तक्रारदार : वकील श्री. यातीन शहा हजर.
सा.वाले : वकील श्री. विलास बने हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले हे बँकिंग व्यवसाय करणारी बँक असून त्यांचे कार्यालय तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी आहे.
2. सा.वाले हे सांताक्रुझ मुंबई येथे रहात असून बांधकामाचा व विकासकाचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सा.वाले बँकेत त्यांचे बचत खाते क्रमांक 5545316112 हे कार्यरत होते. तसेच सा.वाले बँकेत तक्रारदार यांनी ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि. या भागीदारी संस्थेचे चालु खाते देखील बँकेत उघडले होते. सदर भागीदारी संस्थेचा व्यवहार तक्रारदार व त्यांचे बंधु कैलास प्रसाद चौक्सी यांचे सहीने कार्यरत होते. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, दिनांक 18.8.2008 रोजी सा.वाले यांनी सचिन चोखानी यांच्या विनंती वरुन ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि. यांच्या चालु खात्यात अपुरी शिल्लक असताना देखील रु.21 लाखाचा धनाकर्ष अदा केला. तसेच दिनांक 18.8.2008 रोजी तक्रारदार यांनी रु.20,000/- येवढया रक्कमेचा धनादेश देऊन देखील तक्रारदार यांचे खात्यातुन रु.1,80,000/- तक्रारदार यांच्या खात्यातुन वजा केले व तक्रारदार यांच्या खात्यात रु.2 लाख नावे टाकले.
3. तक्रारदार यांचे असे देखील म्हणणे आहे की, दिनांक 29.3.2011 रोजी कोलंबीया पेट्रोकेम प्रा.लि. या भागीदारी संस्थेने 6 करोड हे तक्रारदार यांच्या ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि. यांच्या खात्यात वायर ट्रान्सफरव्दारे पाठविले व ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि. या भागीदारी संस्थेने सदरची रक्कम लक्षचंदी हौसिंग अॅन्ड इन्फ्रास्टक्चर प्रा.लि. या भागीदारी संस्थेस कर्ज म्हणून दिली. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सा.वाले बँकेने तक्रारदार यांच्या सदर व्यवहारास तिव्र आक्षेप घेऊन सदर व्यवहारा बाबत तक्रारदार यांच्याकडे दिनांक 13.5.2011 च्या पत्राने विचारणा केली. सदर पत्रास तक्रारदार यांनी दिनांक 24.5.2011 रोजी समाधानकारक उत्तर दिले. असु असुनसुध्दा दिनांक 18.8.2011 रोजी सा.वाले यांनी तक्रारदार यांना पत्र पाठवून तक्रारदार यांचे खाते रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार वापरण्यात येत नसुन सदर खाती बंद करण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदारांना त्यांचे बचत खात्यातील रक्कम काढुन घेण्या पलीकडे पर्याय उरला नाही. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या चालु खात्यातील व्यवहारा संबंधी त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही मार्गदर्शक तत्वांचे उलंघन केलेले नाही. असे असुनसुध्दा केवळ तक्रारदार यांना त्रास देण्यासाठी त्यांचे बचत खाते बंद करण्याचा निर्णय सा.वाले यांनी घेतला. त्यामुळे सा.वाले यांची सदर कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर असल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून रु.1 लाख व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदारांचे म्हणणे, मागणे व तक्रारीतील कथने फेटाळून लावली. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने, म्हणणे व मागणे खोटे व लबाडपणाचे असून सा.वाले यांचे कडून पैसे लुबाडण्यासाठी तक्रारदारांनी सदरची खोटी विधाने केलेली आहेत. तक्रारदार यांचे बचत खाते क्रमांक 5545316112 हे सा.वाले यांच्या फोर्ट शाखेत दिनांक 17.8.2000 पासून अस्तीत्वात असल्याबाबत व सदर बचत खाते दिनांक 27.9.2011 रेाजी बंद करण्यात आल्या बाबत सा.वाले नाकारत नाहीत. तक्रारदार यांचे बचत खाते बंद करण्याचे समर्थन करताना सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांचे ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि.या नांवाचे चालु खाते असून सदर खाते तक्रारदार व त्यांचे भाऊ कैलास हे वापरत असतात. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, दिनांक 29.3.2011 रोजी तक्रारदार यांच्या वरील खात्यात मे. कोलंबीया पेट्रोकेम प्रा.लि. यांच्या कडून रुपये 6 करोड हस्तांतरीत करण्यात आले व त्याच दिवशी सदर रक्कम मे. लक्षचंदी हौसिंग आणि इन्फ्रास्टक्चर प्रा.लि. यांचे खात्यात वळती करण्यात आली. तसेच दिनांक 29.3.2011 रोजी मे. लक्षचंदाणी हौसिंग आणि इन्फ्रास्टक्चर प्रा.लि. यांचे खात्यात रु.5 करोड येवढी रक्कम जमा करण्यात आली व सदर रक्कम कुलदीप हलवासीया यांच्या कडून वळती करण्यात आली. श्री. कुलदिप हलवासीया हे कोलंबीया पेट्रोकेम प्रा.लि. यांचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 30.3.2011 रोजी रु.11 कोटीची
रक्कम रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट यांचे नांवाने मे. कोलंबीया पेट्रोकेम यांना वळती करण्यात आली. सा.वाले यांच्या म्हणण्याप्रमाणे वरील व्यवहार हे ओम कैलास, लक्ष चंदी व कोलंबीया यांच्यातील असून वरील तिन्ही मर्यादित कंपन्या हे घरे बांधणीच्या कामात कार्यरत आहेत. वरील सर्व व्यवहार तक्रारदारांशी निगडीत असून ते संशयास्पद असल्यामुळे दिनांक 13.5.2011 रेाजी सा.वाले यांनी तक्रारदार यांना पत्र पाठवून सदर व्यवहारामागील कारण स्पष्ट करण्यास सांगीतले. सा.वाले यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी वरवर खुलासा करता सखोल उत्तर दिले नाही. तसेच तक्रारदार हे वरील व्यवहारांचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बॅकेच्या दिनांक 1.7.2011 रेाजीच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे संशयास्पद बँक खातेदाराशी संबंध बँक ठेऊ शकत नाही. त्यामुळे तक्रारदार यांना त्या बाबतची सूचना देऊन त्यांचे बचत खाते रद्द करण्यात आले. परंतु तसे करण्यात सा.वाले यांचा कोणताही कलुशीत हेतु नाही. म्हणून सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ठरु शकत नाही. सबब तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात यावी.
5. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, तक्रारदार यांचे चालु खात्याचा उतारा, सा.वाले यांचे सोबत झालेल्या पत्र व्यवहाराच्या प्रती, दाखल केलेल्या आहेत.
6. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयती सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, तसेच रिझर्व्ह बँकेची दिनांक 1.7.2011 रोजी ची दिलेली मार्गदर्शक तत्वे, तक्रारदार यांच्या चालु खात्यातील तसेच कुलदिप मदामोहन, कोलंबीया पेट्रोकेम यांच्यातील झालेल्या व्यवहाराची कागदपत्रे, दाखल केलेली आहेत.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार , कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. उभय पक्षकारांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. त्यानुसार तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना त्यांचे बचत खाते बंद करुन व त्यांना बँक खातेधारक म्हणून नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिंध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | नाही. |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः तक्रारदार यांचे सा.वाले बँकेत असलेले बचत खाते तसेच चालु खाते व त्या संबंधी तक्रारदार व सा.वाले यांच्यातील झालेला पत्र व्यवहार उभय पक्षकार नाकारत नाही. सा.वाले बँकेत तक्रारदार यांचे असलेले चालु खाते हे तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नांवे असून त्यांच्या सहीने चालु खात्यातील व्यवहार होत असतात ही बाब तक्रारदार नाकारत नाहीत. तक्रारदार यांचे चालु खाते ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि. या भागीदारी संस्थेच्या नांवे असून दिनांक 29.3.2011 रेाजी तक्रारदार यांच्या वरील चालु खात्यात कोलंबीया पेट्रोकेम यांचेकडून रु.6 करोड हस्तांतरीत करण्यात आले व त्याच दिवशी सदर रक्कम लक्षचंद हौऊसिंग लिमिटेड या भागीदारी संस्थेकडे वळते करण्यात आले ही बाब तक्रारदार नाकारत नाहीत.
8. तक्रारदार यांचे वरील वर्णनाचे बचत खाते रद्द करण्याची सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते हे दाखविण्यासाठी तक्रारदार यांनी आपले पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद याव्दारे प्रामुख्यसाने असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे की, तक्रारदारांचे चालु खाते हे ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि. या भागीदारी संस्थेच्या नावे असून सदर चालु खात्याचा तक्रारदार यांच्या नांवे सुरु असलेल्या बचत खात्याशी काडीचाही संबंध नाही. तक्रारदार यांचे चालु खाते ते व त्यांचा भाऊ यांच्या सहीने कार्यरत होत असले तरी वरील चालु खात्यातील व्यवहार तक्रारदार यांच्या व्यवहारा संबंधी असून त्यातील पैशाची देवाण घेवाण याचा तक्रारदारांच्या बचत खात्याशी काही संबंध नाही. या बाबत तक्रारदारांनी सा.वाले यांना योग्य समर्पक उत्तर देऊनसुध्दा सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचे बचत खात्यातील रक्कम काढून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदार यांचे नांव त्यांचे व्यवसाय क्षेत्रात बदनाम होऊन त्यांचेकडे पहाण्याची इतर व्यवसायिकांची दृष्टी संशयास्पद झाल्यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे सा.वाले यांची सदर कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते असा युक्तीवाद
9. प्रति उत्तरादाखल सा.वाले यांचेतर्फे युक्तीवाद करताना असे प्रतिपादन करण्यात आले की, तक्रारदार यांची ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि. या भागीदारी संस्थेचे चालु खाते तक्रारदार व त्यांचा भाऊ कैलास यांच्या सहीने वापरण्यात येते. तक्रारदार यांचे जरी सा.वाले यांचे बँकेत बचत खाते असले तरी तक्रारदारांच्या चालु खात्यातील वरील भागीदारी संस्थेच्या दिनांक 29.3.2011 रोजीचा रु.6 करोड येवढया रक्कमेचा आर्थिक व्यवहार संशयास्पद होता. कारण वरील तारखेस रु.6 करोड येवढी रक्कम तक्रारदार यांचे नांवे कोलंबीया पेट्रोकेम प्रा.लि. यांच्या नांवे जमा करण्यात आली होती व त्याच दिवशी सदरची रक्कम ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि. या भागीदारी संस्थेने लक्षचंदी हौसिंग आणि इफ्रास्टक्चर प्रा.लि. या भागीदारी संस्थेस वळती करण्यात आली. त्याच दिवशी लक्षचंदी हौसिंग आणि इफ्रास्टक्चर यांच्या खात्यात मे. कोलंबीया पेट्रोकेम यांचे कडून रु.5 कोटी वळते करण्यात आले व सदर रु.11 कोटीची रक्कम लक्षचंदी हौसिंग आणि इफ्रास्टक्चर यांनी कोलंबीया पेट्रोकेम यांच्या नांवे वळती करण्यात आली. वरील सर्व व्यवहार संशयास्पद असल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे तक्रारदार यांचेकडे वरील व्यवहारा बाबत खुलासा करण्यात आला असता तक्रारदार यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे तक्रारदार यांचे बचत खाते बंद करण्या विषयी त्यांना कळविण्यात आले. त्यामुळे सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारदार यांचे विरुध्द केलेली कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर अथवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब ठरु शकत नाही.
10. उभय पक्षकारांतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद व अभिलेखात दाखल केलेली कागदपत्र यांचे अवलोकन केल्यानंतर असे दिसते की, तक्रारदार यांच्या चालु खात्यातील रु.6 कोटी रुपयाचा दिनांक 29.3.2011 रोजीचा व्यवहार तसेच त्याच दिवशी वरील चालु खात्यातील रु.6 कोटी लक्षचंदी हौसिंग इफ्रास्टक्चर यांना वळते केल्याचा व्यवहार या बाबत तक्रारदार यांना खुलासा करुन देखील त्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नाही. या व्यवहारा व्यतिरिक्त कोलंबीया पेट्रोकेम यांनी लक्षचंदी हौसिंग इफ्रास्टक्चर यांचे नांवे वळते केलेले रु.5 करोड व सदर भागीदारी संस्थेने कोलंबीया पेट्रोकेम यांनी दुस-या दिवशी वळते केलेले रु.11 कोटी हा व्यवहार देखील संशयास्पद आहे. या ठिकाणी एक गोष्ट नमुद करावीसी वाटते की ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि., लक्षचंदी व कोलंबीया प्रट्रोकेम या भागीदरी संस्था संयुक्तपणे बांधकाम व्यवसायाच्या प्रकल्पामध्ये एकत्रपणे काम करतात. त्यामुळे वरील व्यवहारा बाबत तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक असल्यामुळे अशा व्यवहारा बाबत रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे व्यवहाराच्या पारदर्शकते बाबत खात्री करुन घेणे आवश्यक आहे व जर बँकेचे खातेदार अशी खात्री करुन देत नसतील तर बँकेस खातेदाराचे संशयास्पद खाते बंद करण्याचा अधिकार आहे असे मार्गदर्शक तत्वातील प्यारा क्र.2.11 मध्ये तरतुद नमुद केलेली आहे. परंतु सदर खाते बंद करण्या अगोदर बॅकेच्या खातेदाराचे स्पष्टीकरण घेणे आवश्यक आहे. वरील कायदेशीर बाब सा.वाले बँकेने तक्रारदार यांचे कडून दिनांक 4.5.2011 रोजी पत्र पाठवून खुलासा घेऊन मगच तक्रारदार यांचे खाते बंद केलेले असल्यामुळे तक्रारदार यांची बचत खाते बंद करण्याच्या कृतीत सा.वाले यांची कोणतीही कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ठरु शकत नाही. तक्रारदार यांचे बचत खाते व चालु खाते हे वेगवेगळे असले व चालु खाते हे ओम कैलास फायनान्स अॅन्ड इनव्हेसमेंट प्रा.लि. या भागीदारी संस्थेचे असले तरी वरील भागीदारी संस्थेचे व्यवहार तक्रारदार व त्यांचे भाऊ यांच्याच सहीने होत असल्यामुळे व तक्रारदार सदर भागीदारी संस्थेचे भागीदार असल्यामुळे अशा खातेधारकाची वैयक्तीक माहिती (KYC) समाधानकारक असणे आवश्यक आहे. त्यामुळे सा.वाले यांची कृती कोणत्याही प्रकारे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ठरु शकत नाही. त्यामुळे तक्रारदार कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही.
11. वरील विवेचना वरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. आरबीटी तक्रार क्रमांक 553/2011 ही रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 26/02/2016