लेखी बयान निशाणी क्रमांक. 18 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार म्‍हणतात की, अर्जदार हे ग्राहक नसल्‍यामुळे त्‍यांना ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्‍याचा कायदेशीर हक्‍क नाही. अर्जदार व त्‍यांच्‍यामध्‍ये कोणताही करार झालेला नाही.
 
7.                  गैरअर्जदार क्रं. 3 यांनी  अर्जदार यांच्‍या कर्ज रकमेतून विमा हप्‍त्‍यांची रक्‍कम कापलेली नाही व गैरअर्जदार क्रं. 2 यांना जाहिरनामा पाठविलेला नाही. त्‍यामुळे गैरअर्जदार क्रं.2 यांचे विरोधात ग्राहक तक्रार चालू शकत नाही.
8.                  गैरअर्जदार क्रं. 3 यांच्‍या सेवेत कोणतीही न्‍युनता नसल्‍यामुळे अर्जदाराने दाखल केलेल्‍या ग्राहक तक्रारी या खर्चासह खारीज होण्‍यास पात्र आहेत.
 
कारणे व निष्‍कर्ष  
 
10         शेतक-यांना नैसर्गिक आपत्‍ती व रोगांमुळे नापिकी झाली तर विमा संरक्षण व आर्थिक पाठबळ देणे (उद्देश क्रं. 1 )व अरिष्‍ट आलेल्‍या वर्षात शेतीचे उत्‍पन्‍न स्थिर ठेवणे (उद्देश क्रं. 3) हे राष्‍ट्रीय कृषी योजनेचे मुख्‍य उद्देश आहेत.
 
11         राष्‍ट्रीय विमा योजनेच्‍या कलम 4 (4) प्रमाणे अनावृष्‍टी/ अवर्षण या न टाळता येणा-या आपत्‍तीसाठी सर्वसमावेशक (comprehensive risk Insurance ) विमा संरक्षण देण्‍यात आले आहे.
12         सदर प्रकरणामध्‍ये गैरअर्जदार क्रं. 2 यांनी मुख्‍य आक्षेप घेतला आहे की, अर्जदार हे ग्राहक नाहीत. रेशमबाई व इतर विरुध्‍द देना बँक व इतर या IV (2006) सीपीजे 4 मध्‍ये प्रकाशित झालेल्‍या प्रकरणात आदरणीय छत्‍तीसगढ राज्‍य आयोगाने राष्‍ट्रीय कृषी विमा योजनेचे लाभार्थी हे ग्राहक या संज्ञेत येतात असा निर्वाळा दिला आहे.
 
13         गैरअर्जदार म्‍हणतात की, राष्‍ट्रीय कृषी विमा योजनेत आणेवारीला महत्‍व नाही तर ती योजना ही विभागीय दृष्‍टीकोनावर (Area Approach) आधारित आहे व वडेगाव महसूल विभागात उत्‍पन्‍नामध्‍ये तुट नसल्‍याने त्‍या विभागातील शेतकरी हे योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी पात्र नाहीत.
 
14         गुजरात राज्‍य ग्राहक संरक्षण केंद्र व इतर वि. भारतीय जीवन विमा महामंडळ व इतर या प्रकरणात (मुळ याचिका नं. 192, 194, 197, 198, 260, 261 व 273/1997 आदेश तारीख 24.12.2005) आदरणीय राष्‍ट्रीय आयोगाने सर्वकष पीक विमा योजना संबंधित प्रकरणांमध्‍ये आदेश करतांना असे मत व्‍यक्‍त केले आहे की, ‘‘ विमा हप्‍ता हा प्रत्‍येक कर्ज घेतलेल्‍या शेतक-याने स्‍वतंत्रपणे भरलेला आहे. पिकाचे संपूर्ण नुकसान झाले तर कर्जदार शेतक-याला संपूर्ण विमाकृत रक्‍कम मिळावयास पाहिजे. कर्जावू शेतक-याचे मत विचारात न घेता त्‍यांना विमाकृत रकमेपेक्षा कमी रक्‍कम देणे हे अन्‍यायकारक आहे.’’
 
 
15         सदर आदेशात आदरणीय राष्‍ट्रीय आयोगाने परिच्‍छेद क्रं. 21 मध्‍ये आहे की,
‘‘विमा हप्‍ता हा प्रत्‍येक शेतक-याने स्‍वतंत्रपणे भरलेला आहे. विमा हप्‍ता हा गाव पातळीवर अथवा विशिष्‍ट पत संस्‍थेचे कर्जदार म्‍हणून स्विकारला गेला नाही.
योजनेच्‍या कलम 10 अनुसार सुत्र आहे की,
 
                        उत्पन्नातीलतुट                                               
दावा  = --------------------------- X शेतक-याची विमाकृत रक्‍कम
                 आरंभीचे उत्‍पन्‍न
 
म्‍हणून अवर्षणामुळे संपूर्ण नापिकी आली तर संपूर्ण विमाकृत रक्‍कम कर्जदार शेतक-यांना देण्‍यात यायला पाहिजे.’’
  
16    गैरअर्जदार क्रं. 2 यांनी दाखल केलेले केस लॉ यांच्‍यानंतर आदरणीय राष्‍ट्रीय आयोगाचा दिनांक 24.02.2005 चा आदेश आलेला आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्रं. 2 यांनी दाखल केलेले केस लॉ सदर प्रकरणास लागू होत नाहीत.
 
17    अर्जदार क्रं. 1 व 3 यांचे काही शेत हे वडेगाव सर्कलमध्‍ये येते तर काही शेत हे मुंडीकोटा सर्कलमध्‍ये येते. त्‍यामुळे त्‍यांनी गैरअर्जदार क्रं. 3 यांचेकडून घेतलेल्‍या कर्जाची सर्कलप्रमाणे टक्‍केवारी ही पुढीलप्रमाणे येते.
 
      अ)अर्जदार क्रं. 1 लखाराम महादेव रहांगडाले
 
      अर्जदार यांची वडेगांव सर्कलमध्‍ये येणा-या लाखेगांव येथे 3.22 H.R. शेती आहे. तर मुंडीकोटा सर्कलमध्‍ये येणा-या विहीरगांव येथे 2.45 H.R. शेती आहे. म्‍हणजेच अर्जदार क्रं. 1 यांची एकूण शेतजमीन 5.67 H.R. आहे. त्‍यांनी गैरअर्जदार क्रं. 3 यांचेकडून रु.66,000/- एवढे कर्ज घेतले आहे.
 
66000
-------- = 11,640/- ही प्रत्‍येक हेक्‍टरच्‍या कर्जाची रक्‍कम ठरते.
5.67
 
तर लाखेगांव (वडेगांव सर्कल) येथील शेतजमीनीवर घेतलेले लोन हे
3.22 X11640 = 37481 इतके आहे.
विहीरगांव (मुंडीकोटा सर्कल) च्‍या शेतजमीनीवर घेतलेले लोन हे
      2.45 X 11640 = 28518 इतके होते.
 
(ब)               अर्जदार क्रं. 3 जितेंद्र लखाराम रहांगडाले
(ब)----------------------------------------------
(ब)
अर्जदार क्रं. 3 यांची लाखेगांव येथे 4.04 तर विहीरगांव येथे 0.81 H.R. शेतजमीन आहे. म्‍हणजेच अर्जदार यांची एकूण शेतजमीन 4.85 H.R. एवढी आहे. त्‍यांनी गैरअर्जदार क्रं. 3 यांचेकडून रु.50,000/- एवढे लोन घेतलेले आहे.
 
      50,000/-
      ---------   = 10309 ही प्रत्‍येक हेक्‍टरच्‍या लोनची रक्‍कम ठरते.
      4.85
 
त्‍यानुसार लाखेगांव येथील शेतजमिनीवर घेतलेले लोन हे 10309 X 4.04 = 41648 इतके होते तर विहीरगांव च्‍या शेतजमिनीवर घेतलेले लोन हे
      10309   X 0.81   = 8350 इतके होते.
 
17 गैरअर्जदार क्रं. 2 यांनी गैरअर्जदार क्रं. 3 यांना खरीप हंगाम 2004 चे मुंडीकोटा महसूल विभागातील शेतक-यांचे पिक विम्‍याचे पैसे दिल्‍याचे रेकॉर्डवरुन दिसून येते.
 
18    सदर ग्राहक तक्रारीमध्‍ये अर्जदार शेतक-यांनी भात पीक लावले होते, त्‍याचा विमा काढला होता व विमा हप्‍त्‍याची कर्ज रकमेतुन कपात झाली, या बाबी गैरअर्जदार यांनी नाकारलेल्‍या नाहीत. अल्‍पवृष्‍टीमुळे संपूर्ण पिक सुकून गेले असे अर्जदारांचे शपथपत्र रेकॉर्डवर आहे. विभागीय दृष्‍टीकोनाच्‍या तांत्रिक आधारावर अर्जदार शेतक-यांना राष्‍ट्रीय कृषी विमा योजनेचा लाभ न मिळू देणे ही गैरअर्जदार क्रं. 2 यांच्‍या सेवेतील न्‍यूनता आहे.तसेच गैरअर्जदार क्रं. 2 यांचेकडून मुंडीकोटा महसूल विभागातील शेतक-यांच्‍या पिक विमा बाबत पैसे मिळून ही ते अर्जदारांना न देणे ही गैरअर्जदार क्रं. 3 यांच्‍या सेवेतील न्‍यूनता आहे.
अशास्थितीतसदरआदेशपारितकरण्यातयेतआहे.
 
                                                            आदेश
 
1.                   गैरअर्जदार क्रं. 2 यांनी रु.37,481/- तर गैरअर्जदार क्रं. 3 यांनी रु. 28,518/- हे अर्जदार क्रं. 1 श्री. लखाराम महादेव रहांगडाले यांना दि. 25.11.05 पासून म्‍हणजेच ग्राहक  तक्रार दाखल झाल्‍यापासून तर  रक्‍कम अर्जदार यांना मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 % व्‍याज दराने द्यावे.
2.                   गैरअर्जदार क्रं. 2 यानी रु. 60,000/- ही रक्‍कम अर्जदार क्रं. 2 श्री. अशोक लखाराम राहांगडाले यांना दि. 25.11.05 पासून ती रक्‍कम अर्जदार यांना मिळेपर्यंत 9% व्‍याज दराने द्यावी.
3.                   गैरअर्जदार क्रं. 2 यांनी रु.41648/- तर गैरअर्जदार क्रं. 3 यांनी रु.8350/- ही रक्‍कम अर्जदार क्रं. 3 श्री. जितेंद्र लखाराम राहांगडाले यांना दि. 25.11.05 पासून तर रक्‍कम अर्जदारांना मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 % व्‍याज दराने द्यावी.
4.                   गैरअर्जदार क्रं. 2 यांनी प्रत्‍येक अर्जदारास रुपये 1500/- तर गैरअर्जदार क्रं. 3 यांनी अर्जदार क्रं. 1 व 3 यांना रु.1500/- हेमानसिकव शारीरिक त्रासासाठी द्यावेत.
5.                   गैरअर्जदार क्रं. 2 यांनी प्रत्‍येक अर्जदारास रु.500/- तर गैरअर्जदार क्रं. 3 यांनी रु.500/- हे अर्जदार क्रं. 1 व 3 यांना ग्राहक तक्रारीचा खर्च म्‍हणून द्यावे.
6     वरील आदेशाचेपालनगैरअर्जदार क्रं. 2 व 3 यांनीआदेशाच्यातारखेपासूनएका  महिन्याच्याआतकरावे . अन्यथागैरअर्जदार हे  ग्राहकसंरक्षणकायदा 1986 च्याकलम 27 प्रमाणेकारवाईसपात्रअसतील.
 
 
 
[HON'ABLE MRS. P. B. POTDUKHE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain]
Member
 
[HON'ABLE MRS. MOHINI BHILKAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.