जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/152. प्रकरण दाखल तारीख - 07/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 09/10/2009 समक्ष – मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या सरवरी रमजतान मडल भ्र. रमजतान मडल वय, 35 वर्षे, धंदा घरकाम रा.के.2142/98 आणि 10 सिडको, नांदेड मार्फत- मुखत्यारनामाधारक अर्जदार रमजतान मंडल पि. बहादूर मडल वय 42 वर्षे, धंदा व्यापार, रा.के.2142/9 आणि 10 सिडको, नांदेड. विरुध्द. 1. शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित, (महाराष्ट्र) सिडको, नांदेड. गैरअर्जदार 2. मुख्य शाखा कार्यालय, उद्योग भवन, तापडिया फेम समोर, औद्योगिक विकास महामंडळ, सिडको बसस्टँड ते जळगाव रोड, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड. मिलींद एकताटे. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.दिनकर नागापूरकर. गैरअर्जदार क्र. 2 तर्फे - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार शहर औद्योगिक विकास महामंडळ यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा प्लॉट नंबर 30, चा मालक ताबेदार असून जो सिडको येथे स्थित असून सदर प्लॉट अर्जदार यांनी पुष्पा नेमीचंद चौधरी यांचेकडून खरेदी केला आहे व सन 1988 पासून अर्जदाराचा त्यांवर ताबा आहे. पुष्पा चौधरी यांनी सदरील प्लॉट सुरेखा मालपानी यांना यापूर्वी विकला व हस्तांतरण केला होता जो दि.12.07.2004 रोजी व दि.22.01.2004 रोजी रेज्यूलेशन नं.8913 प्रमाणे करार झाला व गैरअर्जदार यांनी तो त्यावेळेस सुरेखा मालपानी यांच्या नांवाने हस्तांतरण केला होता. मालपानी यांच्या विनंतीवरुन नंतर अर्जदार यांच्या नांवे ञयस्थ करार दि.7.6.2007 रोजी करुन दिला. मूळ मालक सूरेखा असल्यामूळे गैरअर्जदार यांनी सदरच्या करारास मान्यता देऊन अर्जदार यांचे नांवे हस्तांतरण करुन देण्यासाठी परवानगी दिली. त्याप्रमाणे दि.7.6.2007 रोजी प्लॉट नंबर 30 साठी रु.10,000/- भरुन अर्जदाराने उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन घेतली. अर्जदार यांस सदर प्लॉटचे बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी दि..3.3.2008 रोजी चालान क्र.392 प्रमाणे म.न.पा. कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला. अर्जदार यांनी दि.1.3.2008 रोजी रु.1866/-भरुन म.न.पा.क्र.11-05-473/1 असा क्रमांक घेतला. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे सर्व कर भरणा केला आहे. तसेच त्यावरही दि.23.3.2007 रोजी रु.85,000/- तसेच दि.26.3.2007 रोजी रु.10,300/- तसेच अकृषिक कराचे रु.3076/- देखील जमा केले आहे. सर्व बाबीची पूर्तता करुन ही म.न.पा. कार्यालयाने अर्जदारास बांधकाम परवानगी दिली नाही. अर्जदाराने दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्याकडे आर.सी.एस.नंबर 455/2008 दाखल करुन अर्जदारास स्थगिती आदेश मिळाला आहे. तसेच दि.10.09.2008 रोजी वकीलामार्फत नोटीस दिली आहे. दि.5.9.2008 रोजी गैरअर्जदाराकडून रु.61,750/- बाकी असल्याबाबत नोटीस मिळाली त्यामध्ये विषयांकित भुखंडावरील अतिरिक्त भाडे पटटा भरल्यानंतरच आपल्याला नाहरकत प्रमाणपञ देण्यात येईल अशी नोटीस दिली. त्यामूळे अर्जदाराला प्रचंड धक्का बसला असून अर्जदाराकडे कोणतीही बाकी नाही.अर्जदार यांनी रु.98,876/- भरलेले असताना गैरअर्जदार हे रु.61,750/- ची बाकी दाखवितात. त्यामूळे गैरअर्जदार यांनी दिलेल्या चूकीच्या सेवेमूळे झालेल्या मानसिक ञासापोटी नूकसान भरपाई रु.50,000/- व रु.5,000/- दावा खर्चासह तक्रार मंजूर करावी तसेच त्यांचे प्लॉटला नाहरकत प्रमाणपञ देण्यात यावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदार यांनी पूष्पा चौधरी यांचेकडून प्लॉट घेतला व त्यांचा ताबा आहे हे गैरअर्जदार यांना मान्य नाही. पुष्पा चौधरी यांनी कोणता करार केला या बाबत त्यांना माहीती नाही. हस्तांतरणा बाबत गैरअर्जदार यांना काहीही माहीती नाही. अर्जदाराने प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी किंवा सदर प्लॉटवर म.न.पा. क्रंमाक मिळविण्यासाठी कुठल्या प्रक्रियेचा अवलंब केला या बददल त्यांना माहीती नाही. अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडे नाहरकत प्रमाणपञ मिळविण्यासाठी केव्हाही आलेले नाहीत. अर्जदाराने दिलेल्या रक्कमा व तारखा गैरअर्जदार हे अमान्य करतात.दिवाणी दाव्या बाबत व स्थगिती बाबत त्यांना काहीही कल्पना नाही.गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणतीही बाकी असल्याबाबत नोटीस पाठविलेली नाही. त्यामूळे त्यांना मनस्ताप होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अर्जदार हा ग्राहक या संज्ञेखाली येत नसल्यामूळे व तसेच सदर तक्रार ही वेळेत दाखल न केल्यामूळे तक्रार अपाञ असून ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचाने पाठविलेली नोटीस मिळाली परंतु ते हजर झाले नाही म्हणून प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा करुन पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी उस्मान नगर येथील प्लॉट नंबर 30 हा सूरेखा ओमप्रकाश मालपानी या मूळ परवानाधारक मालक असलेल्या व्यक्तीकडून विकत घेतलेला आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ती फी व रक्कम अदा केल्यानंतरच सदरचा प्लॉट अर्जदार यांचे नांवे हस्तांतरीत करण्यात आलेला आहे. अर्जदार, गैरअर्जदार व सूरेखा ओमप्रकाश मालपानी यांचेमध्ये TRIPARTIATE AGREEMENT झालेले आहे. दि.23.03.2007 रोजी अर्जदार यांनी Addl. Lease Premium म्हणून रु.85,500/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांचेकडे भरलेली आहे. तशी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पावती दिलेली आहे. अर्जदारांचा अर्ज, शपथपञ व अर्जासोबत दाखल केलेली कागदपञे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांचे नांवे प्लॉट हस्तांतरण झाल्यानंतर अर्जदार यांनी नांदेड वाघाळा यांचे कर भरल्या बाबतची कराची पावती या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेली आहे. अर्जदार यांना सदरचे प्लॉटवर बांधकाम करायचे असल्याने बांधकाम परवाना मंजूरी मिळणेसाठी सहायक संचालक, नगर रचना विभाग यांचेकडे मागणी केलेली आहे. त्यावेळी बांधकाम करणे बाबतची आवश्यक त्या कागदपञाची पूर्तता केल्यानंतर बांधकाम परवाना मिळण्यासाठी सिडकोचे एनओसी आवश्यक असल्याने अर्जदार यांनी दि.30.05.2008 रोजी लेखी पञाद्वारे सिडको कार्यालय सिडको यांचेकडे एनओसी ची मागणी केलेली आहे. अर्जदार यांनी मागणी केल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडे भूखंडावरील अतिरिक्त भांडेपटटा रु.61,750/- एवढया रक्कमेची मागणी केलेली आहे व सदरची रक्कम भरल्यानंतरच नाहरकत दाखला देण्यात येईल असे अर्जदार यांना दि.05.09.2008 रोजीच्या पञाने कळवलेले आहे. सदरचे पञ आल्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दि.10.09.2008 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे. सदरच्या नोटीसला गैरअर्जदार यांनी उत्तर दिलेले नाही. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यामध्ये अर्जदार यांचे अर्जातील पूर्ण कथन नाकारलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या अर्जातील कथन नाकारले म्हणजे त्यांची जबाबदारी संपत नाही. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपञावर गैरअर्जदार यांची सही व शिक्का आहे. त्यामूळे अर्जदार यांचे कथन गैरअर्जदार यांनी नाकारले यांला कोणताही कायदेशीर अर्थ उरत नाही. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये पॅरा नंबर 8 मध्ये अर्जदार यांचेकडे कोणतीही बाकी असल्या बाबत कोणतीही नोटीस पाठविली नाही असे नमूद केलेले आहे. प्रत्यक्षात अर्जदार यांनी दाखल केलेल्या गैरअर्जदार यांच्या दि.5.9.2008 रोजीच्या पञावर गैरअर्जदार यांचा शिक्का व सही आहे. अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी बांधकाम करण्यासाठी आवश्यक असणारे नाहरकत प्रमाणपञ कोणतेही योग्य व कायदेशीर कारण नसताना दिलेले नाही. अर्जदार यांनी प्लॉट खरेदी करतेवेळी गैरअर्जदार यांचेकडे अडीशनल लिज प्रिमियम म्हणून रक्कम रु.85,500/- चा भरणा केल्याचे दाखल कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीमध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडे अतिरिक्त भांडे पटटा रु.61,750/- ची केलेली मागणी योग्य व कायदेशीर अशी नाही. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपञावरुन अर्जदार यांनी प्लॉट घेतेवेळेस गैरअर्जदार यांचेकडे अडीशनल लिज प्रिमियम भरलेले असताना पून्हा पून्हा अर्जदार यांचेकडून अतिरिक्त भांडे पटटयाची मागणी गैरअर्जदार यांनी करणे योग्य व कायदेशीर असे नाही. गैरअर्जदार यांनी कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना अर्जदार यांना नाहरकत प्रमाणपञ दिलेले नाही, यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून नाहरकत प्रमाणपञ मिळण्यासाठी मागणी केलेली आहे. कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना नाहरकत प्रमाणपञ दिले नाही.अर्जदार यांनी प्रमाणपञाची मागणी करुनही गैरअर्जदार यांनी बांधकाम परवानासाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपञ न दिल्यामूळे सदरचे प्रमाणपञ न मिळाल्यामूळे अर्जदार यांना मानसिक ञास झालेला आहे. गैरअर्जदार यांचेकडून नाहरकत प्रमाणपञ मिळण्यासाठी अर्जदार यांना या मंचामध्ये अर्ज करावा लागलेला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून अर्जाचे खर्चापोटी व मानसिक ञासापोटी रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्यांनी दाखल केलेली कागदपञे, त्यांचे तर्फे वकिलाचा यूक्तीवाद आणि गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपञ व नि.11 ला गैरअर्जदार यांचेतर्फे दाखल केलेले लेखी म्हणणे हाच यूक्तीवाद समजण्यात यावा अशी पूरशीस, या सर्वाचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश आजपासून 30 दिवसांचे आंत, 1. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना प्लॉट नंबर 30 उस्माननगर, नवीन नांदेड यांचे नाहरकत प्रमाणपञ दयावे. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मानसिक ञासाबददल रु.3000/- व दावा खर्च म्हणून रु.2000/- दयावेत. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |