तक्रार क्र.131/2010 प्रतिभा खरोटे विरुध्द सी.टी.रियलकॉम लि. फिर्याद अर्ज नि.1 वरील आदेश (दि.09.05.2011 ) 1. व कागदपञाचे अवलोकन केले. अर्जदाराने आपला व्यवसाय “ घरकाम ” असा लिहीलेला आहे. असे असताना देखील अर्जदाराने असे म्हटले आहे की, अर्जदार यांचेवरच संपूर्ण कूटूंबाची पालनपोषणाची जबाबदारी आहे ? त्यांनी उत्पन्नाचे काय साधन आहे यांचाही उल्लेख केलेला नाही. तसेच अर्जदार हिने एवढी रक्कम कोठून आणली या बददल काहीही कागदपञे दिलेले नाही. तथापि त्या खोलात जाण्याची याठिकाणी आवश्यकता नाही असे आम्हाला वाटते. अर्जदाराला गैरअर्जदाराकडून मिळालेले एकूण 17 चेकस पैकी 14 चेकस वटले आहेत व त्या 14 चेकचे मिळून एकूण रु.1,08,850/- सदरी प्रतीभा खरोटे यांना गैरअर्जदाराकडून मिळाले असल्याचे लिहीलेले आहे. तरीही त्यांनी रु.5,16,500/- रुपयांची मागणी केली आहे ? दोन्ही तक्रारीमध्ये जो करार (Memorandum of undertaking) झालेले आहे त्यावरुन असे दिसते की, सदरी स्टॅम्प पेपर रु.100/- चा मुंबई येथे विकत घेतला आहे व सदरी करार हा मुंबई येथेच झालेला आहे. दोन्ही तक्रारीमध्ये गैरअर्जदार हे मुंबई येथेच राहतात असे कथन केले आहे.अर्जदाराची तक्रार काळजीपूर्वक वाचली 2. अर्जदाराच्या कथनावरुन गैरअर्जदार हे मुंबई येथेच राहत असून तेथेच व्यवसाय करतात. सदरी कथनावरुन करार देखील मुंबई येथेच झालेला आहे. त्यामूळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 11 (2) (a) नुसार सदरी तकार ही मुंबई येथेच दाखल करावयास पाहिजे. सदरी (Memorandum of undertaking) वरुन असेही सिध्द होते की सदरी स्टॅम्प पेपर हा मुंबई येथेच खरेदी करण्यात आला व तो करार देखील मुंबई येथेच झाला आहे.सदरी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 11 (2) (c) प्रमाणे देखील ही तक्रार ज्याठिकाणी कॉज ऑफ अक्शन निर्माण झाले तेथे, म्हणजे मुंबईतच तक्रार दाखल करावयास पाहिजे होती. 3. सदरी मेमोरंडम ऑफ अंडर टेडींगची झेरॉक्स प्रत पहाता असे दिसते की, तो करार वेगळयाच स्वरुपाचा आहे. तसेच त्यातील परिच्छेन नं.7 पहाता असे स्पष्ट दिसते की, कांही तक्रार निर्माण झालीच तर त्यांचा निवाडा मुंबई येथील कोर्टातच होईल. अर्जदाराने असे स्पष्ट लिहून दिल्यामुळे देखील हा वाद मुंबई येथेच दाखल करावयास पाहिजे होता, असे आमचे मत आहे. 4. एकंदर सर्व कागदपञ पाहिले असता असे दिसते की, गैरअर्जदार हे मुंबई येथे राहतात व व्यवसायही करतात. सदरी तथाकथीत करार हा मुंबईतच झालेला होता सदरी तक्रार निवारण करण्याचा अधिकार मुंबई येथील मंचास प्राप्त होतो असे आमचे मत झालेले आहे. त्यामूळे अर्जदाराने ही तक्रार मूंबई येथील विद्यमान मंचापूढे, त्यांना तसा सल्ला दिला तर दाखल करावी किंवा सखोल पुराव्यासाठी दिवाणी न्यायलयात दाखल करावी. म्हणून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. या मंचास सदरी तक्रार चालविण्याचे कार्यक्षेञ येत नसल्यामुळे ही तक्रार खारीज करण्यात येते. 1. 2. अर्जदाराने यांच कॉज ऑफ अक्शन वर त्यांना तसा सल्ला मिळाला तर, ते आपली तक्रार मुंबई येथील विद्यमान मंचासमोर दाखल करु शकतील किंवा दिवाणी न्यायालयापुढे दाखल करु शकतील. 3. खर्चाबददल आदेश नाही. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |