Maharashtra

Nagpur

CC/10/739

Hussain Ali Jafar Ali Hussain - Complainant(s)

Versus

Coal India Ltd. Through Company Secretary and Compliance Officer - Opp.Party(s)

Adv. Abdul Matin

17 Jan 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/739
 
1. Hussain Ali Jafar Ali Hussain
516, Nikhera Apartment, Flat No. C-3, New Colony, Sadar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Coal India Ltd. Through Company Secretary and Compliance Officer
C-13, Pannalal Silk, Mills Compound, SBS Marg, Bhandup (West), Mumbai 400078
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. Abdul Matin, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

श्री नरेश बनसोड, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 17/01/2012)
1.           तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल करुन, मागण्‍या केल्‍या आहेत की, गैरअर्जदाराने 50 शेअर्सची रक्‍कम रु.12,862/- व्‍याजासह द्यावी, मानसिक, शारिरीक नुकसानाबद्दल भरपाई, तक्रारीचा खर्च मिळावा.
 
2.          तक्रारकर्त्‍याची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, त्‍याचे पंजाब नॅशनल बँक येथे बचत खाते असून त्‍याने कोल इंडिया लि.चे 100 शेअर्स विकत घेण्‍याकरीता रु.24,500/- गैरअर्जदार कंपनीला अदा केले होते. कंपनीने तक्रारकर्त्‍याला फक्‍त 50 शेअर्स वाटप केले आणि उर्वरित रक्‍कम रु.12,862/- परत पाठविले. परंतू सदर रक्‍कम अद्याप तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात आलेली नाही. कंपनीने तक्रारकर्त्‍याला सदर रक्‍कम 30.10.2010 रोजी जमा झाल्‍याचे सांगितले. सदर रक्‍कम वेळेवर खात्‍यात जमा न झाल्‍याने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक तसेच व्‍यवहारीक नुकसान झालेले आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीचे पुष्‍टयर्थ एकूण दोन दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.
 
3.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारास पाठविली असता त्‍यांना नोटीस प्राप्‍त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले नाही. म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला.
4.          दोन्‍ही पक्षास युक्‍तीवादाकरीता वारंवार संधी देऊनही ते गैरहजर. प्रकरण गुणवत्‍तेवर निकाली काढण्‍याकरीता ठेवण्‍यात आले. मंचाने सदर प्रकरणात दाखल दस्‍तऐवजांचे सुक्ष्‍मपणे अवलोकन केले असता मंचाचे निष्‍कर्ष खालीलप्रमाणे.
-निष्‍कर्ष-
5.          गैरअर्जदारास नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा गैरअर्जदाराने आपले म्‍हणणे वस्‍तूनिष्‍ठ पुराव्‍यासह सादर न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील, 50 शेअर्स रु.12,862/- त्‍याच्‍या खात्‍यात जमा झाले नाही या तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यास पुष्‍टी मिळते व दाखल दस्‍तऐवजावरुन गैरअर्जदाराने पाठविलेली रक्‍कम रु.12,862/- तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा झालेली नाही ही बाब अनुक्रमे पृष्‍ठ क्र. 8 ते 11 वरील पासबुकच्‍या तपशिलावरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याची तक्रार पूर्णपणे सिध्‍द केलेली आहे व 50 शेअर्सची उर्वरित रक्‍कम रु.12,862/- ही 30.10.2010 पासून तक्रारकर्त्‍याचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजाने परत करणे, तसेच तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासाच्‍या भरपाईकरीता रु.3,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.2,000/- देणे संयुक्तीक होईल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदारास आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास 50 शेअर्सची रक्‍कम रु.12,862/- द्यावी व सदर रक्‍कम खात्‍यात जमा न झाल्‍यामुळे गैरअर्जदाराने त्‍यावर 30.10.2010 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के  व्‍याज द्यावे.
3)    गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाईबद्दल  रु.3,000/- व तक्रारीचा खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
4)    सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्‍त     झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.