नि. ३७
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १६४८/२००९
---------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १२/३/२००९
तक्रार दाखल तारीख : ३०/३/२००९
निकाल तारीख : ३०/११/२०११
----------------------------------------------------------------
रफीक महंमद सनदी
व.व.५०, धंदा – व्यापार
रा.१०१७, लकी कोल्ड्रींक्स,
पॉवरहाऊस समोर, खणभाग, सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. चौगुले इंडस्ट्रिज लिमि.
वखारभाग, आमराई मागे, सांगली
२. सुंदरम् फायनान्स लिमि.
जी.ए.कॉलेजसमोर, उत्तर शिवाजीनगर,
सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.ए.आर.कुडाळकर, डी.ए.जाधव
जाबदार क्र.१ तर्फे : +ìb÷. श्री जे.एस.कुलकर्णी
जाबदार क्र.२ : +ìb÷. श्री डी.व्ही.शिंदे
नि का ल प त्र
द्वारा- मा.अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपले वाहनाचे कर्जप्रकरणाबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचे शोरुममध्ये गाडी खरेदी करणेकरिता गेले होते. जाबदार क्र.१ यांच्या प्रतिनिधी यांनी अतिरंजीत माहिती देवून तक्रारदार यांना गाडी घेण्यास प्रवृत्त केले. जाबदार क्र.१ यांचे प्रतिनिधी यांनी तक्रारदार यांना विविध योजनांची माहिती दिली. त्यावेळी इन्शुरन्स फ्री, कर्जप्रकरणाकरिता कोणतेही चार्जेस अथवा प्रोसेस फी घेतली जाणार नाही असेही सांगितले. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे रक्कम रु.८०,०००/- रोख भरावयाचे व उरलेली रक्कम रु.५,१४०/- चे हप्त्याने फेडावयाची असे सांगितले. तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांचेकडे दि.२३/६/२००७ पासून दि.२७/९/२००७ पर्यंत वेळोवेळी एकूण रु.८०,०००/- जमा केले. दरम्यानच्या काळामध्ये तक्रारदार यांना हार्ट ऍटॅक आला. त्यामुळे तक्रारदार यांचेवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. त्यामुळे गाडी घेणेचा निर्णय तक्रारदार यांना रद्द करावा लागला. त्याबाबत तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.१/११/२००७ रोजी कळविले. दरम्यानचे कालावधीमध्ये जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांनी दिलेले पाच पोस्ट डेटेड चेक तक्रारदार यांचे खात्यावर जमा केले त्यामुळे जाबदार क्र.२ यांचेकडे कर्जापोटी रक्कम रु.२५,७००/- जमा झाले. तक्रारदार यांनी गाडी घेणेचा निर्णय रद्द केलेमुळे जाबदार क्र.१ यांचेकडे रकमेची मागणी केली. जाबदार क्र.१ यांनी रक्कम रु.२१,९८९/- कपात करुन उर्वरीत रक्कम रु.५०,०११/- तक्रारदार यांना परत दिली. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांना कोणतीही रक्कम परत दिली नाही. जाबदार क्र.२ यांचेकडे सुरुवातीस भरलेला एक हप्ता रु.५,१४०/- व पाच चेकची जमा झालेली रक्कम रु.२५,७००/- जमा आहेत. जाबदार नं.१ यांनी अर्जदार यांचे रकमेतून विम्याचा हप्ता रु.८,१४२/- तसेच प्रोटेक्टेड वॉरंटी रु.३,४९५/-, इन्टेन्डेड वॉरंटी चार्जेस रु.६,९८०/- कपात करुन घेतली. जाबदार क्र.१ यांनी गाडीची पुन्हा विक्री केली असल्याने तक्रारदार यांचेकडून कोणतीही रक्कम घेण्याचा अधिकार नाही. जाबदार यांनी दिलेल्या दूषित सेवेमुळे तक्रारदार यांनी रक्कम परत मिळणेसाठी तसेच इतर तदानुषंगिक मागण्यांसाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ६ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी नि.१६ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांचेकडून वेळोवेळी रु.८०,०००/- मिळाले ही बाब जाबदार यांनी नाकारली आहे. तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.७५,०००/- मिळाल्याचे जाबदार यांनी नमूद केले आहे. गाडीच्या एकूण किंमतीपैकी जाबदार क्र.२ यांच्याकडून रक्कम रु.१,७८,८६०/- देण्यात आले. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांनी गाडीचा व्यवहार एकतर्फा रद्द केला आहे. दि.७/१२/२००७ रोजी तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून रिफंड चेक बिनशर्त स्वीकारला आहे. तक्रारदार यांनी कार खरेदी व्यवहार पूर्ण केला परंतु गाडीच्या रजिस्ट्रेशनसाठी रक्कम रु.१५,०००/- जाबदार क्र.१ यांचेकडे जमा केले नाहीत त्यामुळे कारचे रजिस्ट्रेशन न झाल्याने कारची डिलीव्हरी तक्रारदार यांना देण्यात आली नाही. तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ कंपनीकडे कार फायनान्स घेतला असून तक्रारदार यांनीच जाबदार क्र.२ कडे स्टॅंप डयूटी, कागदपत्रे, खर्चाची रक्कम इ. रकमा जाबदार क्र.१ मार्फत अदा केल्या आहेत. तक्रारदार यांनी कर्जप्रकरणाबाबत पूर्तता केल्यानंतर दि.३०/६/२००७ रोजी कारची इन्व्हॉईस तक्रारदार यांचे नावे करण्यात आली. कारचा नियमाप्रमाणे इन्शुरन्स प्रिमिअम रु.८,१४२/- इन्शुरन्स कंपनीकडे भरण्यात आले. तसेच तक्रारदार यांचे सांगणेनुसार रक्कम रु.१,५४५/- च्या ऍक्सेसरीज कारमध्ये इन्स्टॉल करण्यात आल्या. सर्व बाबींची पूर्तता झालेनंतर सुमारे पाच महिन्यांनी कार खरेदी व्यवहार रद्द केलेने रक्कम रु.२१,९८९/- कपात करुन तक्रारदार यांना रु.५३,०११/- चा चेक अदा केला. तो तक्रारदार यांनी बिनशर्त स्वीकारला आहे. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१७ ला प्रतिज्ञापत्र व नि.१८ च्या यादीने ३ कागद दाखल केले आहेत.
४. जाबदार क्र.२ यांनी याकामी नि.३० ला आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना वाहन खरेदी करण्यासाठी ४८ महिन्याच्या कालावधीसाठी रक्कम रु.१,८४,०००/- चे कर्ज दिले होते. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांच्याकडून कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता झालेनंतर दि.२८/७/२००७ रोजी जाबदार क्र.१ यांना रक्कम रु.१,७८,८६०/- चा डी.डी.देवून अर्जदारांनी घेतलेले वाहन अर्जदारांच्या ताब्यात देण्याबाबत कळविले होते. कर्जाचा कालावधी हा ४८ महिन्यांचा होता. तक्रारदार यांनी सुरुवातीचा रक्कम रु.५,१४०/- चा हप्ता रोख स्वरुपात जमा केला होता. तक्रारदार यांनी गाडी रद्द करणेपर्यंतचा कालावधी ६ महिन्यांचा होता. या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये तक्रारदार यांनी दिलेला एक मासिक हप्ता व दिलेल्या चेकपैकी दोन चेकची रक्कम अर्जदार यांच्या कर्जखात्यावर जमा झाली व तीन चेक अनादरीत झाले. तक्रारदार यांनी वाहन खरेदी करण्याचे रद्द केलेनंतर जाबदार यांनी पुढील चेक वटणेकरिता जमा केले नाहीत. जाबदार क्र.२ यांनी केव्हाही तक्रारदार यांना कर्जापोटी प्रोसेस फी व स्टॅंप चार्जेस घेणार नाही असे सांगितले नाही. अर्जदार यांनी जाबदार क्र.२ यांना केव्हाही चेक जमा करु नयेत अशा सूचना दिलेल्या नाहीत. अर्जदार यांना दिलेल्या कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत जाबदार क्र.२ यांना अर्जदारांचे मासिक हप्त्यांच्या परतफेडीचे चेक वटणेसाठी जमा करण्याचा पूर्ण अधिकार होता व आहे. जाबदार क्र.२ हे केव्हाही उर्वरीत चेक नेण्यासाठी जाबदार यांचेकडे आलेले नाहीत. आजदेखील जाबदार हे अर्जदारांचे उर्वरीत चेक परत देण्यास तयार आहेत. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.३१ ला प्रतिज्ञापत्र व नि.३२ च्या यादीने ८ कागद दाखल केले आहेत.
५. तक्रारदार यांनी नि.२३ ला शपथपत्राच्या स्वरुपात प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जाबदार क्र.१ यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तसेच नि.२४ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.२५ व ३५ ला कैफियत हाच लेखी युक्तिवाद असल्याची पुरसिस दाखल केली आहे. जाबदार क्र.२ यांनी नि.३४ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.३६ ला तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरसिस दाखल केली. जाबदार यांचे विधिज्ञ युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत.
६. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपत्रे, दाखल लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांचेकडून रक्कम रु.३०,८४०/- ची मागणी केली आहे. त्यामध्ये रक्कम रु.५,१४०/- चा भरलेला पहिला हप्ता व दिलेल्या पाच चेकची रक्कम रु.२५,७००/- ची मागणी केली आहे. जाबदार क्र.२ यांचे म्हणण्यातील मजकुरावरुन तक्रारदार यांना गाडी खरेदीसाठी रक्कम रु.१,८४,०००/- चे कर्ज देणेत आले होते व दिलेल्या ५ चेकपैकी दोन चेक वटले व उर्वरीत चेक अनादर झाले असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांचेकडे नेमकी किती रक्कम जमा केली हे दर्शविण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. तक्रारदार यांना गाडी खरेदीसाठी जाबदार क्र.२ यांनी कर्जपुरवठा केला आहे व सहा महिन्यांनी तक्रारदार यांनी गाडी खरेदी करणेचा निर्णय रद्द केला आहे. या सहा महिन्यांत होणारे व्याज किती ? प्रोसेस फी किती ? याबाबत तक्रारदार यांनी कोणताही तपशील दिला नाही. कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल न करता केवळ जाबदार यांचेकडे जमा असलेली रक्कम परत मागणेची तक्रारदार यांची मागणी मान्य करणे संयुक्तिक होणार नाही असे या मंचाचे मत असलेने सदर मागणी अमान्य करणेत येत आहे.
७. तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांचेकडून कपात केलेली रक्कम रु.२१,९८९/- परत मिळावी अशी मागणी केली आहे. जाबदार क्र.१ यांनी याबाबत नि.१६ वर म्हणणे देताना तक्रारदार यांची रक्कम रु.२१,९८९/- कपात केलेचे मान्य केले आहे. सदर कपातीबाबत जाबदार क्र.१ यांनी परिच्छेद क्र.७ मध्ये तपशील दाखल केला आहे. तक्रारदार यांनी आपले लेखी युक्तिवादामध्ये काढता न येणारे सुट्टे भाग, महापालिका जकात, एक्सटेंडेड वॉरंटी व कार इन्शुरन्स रिफंडरु.९,४४३/- ही रक्कम कपात करणेचे जाबदार यांना अधिकार नाहीत असे कथन केले आहे. वस्तुत: तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या वाहनाचा विमा उतरविला आहे व विम्याची रक्कम विमा कंपनीस अदा केली आहे. सदर विमा रद्द केल्याने रक्कम रिफंड मिळाली आहे. सदर रक्कम तक्रारदार यांना मिळणे गरजेचे आहे. सदर रक्कम जाबदार नं.१ यांना कपात करता येणार नाही तसेच तक्रारदार यांचे वाहन नोंदणीकृत झाले नाही. सदरचे वाहन अन्य व्यक्तीस विक्री केले आहे. त्यामुळे स्पेअर पार्टस, महापालिका जकात, एक्सटेंडेड वॉरंटी या रकमाही जाबदार क्र.१ यांना कपात करता येणार नाहीत. सदर रक्कम मिळणेस तक्रारदार निश्चितच पात्र आहेत. सबब तक्रारदार यांनी लेखी युक्तिवादामध्ये नमूद केलेली रक्कम रु.९,४४३/- परत करणेबाबत जाबदार क्र.१ यांना आदेश करणे संयुक्तिक होईल असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांची रक्कम दि.७/१२/२००७ रोजी कपात करुन उर्वरीत रकमेचा धनाकर्ष तक्रारदार यांना अदा केला आहे. त्यामुळे सदर रकमेवर दि.७/१२/०७ पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याजही अदा करणेबाबत आदेश करणे संयुक्तिक ठरेल असे या मंचाचे मत आहे.
८. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांची रक्कम जाबदार यांनी अयोग्य कारणाने कपात केलेने तक्रारदार यांना या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी रक्कम रुपये ९,४४३/- (अक्षरी रुपये नऊ हजार चारशे
त्रेचाळीस माञ) दि.७/१२/२००७ पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत असा
जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये १,५००/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे माञ) अदा करावेत
असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक १५/१/२०१२ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò: ३०/११/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११