Maharashtra

Washim

CC/42/2013

Smt. Sindhu Rameshwar Gote - Complainant(s)

Versus

Circle Registrar, Life Insurance Corp. of India Regional Office Amravati - Opp.Party(s)

P.V.Ingle

27 Oct 2014

ORDER

Judgment
Final Order
 
Complaint Case No. CC/42/2013
 
1. Smt. Sindhu Rameshwar Gote
At. Tondgaon Dist. Wasshim
...........Complainant(s)
Versus
1. Circle Registrar, Life Insurance Corp. of India Regional Office Amravati
Regional Office Amravati
2. Branch Manager, Life Insurance corp. of India
Near Renold Hospital Washim
Washim
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale PRESIDENT
 HON'BLE MR. A.C.Ukalkar MEMBER
 HON'BLE MRS. J.G.Khandebharad MEMBER
 
For the Complainant:P.V.Ingle, Advocate
For the Opp. Party: C.S.Potdar, Advocate
ORDER

                                        :::   आ दे श   :::

                                                                                 ( पारित दिनांक  : 27/10/2014 )

आदरणीय सदस्‍य, मा.श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार: -

 

1.       ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्‍वये, सादर करण्‍यात आलेल्‍या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्‍यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,

          तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांची ग्राहक आहे. तक्रारकर्तीचे पती नामे रामेश्‍वर किसन गोटे यांनी विरुध्‍द पक्ष क्र. 2 शाखेतून जीवन विमा पॉलिसीज काढलेल्‍या होत्‍या, त्‍याचे विवरण खालीलप्रमाणे  . . .

    पॉलिसी क्र.         टेबल नंबर              रक्‍कम

    823669730        179/20              1,00,000/-

    823470097        165/15              1,25,000/-

    822667578        149/16              3,00,000/-

    820455309         75/20                50,000/-

          तक्रारकर्तीचे पती नामे रामेश्‍वर किसन गोटे हे दिनांक 21/04/2011 रोजी अपघातामुळे मरण पावले. मृत्‍युसमयी त्‍यांचे वय 45 वर्षे होते. मृत्‍युसमयी वरील उल्‍लेखीत चारही पॉलिसीज कार्यान्वित होत्‍या. तक्रारकर्ती ही कायदेशीर वारसदार आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीने वरील चारही पॉलिसीची एकूण रक्‍कम रुपये 5,75,000/- अपघाती विम्‍याचे निकषानुसार मिळण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांचेकडे वारंवार लेखी व तोंडी विनंती केली परंतु विरुध्‍द पक्षाने प्रतिसाद दिला नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने वकिलामार्फत नोटीस पाठविली, तरीसुध्‍दा विरुध्‍द पक्षाने पॉलिसीजची रक्‍कम दिली नाही व विरुध्‍द पक्षाने सेवेतील कसूर केलेला आहे.  म्‍हणून तक्रारकर्तीने

ही तक्रार दाखल करुन, वि. मंचास विनंती केली की, तक्रार मंजूर करण्‍यांत यावी व विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून तक्रारकर्तीला चारही पॉलिसींची रक्‍कम रुपये 5,75,000/- तसेच तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये 50,000/- असे एकूण रुपये 6,25,000/- व त्‍यावर द.सा.द.शे. 12 % व्‍याज व खर्चासह मिळावेत. 

तक्रारकर्तीने सदर तक्रार शपथेवर दाखल केलेली असून त्‍या सोबत निशाणी- 3 प्रमाणे एकुण 18 दस्‍तऐवज पुरावे म्‍हणुन दाखल केलेले आहे.

2)   विरुध्‍द पक्ष यांचा लेखी जवाब :-  सदर तक्रारीची नोटिस मंचातर्फे प्राप्त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी लेखी जबाब दाखल करुन बहुतांश विधाने नाकबूल केली व पुढे नमूद केले त्‍याचा थोडक्‍यात आशय असा, . . . .

     तक्रारकर्तीचे पती नामे रामेश्‍वर किसन गोटे यांनी विरुध्‍द पक्षाच्या वाशिम शाखेतून खालील प्रमाणे पॉलिसीज घेतलेल्‍या होत्‍या.

  अ.क्र.  पॉलिसी क्र.   डि ओ सी      टेबल नंबर         रक्‍कम

  1  822667578   28.03.2005     149/16         3,00,000/-

  2  823470097   28.04.2008     165/15         1,25,000/-

  3  823669730   08.06.2009     179/20         1,00,000/-

  4  820455309   11.01.1999      75/20           50,000/-

 

     या पॉलिसीपैकी अनुक्रमांक 1, 2 व 4 हयाच्‍या नॉमिनी सिंधुबाई होत्‍या तर अनुक्रमांक 3 च्‍या नॉमिनी ही मयत रामेश्‍वरची बहिण लताबाई होती तसेच पॉलिसी क्रमांक 1,3 व 4 हया वार्षीक हप्‍त्‍याच्‍या होत्‍या तर अनुक्रमांक 2 ची पॉलिसी ही त्रैमासिक हप्‍त्‍याची होती. अनुक्रमांक 1 पॉलिसी नंबर 822667578 हया पॉलिसीची रक्‍कम रुपये 3,15,262/- ही दि. 30/09/2011 चा धनादेश क्रमांक 209618 व्‍दारे दिली. अनुक्रमांक 2 पॉलिसी नंबर 823470097 हया पॉलिसीची रक्‍कम रुपये 1,36,998/- ही दि. 14/09/2011 चा धनादेश क्रमांक 209052 व्‍दारे दिली. अनुक्रमांक 3 पॉलिसी नंबर 823669730 या पॉलिसीची रक्‍कम रुपये 1,00,000/- ही दि. 17/09/2011 चा धनादेश क्रमांक 221715 व्‍दारे दिली. अनुक्रमांक 4 पॉलिसी नंबर 820455309 या पॉलिसीची रक्‍कम रुपये 78,225/- ही दि. 09/07/2011 चा धनादेश क्रमांक 217725 व्‍दारे दिली आहे.

 

     तक्रारकर्तीचे पती नामे रामेश्‍वर किसन गोटे यांचा मृत्‍यू दिनांक 21/04/2011 रोजी झाला याबाबत वाद नाही परंतु ते अपघातात वारले हे नाकबूल केले. तक्रारकर्ती ही एकटी वारस नाही. तक्रारकर्तीचे पती रामेश्‍वर किसन गोटे यांचा कोणताही अपघात झालेला नव्‍हता व अपघातात त्‍यांचा मृत्‍यू नाही, म्‍हणून ते अपघातात मरण पावले हे नाकबूल केले.  विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे की, दिनांक 04/09/2013 ला नोटीसचा जबाब दिलेला आहे व पॉलिसीजचा क्‍लेम हा विरुध्‍द पक्षाने दिलेला आहे परंतु अपघाती क्‍लेम हा विरुध्‍द पक्षाने नाकारलेला आहे, कारण अपघातामध्‍ये रामेश्‍वर किसन गोटे यांचा मृत्‍यू झाला हे कोठेही सिध्‍द झाले नाही. त्‍यामुळे अपघाती विम्‍याचे निष्‍कर्षाप्रमाणे विम्‍याची रक्‍कम देण्‍याचा प्रश्‍न उद्भवत नाही. विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार रक्‍कम दिलेली आहे व सेवा पुरविलेली आहे. पॉलिसीच्‍या क्‍लॉज नंबर 11 डी प्रमाणे अपघाती लाभ मिळण्‍याकरिता शारीरिक इजा नाही, अपघाताव्‍दारे प्रत्‍यक्षपणे शारीरिक इजा झालेली असल्‍यास व तसे सिध्‍द झाल्‍यास अपघाती लाभ मिळू शकतो, अन्‍यथा नाही. या प्रकरणामध्‍ये रेल्‍वे अपघाताव्‍दारे मृत्‍यू झाल्‍याचे सिध्‍द झालेले नाही. तक्रारीमध्‍ये अपघात कसा झाला, नमूद केलेले नाही. सब डिव्‍हीजनल मॅजीस्‍ट्रेट यांना समरी पाठविण्‍यात आली, त्‍यामध्‍ये सुध्‍दा रामेश्‍वर किसन गोटे यांचा मृत्‍यू अपघाताने झालेला नसून तो पायी चालत असतांना पाय घसरुन पडला व त्‍यामुळे त्‍याला गिटटी लागून त्‍याचा मृत्‍यू झाला. तसेच रेल्‍वे अपघातामुळे मृत्‍यू झाल्‍याबद्दलची तक्रार रेल्‍वे प्रशासनाकडे केलेली नाही, असे विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे.  विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे की, रेल्‍वे अपघात झाला असता तर,रामेश्‍वर गोटे च्‍या शरिराचे तुकडे-तुकडे झाले असते. रेल्‍वे ट्रॅकवर शरीर सापडणे म्‍हणजे रेल्‍वे अपघात झाला हे सिध्‍द होत नाही. रेल्‍वे अपघात झाल्‍याचे कथन जाणून-बुजून पैसे उकळण्‍याचे दृष्‍टीने केलेले आहे. अशा परीस्थितीत तक्रारकर्तीची तक्रार ही खारिज करण्‍यांत येऊन रुपये 10,000/- दंड बसविण्‍यात यावा.

  विरुध्‍द पक्षाने लेखी जबाबासोबत दस्‍तऐवज यादीनुसार चार कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

3)   कारणे व निष्कर्ष ः-

     या प्रकरणातील तक्रारकर्ती यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांचा संयुक्‍तीक लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, तक्रारकर्ती  यांचे प्रतिउत्‍तर, उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद व दाखल केलेले न्‍यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन मंचाने केले व खालील निष्‍कर्ष कारणे देवुन नमुद केला.

     तक्रारकर्तीचे पती रामेश्‍वर किसन गोटे यांचा मृत्‍यू दिनांक 21/04/2011 रोजी झाला हे विरुध्‍द पक्षास मान्‍य आहे. तक्रारकर्तीचे पती नामे रामेश्‍वर किसन गोटे यांनी विरुध्‍द पक्षाच्या वाशिम शाखेतून खालील प्रमाणे पॉलिसीज घेतलेल्‍या होत्‍या.

  अ.क्र.  पॉलिसी क्र.   डि ओ सी      टेबल नंबर         रक्‍कम

  1  822667578   28.03.2005     149/16         3,00,000/-

  2  823470097   28.04.2008     165/15         1,25,000/-

  3  823669730   08.06.2009     179/20         1,00,000/-

  4  820455309   11.01.1999      75/20           50,000/-

     म्‍हणून मयत रामेश्‍वर किसन गोटे यांची तक्रारकर्ती ही पत्‍नी असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाची ग्राहक होते.

      विरुध्‍द पक्षाने युक्तिवाद केला की, वरील पॉलिसीपैकी अनुक्रमांक 1, 2 व 4 हयाच्‍या नॉमिनी सिंधुबाई म्‍हणजे तक्रारकर्ती होत्‍या तर अनुक्रमांक 3 च्‍या नॉमिनी ही मयत रामेश्‍वरची बहिण लताबाई होती तसेच पॉलिसी क्रमांक 1, 3 व 4 हया वार्षीक हप्‍त्‍याच्‍या होत्‍या तर अनुक्रमांक 2 ची पॉलिसी ही त्रैमासिक हप्‍त्‍याची होती. अनुक्रमांक 1 पॉलिसी नंबर 822667578 हया पॉलिसीची रक्‍कम रुपये 3,15,262/- ही दि. 30/09/2011 चा धनादेश क्रमांक 209618 व्‍दारे दिली. अनुक्रमांक 2 पॉलिसी नंबर 823470097 हया पॉलिसीची रक्‍कम रुपये 1,36,998/- ही दि. 14/09/2011 चा धनादेश क्रमांक 209052 व्‍दारे दिली. अनुक्रमांक 3 पॉलिसी नंबर 823669730 या पॉलिसीची रक्‍कम रुपये 1,00,000/- ही दि. 17/09/2011 चा धनादेश क्रमांक 221715 व्‍दारे दिली. अनुक्रमांक 4 पॉलिसी नंबर 820455309 या पॉलिसीची रक्‍कम रुपये 78,225/- ही दि. 09/07/2011 चा धनादेश क्रमांक 217725 व्‍दारे दिली आहे. सदरहू बाब तक्रारकर्ती यांना मान्‍य आहे. परंतु तक्रारकर्तीचे म्‍हणणे आहे की, तिचे पती रामेश्‍वर किसन गोटे हे दिनांक 21/04/2011 रोजी रेल्‍वे अपघातामुळे मरण पावले. त्‍यांच्‍या मृत्‍यूसमयी चारही पॉलिसीज कार्यान्‍वीत होत्‍या, त्‍यामुळे अपघाती विम्‍याच्‍या निकषानुसार त्‍या रुपये 5,75,000/- अपघाती विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. याबाबत तक्रारकर्तीने दिनांक 20/12/2012 रोजी विरुध्‍द पक्षाकडे तिची मागणी नोंदविली आहे. विरुध्‍द पक्षाने युक्तिवाद केला की, रामेश्‍वर किसन गोटे यांचा मृत्‍यू अपघातामध्‍ये झालेला नाही. म्‍हणून तक्रारकर्ती अपघाती विमा लाभ मिळण्‍यास पात्र नाही. अशा आशयाचे पत्र विरुध्‍द पक्षाने दिनांक 07/10/2012 रोजीचे पत्रान्‍वये आधीच कळविलेले आहे व त्‍यामध्‍ये “   Claims for Death Accident Benefit is regretted ” असा ऊल्‍लेख केलेला आहे. विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे की, मयत रामेश्‍वर किसन गोटे यांचा मृत्‍यू दिनांक 21/04/2011 रोजी रेल्‍वे अपघातामुळे झालेला नसून कशामुळे झाला आहे, हे तक्रारकर्तीने सिध्‍द केलेले नाही. त्‍याच्‍या पुष्‍टीकरिता विरुध्‍द पक्षाने खालील न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

  1.  I (2008) CPJ 439 (NC)

NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, CIRCUIT BENCH AT PUNE

 

LIC Of INDIA –Vs.- SUREKHA R. AUTADE

Revision Petition No. 689 of 2006 Decided on 22.2.2008

 

     Consumer Protection Act, 1986 – Section 2 (1) (g) – Life Insurance – Accidental benefit – Claim repudiated on ground that deceased committed suicide – Complaint allowed by Forum on ground that no poison detected in viscera – State Commission in appeal held that policies being money back policies, amount payable after maturity period – Heirs of deceased not required to pay premium till maturity – Finding of Forum regarding accidental benefit upheld – Hence revision – No evidence produced to prove that deceased died due to bodily injury from accident caused by outward, violent and visible means – Heirs of deceased not entitled to accidental benefit – Order modified accordingly.

 

  1.  I (2008) CPJ 338 (NC)

NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, (CIRCUIT BENCH AT PUNE MAHARAS.)

 

LIC Of INDIA –Vs.- SUREKHA R. AUTADE

Revision Petition No. 689 of 2006 ( From the order dated 7.12.2005 in Appeal No. 717 of 2005 of the State Commission, Maharashtra) - Decided on 22.2.2008

 

  (i) Consumer Protection Act, 1986 – Section 21 (b) – Life Insurance – Accidental benefit – Repudiated – Contention, insured committed suicide, accidental benefit not entitled  – Contention not acceptable – Chemical analysia report clearly reveals, no poison detected in viscera – Insured not committed suicide – No evidence Produced to prove death of insured due to bodily injury from accident caused by outward, violent and visible means – Accidental benefit not entitled.

 

       वरील दोन्‍ही न्‍यायनिवाडयांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, असे दिसून येते की, दोन्‍ही न्‍यायनिवाडे हे एकाच प्रकरणातील असून, सदरहू प्रकरण व आमच्‍या हातातील प्रकरणातील परिस्‍थीती व वस्‍तुस्थिती ही भिन्‍न असल्‍या कारणाने हे न्‍यायनिवाडे या प्रकरणात लागू होत नाहीत.

      तक्रारकर्तीने युक्तिवाद केला की, तिचे पती रामेश्‍वर किसन गोटे हे रेल्‍वे अपघातामुळे अकोला येथे उपचारा दरम्‍यान मरण पावले. त्‍याबाबत तिने वाशिम पोलीस स्‍टेशन ला कळविले. त्‍याबाबतचा दिनांक 21/09/2011 रोजीचा प्रेतासोबतचा अहवाल, मर्ग खबरी क्र. 00/11, प्रेताचा पंचनामा, शव विच्‍छेदन अहवाल, उप विभागीय अधिकारी यांनी मंजूर केलेली मर्ग समरी क्र. 50/2011, सदरहू घटनेचा दिनांक 24/09/2010 रोजीचा घटनास्‍थळ पंचनामा, ही सर्व कागदपत्रे दाखल केलीत. या सर्व कागदपत्रांवरुन, रामेश्‍वर किसन गोटे हे रेल्‍वे अपघातामुळे मरण पावल्‍याचे दिसून येते. मयत रामेश्‍वर किसन गोटे यांनी विरुध्‍द पक्षाकडून चार पॉलिसीज घेतल्‍या होत्‍या, या चारही पॉलिसीचे अवलोकन केले असता, या पॉलिसीच्‍या Clause No. 11 (B) for getting accident benefit “ Life assured shall sustained any body injury resulting solely and directly from accident cause by outwards ?, violent and visible means ” असे नमुद केलेले आहे व त्‍या कारणाने ती अपघाती विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्तीने तिच्‍या युक्तिवादाच्‍या पृष्‍ठयर्थ मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे खालील न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

  1.  [ 2000 ( I ) B.C.J. 19 (SC) ]

SUPREME COURT

 

     M/s India Photographic Co. Ltd.  –Vs.-  H.D.Shourie

  Civil Appeal No. 5310 of 1990 Decided on 3rd August 1999

  1.  Consumer Protection Act, 1986 – Section 1 – Object of the Act is to protect consumers interest – Rational approach and not technical approach required.

   The reference to the consumer movement and the international obligations for protection of the rights of the consumer, provision has been made herein with the object of interpreting the relevant law in a-rational manner and for achieving the objective set forth in the Act. Rational approach and not a technical approach if the mandate of law.

    

  1.  IV (2011) CPJ 4 (SC)

 SUPREME COURT OF INDIA

LIC Of INDIA & ANR. –Vs.- HIRA LAL

Petition for Special Leave to Appeal (Civil)No. 28693 of 2009 ( From the Judgement and Order dated 17.4.2009 in R.P. No. 3625/2007 of The National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi) - Decided on 23.8.2011

  1. Consumer Protection Act, 1986 – Section 23 –Insurance – Accident – Permanent blindness – Claim repudiated – Forum dismissed complaint – State Commission allowe appeal and held that blindness suffered by complainant was neither designed by him nor was in any manner attributed to any act on his own part as to show that it was not due to any unforeseen or unexpected cause to exonerate the Insurance Company – National Commission held that respondent suffered blindness due to accident and he was entitled to Insurance amount – Order of Commissions below upheld.
  2. Interpretation of Statutes – When two interpretations are possible one beneficial to consumer has to be followed.  

 

     वरील दोन्‍ही न्‍यायनिवाडयांच्‍या मार्गदर्शक तत्‍वांचे अवलोकन केले असता, तसेच अपघाताबाबतच्‍या परिभाषेबाबत लिहीलेले विवेचनावरुन असे दिसून येते की, पॉलिसीमध्‍ये अपघात या शब्‍दाचा गैरअर्थ काढून विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा अपघात विम्‍याचा दावा, अपघाती हितलाभ न देता मंजूर केला आहे.  वरील दोन्‍ही न्‍यायनिवाडे तक्रारकर्तीच्‍या दाव्‍यास तंतोतंत लागू होतात व पुरक ठरतात.

     तक्रारकर्तीने दाखल केलेली पोलीस कार्यवाही बाबतची कागदपत्रे व शव विच्‍छेदन अहवाल यांमध्‍ये मयत रामेश्‍वर किसन गोटे यास नऊ बाहेरील जखमा, फॅक्‍चर, बरगडी तुटणे व डोक्‍यावरील गंभिर इजा, त्‍याच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍या आहेत, असे दिसून येते.  या सर्व परीस्थितीजन्‍य व कागदोपत्री पुराव्‍यावरुन, असे दिसून येते की, पोलीस निरीक्षक, वाशीम यांनी केलेला तपास, उप विभागीय अधिकारी यांनी मर्ग दाखल करण्‍यास दिलेली परवानगी व वैदयकीय अधिकारी यांनी दिलेला अकस्‍मात मृत्‍यू खबरी व शव विच्‍छेदन अहवाल ही कागदपत्रे खरी असून, मयत रामेश्‍वर किसन गोटे यांचा

मृत्‍यू रेल्‍वे अपघामुळेच झालेला आहे, असे मंचाचे मत आहे.

     मयत रामेश्‍वर किसन गोटे यांनी चार पॉलिसीज काढलेल्‍या होत्‍या, त्‍यामधील पॉलिसी क्र. 823669730 या पॉलिसीची नॉमिनी ही त्‍यांची बहिण लताबाई होती. उर्वरीत तीन पॉलिसीज क्र.1. 822667578, 2.  823470097  

3.   820455309  या पॉलिसींची एकत्रीत रक्‍कम रुपये 4,75,000/- याची नॉमिनी तक्रारकर्ती आहे. पॉलिसींच्‍या अपघाती विम्‍याच्‍या निकषानुसार विमाकृत रक्‍कमेच्‍या समतुल्‍य रक्‍कम ही अपघाती हितलाभ म्‍हणून तक्रारकर्ती मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्‍द पक्षाने वरीलप्रमाणे नियमानुसार देय असलेली रक्‍कम तक्रारकर्तीस न दिल्‍यामुळे, तिला मंचात तक्रार दाखल करावी लागली, परिणामत: तक्रारकर्तीस मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्‍यामुळे तक्रारकर्ती / वारसदार विरुध्‍द पक्षाकडूनअपघात विमा पॉलिसी अंतर्गत एकत्रीत रक्‍कम रुपये 4,75,000/- सव्याज मिळण्यास पात्र आहे, या निष्‍कर्षाप्रत मंच आले आहे.

          सबब, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो. 

                                                                         अं ति म   दे  -

  • तक्रारअर्ज विरुध्द पक्ष   -विमा कंपनी विरुध्द अंशतः मान्य करण्यांत येतो. 
  • विरुध्द पक्ष - विमा कंपनीने तक्रारकर्तीस तीन पॉलिसीज
  • . 822667578, 2.  823470097   3.   820455309  या पॉलिसींची एकत्रीत रक्‍कम रुपये 4,75,000/- ( अक्षरी - रुपये चार लाख पंचाहत्‍तर हजार )पॉलिसींच्‍या अपघाती विम्‍याच्‍या

निकषानुसार विमाकृत रक्‍कमेच्‍या समतुल्‍य रक्‍कम ही अपघाती

हितलाभ म्‍हणून तक्रारकर्तीस दरसाल, दरशेकडा 8 टक्के व्याजदराने प्रकरण दाखल दिनांक 24/10/2013 पासुन तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत व्याजासहीत द्यावी.

 

  1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक त्रासापोटी
  2.  भरपाई म्‍हणून रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्‍त) तसेच न्‍यायिक खर्च रुपये 2,000/- ( रुपये दोन हजार फक्‍त ) द्यावे.

 

  1.  विरुध्द पक्ष यांनी सदर आदेशाची पुर्तता, आदेश प्रत प्राप्‍त  
  2. 45 दिवसांत करावी.

 

5)  तक्रारकर्तीच्या इतर मागण्या अमान्य करण्यांत येतात.

 

6)  उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.

 

 

 

                                             (श्रीमती जे.जी. खांडेभराड)     (श्री. ए.सी.उकळकर)    ( सौ. एस.एम. उंटवाले  

                                                          सदस्या.                       सदस्य.              अध्‍यक्षा.

                                     जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).

 
 
[HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. A.C.Ukalkar]
MEMBER
 
[HON'BLE MRS. J.G.Khandebharad]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.