निकाल
दिनांक- 12.08.2013
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार श्रीमती भामाबाई भ्र. अंकुश शेंडगे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अनवये दाखल केली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांचे पती अंकुश शेंडगे हे खापर पांगरी ता.व जि.बीड येथील रहिवासी होते. मयत अंकुश हे शेतकरी होते.दि.27.08.2011 रोजी अंकुश यांचा खुन झालेला आहे. तक्रारदार हिने दि.05.11.2011 राजी नुकसान भरपाई मिळणेसाठी आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सामनवाले क्र.2 कडे दाखल केला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी महाराष्ट्रातील 7/12 उता-याचे नोंदीमधील संपूर्ण शेतक-याचे अपघातामध्ये कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास अथवा निधन झाल्यास अनुक्रमे रु.50,000/- व रु.1,00,000/- चा वव्यक्तीगत शेतकरी अपघात योजने अंतर्गत विमा काढलेला आहे. त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम सामनेवाले क्र.2 कडे देण्यात आले आहे. सामनेवाले क्र.4 यांनी दावा प्राप्त झाल्यापासून एक महिन्यात आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुन मंजूरीसाठी सामनेवाले क्र.3 कडे पाठविण्यात काम दिलेले आहे. सामनेवाले क्र.3 यांनी शेतक-याचे खाते सामनेवाले क्र.4 चे सांगणेवरुन चेक दिलेल्या रक्कमेनुसार जमा करावयाचा असतो. विमा दाव्याची रक्क्म देणे बंधनकारक असताना देखील सामनेवाले यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे.
तक्रारदार यांचे पूढील कथन की, तक्रारदाराचे पती अंकुश हे व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबविली होती.सदर योजने अंतर्गत सर्व शेतक-यांचा विमा काढला आहे. त्यांची अंमलबजावणी शासना मार्फत संबंधीत तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत न्यू इंडिया अॅशोरंन्स कंपनी यांचे संयूक्त विद्यमाने अंमलबजावणी केली जात आहे. तक्रारदाराने सर्व कागदपत्र सांक्षाकीत करुन सामनेवाले क्र.1 व 2 यांच्याकडे कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पाठविला आहे. परंतु त्यांनी सदरील दावा आजपर्यत मंजूर केला नाही. सबब, तक्रारदार यांची विनंती की, विमा अंतर्गत रक्कम रु.1,00,000/-व त्यावरील व्याज देण्या बाबत सामनेवाले यांना निर्देश देण्यात यावेत. तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.30,000/- व खर्चापोटी रक्कम व रु.5,000/- असे एकूण रु.1,35,000/- देण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावेत.
सामनवेाले क्र.1,3, व 4 यांनी लेखी जवाब दाखल न केल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा निर्णय दि.14.08.2012 रोजी घेतला
सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे.मयत अंकूश यांचा दि.27.08.2011 रोजी खुन झालेला आहे. त्यामुळे त्यांचा उक्त योजनेत दावा मंजूर होणार नाही असे कळविले होते. त्यांचा विमा प्रस्ताव दि.08.11.2011 रोजी प्राप्त झाला आहे. सदर प्रस्ताव सामनेवाले क्र. 3 यांना दि.09.11.2011 रोजी ऑनलाईन सादर केलेला आहे. सदर प्रस्ताव दि. 09.11.2011 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांना पूढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. त्यामुळे त्यांचे सेवेत कोणतीही त्रूटी नाही. त्यामुळे त्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये असे म्हटले आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीच्या पृष्टयर्थ स्वतःचे शपथपत्र, क्लेम फॉर्म भाग-1, भाग -1 चे सहपत्र, 8-अ चा उतारा, सामनेवाले यांना पाठविलेली नोटीसची प्रत, पोस्टाच्या पावत्या, इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रति दाखल केल्या आहेत. सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचा लेखी जवाब पोस्टाने दाखल केला आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्र यांचे अवलोकन केले. खालील मुददे न्यायनिर्णयासाठी उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्याबाबत
कसूर केला आहे काय ? नाही.
2. तक्रारदारास नुकसान भरपाई बददल रु.1,00,000/-
मिळाले आहे काय ? होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदारांची तक्रार व पुराव्याकामी दाखल केलेले शपथपत्र यांचे अवलोकन केले. तसेच तक्रारदार यांनी मयत अंकूश शेंडगे यांच्या नांवाचे गांवाच नमुना 8 अ चा उतारा, तसेच शेतकरी जनता व्यक्तीगत अपघात योजना क्लेम फार्म-1 व त्यांचे सहपत्र इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत.
सामनेवाले क्र.1,3 व 4 यांना नोटीस बजावण्यात आली तरी सामनेवाल क्र.3 व 4 हे मंचासमोर हजर झाले नाही व त्यांनी आपले कोणतेही लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा प्रकरणा चालविण्याचा आदेश झाला आहे.
सामनेवाले क्र.2 हे हाजीर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्या व्यतिरिक्त सामनेवाले क्र.2 यांच्याकडून कोणताही पुरावा श्पथपत्र दाखल केलेले नाही.सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, सदर मयत अंकूश शेंडगे यांचा खुन झालेला आहे. यामुळे त्यांचा प्रस्ताव सदर योजनेत मंजूर होणार नाही. याबाबत त्यांना अवगत केलेले आहे. तसेच तक्रारदाराची तक्रार व पुराव्याकामी दाखल केलेले शपथपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले. तक्रारदाराचे वकील श्री. काकडे यांचा युक्तीवाद ऐकला. कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले असता हे ठरविणे महत्वाचे आहे की,सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय तक्रारदार यांनी महाराष्ट्र शासना तर्फे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाईची मागणी सामनेवाला कडून केली होती. सदर योजना ही शतक-याच्या हितासाठी आहे. त्यामुळे तक्रारदार या योजने अंतर्गत मागणीस पात्र आहेत काय हे ठरिवणे महत्वाचे आहे. वर नमुद केलेल्या बाबी लक्षात घेऊन व तक्रारदारांनी दाखल केलेले पुराव्याचे अवलेाकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी त्यांच्या पुरारव्याच्या शपथपत्रात केलेले कथन असे की, तक्रारदार यांना सामनेाले क्र.1 ते 4 यांच्या विरुध्द विमा योजनेची रक्कम मिळावी म्हणून तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रारीची सुनावणी चालू असताना सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारास दि.07.04.2012 राजी रक्कम रु.1,00,000/- चा धनादेश तक्रारदारास मिळाला आहे. यावरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारदारास विमा योजनेची रक्कम मुदतीत मिळाली आहे. तसेच सामनेवाला क्र.4 यांनी विमा अंतर्गत तक्रारदारास मिळणारी रक्कम रहफ.1,00,000/- चा धनादेश तक्रारदारास योग्य कार्यवाही झाल्यानंतर दिलेला आहे. म्हणजे सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यास कसूर केला नाही बाब बाब सिध्द होत आहे असे मंचाचे मत आहे.
मुददा क्र.1 चे उत्तर नकारार्थी व मुददा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. तक्रारदारास सामनेवाला यांच्याकडून रक्कम रु.1,00,000/- चा
धनादेश मिळाला आहे.
3. खर्चाबददल आदेश नाही.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.