::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 07.02.2012) 1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदार हा खास चिखली ता.वणी जि यवतमाळ येथील रहिवासी असुन त्याचे लग्न मौजा चिचोली (बु.) ता. राजुरा जि. चंद्रपूर येथील पांडूरंग वडस्कर यांची मुलगी रेखा ऊर्फ जयश्री हिचे सोबत झाले. तिला लहानपणापासुनच झोपेत चालण्याची सवय होती. ती अबोल असल्यामुळे मानसीकरित्या परिपक्व नाही असे वाटत होते. माञ तिच्यात कोणतीही उणिव अथवा पागलपण नव्हता.
2. मयत रेखा ऊर्फ जयश्री हिचे मालकीचे दोन एलएमव्ही सुमो व्हिक्टा पंजिकरण क्र. एम. एच. 29/ टी - 7633 व टाटा व्हिक्टा एम. एच. 29/ टी - 8142 हया होते व आहे. सदर दोन्ही गाडया मयत रेखा ऊर्फ जयश्री ने चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अन्ड फायनान्स कंपनी लिमी. याचेकडून कर्ज घेतले होते. चोलामंडलम इन्व्हेस्ट फायनान्स कंपनी याने वाहना करीता कर्ज घेणा-या ग्राहकांना विमा संरक्षण देणारी ग्रुप पर्सनल एक्सीडेन्ट मास्टर पॉलीसी क्र. ए पी जी 00005055 – 000 - 00, प्रमाणपञ क्र. डी बी एस- ए पी आय -3-000566466, दि. 01/03/2009 ते दि. 29/02/2012 हया कालावधी करीता विमाकृत केले आहे. विमा पॉलीसीची मूळ प्रत गै.अ. क्रं. 2 कडे आहे म्हणून गै.अ. क्र. 2 ला केस मध्ये पक्ष केले आहे. मृतक रेखा ऊर्फ जयश्री चे मालकीच्या दोन गाडया असल्यामुळे तिचा दोनदा अपघात विमा, गै.अ. क्र. 2 ने काढला आहे. मयत रेखा ऊर्फ जयश्रीचा 2,98,337/- रु. चा विमा एका गाडी करीता असुन दुस-या गाडी करीता तितकाच अपघाती विमा आहे. 3. मयत रेखा ही ऑगस्ट 2010 मध्ये सणावारी करीता माहेरी चिचोली (बु.) येथे गेली होती. दि.29/8/10 रोजी राञी 10 वाजता आई वडीलासोबत जेवण करुन झोपी गेली. तिला झोपेत चालण्याची सवय असल्यामुळे राञी झोपेतच उठून घराबाहेर गेली, झोपेत चालण्याच्या सवयीमुळे तिचा अपघात होवून मौजा चिचोली (बु.) येथील विहीरीत पडली व तिचा मृत्यु झाला. मयत रेखा ऊर्फ जयश्री दिसुन न आल्यामुळे शोधाशोध केंली असता, ग्रामपंचायत विहीरीत प्रेत आढळले. पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यात आली. घटनास्थळ पंचनामा तयार केला व प्रेत शवविच्छेदना करीता पाठविले. 4. गै.अ. क्र. 2 ने प्रमाणपञाची झेरॉक्स दिली, त्यात मयत रेखा हीला विमाछञ उपलब्ध असल्याची माहीती मिळाली लगेच क्लेम मिळण्याकरीता गै.अ. क्र.1 कडे पाठपुरावा केला. क्लेम क्रं. 10-11/एस सी/405 अन्वये दाखल करुनही नुकसान भरपाईची रक्क्म दिली नाही. यामुळे अधि. लोहे रा. वणी मार्फत नोटीस पाठविला. गै.अ. क्रं. 1 ने विमा क्लेम नाकारुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. गै.अ. ने अर्जदारास दिलेली न्युनतापूर्ण सेवा आहे. गै.अ. क्र. 1 ने दि. 15/4/11 ला पंजिबध्द डाकेने पञ पाठवून मयत रेखा ऊर्फ जयश्रीचा विमा दावा नाकारला त्यामुळे गै.अ. क्रं. 1 ने न्युनतापूर्ण सेवा दिली व अनुचित व्यापार पध्दती अवलंबीली असे ठरविण्यात यावे आणि गै.अ. क्रं. 1 ने दोन गाडयाच्या अनुशंगाने 2,98,337/- एका गाडी करीता व दुस-या गाडीचे 2,98,337/- असे एकूण 5,96,776/-रु. दि.01/01/11 पासुन रक्कम अर्जदाराचे पदरी पडे पर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाने देण्याचा आदेश, गै.अ. विरुध्द पारीत करण्यात यावा. गै.अ. क्रं. 2 ने मूळ पॉलीसी दस्ताऐवज न्यायालयात दाखल करावे. अर्जदारास शारीरीक, मानसिक ञास झाला असून त्याची भरपाई 50,000/- देण्यात यावे व केसचा खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश गै.अ. विरुध्द पारीत करण्यात यावा अशी मागणी केली आहे. 5. अर्जदाराने तक्रारी सोबत नि. 5 नुसार 9 झेरॉक्स व मूळ दस्तऐवज दाखल केले. तक्रार स्विकृत करुन गै.अ.यांना नोटीस काढण्यात आले. गै.अ. 1 व 2 हजर होवून नि. 21 नि. 18 नुसार लेखी उत्तर दाखल केले. 6. गै.अ. क्रं. 1 ने नि. 21 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात आक्षेप घेतला की, तक्रार पूर्णता खोटी, बनावटी असल्यामूळे प्रथम दर्शनीच खारीज करण्यात यावी. मृतक रेखा हिला झोपेत चालण्याचा आजार नव्हता हे म्हणणे खोटे आहे. मृतक हिचे मालकीचे दोन एल एम व्ही क्र. एम. एच. 29 /टी 7633 आणि एम. एच. 29/टी 8142 हे दोन वाहन होते. व त्याकरीता चोलामंडलम डी बी एस फायनास कडून कर्ज घेतले होते हे कागदोपञी पुराव्याचा भाग आहे. गै.अ. क्रं. 1 ने ग्रुप पर्सनल अक्सीडेन्ट पॉलीसी मास्टर पॉलीसी क्रं. एपीजी 00005055-000-00 सर्टीफिकेट क्र. डीबीएसएपीआय – 3 -00056466 कालावधी दि.01/03/09 ते 29/02/12 करीता दिली होती. त्यात रेखा चा विमा काढला होता हा कागदोपञी पुराव्याचा भाग आहे. अर्जदाराने केलेली मागणी अमान्य असून अर्जदार प्रार्थनेनुसार कोणतीही मागणी मिळण्यास पाञ नाही. 7. गै.अ. क्रं. 1 यांनी लेखी उत्तरातील विशेष कथनात असे कथन केले आहे की, अर्जदाराने ही तक्रार व्देष बुध्दीने, अधिकच्या रक्कमेच्या लाभ मिळण्या करीता दाखल केली आहे. अर्जदाराने खोटी, बनावटी, माहीती व हेतुपुरस्पर माहीती लपवून तक्रार दाखल केली आहे. या एकमाञ कारणा वरुन तक्रार खारीज होण्यास पाञ आहे व खारीज करण्यात यावी. अर्जदारास या गै.अ. विरुध्द केस दाखल करण्याचे लोकसस्टॅन्डी नाही. अर्जदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे तरतुदी अंतर्गत येत नाही तसेच तक्रार कायद्याच्या दृष्टिने मान्य (Maintainable) नाही. या कारणावरुन ही तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराची तक्रार खोटी, बनावटी व खोटे कथनाचे आधारावर असल्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 अन्वये रु. 10,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी. 8. गै.अ. क्रं. 2 ने नि. 18 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात कथन केले की, यात काही वाद नाही की, मय्यत रेखा ऊर्फ जयश्री यांचे मालकीचे एल एम व्ही सुमो व्हिक्टा होते व आहे. यात वाद नाही की, सदर दोन्ही गाडया मय्यत रेखा ऊर्फ जयश्री ने चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अन्ड फायनान्स यांचे कडून कर्ज घेतले होते. गै.अ. क्रं. 1 ने मयताचे नावे ग्रुप पर्सनल मास्टर ऍक्सीडेंट पॉलीसी दिली आहे. गै.अ. क्रं. 2 ने मयतास वाहना संबंधी कर्ज दिले असता, गै.अ. क्र. 1 ने मयताचा वैयक्तिक अपघात विमा काढलेला होता. गै.अ. क्रं. 2 चा मयताचे विम्याशी कोणताही संबंध नाही जो काही संबंध आहे, तो गै.अ. क्रं. 1 चा आहे. विमा अपघाती विमा असुन त्याची मूळ पॉलीसी गै.अ. क्रं . 2 कडे नाही. त्यामुळे गै.अ. क्रं. 2 ला या केस मध्ये विनाकारण ञास देण्याकरीता पार्टी केले आहे. गै.अ. क्रं 1 व गै.अ. क्रं. 2 या वेगवेगळया कंपनी आहेत. अर्जदाराने मागीतलेली मागणी परीपूर्ण अमान्य व नाकबूल आहे.
9. गै.अ. क्रं. 2 ने लेखीउत्तरातील विशेष कथनात असे कथन केले की, तक्रार वस्तुस्थिती नुसार व कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही. न्यायमंचाचे अधिकार क्षेञाबाहेरील आहे. व तक्रार मुदत बाहय असुन संपूर्ण वादांकीत कारण यवतमाळ येथे घडले आहे. त्यामुळे चंद्रपूर मध्ये कोणतेही कारण उदभवले नाही किंवा घडले नाही. या अभावी तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. सदरील मामला गुंतागुंतीचा आहे त्यामूळे पुरावा घेणे आवश्यक आहे. 10. गै.अ. क्रं. 2 कळवू इच्छितो की, त्यांचे कडून वाहना करीता कर्ज घेणा-या त्यांच्या ग्राहकांना अपघाती विमा संरक्षण देणारी ग्रुप पर्सनल ऍक्सीडेन्ट मास्टर पॉलीसी क्र. एपीजी 00005055 – 00000 – 00 असे प्रमाणपञ जयश्री मुसळे यांना दिले होते. मयत रेखा ऊर्फ जयश्री हिला झोपेत चालण्याची सवय होती व ति पागल नव्हती याबाबतचा दस्तऐवज पुरावा, अर्जदाराने न्यायमंचा समोर आणलेला नाही. अर्जदाराने खोटी तथ्यहीन व बनावटी तक्रार दाखल केली आहे. 11. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठार्थ नि. 26 नुसार पुरावा शपथपञ दाखल केले. गै.अ.क्रं. 1 ने लेखीबयानातील मजकुर पुरावा शपथपञ समजण्यात यावा या आशयाची पुरसीस नि. 27 नुसार दाखल करुन त्यासोबत कारटेल सर्वेअर अन्ड इन्व्हेस्टीगेटर प्रायव्हेट लिमीटेड यांची सर्वे रिपोर्ट नि. 28 प्रमाणे दाखल. गै.अ. क्रं. 2 यांनी लेखीबययानातील भाग पुरावा शपथपञ म्हणून स्विकारत आहे या आशयाची पुरसीस नि. 29 नुसार दाखल. 12. अर्जदार व गै.अ. यानी दाखल केलेले दस्तऐवज, शपथपञ आणि अर्जदाराने नि. 33 नुसार दाखल केलेला लेखीयुक्तीवाद व गै.अ. क्रं. 1 ने नि. 32 प्रमाणे सादर केलेला लेखीयुक्तीवाद आणि गै.अ. क्रं. 2 च्या वकीलाने केलेल्या तोंडीयुक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे : उत्तर 1) गै.अ. क्रं. 1 यांनी दि. 15/4/2011 च्या पञानुसार कायदेशीररित्या विमा दावा नाकारला आहे काय ? : होय 2) गै.अ. क्र. 1 व 2 यांनी सेवा देण्यात न्युनता केली आहे काय ? : नाही. 3) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? :अंतिम आदेशा प्रमाणे // कारण मिमांसा // मुद्दा क्र. 1 व 2 : 13. अर्जदार याची पत्नी मयत रेखा ऊर्फ जयश्री राजेन्द्र मुसळे हिचा मृत्यु दि. 29/08/10 व 30/08/10 च्या राञी मौजा चिचोली (बु) येथील ग्रामपंचायतच्या विहीरीमध्ये बुडून झाला याबाबत वाद नाही. तसेच मयत रेखा ऊर्फ जयश्री हिने गै.अ. क्रं. 2 कडून एलएमव्ही सुमो व्हिक्टा एम.एच.29/टी/ 7633 आणि टाटा व्हिक्टा एम.एच. 29/टी/8142 या दोन वाहनाकरीता कर्ज घेतले होते. गै.अ क्रं.2 आपले कर्जदार ग्राहकाचे ग्रुप पर्सनल अपघात विमा गै.अ क्रं. 1 कडून काढतो त्याप्रमाणे मयत रेखा ऊर्फ जयश्री हीचा ग्रुप पर्सनल अपघाती विमा पॉलीसी क्र. एपीजी 00005055 – 00000 – 00 दि. 1/3/09 ते 29/2/12 या कालावधीकरीता काढला होता. विमा कालावधीतच रेखा ऊर्फ जयश्री हिचा मृत्यु झाला. अर्जदाराने पत्नीच्या मृत्युनंतर गै.अ. क्रं. 2 कडून अ-1 वरील पॉलीसीची प्रत मिळाल्यावर विमा क्लेम ची रक्कम मिळण्याकरीता विमा क्लेम सादर केला. गै.अ. यांनी विमा क्लेम दि.15/4/11 ला नाकारला याबद्दल वाद नाही. गै.अ. क्रं. 2 मार्फत विमा काढला होता व विमा पॉलीसीची प्रत गै.अ. क्रं. 2 कडे असल्याने केस मध्ये आवश्यक पक्ष म्हणून केले आहे. अर्जदाराने गै.अ. क्रं. 2 कडून विमा पॉलीसीची प्रत न्यायमंचात दाखल करावी एवढीच मागणी आहे. गै.अ. क्र.1 कडून मयत रेखा ऊर्फ जयश्री चा अपघाती मृत्युचा क्लेम मुल्य (Principal Sum Insured) रु.2,98,337/- एका वाहना करीता व तेवढीच विमा क्लेम ची रक्कम दुस-या वाहनाच्या विमा क्लमेची मागणी अर्जदाराने केली आहे. अर्जदाराने पत्नीचा अपघाती मृत्यु झाल्याने क्लेम मागणी करुनही दिली नाही, आणि बेकायदेशीर, तथ्यहिन निष्कर्ष काढून गै.अ. क्रं. 1 ने नाकारल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. 14. अर्जदार व गै.अ. क्रं. 1 यांनी ब-याच बाबी मान्य केलेल्या आहेत. वादातील मुद्दा असा आहे की, दि. 29/8/10 चे राञी मयत रेखा ऊर्फ जयश्री हिचा जो मृत्यु झाला तो मृत्यु अपघाती मृत्यु नाही तर स्वतः केलेली आत्महत्या आहे. याबाबतचा वाद आहे. अर्जदाराच्या कथना नुसार मृतक रेखा हिला झोपेत चालण्याची सवय होती त्यामुळे तिचा अपघात होवून ती मौजा चिचोली (बु) येथील विहीरीत राञी पडली व तिचा मृत्यु झाला. मृतक रेखा ऊर्फ जयश्री लहानपणा पासुनच कमी बोलणारी होती. ती अबोल असल्यामुळे मानसीक रित्या परिपक्व नाही असे वाटत होते. माञ तिच्यात कोणतीही उणीव अथवा मानसीक पागलपणा नव्हता. अर्जदाराचे हे म्हणणे उपलब्ध रेकॉर्ड वरुन संयुक्तिक नाही. अर्जदाराने अ-2 वर इनक्वेस्ट पंचनामा अ-2 व अ-3 वर घटनास्थळ पंचनाम्याची प्रत दाखल केले आहेत. सदर दस्तऐवजाचे अवलोकन केले असता एक बाब स्पष्टपणे सिध्द होतो की, मृतकाचे डोक्यात फरक असल्यामुळे ग्रामपंचायत विहीरीत उडी घेऊन मृत्यु पावली. अर्जदाराने स्वतः आपले तक्रारीत मान्य केले आहे की, दि. 29/8/10 ला मृतक रेखा ऊर्फ जयश्री हिने आई-वडिलासोबत राञी 10 वाजे जेवन करुन झोपी गेली, या कथनावरुन मृतक रेखा ही दि.29/8/10 ते 30/8/10 चे दरम्यान ग्रामपंचायत विहीरीत बुडून मरण पावली. अर्जदार यांच्या कथनानुसार ती झोपी गेली होती तरी, तिचे कोणतेही मानसीक असंतुलन नव्हते तर, मध्यराञी ग्रामपंचायत विहीरीवर जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. म्हणजेच एक बाब स्पष्टपणे सिध्द होतो की, रेखा ऊर्फ जयश्री हिने आई-वडिलासोबत ते झोपी गेल्यानंतर स्वतःहा आत्महत्या केली. मृतकाचा मृत्यु हा स्वतःहा ओढवून घेतलेला मृत्यु आहे. त्यामूळे विमा पॉलीसीच्या शर्ती व अटी नुसार अर्जदार हा विमा क्लेम मिळण्यास पाञ नाही. गै.अ. क्रं. 1 यांनी दि. 15/4/11 ला योग्य कायदेशीर कारणांनीच क्लेम नाकारला असल्याने त्यांनी अर्जदारास सेवा देण्यात कोणतीही न्युनता केलेली नाही असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे.
15. गै.अ.क्रं. 1 च्या वकीलांनी नि. 32 नुसार दाखल केलेल्या लेखीयुक्तीवादात असा मुद्दा घेतला आहे की, फिर्यादी यांनी दस्त अ- 3 मध्ये डोक्यात फरक असल्याने विहीरीत उडी घेऊन मृत पावल्याचे सांगीतले आहे. सदर दस्ताचे अवलोकन केलें असता विहीरीची तोंडी अडीच फूट उंच आहे. अशा स्थितीत मृतक अवधानाने पाय घसरुन पडून अपघाती मृत्यु झाला असे म्हणता येणार नाही. तसेच राञीच्या 10 नंतर मृतक रेखा ग्रामपंचायत विहीरवर झोपी गेल्यानंतर, पाणी आणण्याकरीता गेली असता अवधानाने पाय घसरुन पडली असेही म्हणता येणार नाही. तर उपलब्ध रेकॉर्ड वरुन आणि अर्जदाराच्या कथनावरुन हे स्पष्ट होत की, मृतक रेखा ऊर्फ जयश्री हिने स्वतः आत्महत्या केली. 16. अर्जदाराचें वकीलांनी नि. 33 नुसार दाखल केलेल्या लेखीयुक्तीवादाबरोबर वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडयाचा दाखला दिला आहे ते सदर खालील प्रमाणे. 1 United India Insurance Company Limited Vs. Nisha Devi & Ors. I (2011) CPJ 496 (Shimla State Commission) 2 Rajendra Kumar Shukla Vs. New India Insurance Company Limited. 2001 (1) CPR 267 (Lucknow State Commissio) 3 New India Insurance Company Limited Vs. Tribhuvan Prakash Gupta III (2003) CPJ 113 (Punjab State Commission) वरील न्यायनिवाडयात दिलेले मत या प्रकरणातील बाबीला लागु पडत नाही. गै.अ. यांनी कारटेल सर्व्हेअर अन्ड इन्व्हेस्टीगेटरर्स प्रायव्हेट लिमीटेड यांनी केलेल्या सर्व्हे रिपोर्ट ची प्रत नि. 28 नुसार दाखल केले आहे. त्या सर्व्हे रिपोर्ट च्या समर्थनार्थ शपथपञ दाखल केला नसल्यामुळे तो दस्त पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येवू नये हे दाखविण्याकरीता वरील न्यायनिवाडयाचा दाखला, अर्जदाराने दिलेला आहे. परंतु सदर सर्व्हे रिपोर्ट विचारात न घेता सुध्दा अर्जदाराच्या कथनावरुन आणि पोलीस स्टेशन विरुर यांनी तयार केलेल्या पंचनाम्यावरुन हे स्पष्ट होते की, मृतक रेखा ऊर्फ जयश्री हीचा अपघाती मृत्यु नसुन स्वतःहा ओढून घेवून मृत्यु झालेला आहे. गै.अ.क्रं. 1 चे वकीलांनी लेखीयुक्तीवादा सोबत मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नवी दिल्ली यांनी युनायटेड इंडिया इंन्सुरन्स कंपनी लिमीटेड विरुध्द पोटरु विजया लक्ष्मी III (2010) CPJ 123 (NC) या प्रकरणाचा दाखला दिला. सदर प्रकरणात दिलेले मत या प्रकरणातील बाबीला लागु पडतो. 17. अर्जदार यांनी लेखीयुक्तीवादातील पॅरा 13 मध्ये असे भाष्य केले आहे की, ‘’स्वप्नील बोबाटे नावाचा मयताचा कोणीही भाचा नाही’’ अर्जदाराचे वकीलांनी केलेले कथन स्पष्टपणे खोटे असुन स्वच्छ हाताने तक्रार दाखल केली नसल्याचे सिध्द होतो. अर्जदाराने विमा क्लेम मिळण्याकरीता खोटया सबबी पुढे करुन दाखल केले असल्याचे दस्त अ-3 वरुन सिध्द होतो. घटना स्थळ पंचनामा अ-3 मर्ग क्र.10/2010 दि. 30/8/10 कलम जाफौ कलम 174 प्रमाणे मर्ग दाखल केला असुन त्यात भाऊराव हरिशचंद्र बोबाटे यांनी विहीरीत उबडया स्थितीत असलेल्या स्ञीचे प्रेत ओळखून मृतक ही माझी साळी असुन तिचे नाव सौ रेखा राजु मुसळे असल्याचे फिर्यादी यानी पंचासमक्ष सांगीतले. सदर फिर्यादी भाऊराव बोबाटे याची मृतक ही साळी असुन स्वप्नील बोबाटेशी काही संबंध नाही हे अर्जदाराचे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही. हा मुद्दा विचारात घेतला नाही तरी, उपलब्ध रेकॉर्ड वरुन रेखा ऊर्फ जयश्री हीचा मृत्यु अपघाती झालेला नाही. अर्जदाराने अ-1 वर सर्टीफिकेट ऑफ इंन्सुरन्स दाखल केले आहे. त्यात विमा संरक्षण हे अपघाती मृत्यु करीताच जोखीम स्विकारली आहे. त्यामुळे पॉलीसीच्या शर्थीनुसार गै.अ. क्रं. 1 यांनी विमा दावा नाकारण्यात कोणतीही चुक केलेली नाही. या निणर्याप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी व मुद्दा क्रं.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. 18. वरील मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचने वरुन, तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) अर्जदार व गै.अ. यांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) अर्जदार व गै.अ.यांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 07/02/2012. |