::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 20.02.2016 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली आहे.
सदर प्रकरण दि. 9/9/2015 रोजी मंचात दाखल झाले, परंतु विरुध्दपक्षाने जबाब दाखल न केल्याने विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 विरुध्द प्रकरण विना जबाब चालविण्याचा आदेश मंचाने दि. 17/12/2015 रोजी पारीत केला. दरम्यानच्या काळात उभय पक्षात समझोता झाल्याने, उभय पक्षांनी दि. 15/02/2016 रोजी संयुक्त पुरसीस दाखल केली, त्यातील मजकुर येणे प्रमाणे…
“वरील सदरचे प्रकरण विद्यमान न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून, सदर प्रकरण हे अर्जदार व गैरअर्जदार यांचे आपसात झाले आहे. त्यापोटी गैरअर्जदार हे अर्जदार यांना रु. 45,000/- देण्याचे मान्य करतात. तरी त्या संबंधीचा अवार्ड पास करावा.”
उभय पक्षांनी दाखल केलेल्या पुरसीसची दखल घेऊन मंचाने खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत केला.
::: अं ति म आ दे श :::
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे
2) उभय पक्षातील समझोत्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तपणे तक्रारकर्त्याला रु. 45,000/- ( रुपये पंचेचाळीस हजार ) द्यावे.
3) इतर खर्चाबद्दल आदेश पारीत नाही.
4) सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावी.
5) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.