तक्रारदारातर्फे – वकील – सययद साजेद अली,
सामनेवाले 1 व 2 तर्फे – वकिल - रविंद्र केंद्रे,
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, सामनेवाले नं.1 हे बजाज ऑटो लि., चे वितरक असून त्यांचे बीड येथे ‘‘ स्वास्तिक बजाज ’’ या नावाचे ऑफिस शोरुम आहे. तसेच बाजाज ऑटो फायनान्सचे हेड ऑफिस, पूणे येथे आहे.
तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडून दूचाकी बजाज डिस्कव्हर के-70 112 सीसी चेसीस नं.MD2DSX22NAH20291 इंजिन नं. DXEBNH21257 रक्कम रु.40,599/- विकत घेतली. याकरणास्तव सामनेवाले नं.1 यांचेकडून रक्कम रु.36,000/- वाहन कर्ज घेतले. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये ठरलेल्या करारानूसार कर्जाचा कालावधी 5.10.2007 ते 1.10.2008 ( 21 महिन्याचा ) असून दरमहा हप्ता रु.1,715/- एवढया रक्कमेचा तक्रारदारांनी द्यावयाचा होता. तक्रारदारांना ता. 11.2.2007 रोजी वाहन ताब्यात मिळाले तेव्हा पासून (11/2/2007) दरमहा कर्ज परतफेडीच्या हप्त्याची सुरुवात झाली. तक्रारदारांनी ता.11.2.2007 रोजी ऑडव्हान्स हप्त्याची रक्कम रु.1,715/-अदा केली. तक्रारदार व सामनेवाले यांनी करार क्र.607000182 वर सही केली. त्यावेळी सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारांचे सदर वाहनाचे आरसी बूक, कर्जाच्या इतर सेक्यूरीटी करीता त्यांचेकडे ठेवून घेतले. तक्रारदारांनी सदर वाहन कर्जाचे ठरलेल्या करारापेक्षा दोन हप्ते जास्त म्हणजेच 23 हप्ते भरणा केलेले आहेत. तक्रारदारांनी संपूर्ण कर्ज रक्कम सामनेवाले यांचेकडे भरणा केलेली असल्यामूळे आरसी बूकची मागणी केली असता रक्कम रु.6,300/- कर्जाची थकबाकी असल्याचे सामनेवाले नं.1 यांनी कळविले. तक्रारदारांनी सदर कर्जाचे खाते उतारा सामनेवाले यांचेकडून घेतले. तक्रारीसोत सदर खाते उतारा दाखल केले आहे. तक्रारदारांनी संपूर्ण कर्ज रक्कमेची परतफेड करुनही सामनेवाले यांनी सदर वाहनाचे आरसी बुक दिलेले नसल्यामुळे ता.23.10.2009 रोजी कायदेशीर नोटीस सामनेवाले यांना पाठवली. सदर नोटीसीचे उत्तर सामनेवाले यांनी दिले नाही. परंतू रक्कम रु.6,300/- कर्जाची थकबाकी असल्याबाबतची ता.13.11.2009 रोजीची नोटीस तक्रारदारांना मिळाली.
तरी तक्रारदारांची विनंती की, तक्रारदारांना सदर वाहनाचे मूळ आरसी बुक सामनेवाले यांचेकडून मिळावे. तसेच दोन जास्त हप्ते भरणा केलेल्या कर्ज हप्त्याची रक्कम रु.3,430/- तसेच 5,000/- शारिरीक, आर्थिक,मानसिक त्रासापोटी सामनेवाले यांचेकडून वसूल होवून मिळावेत.
सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 व 2 हजर झाले असुन त्यांनी त्यांचा खुलासा न्यायमंचात ता. 9.3.2010 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले यांना तक्रारदारांनी वाहन खरेदीकरीता रक्कम रु.36,000/- वाहन कर्ज घेतल्याबाबतची बाब मान्य असुन तक्रारदारांनी रक्कम रु.1,700/- हप्त्याची रक्कम तसेच रु.5,215/- दंडाची रक्कम भरणा केले असल्याचे मान्य केले आहे. तक्रारदारांच्या कर्ज खात्यातील उता-यानुसार रक्कम रु.6,915/- थकबाकी असल्याचे सामनेवाले यांनी खुलाशात नमुद केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेला उर्वरीत मजकूर नाकरलेला आहे.
न्याय निर्णयासाठी मुद्दे. उत्तरे.
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांनी पूर्ण कर्ज रक्कमेची परतफेड
करुनही सदरी वाहनाचे मूळ कागदपत्र, आरसी बुक न देवून
तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कसूरी केल्याची बाब तक्रारदारांनी
सिध्द केली आहे काय ? नाही.
2. तक्रारदार दाद मिळणेस पात्र आहेत काय ? नाही.
3. अंतिम आदेश काय ? निकालाप्रमाणे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, सामनेवाले नं.2 यांचा खुलासा सखोल वाचन
तक्रारदारांचे विद्वान वकिल सयद साजेत अली यांचा युक्तीवाद ऐकला.सामनेवाले नं.1 व 2 याचा युक्तीवाद नाही.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून बजाज डिस्कव्हर गाडी घेण्यासाठी रक्कम रु.36,000/- वाहन कर्ज, कर्ज करारनामा नं.7000182 ता.11.1.2007 रोजी घेतल्यानुसार सदर कर्जाचे परतफेड ता.5.10.2007 ते 5.10.2008 असुन 21 महिन्याच्या कालावधीसाठी कर्जाचा प्रतिमहा हप्ता रु.1,715/- असल्याबाबतची बाब तक्रारदार व सामनेवाले यांनामान्य आहे.
तक्रारदारांनी सदर प्रकरणात तक्रारीसोबत शपथपत्र तसेच पुराव्याचे शपथपत्रही दाखल केले नसल्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेला मजकुर भारतीय पुरावा कायदयातील तरतुदीनुसार शाबीत केलेला नाही. तसेच सामनेवाले यांनी सदर प्रकरणात खूलाशासोबत शपथपत्र दाखल केलेले नाही, त्यामुळे सामनेवाले यांनी खुलाशात नमूद केलेला मजकूर भारतीय पुरावा कायदयातील तरतुदीनुसार शाबीत होत नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
वरील परिस्थितीचे आवलोकन केले असता तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून घेतलेल्या वाहन कर्जाचा पूर्णपणे परतफेड केल्याची बाब सिध्द केली नसल्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना वरील वाहनाची मुळ कागदपत्रे, आरसी बुक न देवून कसूरी केल्याची बाब सिध्द होत नाही. सामनेवाले यांची सेवेत कसूरीची बाब सिध्द न झाल्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे अतिरिक्त भरलेल्या दोन हप्त्याची रक्कम रु.3,430/- तसेच रक्कम रु.5,000/- नुकसान भरपाईची रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि. बीड