Maharashtra

Nagpur

CC/188/2017

Shri Vaibhav Vijay Pakhmode, Through his natural Guardian father Vijay Pakhmode - Complainant(s)

Versus

Cloudtail India Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Adv. K.E.Meshram

22 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/188/2017
( Date of Filing : 12 Apr 2017 )
 
1. Shri Vaibhav Vijay Pakhmode, Through his natural Guardian father Vijay Pakhmode
R/o. Lakhani, Dist Bhandara, and Aternater Address R/o. Plot No. 77, Perfect co-operative Society, Indraprastha Nagar, Near Airport Wall, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Cloudtail India Pvt. Ltd.
S-405, Ground floor, Greater Kailash II, New Delhi 110048
New Delhi
New Delhi
2. Amazon India Pvt. Ltd.
Bridge Gateway, 8th floor, 26/1, Dr. Rajkumar Road, Malleshwaram (W), Banglore 560055
Banglore
Karnataka
3. Lenovo India Pvt. Ltd., Through Lenovo Service Centre
248, Canal Road, Behind Times of India, Dharampeth, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 22 Jun 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्त्‍याला सेवा देण्‍याचे नाकारले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांच्‍याकडे तक्रार क्रमांक २२२८९१३४८ दिनांक २६/७/२०१६ रोजी तक्रार केली परंतु त्‍याचा काहीही उपयोग झाला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना दिनांक १/८/२०१६ रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. तक्रारकर्त्‍याने ईमेल व्‍दारे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला दिनांक २३/७/२०१६ रोजी तक्रार केली. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी त्‍यांना पाठविलेल्‍या नोटीस च्‍या उत्‍तरात नमुद केले की, ते सदर मोबाईल हॅन्‍डसेट चे विक्रेते आहे आणि मोबाईल हॅन्‍डसेल मधील निर्मिती दोष हा निर्मात्‍याचा संबंधात आहे. त्‍यामुळे निर्मिती दोष करीता ते जबाबदार नाही आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक २३/७/२०१६, २६/०७/२०१६ व १/८/२०१६ अन्‍वये स्‍मरणपञ पाठवून तक्रारकर्त्‍याचे तक्रारीचे निराकरण करण्‍याबाबत कळविले परंतु त्‍यांनी दुर्लक्ष केले. तक्रारकर्त्‍याने नोटीस व्‍दारे विरुध्‍द पक्षाला सदर मोबाईल हॅन्‍डसेट बदलवुन किंवा त्‍याची किंमत परत करण्‍याबाबत विनंती केली. परंतु  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे तक्रारीकडे लक्ष दिले नाही. करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी मोबाईल हॅन्‍डसेट बदलवुन द्यावा किंवा तक्रारकर्त्‍याला मोबाईल हॅन्‍डसेट ची किंमत रुपये ११,९९९/-, १८ टक्‍के व्‍याजासह परत करावी.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना निर्देश देण्‍यात यावे की, त्‍यांनी मानसिक, शारीरिक ञासाकरीता रुपये ७५,०००/-  व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ च्‍या कथनानूसार विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे लेनोवो चे अधिकृत सेंटर आहे आणि तक्रारकर्त्‍याने नमुद केल्‍याप्रमाणे निर्मिती दोषाकरीता जबाबदार नाही आहे. जेव्‍हा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ चे सर्व्हिस सेंटर ला भेट दिली तेव्‍हा तक्रारकर्त्‍याचा मोबाईल हॅन्‍डसेट पूर्णपणे उघडलेला होता व तो दाखविण्‍यापूर्वी निर्मार्त्‍याने अधिकृत न केलेल्‍या कोणत्‍या तिस-या व्‍यक्‍तीने दुरुस्‍त केला होता. त्‍यामुळे विरुध्‍द  पक्ष क्रमांक ३ यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेतली नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचे विरुध्‍द तक्रार दाखल होऊ शकत नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी तक्रारकर्त्‍याला कोणत्‍याही प्रकारचा ञास दिला नाही. तक्रारकर्त्‍याने मोबाईल हॅन्‍डसेट चे निर्मात्‍याला पार्टी केले नाही. तक्रारकर्त्‍याची तक्रार मोबाईल हॅन्‍डसेट चे निर्मिती दोषाबाबत आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार निर्मात्‍याला आवश्‍यक पार्टी न बनविल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे कथनानूसार विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही कंपनी अॅक्‍ट १९५६ अंतर्गत रजिस्‍टर्ड कंपनी आहे व तीचा वस्‍तु विक्रीचा व्‍यवसाय आहे आणि ती अॅमेझॉन इंडिया मार्केट प्‍लेस
  1. Hindustan Motor Ltd. Vs. N. Sivakumar (2000) 10 SCC 654.
  2. Cadbury India Ltd. Vs. Kanteppa & Ors. I (2016) CPJ 436 (NC).
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी त्‍यांचे लेखी जबाबात नमुद केले की, विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ हे वस्‍तु विकत नाही किंवा वस्‍तु विकण्‍यास प्रलोभन देत नाही. विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ हे ऑनलाईन विक्रीचे ठिकाण आहे. ज्‍याठिकाणी तिसरी व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या वस्‍तु विक्रीकरीता, वस्‍तु विकत घेण्‍याकरीता ठेवतात. वस्‍तु विक्री करणारे त्‍या वस्‍तु विक्री करीता जबाबदार आहे. ASSPL  (Amazon Seller Services Private Ltd.) यांचा ग्राहक आणि विक्रेता यांचे व्‍यवहारामध्‍ये  संबंध नसतो. तक्रारकर्त्‍याने कोणतीही वस्‍तु ASSPL किंवा कोणतीही रक्‍कम ASSPL यांना अदा केली नाही. तक्रारकर्त्‍याने वस्‍तु विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे वेबसाईट वरुन विकत घेतली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रमांक २ चा ग्राहक संरक्षण कायदाअंतर्गत ग्राहक होऊ शकत नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हा मोबाईल हॅन्‍डसेट चा निर्माता किंवा विक्रेता नाही. त्‍यामुळे तक्रार दाखल करण्‍याचे कारण विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे विरुध्‍द उद्भवत नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे विरुध्‍द दाखल करण्‍यात आलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  2. उभयपक्षांनी मंचाचे अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवज व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?       नाही
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.