ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1379/2010
दाखल दिनांक. 08/10/2010
अंतीम आदेश दि. 20 /01 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
भागवत गोविंदा पाटील, तक्रारदार
उ.व. 40, वर्ष, धंदा – शेती, (अॅड.अनिल दायमा)
रा.असोदा रोड, जळगांव
विरुध्द
1. मॅनेजर/व्यवस्थापक सामनेवाला
चोलामंगलम एम.एस.जनरल (कोणीही नाही)
इन्शुरन्स कं.लि.
डेअर हाऊस, सेंकड फलोअर नं. 2
एस.एस.सी.बोस रोड, चेन्नई – 600 001
जि. चेन्नई
2. शाखाधिकारी
चोलामंगलम एम.एस. जनरल,
इन्शुरन्स कं.लि.
बी.जे. मार्केट, जळगांव. बालाजी
निशाणी क्र. 01 वरील आदेश
मिलींद.सा.सोनवणे,अध्यक्ष - प्रस्तुत केसचे रेकॉर्ड दर्शविते की, तक्रारदाराचा तक्रार अर्ज दि. 08/11/2010 रोजी दाखल करण्यात आलेला आहे. त्यावर आमच्या पुर्वाधिकारी मंचाने त्याच रोजी सामनेवाल्यांना मंचाची नोटीस पाठविण्यात यावी असे आदेश केलेले आहे. त्या आदेशाबर हुकूम मंचाच्या प्रबंधकांनी सामनेवाल्यांना दि. 21/01/2011 रोजी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. मात्र, त्यानंतर दि. 15/04/2011 पासून तक्रारदार व त्यांचे वकील सातत्याने गैरहजर आहेत. त्यांनी सामनेवाल्यांवर नोटीस बजावणी साठी काहीही स्टेप्स घेतलेल्या नाही. त्यावरुन असे दिसते की, तक्रारदारास सामनेवाल्यांविरुध्द प्रस्तुत तक्रार अर्ज चालविण्यास स्वारस्य उरलेले नाही. आज रोजी देखील नेमलेल्या तारखेस तक्रारदार व त्यांचे वकीलांचा पुकारा केला असता ते गैरहजर आहेत. परिणामी, तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13 (2) (सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
2. खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
दि. 20/01/2014 (श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव