Maharashtra

Nagpur

CC/10/219

Smt. Sandhya Ravindra Pundlik - Complainant(s)

Versus

City Servey Deptt. - Opp.Party(s)

Adv. Tushar Mandlekar

02 Nov 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/10/219
1. Smt. Sandhya Ravindra PundlikNagpur ...........Appellant(s)

Versus.
1. City Servey Deptt.Nagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 02 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर.
 
तक्रार दाखल दिनांकः 12/04/2010
                                                                             आदेश पारित दिनांकः 02/11/2010
 
तक्रार क्र.     -      219/2010
 
तक्रारकर्ता    :     श्रीमती संध्‍या रविंद्र पुंडलिक,
वय : 57 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम,
रा. 39, गणेश अपार्टमेंट्स, राम मंदिराजवळ,
स्‍वालंबी नगर, नागपूर.
             
 
                       
                   //- विरुध्‍द   -//
 
 
गैरअर्जदार    :    1)     कमलाकर हट्टेवार,
                  नगर भूमापन अधिकरी क्र. 3,
                  नविन प्रशासकीय इमारत, 6 वा माळा,
                  सिव्‍हील लाईन्‍स, नागपूर.
            2)    रामदास आगवणे,
अधिक्षक, भूमी अभिलेख,
तहसिल कार्यालय, 1 ला माळा,
सिव्‍हील लाईन्‍स, नागपूर.
 
तक्रारकर्त्‍यातर्फे               :      स्‍वतः.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे           :      ऍड. श्रीमती वजानी.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे           :      स्‍वतः.
 
 
 
 
                 
           गणपूर्तीः    1.    श्री. विजयसिंह राणे   -    अध्‍यक्ष.
                     2.    श्री. मिलींद केदार -     सदस्‍य.
 
           
               मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 02/11/2010)
 
1.     तक्रारकर्त्‍यानी सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्‍याची तक्रार अशी आहे की, त्‍याने दि.30.12.1998 रोजी स्‍वालंबी सहकारी गृहनिर्माण संस्‍थामधील गणेश अपार्टमेंट्समधील दूस-या मजल्‍यावरील गाळा क्र., 201, क्षेत्रफळ 850 चौ.मी. मौजा भामटी, न.भु.क्र.28, स्‍वालंबीनगर, नागपूर येथे स्थित गाळयाचे नामांतरण करण्‍याकरीता दि.28.07.2002 रोजी न.भु.अधिकारी क्र. 3 कार्यालयात रीतसर अर्ज करुन आपल्‍या नावाचा फेरफार करण्‍याबाबत विनंती केली. परंतू  गैरअर्जदारांनी नियमानुसार सदर नामांतरणाचा अर्ज हा एक महिन्‍याच्‍या कालावधीत निकाली काढला नाही. वारंवार विचारणा केल्‍यावरही तक्रारकर्त्‍याचा अर्ज निकाली काढण्‍यात आला नाही.
      तक्रारकर्त्‍याने आखिव पत्रिकेची प्रत मागणीसाठी अर्ज केला असता प्रमाणित प्रतीस रु.15/- आकारुन प्रमाणित प्रत द्यावयास पाहिजे. परंतू गैरअर्जदार क्र. 1 यांनी रु.60/- अवैधरीत्‍या वसुल केले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने सेवेतील त्रुटी केली आहे. गैरअर्जदाराने आखिव पत्रिका स्‍वखर्चाने द्यावी, मानसिक, शारिरीक व भावनिक त्रासाकरीता भरपाई मिळावी, तक्रारीचा खर्च मिळावा, नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ खालील निवाडे दाखल केलेले आहेत.
1) I (1994) CPJ 114 (NC), Akhil Bhartiya Grahak Panchayat Vs. State of Gujrat
2) II 1995 CPJ 1 (SC), Indian Medical Association Vs. V. P. Santha
3) III (1995) CPJ 28 (SC), Housing Board Haryana Vs. Housing Board Colony Welfare Association & ors.
4) 2003 (3) CPR 114, V. Mehar Shravan Kumar Vs. Regional Passport Officer
5) 2001 (1) CPR 352, The Regional Passport Officer Vs. Mrs, V. RAmani Bai.
 
 
2.    सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्‍यानंतर मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावला. गैरअर्जदारांनी सदर तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले.
3.    गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी उत्‍तरात, सदर तक्रार मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही, तक्रारकर्ता ग्राहक नाही, गैरअर्जदाराचे कार्य सेवा सदरात मोडत नाही, सदर वादाबाबत सक्षम अधिकारी किंवा अन्‍य तत्‍सम महसुली अधिकारी यांचे कडे तक्रार अथवा अपील अर्ज दाखल करुन वाद सोडवून घ्‍यावयास पाहिजे होता असे प्राथमिक आक्षेप उपस्थित केले. तसेच सदर तक्रारीतील वाद हा ग्रा.सं.का.च्‍या प्रावधानात किंवा तरतूदीत नाही.
      परीच्‍छेद निहाय उत्‍तरामध्‍ये गैरअर्जदाराने तक्रारीतील फेरफारीची कार्यवाही पूर्ण झाल्‍याचे नमूद करुन तक्रारकर्त्‍याने गैरहेतूने तक्रार दाखल केल्‍याचे म्‍हटले आहे. तसेच महाराष्‍ट्र शासन राजपत्र 25.09.2001 नुसार महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 127 अन्‍वये नमूद प्रत्‍येक बाबीचा योग्‍य अर्थ लावून नक्‍कल फी आकारणी केली जाते. तक्रारीतील इतर बाबी नाकारल्‍या आहेत.
      गैरअर्जदार क्र. 1 ने विशेष उत्‍तरात महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियमानुसार मालकी हक्‍क व इतर हक्‍कांच्‍या नोंदी अद्यावत करण्‍याबाबतची कायदेशीर/न्‍यायिक अर्धन्‍यायिक प्रक्रीया आहे व त्‍याबाबत कोणतेही शुल्‍क आकारण्‍यात येत नाही. तक्रारकर्ता वस्‍तुस्थिती लपवून मा‍नसिक दबाव आणून अनुचित आर्थिक लाभ प्राप्‍त करण्‍याच्‍या हेतूने प्रस्‍तुत तक्रार दाखल केल्‍याने    सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे, म्‍हणून सदर तक्रार खारीज करण्‍याची मागणी गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराने आपल्‍या म्‍हणण्‍याचे दाखल काही निवाडे मंचासमोर दाखल केलेले आहेत.
1) 2001 (1) CPR 580, Prabhari Adhikari, Nakal Shakha, Jila Adhyaksha Karyalaya & Ors. Vs. Jagdish Prasad Gautam
2)   II (2004) CPJ 2, Accountant General (A&E) Vs. R. Muthusamy
3) 2000 (2) CPR 70, Soosai @ Joseph Izidore Vs. The District Collector of Kanyakumari
4) Appeal No. 49/94, City Survey Officer No. 1 Vs. Smt Nussrat Begam, Maharashtra State Commission.
 
4.    गैरअर्जदार क्र. 2 ने पुरसिस दाखल करुन गैरअर्जदार क्र. 1 चे उत्‍तर हे गैरअर्जदार क्र. 2 चे समजण्‍यात यावे असे नमूद केले आहे.
 
5.    सदर प्रकरण मंचासमोर दि.25.10.2010 रोजी युक्‍तीवादाकरीता आले असता मंचाने उभय पक्षांचा युक्‍तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी उभय पक्षांतर्फे दाखल करण्‍यात आलेली कागदपत्रे, शपथपत्रे, निवाडे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
6.    मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्‍याचे शपथपत्रावर असलेले कथनाचे व त्‍यापुष्‍टयर्थ दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे असे निदर्शनास आले की, तक्रारकर्त्‍याने दि.28.07.2002 रोजी गैरअर्जदाराकडे गाळयाचे नामांतरण व फेरफार करण्‍याबाबत अर्ज केला होता. त्‍यानंतर डिसेंबर 2009 पर्यंत तक्रारकर्त्‍याने याबाबत कधीही वाद उपस्थित केला नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने सदर वाद हा वादाचे कारण उपस्थित झाल्‍यापासून आठ वर्षानंतर मंचासमोर दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराचे मतानुसार तक्रारकर्त्‍याने नामांतरण नोंदी अर्जासोबत आवश्‍यक दस्‍तऐवज दाखल केलेले नव्‍हते. परंतू ते मागणी केल्‍याचे संदर्भात कुठलेही दस्‍तऐवज गैरअर्जदाराने दाखल केलेले नसल्‍याने त्‍यांचे सदर म्‍हणणे मंचास रास्‍त वाटत नाही. परंतू तक्रारकर्त्‍याने सन 2002 चा वाद सन 2010 मध्‍ये उपस्थित केलेला आहे. सदर विलंबाबाबत तक्रारकर्त्‍याने कोणतेच संयुक्‍त कारण वा विलंबाबाबत रास्‍त दस्‍तऐवज दाखल केलेले नाही. मंचाचे मते तक्रारकर्त्‍याचा सदर वाद हा मुदतबाह्य आहे. त्‍यामुळे तो खारीज होण्‍यास पात्र आहे. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन व दाखल दस्‍तऐवजावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2)    खर्चाबाबत काहीही आदेश नाही.
 
 
      (मिलिंद केदार)              (विजयसिंह राणे)
         सदस्‍य                      अध्‍यक्ष            
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT