Maharashtra

Nagpur

CC/94/2017

Prakash Keshavrao Dehankar - Complainant(s)

Versus

City Collection & its Proprietor/Director/Partner - Opp.Party(s)

Adv. Swapnil Chandurkar

17 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/94/2017
( Date of Filing : 18 Feb 2017 )
 
1. Prakash Keshavrao Dehankar
R/o. Shivpriya, A-Wing, F-609, Jaitala, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. City Collection & its Proprietor/Director/Partner
Shop No. 2, Neel Kamal Complex, Mahajan Market, Nagpur 440012
Nagpur
Maharashtra
2. Sony India Pvt. Ltd. & its Proprietor/Director/Partner
A-31, Mohan Co-Operative Industrial Estate, Mathura Road, New Delhi 100044
New Delhi
New Delhi
3. Innovation Computers & its Proprietor/Director/Partner
Plot No. 31, First Floor, Gandhi Grain Market, C.A.Road, Nagpur 440009
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Mar 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. नविन ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ मधील तरतुदीनूसार तक्रारकर्त्‍याच्‍या  उपस्थिती अभावी तक्रार खारीज करणे योग्‍य नाही म्‍हणून वर्तमान प्रकरणाचा निकाल आम्‍ही गुणदोषावर देत आहोत.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडून सोनी मोबाईल एक्‍सपेरिया एम ४ कोरल एक मोबाईल हॅन्‍डसेट रुपये १७,३९०/- इतक्‍या रकमेत दिनांक २/३/२०१६ रोजी विकत घेतला. तक्रारकर्त्‍याने सदर मोबाईल हॅन्‍डसेटचा रुपये १७९९/- इतकी रक्‍कम अदा करुन विमा उतरविला.
  3. तक्रारकर्त्‍याचा मोबाईल हॅन्‍डसेट काम करीत नव्‍हता म्‍हणून तक्रारकर्ता दिनांक २१/४/२०१६ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडे गेला व मोबाईल हॅन्‍डसेट मधील डिफेक्‍ट बाबत सांगितले. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला सदर मोबाईल हॅन्‍डसेट विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला दाखविण्‍याबाबत कळविले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे मोबाईल हॅन्‍डसेट दाखविला. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी मोबाईल हॅन्‍डसेट बघितला व काहीही न करता तक्रारकर्त्‍याला परत केला. तक्रारकर्त्‍याला सदर मोबाईल हॅन्‍डसेट वापरतांना सोयीचे वाटत   नसल्‍यामुळे त्‍याने परत दिनांक ३०/०८/२०१६ रोजी सर्व्हिस सेंटर विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला दाखविला व तो त्‍यांनी दिनांक ९/९/२०१६ पर्यंत आपणाजवळ ठेवला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला भेट दिली व मोबाईल हॅन्‍डसेट दुरुस्‍त करुन देण्‍याबाबत विनंती केली. परंतु तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडून सेवा प्राप्‍त झाली नाही.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून व्‍यवस्थित सेवा न मिळाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेशी संपर्क साधावा व त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास चुक दुरुस्‍त करण्‍याकरीता ४८ तासाचा अवधी मागितला. दिनांक १०/०१/२०१६ रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला भेट दिली व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला मोबाईल हॅन्‍डसेट काम करीत  नसल्‍यामुळे गैरसोय होत असल्‍याबाबत कळविले व तो त्‍वरीत दुरुस्‍त करुन देण्‍याबाबत कळविले. तक्रारकर्त्‍याने घेतलेला मोबाईल हा वॉरंटी कालावधीत खराब झालेला आहे व विरुध्‍द पक्ष क्रमांक  १ ते ३ यांची तक्रारकर्त्‍याला सेवा देण्‍याची जबाबदारी आहे. परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ तक्रारकर्त्‍याला सेवा देण्‍यात अपयशी ठरली आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना त्‍यांचे वापरात असलेला दोषपूर्ण मोबाईल हॅन्‍डसेट बदलवून नव्‍याने मोबाईल हॅन्‍डसेट देण्‍याबाबत विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्त्‍याचे तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तक्रारकर्त्‍याने स्‍वतःचे व्‍यापाराकरीता सदर मोबाईल हॅन्‍डसेट विकत घेतला होता परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्त्‍याला सेवा न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे फार मोठे नुकसान झाले आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ञुटीपूर्ण सेवा दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलामार्फत विरुध्‍दपक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीसची दखल घेतली नाही करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याचे मोबाईल हॅन्‍डसेटची खरेदी किंमत रुपये १७,३९०/- विम्‍यावर खर्च केलेले रक्‍कम रुपये १,७९९/- सह परत करण्‍याचे आदेशीत करावे.
  3. तक्रारकर्त्‍याला नविन मोबाईल हॅन्‍डसेट देण्‍याचे आदेशीत करावे.
  4. मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये २,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १५,०००/- अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्षाचे कथनानूसार विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ही कंपनी कायदा १९५९ अंतर्गत नोंदणीबद्ध कंपनी असून विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ व विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ चे अनुक्रमे अधिकृत सर्व्हिस सेंटर व अधिकृत विक्रेता आहेत.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनीचा सोनी एक्‍सपेरिया एम ४ अॅक्‍वा/ई२३६३ आय.एम.ई.आय क्रमांक ३५३८६३०७२३७७७५१ हा मोबाईल हॅन्‍डसेट दिनांक २/३/२०१६ रोजी खरेदी केला. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ही मोबाईलच्‍या मुळ खरेदी दिनांकापासून एक वर्षाची वॉरंटी त्‍यामधील शर्ती व अटीला धरुन पूरविते. परंतु वॉरंटीमधील तरतुदीच्‍या बाहेरील दाव्‍याकरीता जबाबदार नसते.
  3. तक्रारकर्त्‍याने मोबाईल हॅन्‍डसेट विकत घेतल्‍यानंतर तक्रारकर्ता दिनांक २१/४/२०१६ रोजी सदर मोबाईल मधील बॅटरी प्राब्‍लेमकरीता सर्व्हिस सेंटरला पोहचला. सर्व्हिस सेंटरने कोणताही विलंब न लावता तक्रारकर्त्‍याची तक्रार लक्षात घेवून मोबाईल हॅन्‍डसेट तपासला. तपासणीनंतर लक्षात आले की, मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये काही प्राब्‍लेम नव्‍हता फक्‍त त्‍यामधील सॉफ्टवेअर अपडेट करावयाचे होते व हार्डवेअर व्‍यवस्थित काम करीता होते. सर्व्हिस सेंटरने कोणताही विलंब न लावता मोबाईल हॅन्‍डसेटमधील सॉफ्टवेअर अपडेट केले व तक्रारकर्त्‍याला मोबाईल हॅन्‍डसेट चांगल्‍या स्थितीत परत करण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याला हॅन्‍डसेटमधील सॉफ्टवेअर अपडेट करता येत नव्‍हते. ज्‍या ग्राहकांना सॉफ्टवेअर अपडेट करता येत नाही त्‍याकरीता सर्व्हिस सेंटर सॉफ्टवेअर अपडेटची सेवा पूरविते.  सॉफ्टवेअर अपडेट हे मोबाईल हॅन्‍डसेट चे स्‍मुथ फंक्‍शनिंग करीता वेळोवेळी करावे लागते. सॉफ्टवेअर अपडेट म्‍हणजे मोबाईल हॅन्‍डसेटमधील इनहरन्‍ट डिफेक्‍ट काढणे नव्‍हे.
  4. तक्रारकर्त्‍याने दिनांक ३०/०८/२०१७ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ सर्व्हिस सेंटरला मोबाईल हॅन्‍डसेट मधील बॅटरी चार्जिंग, हिटींग + टच बाबत भेट दिली. सर्व्हिस सेंटरने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेतली आणि मोबाईल हॅन्‍डसेटची तपासणी केली. तक्रारकर्त्‍याच्‍या हॅन्‍डसेटमधील Front Cover Assy  आणि इतर आवश्‍यक पार्टस बदलविले व त्‍याबाबत कोणतेही शुल्‍क तक्रारकर्त्‍याकडून घेतले नाही व निःशुल्‍क सेवा दिली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ सर्व्हिस सेंटरला दिनांक १०/११/२०१६ रोजी मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये ‘नो पॉवर’ याबाबत तक्रार केली. सर्व्हिस सेंटरने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची तात्‍काळ दखल घेवून मोबाईल हॅन्‍डसेटमधील बॅटरी व आवश्‍यक सुटे भाग बदलविले. सदरची सेवा विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी तक्रारकर्त्‍याला निःशुक्‍ल दिली व तक्रारकर्त्‍याकडून सुट्या भागाचे पैसे घेतले नाही.
  5. तक्रारकर्त्‍याने मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये ईनहरन्‍ट डिफेक्‍ट असल्‍याबाबत काहीही पुरावा तक्रारीचे अभिलेखावर दाखल केला नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने मोबाईल हॅन्‍डसेटमध्‍ये काही निर्मिती दोष असल्‍याबाबत एकही दस्‍तावेज अभिलेखावर दाखल केला नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे. वरील नमुद बाबींवरुन असे लक्षात येते की, वरील नमुद हॅन्‍डसेटबाबत कोणतीही ञुटीपूर्ण सेवा देण्‍यात आली नाही. सर्व्हिस सेंटरने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेतली आहे व त्‍याला सेवा दिली आहे. सर्व्हिस सेंटरने तक्रारकर्त्‍याच्‍या  मोबाईल हॅन्‍डसेट मधील दोषाबाबत वेळोवेळी सेवा दिली आहे व दोषाचे निराकरण केले आहे.
  6. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेज व विरुध्‍द पक्षाने दाखल केलेला लेखी जबाब याचे वाचन केल्‍यावर खालिल मुद्दे उपस्थित  करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                  होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                        नाही
  3. काय आदेश ?                                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी निर्मित केलेला सोनी एक्‍सपेरिया एम ४ अॅक्‍वा/ई २३६३ आय.एम.ई.आय. क्रमांक ३५३८६३०७२३७७७५१ हा एक मोबाईल हॅन्‍डसेट रुपये १७,३९०/- इतक्‍या  रकमेत दिनांक २/३/२०१६ रोजी विकत घेतला. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍तावेजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याचा मोबाईल हॅन्‍डसेट काम करीत नव्‍हता म्‍हणून दिनांक २१/४/२०१६ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ सर्व्हिस सेंटरला घेवून गेला. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये योग्‍य दुरुस्‍ती करुन तक्रारकर्त्‍याला परत केला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक ३०/०८/२०१६ रोजी त्‍याचे मोबाईल हॅन्‍डसेटमधील बॅटरी चार्जिग, हिटींग, टचबाबत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ सर्व्हिस सेंटर ला भेट दिली व हॅन्‍डसेट दाखविला. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी मोबाईल हॅन्‍डसेटमधील Front Cover Assy  आणि इतर आवश्‍यक पार्टस बदलविले व त्‍याबाबत कोणतेही शुल्‍क आकारले नाही व  तक्रारकर्त्‍याला मोबाईल हॅन्‍टसेट दुरुस्‍त  करुन परत केला. त्‍यानंतर दिनांक १०/११/२०१६ रोजी तक्रारकर्त्‍याने मोबाईल हॅन्‍डसेट मधील नो पॉवर बाबत तक्रार केली व सर्व्हिस सेंटर ने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेवून मोबाईल हॅन्‍डसेटमधील बॅटरी व आवश्‍यक सुटे भाग निःशुक्‍ल बदलवून दिले. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍तावेज क्रमांक ३,४,५ चे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वॉरंटी कालावधीमध्‍ये निःशुल्‍क सेवा दिली आहे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास कोणतीही ञुटीपूर्ण सेवा दिली नाही आहे.  
  2. तक्रारकर्त्‍याने मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये निर्मिती दोष असल्‍याबाबत एकही पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍द पक्षाने पंजाब ट्रक्‍टर लिमी विरुध्‍द प्रताप, (1997) II CPJ 81 (NC) व इतर न्‍यायनिवाडे समर्थनार्थ सादर केले आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.