(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 22.09.2011) 1. अर्जदाराने दि.20.10.2010 ला कोल इंडिया मध्ये आय.पी.ओ. करीता आदित्य बिडला मनी लिमिटेड चे मार्फत आवदेन क्र.24721073 व 247222425 च्या माध्यमातून प्रत्येक 200 शेअर करीता, अथवा प्रत्येक रुपये 49,000/- चे आवेदन केले होते. अर्जदाराचे दोन्हीही आवेदन स्विकारण्यात आले नाही. त्यामुळे, अर्जदारास दि.6.11.2010 ला 2 रिफन्ड ऑर्डर क्र.237311 व 237312 दि.1.11.2010 लो प्रत्येक रुपये 49,000/- चे लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.,मुंबई कडून प्राप्त झाले. कारण, उपरोक्त रिफन्ड ऑर्डर मध्ये पुराना बँक व खाता नंबर लिहिलेले होते. याबाबत, लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांचेकडे चौकशी केली असता, अर्जदाराने रिफन्ड ऑर्डर, मे.लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. ला दि.12.11.2010 ला स्पीड पोष्टाव्दारे एकाच लिफापा मध्ये टाकून परत पाठविले.
2. अर्जदारास मे.लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. ने दि.24.11.2010 ला पञ क्र.61004 चे सोबत एक डूप्लीकेट (सुधारीत) रिफन्ड ऑर्डर आवेदन क्र. 24722425 व जुने रिफन्ड ऑर्डर 373813 करीता रुपये 49,000/- पाठविले, ते अर्जदारास प्राप्त झाले. परंतु, दुसरे आवेदन क्र.24721073 करीता पाठविलेला रिफन्ड ऑर्डर चे आजपर्यंत डूप्लीकेट (सुधारीत) रिफन्ड ऑर्डर प्राप्त झाले नाही. दोन्ही मुळ रिफन्ड ऑर्डर करीता, अर्जदाराने दि.22.12.2010 व दि.17..1.2011 ला लिंक इनटाईम इंडिया लि. ला पञ पाठविले, परंतु, कोणतेही समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नाही. याबाबत, अर्जदाराने मे.लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. ला दि.6.11.2010, 24.11.2010, 5.12.2010, 6.12.2010 व 9.12.2010 ला ई-मेल पाठविले. परंतु, आजपर्यंत कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. त्यामुळे, अर्जदाराने रिफन्ड ऑर्डर (सुधारीत) चे रुपये 49,000/-, फोन व डाक ई-मेलचा खर्च रुपये 500/-, नुकसानी पोटी रुपये 5000/-, तक्रार खर्च रुपये 3500/- व मानसिक ञासापोटी रुपये 8000/- असे एकूण रुपये 65,000/- ची मागणी केली आहे. 3. अर्जदाराने नि.4 नुसार 16 दस्ताऐवजा दाखल केले. अर्जदाराची तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.2 ने नि.27 नुसार प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्तर विना शपथपञ दाखल केले. गै.अ.क्र.3 ने नि.12 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गै.अ.क्र.4 हजर होऊन नि.10 नुसार लेखी उत्तर दाखल केले. 4. गै.अ.क्र.1 ने नि.22 नुसार पुरसीस दाखल करुन, गै.अ.क्र.2 ने नि.27 नुसार दाखल केलेला लेखी बयानाच स्विकारले (Adopted) आहे. 5. गै.अ.क्र.2 ने लेखी बयान नि.27 नुसार विना शपथपञावर दाखल करुन अर्जदाराची तक्रार अमान्य केली आहे. गै.अ.क्र.2 ने लेखी उत्तरातील प्राथमिक आक्षेपात वरीष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडयावरुन तक्रार मंचाला चालविण्याचा अधिकार नाही, असा आक्षेप घेतला आहे. अर्जदाराने फक्त शेअर अलॉटमेंट करण्याकरीता आवेदन केले होते. अर्जदार व गै.अ. यांच्यात खरेदी विक्रीचा कोणताही करार झालेला नसून, त्याकरीता कोणताही मोबदला अर्जदार व गै.अ.क्र.1 यांच्यात झालेला नव्हता. त्यामुळे, कायदेशीर दृष्टीने तक्रार मान्य (Maintainable) नाही. तक्रारीवरुन अर्जदाराने, भविष्यात व्यवसायीक गुंतवणूक करण्याच्या हेतूने शेअर्स मिळण्याकरीता अर्ज सादर केला, त्यामुळे अर्जदार हा ग्राहक होत नाही. 6. गै.अ.क्र.2 नी लेखी बयानात मान्य केले आहे की, कोल इंडिया लि. गै.अ.क्र.1 यांनी शेअर्स काढले होते व ते शेअर्स 18 ऑक्टोंबर 2010 ला आवेदन भरण्याची सुरुवात होऊन 21 ऑक्टोंबर 2010 बंद झाले. अर्जदाराने 200 शेअर्स मिळण्याकरीता आवेदन केले होते व त्याकरीता रुपये 49,000 प्रत्येकी डिमेट अकांऊट वरुन अदा केले होते. अर्जदारास शेअर्स अलॉट न झाल्यामुळे रिफंन्ड व्हाऊचर नुसार आवेदन मध्ये दिलेल्या अकाऊंट नंबरवर देण्यात आले. परंतु, अर्जदाराने जुना खाता क्रमांक बंद केल्यामुळे मिळाले नाही. अर्जदाराने स्वतः चुक केली आहे. अर्जदाराने आपल्या नवीन खात्याची डिटेल माहिती पूरवीली नाही, त्याकरीता कोणताही लाभ फायदा स्वतःच्या चुकीमुळे मिळण्यास पाञ नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार गै.अ.विरुध्द तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. 7. गै.अ.क्र.3 ने नि.12 नुसार लेखी उत्तर दाखल करुन, तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे. गै.अ.क्र.3 चा अर्जदाराशी झालेल्या शेअर्स रक्कमेबाबत कोणताही संबंध नाही. अर्जदाराने चुकीने पक्ष केला आहे. त्यामुळे, भारी खर्चासह तक्रार खारीज करण्यात यावी. गै.अ.क्र.3 चा अर्जदार व इतर गै.अ.शी झालेल्या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे, निष्काळजीपणा व सेवेत न्युनता केल्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. 8. गै.अ.क्र.4 ने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार, आमच्यामार्फत दोन्ही आवेदन केले होते, ते दोन्ही स्विकृत करण्यात आले नाही व दोन्ही आवेदनाचे धनादेश प्राप्त झाले, तसेच त्यांनी कोल इंडिया चे रजिस्ट्ररसे डूप्लीकेट धनादेशाचा पञव्यवहार केला, याचाच अर्थ असा की, पूर्ण जबाबदारी ही आवेदक व रजिस्ट्रार लिंक इनटाईम ची आहे. गै.अ.क्र.4 कडे सर्व लोक आवेदन करतात व त्यास बँक मध्ये जमा करण्यात येतात. गै.अ.ने आवेदन कोल इंडिया कडे जमा करुन आवेदकाला रसीद दिली, जी गै.अ.ची जबाबदारी आहे. गै.अ.कडून ही सेवा निशुल्क राहते. 9. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ नि.28 नुसार पुरावा शपथपञ सादर केला. गै.अ.क्र.1 ने नि.31 नुसार व गै.अ.क्र.4 ने नि.30 नुसार शपथपञ सादर केले. गै.अ.क्र.2 ने लेखी बयानासोबत झेरॉक्स दस्ताऐवज सादर केले. अर्जदार व गै.अ. यांनी सादर केलेले दस्ताऐवज, शपथपञ आणि उभय पक्षांच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 10. गै.अ.क्र.1 नी जारी केलेले शेअर्स खरेदी करण्याकरीता गै.अ.क्र.4 मार्फत आवदेन केले होते. अर्जदारांनी 200 शेअर्स करीता 2 आवेदन प्रत्येकी रुपये 49,000/- चा भरणा केला होता. अर्जदाराचा शेअर्स खरेदीचा अर्ज अस्विकृत झाल्यामुळे दि.6.11.10 ला 2 रिफन्ड ऑर्डर क्र.237311 आणि 237312 दि.1.11.2010 गै.अ.क्र.2 कडून प्राप्त झाले. सदर रिफन्ड ऑर्डर पुन्हा गै.अ.क्र.2 कडे पाठविले. गै.अ.क्र.2 यांनी एका रिफन्ड ऑर्डरची रक्कम सुधारीत रिफन्ड ऑर्डर व्दारे पाठविली. परंतु, आवेदन क्र.24721073 नुसार केलेल्या आवदेनसोबत पाठविलेले रुपये 49,000/- वारंवार मागणी करुनही दिली नाही. म्हणून अर्जदाराने तक्रार दाखल करुन गै.अ.कडून रुपये 65,000/- ची मागणी केली आहे. 11. गै.अ.क्र.2 यांनी नि.27 नुसार लेखी उत्तर दाखल करुन प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रार ही मंचाला चालविण्याचा अधिकार नाही. गै.अ.क्र.2 नी दाखल केलेला लेखी उत्तर हा शपथपञावर नाही, तसेच पुरावा शपथपञ दाखल केला नाही. त्यामुळे, विना शपथपञावर दाखल केलेले लेखी उत्तर ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास पाञ नाही. परंतु, अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन एक बाब स्पष्ट होतो की, गै.अ.क्र.2 यांनी एका आवेदन पञाची रक्कम रुपये 49,000/- परत केले. परंतु, दुस-या आवेदन पञाची रक्कम परत केली नाही. अर्जदाराने शपथपञ नि.28 नुसार दाखल केला. अर्जदाराने, शपथपञात दि.10.5.11 ला सुधारीत रिफन्ड ऑर्डर 1237311 नुसार धनादेश क्र.719049 रुपये 49,000/- चा चेक प्राप्त झाला, हे मान्य केले आहे. अर्जदराने तक्रारीत केलेली मागणी ही पूर्ण झालेली आहे, त्यामुळे तक्रारीतील वाद हा फलहीन (Infructuaus) झालेला आहे. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे.
12. गै.अ.क्र.1 यांनी, असा मुद्दा उपस्थित केला की, गै.अ.क्र.1 चे वकीलांनी युक्तीवादात असे सांगितले की, अर्जदाराची तक्रार मंचासमक्ष मान्य नाही. गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केलेली नाही. उलट, अर्जदाराचे चुकीमुळे त्याला रक्कम मिळण्यास विलंब झाला. अर्जदार यांनी शेअर्स खरेदी करीता सादर केलेल्या आवेदन पञात जो खाता क्रमांक दिला होता, तो खाता क्रमांक बंद केला त्यामुळे विलंब झाला. यावरुन, गै.अ.च्या सेवेत कोणतीही ञुटी नाही. अर्जदार यांनी आपले शपथपञात बँकेचा खाता बंद केल्याची बाब नाकारलेली नाही. त्यामुळे, गै.अ. यांचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ आहे, तर अर्जदारामुळेच रक्कम परत मिळण्यास विलंब झाला, यात गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केली, ही बाब सिध्द होत नाही. 13. अर्जदार यांनी शेअर्स खरेदी करीता आवेदन नामंजूर झाल्यामुळे पूर्ण रक्कम त्याला परत मिळाली. गै.अ.क्र.2 यांनी अर्जदारास पूर्ण रक्कम दिल्याचे मान्य केले. अर्जदाराने शपथपञात पूर्ण रक्कम मिळाल्याचे कबूल केले. गै.अ.क्र.2 यांनी गै.अ.क्र.1 चे शेअर्स अलॉटमेंटचे काम केलेले असून स्टॉक ब्रोकरचे काम केलेले आहे, असेच दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होते. अर्जदारास शेअर्स अलॉट झाले नाही, तरी गै.अ.यांनी त्याची पूर्ण रक्कम परत केली असल्याने गै.अ.च्या सेवेत न्युनता आहे व ती त्यांची सेवा ञुटीयुक्त आहे असे सिध्द होत नाही. मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी एका प्रकरणात आपले मत दिले आहे. त्यात दिलेले मत या प्रकरणाला लागू पडते. त्यातील महत्वाचा भाग खालील प्रमाणे. IMPORTANT POINT Demanding 100 % margin money towards purchase of shares for covering short sales cannot be said to be deficiency in service of part of stockbroker. Shri Anandappa –Vs.- Regional Manager and Anr. 2011 (3) CPR 233 (NC) 14. अर्जदाराने गै.अ.क्र.3 व 4 ला पक्ष केले आहे. परंतु, त्यांचा अर्जदाराच्या मागणीशी काहीही संबंध नाही. गै.अ.क्र.4 यांनी आवेदन पञ आपले मार्फत सादर केला. त्यामुळे, त्यांनी सेवा देण्यात न्युनता केली असे सिध्द होत नाही. गै.अ.क्र.1 ने नि.31 नुसार सादर केलेल्या शपथपञात वेगवेगळ्या सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे न्यायनिवाडयाचा उल्लेख केलेला आहे. परंतु, कोणत्याही न्यायनिवाडयाची प्रत सादर केली नाही. एकंदरीत, उपलब्ध रेकॉर्डवरुन गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केली नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. तसेच, अर्जदाराने तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे आवदेन पञाची रक्कम रुपये 49,000/- प्राप्त केलेली आहे. या कारणांवरुन, तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 15. वरील कारणे व निष्कर्षावरुन गै.अ.नी सेवा देण्यात न्युनता केली नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार नामंजूर करुन, तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) अर्जदार व गैरअर्जदारांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |