जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 49/2015
श्री विश्वंभर सखाराम परब ... तक्रारदार
विरुध्द
मे.सिंजेटा इंडिया लि.कंपनी
वगैरे-1 ... विरुध्द पक्ष.
आदेश नि.1 वर
दि.23.09.2015
द्वारा : मा.सदस्य, श्रीम. वफा जमशीद खान.
1) विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 यांनी ग्राहक सेवेमध्ये कुचराई केलेमुळे झालेली नुकसान भरपाई मिळणेसाठी तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराचे कथनानुसार त्यांनी सिंजेटा इंडिया लिमिटेड कंपनीच्या लॉट नं.11750118 कलिंगडाच्या ‘ऑगस्टा’ जातीच्या वेलीवर शेंडेरोग व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यांनी कंपनीला कळविले. परंतु कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. कंपनीचे प्रतिनिधी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे आणि फवारणीची औषधे न मिळाल्यामुळे कलिंगडाच्या बागेचे संपूर्ण नुकसान झाले. त्यामुळे कलिंगडाच्या बागेसाठी झालेला खर्च व नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.4,36,805/- मिळणेसाठी तक्रार दाखल केली होती.
2) सदर तक्रार प्रकरण नियमित स्विकृतीचे चौकशीसाठी दि.26.08.2015 रोजी ठेवणेत आले होते. चौकशी दरम्यान तक्रार अर्ज आणि कागदोपत्री पुरावा विचारात घेता तक्रारदार ग्राहक सरंक्षण कायदा कलम-2 (1) (डी) प्रमाणे ‘ग्राहक’ या व्याख्येत समावेश होणेसाठी पुरेशी कागदपत्रे नसल्याने तक्रारदार यांनी कागदपत्रे दाखल करणेसाठी अवधी मागीतला.
3) दि.19.09.2015 रोजी तक्रारदार यांनी अर्ज दाखल करुन तक्रार निकाली करणेची विनंती केली. परंतु गणपूर्तीअभावी प्रकरण आज रोजी आदेशाकरीता ठेवणेत आले.
4) सबब तक्रारदार यांचे दि.19.09.2015 चे विनंती अर्जाला अनुलक्षून तक्रार प्रकरण निकाली काढणेत येते.
5) तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या पुराव्याचे कागदांच्या सत्यलिपि दप्तरी ठेवून मूळ कागदपत्रे आणि इतर जादा प्रती तक्रारदार यांना परत कराव्यात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 23/09/2015
Sd/- Sd/-
(वफा जमशीद खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग