Maharashtra

Parbhani

CC/12/91

Shashikala Rameshwar Agrawal - Complainant(s)

Versus

Cholomandalam General Insurances,Pune - Opp.Party(s)

M.K.Toshniwal

10 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/91
 
1. Shashikala Rameshwar Agrawal
R/o Mahaveer Nagar,Purna Tq.Purna
Parbhani
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Cholomandalam General Insurances,Pune
Company Limited,Through Branch Officer,Branch Office,Pune Shope No.21/4B Shatt House,Bunegarden Road,Pune
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar PRESIDENT
 HON'ABLE MRS. Anita Ostwal Member
 
PRESENT:
 
ORDER

निकालपत्र

                  तक्रार दाखल दिनांकः- 18/05/2012

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 07/06/2012

                        तक्रार निकाल दिनांकः- 10/12/2013

                                                                              कालावधी 01वर्ष. 06 महिने.03 दिवस.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

                                              अध्‍यक्ष                                                               श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.

                                                      सदस्‍या

सौ.अनिता ओस्‍तवाल. M.Sc.LLB.

---------------------------------------------------------------------------------------------------------       

    

      शषीकला भ्र.रामेश्‍वर अग्रवाल.                                            अर्जदार

      वय 65 वर्षे,धंदा घरकाम व शेती.                 अॅड.एम.के.तोष्‍णीवाल.

      रा.महाविर नगर,पुर्णा ता.पुर्णा जि.परभणी.

     

               विरुध्‍द

      चोलोमंडलम जनरल इन्‍शुरन्‍स कंपणी.                      गैरअर्जदार.

      लि.तर्फे शाखा अधिकारी.                                     अॅड.अजय व्‍यास.                                    

      शाखा कार्यालय,पुणे शॉप नं. 21/43 सेठ हाऊस,

      बनगार्डण रोड पुणे, महाराष्‍ट्र. ______________________________________________________________________        

     कोरम  -    1)    श्री.पी.पी.निटूरकर.       अध्‍यक्ष.

                  2)    सौ.अनिता ओस्‍तवाल.                     सदस्‍या.   

              (निकालपत्र पारित व्‍दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्‍यक्ष.)      

          गैरअर्जदाराने अर्जदारास तिची मालकीची गाडी MH 22- U-1251 हरवल्‍या बाबतची नुकसान भरपाई देण्‍याचे टाळून सेवेत त्रुटी दिल्‍या बद्दलची तक्रार आहे.

      अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही पूर्णा जि. परभणी येथील रहिवाशी असून तिने तिच्‍या घरगुती कामाला वापरासाठी फोर्ड कंपनीची फिगो 1.4  ZXI - TDCI ही कार दिनांक 19/07/2010 रोजी औरंगाबाद येथून YVZ मोटार्स प्रा.लि. कडून रु. 5,10,000/- ( सर्व करासहीत ) खरेदी केली. अर्जदाराने सदरची कार खरेदी करतेवेळी  इंडुसंड बँक लि.कडून वित्‍त पुरवठा घेतला होता.

      अर्जदाराचे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने सदरची कार गैरअर्जदाराकडे विमाकृत केली होती, सदरचा विमा कालावधी दिनांक 01/07/2011 ते 30/06/2012 या कालावधीसाठी वैध होता. सदरच्‍या विमा हप्‍त्‍यापोटी अर्जदाराने रु. 10,432/- गैरअर्जदाराकडे जमा केले आहेत. सदर पॉलिसीचा कव्‍हर नोट नं. 6537116 असा आहे.

     अर्जदाराचे म्‍हणणे की, तिच्‍या सदर गाडीचा चेसीस नं. MJ 1xxMRJ 1 AS 00945 व इंजन नं.  AS-00945  व चावी क्रमांक T 414412   असा आहे. सदर कार ही लाल रंगाची असून तिचा RTO Passing No. MH – 22- U-1251 असा आहे.

      अर्जदाराचे म्‍हणणे की, तिचा मुलगा संतोष रामेश्‍वर अग्रवाल हा त्‍याचा चुलत भाऊ प्रवीण सत्‍यनारायण अग्रवाल सोबत दिनांक 29/07/2011 रोजी खाजगी कामासाठी परभणी येथे गेले होते, सदर दिवशी अर्जदाराचे मुलाने परभणीतील काम आटोपून जेवण घेण्‍यासाठी रात्री सदर दिवशी 8 ते 8.30 च्‍या दरम्‍यान परभणी येथील  तंदुरबार हॉटेल मध्‍ये गाडी पार्कींग करुन व गाडीला लॉक सिस्‍टीने बंद करुन हॉटेल मध्‍ये जवेण घेण्‍यासाठी गेले. जेवण झाल्‍यानंतर हॉटेल मधून बाहेर आल्‍यानंतर आपल्‍या सदर गाडीकडे निघाला, परंतु पार्कींग केलेल्‍या ठिाकणी मिळून आली नाही. गाडी बद्दल आजुबाजूला चौकशी केली असता सदर गाडी मिळून आली नाही, लगेच अर्जदाराच्‍या मुलाने  नवा मोंढा पोलीस स्‍टेशन येथे जाऊन तोंडी फिर्याद दिली, त्‍यावेळेस संबंधीतांनी तपास करु असे तोंडी सांगीतले. त्‍यानंतर दिनांक 03/08/2011 रोजी पर्यंत गाडीचा शोध घेतला असता सदर अर्जदाराची गाडी मिळून आली नाही, त्‍यामुळे दिनांक 03/08/2011 रोजी नवा मोंढा पोलिस स्‍टेशन परभणी येथे लेखी तक्रार दिली व गुन्‍हा नं. 161/11 अन्‍वये भा.द.वी. 379 अंतर्गत अज्ञात इसमाच्‍या विरुध्‍द एफ.आय.आर. करण्‍यात आला. गाडी चोरी गेली त्‍यावेळेस गाडी मध्‍ये, विम्‍याची प्रत मुळ गैरअर्जदाराकडे काढलेली  व तसेच गाडीची एक चावी पण त्‍या गाडीमध्‍ये होती या दोन्‍ही वस्‍तु गाडी सोबत चोरीला गेल्‍या.

       अर्जदाराचे  म्‍हणणे की, अर्जदाराने सदर गाडी चोरी बद्दल गैरअर्जदारास दिनांक 13/09/2011 रोजी दिली व त्‍या अनुषंगाने गैरअर्जदाराने अर्जदारास अर्ज मिळाला म्‍हणून पोच दिली. तसेच अर्जासोबत अर्जदाराने गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात मुळ कागदपत्रे व गाडीची एक चावीपण दिली. अर्जासोबत अर्जदाराने मुळ क्‍लेमफॉर्म बँकेचा खाते उतारा, एफ.आय.आर.ची प्रत, इन्‍शुरंस कव्‍हरनोट, इ. कागदपत्रे दिली. तसेच अर्जदाराचे म्‍हणणे आहे की, दिनांक 21/11/2011 रोजी प्रस्‍तुत गाडीचे RTO Particular  आणि पोलिसाच्‍या अंतीम अहवालाची मुळ प्रत गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात जमा केली व त्‍यानंतर सदरील प्रकरणी पोलीसांनी न्‍यायालयातून मिळालेलल्‍या  अै समरीची प्रत दिनांक 02/01/2012 रोजी गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात दाखल केली.

      अर्जदाराचे म्‍हणणे की, सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही गैरअर्जदाराने क्‍लेम मंजुरी बाबत आजपर्यंत कळवले नाही, म्‍हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश करावा की, अर्जदाराची फिगो कार नं. MH – 22- U-1251 हरवल्‍या बाबतची नुकसान भरपाई रु. 5,10,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास गाडी हरवल्‍या तारखे पासून 12 टक्‍के व्‍याजदराने अर्जदारास द्यावेत. तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी 25000/- तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. अर्जदारास देण्‍याचा आदेश करावा.

      अर्जदाराने तक्रार अर्जाच्‍या पुष्‍टयर्थ नि.क्रमांक 2 वर  आपले शपथपत्र दिले आहे.

अर्जदाराने पुराव्‍याबाबत नि.क्रमांक 5 वर 11 कागदपत्रांच्‍या यादीसह 11 कागदपत्रांच्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केलेली आहेत. ज्‍यामध्‍ये अर्जदाराने खरेदी केलेल्‍या गाडीचे बिल, पॉलिसी कव्‍हर नोट, आर.टी. ओ. स्‍मार्टकार्ड प्रत, पोलीस स्‍टेशनला दिलेल्‍या फिर्यादीची प्रत, गुन्‍हा नं. 161/11 ची प्रत, अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेल्‍या अर्जाची प्रत घटनास्‍थळ पंचनामाची प्रत,  Crime No 161/11 मधील नि.क्रमांक 1 ची प्रत, गैरअर्जदार यांच्‍या कार्यालयात कागदपत्रे दिल्‍याबाबतचा अर्ज . इ कागदपत्रे दाखल केले आहेत.

             तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्‍यासाठी  मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीसा काढण्‍यात आल्‍या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्‍यात त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, सदरची संपूर्ण तक्रार ही खोटी व बनावटी आहे व खारीज होणे योग्‍य आहे.

      गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराची सदरची गाडीची चोरी 29/07/2011 रोजी झालेली नाही व अर्जदाराची तक्रार ही खोटी व बनावटी आहे.

      गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराच्‍या तक्रार अर्जा प्रमाणे अर्जदाराची कार दिनांक 29/07/2011 रोजी चोरीस गेली व सदरची माहिती पोलीसास अर्जदाराने दिनांक 03/08/2011 रोजी लेखी तक्रार देवुन कळविली यावरुन हे दिसते की, तक्रार नोंदविण्‍यास विलंब झाला, त्‍यामुळे सदरची तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार नसल्‍यामुळे कायद्यान्‍वये चालवणे योग्‍य नाही व तसेच अर्जदाराने सदर घटनेची माहिती गैरअर्जदारास दिनांक 08/08/2011 रोजी दिली व अर्जदाराची सदरची चोरीच्‍या घटनेची माहिती देण्‍यास विलंब लावला म्‍हणून सदरची तक्रार चालवणे योग्‍य नाही व ती खारीज होणे योग्‍य आहे.

      तसेच गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने पॉलिसीच्‍या अटी नं. 1 प्रमाणे सदर घटनेची माहिती गैरअर्जदारास तात्‍काळ कळवणे आवश्‍यक होते, परंतु अर्जदाराने तसे केलेले नाही व पॉलिसीच्‍या अटी नं. 1 चे उल्‍लंघन केले आहे व तसेच अर्जदाराने पॉलिसीच्‍या अटी मधील अट नं. 9 चे देखील उल्‍लंघन केलेले आहे.

      गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने पॉलिसीच्‍या  अट नं. 1 व अट नं. 9 चे उल्‍लंघन केंलेमुळे गैरअर्जदाराने दिनांक 10/08/2011 रोजी अर्जदारास सदरील कारण सांगुन अर्जदारास गाडी नुकसान विमा रक्‍कम देण्‍याचे नाकारले व याबाबत अर्जदाराने सदरचे कागदपत्र (Repudiation  Latter) मंचासमोर आणले नाही व अर्जदार हा मंचासमोर स्‍वच्‍छ हाताने मंचासमोर आला नाही.

      तसेच गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने पॉलिसीच्‍या अटी नं. 8 व 5 चे देखील उल्‍लंघन केलेले आहे. अर्जदाराने आपल्‍या गाडीची काळजी व्‍यवस्‍थीत घेतली नाही, त्‍यामुळे झालेल्‍या नुकसानीस अर्जदार जबाबदार आहे.

      अर्जदार हा पॉलिसीच्‍या अटीशी बांधील आहे तसेच गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा गाडी नुकसान भरपाईचा अर्ज योग्‍य ते कारण देवुन नुकसान भरपाई देण्‍याचे नाकारले व तसेच गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने इंडुसंड बँकेला पार्टी करणे आवश्‍यक होते, कारण अर्जदाराची सदरची गाडी सदर बँकेकडे कर्जाव्‍दारे घेतली होती तसे न केल्‍यामुळे सदरची तक्रार आवश्‍यक पार्टी न केलेमुळे खारीज होने योग्‍य आहे. तसेच अर्जदाराने ड्रायव्‍हरचे ड्रायव्‍हींग लायसेंस देखील दाखल केले नाही, म्‍हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

      गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्‍या पुष्‍टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.

      गैरअर्जदाराने पुराव्‍यासाठी नि.क्रमांक 13 वर दोन कागदपत्रांच्‍या यादी सह दोन कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्‍यामध्‍ये पॉलिसी क्रमांक 3362/00648948/000/00 ची प्रत व दिनांक 10/08/2011 चे Repudiation Letter ची प्रत दाखल केली आहे.

 

 

दोन्‍ही बाजुंच्‍या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

                          मुद्दे.                                                                 उत्‍तर.

1     गैरअर्जदाराने अर्जदाराची गाडी क्रमांक MH – 22- U-1251

      हरवल्‍या बाबतची नुकसान भरपाई देण्‍यास इन्‍कार करुन

      अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ?                     नाही.

2        आदेश काय ?                                                           अंतिम आदेशा प्रमाणे.

कारणे.

मुद्दा क्रमांक 1.

     अर्जदार ही गाडी क्रमांक MH – 22- U-1251 ची मालक होती ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्‍या पुराव्‍यातील नि.क्रिमांक 5/3 वरील आर.सी. बुकच्‍या प्रतवरुन सिध्‍द होते, तसेच अर्जदाराने सदरची गाडी गैरअर्जदाराकडे विमाकृत केली होती ज्‍या पॉलिसीचा क्रमांक 3362/ 00648948/000/00 असा होता ही बाब गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.क्रमांक 13 /1 वरील पॉलिसीच्‍या प्रत वरुन सिध्‍द होते.

      अर्जदाराची गाडी नं MH – 22- U-1251 चा सदरच्‍या पॉलिसीचा विमा कालावधी 01/07/2011 ते 30/06/2012 पर्यंत वैध होता ही बाब देखील नि.क्रमांक 13/1 वरील पॉलिसीच्‍या प्रत वरुन सिध्‍द होते.

      तसेच सदरच्‍या अर्जदाराची गाडीचा IDV ( Insured Declared value ) 459052/ होती ही बाब देखील नि.क्रमांक 13/1  वरील कागदपत्रावरुन सिध्‍द होते.

      अर्जदाराची सदरची कार परभणी येथे 29/07/2011 रोजी चोरीस गेली होती ही बाब नि.क्रिमांक 5/5 वरील Crime No. 161/2011  च्‍या एफ.आय.आर. च्‍या प्रत वरुन सिध्‍द होते.

      अर्जदाराने सदरच्‍या चोरीस गेलेल्‍या गाडीची नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून गैरअर्जदाराकडे दिनांक 13/09/2011 रोजी अर्ज केला होता ही बाब नि.क्रिमांक 5/6 वरील कागदपत्रावरुन सिध्‍द होते.

अर्जदाराचे म्‍हणणे की, गैरअर्जदाराने अद्याप पर्यंत सदरच्‍या नुकसान विमा रक्‍कम बाबत गैरअर्जदारास काहीही लेखी कळविले नाही. या बाबत गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी जबाबात म्‍हंटले आहे की, त्‍याने Repudiation Letter अर्जदारास आर.पी.ए.डी.व्‍दारे दिनांक 10/08/2011 रोजी कळविले, परंतु याबाबत गैरअर्जदाराने अर्जदारास सदरील  Repudiation Letter आर.पी.ए.डी.व्‍दारा पाठवल्‍याचा पुरावा मंचासमोर आणला नाही, म्‍हणून गैरअर्जदाराचे म्‍हणणे ग्राहय धरणे मंचास योग्‍य वाटत नाही. व तसेच सर्वात आश्‍चर्याची बाब म्‍हणजे गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.क्रमांक 13/ वरील कागदपत्र Repudiation Letter चे अवलोकन केले असता गैरअर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदाराने त्‍याचा गाडीची चोरी संदर्भात गैरअर्जदारास दिनांक 08/08/2011 रोजी दिली व लगेचच अर्जदाराचा क्‍लेम Repudiate  केला ती तारीख 10/08/2011 अशी आहे व या उलट अर्जदार स्‍वतः तक्रार अर्जा मध्‍ये म्‍हणतो की, त्‍याच्‍या गाडीची चोरीची माहिती गैरअर्जदारास दिनांक 13/09/2011 रोजी व याबाबत स्‍वतः गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या सदरचा अर्ज 13/09/2011 रोजीचा 13/09/2011  रोजी प्राप्‍त झाला. अशी पोच दिली ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्‍या नि. क्रमांक 5/6 वरील कागद पत्रावरुन सिध्‍द होते, यावरुन गैरअर्जदाराचे लेखी निवेदन दाखल करतांना बेजबाबदारपणाचे वर्तण दिसत आहे.

       हे की, गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी जबाबामध्‍ये म्‍हंटले आहे की, अर्जदाराने त्‍याच्‍या गाडीची चोरीची माहिती गैरअर्जदारास देण्‍यास उशीर केला आहे व अर्जदाराने पॉलिसीच्‍या अट नं. 1 चे सरळ सरळ उल्‍लंघन केले आहे, त्‍यामुळे अर्जदार त्‍याचा Claim मंजूर करण्‍यात पात्र नाही, याबाबत गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या पॉलिसीची प्रत नि. क्रमांक 13/1 वर दाखल केली आहे. सदर पॉलिसीच्‍या प्रतच्‍या अट नं. 1 चे अवलोकन केले असता अट नं. 1 खालील प्रमाणे आहे.

“ Notice shall be given in writing to the Company immediately upon the occurrence of any accidental loss or damages in the event of any claim and thereafter the insured shall give all such information and assistance as the Company shall require. Every letter claim writ summons and/or process or copy thereof shall be forwarded to the Company immediately on receipt by the in sured. Notice shall also be given in writing to the Company immediately the insured shall have knowledge of any impending prosecution, inquest or fatal inquiry in respect of any occurrence which may give rise to a claim under this policy. In case of theft or criminal act which may be the subject of a claim under this policy the insured shall give immediate notice to eh police and co-operate with the company in securing the conviction of the offender.

सदरील पॉलिसीच्‍या अटी प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदारास त्‍याच्‍या गाडीची चोरीची घटनेची माहिती ताबडतोब देणे आवश्‍यक होते, परंतु प्रस्‍तुत तक्रारीत अर्जदाराचे म्‍हणणे की, त्‍याच्‍या गाडीची चोरी 29/07/2011 रोजी झाली व पोलीस स्‍टेशन मध्‍ये लेखी तक्रार दिली दिनांक 03/08/2011 रोजी व अर्जदार स्‍वतः तक्रारी मध्‍ये म्‍हणतो की, सदर गाडीच्‍या चोरी संबंधी घटनेची माहीती अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक  13/09/2011 रोजी दिली, म्‍हणजे याचाच अर्थ असा होतो की, अर्जदाराने गैरअर्जदारास माहिती देण्‍यास तब्‍बल 47 दिवसाचा उशीर केला. यावरुन हे सिध्‍द होते की, अर्जदाराने सरळसरळ पॉलिसीचा अट नं.1 चे उल्‍लंघन केले आहे.

याबाबत गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या केस लॉ मधील मा.राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यांनी Revision Petition No.1362/11 Ranglal V/s United Insurance Company  दिलेला निकाल सदर प्रस्‍तुत तक्रारीस तंतोतंत लागु पडतो.

तसेच मा.राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यांनी Revision Petition No. 3965/ 2011  2013 (2) CPR 517 (NC) Lakhan Pal V/s United India Insurance Co. मध्‍ये दिलेल्‍या निकाला मध्‍ये देखील म्‍हंटले आहे की,  Insurance Company Must be immediately informed after alleged theft. सदरच्‍या केस मधील मा. राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यांनी दिलेला निकाल प्रस्‍तुत तक्रारीस तंतोतंत लागु पडतो. अर्जदाराने पॉलिसीच्‍या अटीचे सरळसरळ उल्‍लंघन केलेले आहे. त्‍यामुळे ती गैरअर्जदाराकडून त्‍याच्‍या गाडीची चोरी झाली म्‍हणून नुकसान भरपाई मिळवणेस निश्चितच पात्र नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे असे कोठेही दिसून येत नाही. असे मंचास वाटते. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे  नकारार्थी उत्‍तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

 

                            आदेश

1     अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात येत आहे.

2     तक्रारीचा खर्च ज्‍याचा त्‍यांनी सोसावा.

3        आदेशाच्‍या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्‍यात.

 

         

  सौ.अनिता ओस्‍तवाल.                            श्री. पी.पी.निटूरकर

            मा.सदस्या.                                                                     मा.अध्यक्ष.

 

 
 
[HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Anita Ostwal]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.