Maharashtra

Nanded

CC/09/79

Harpalsingh Antarsingh thekedar - Complainant(s)

Versus

Cholamandalam MS General Insurance Co.Lit - Opp.Party(s)

ADV.S.D.Nagapurkar

11 Aug 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/79
1. Harpalsingh Antarsingh thekedar Pandurang Nagar, Airport Road NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Cholamandalam MS General Insurance Co.Lit Shivaji Nagar,NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 11 Aug 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
प्रकरण क्र. 2009/79
                                                     प्रकरण दाखल दिनांक  08/04/2009.
                                                     प्रकरण निकाल दिनांक  11/08/2009.
                                                   
समक्ष         -    मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील          अध्‍यक्ष.
                       मा.श्रीमती सुजाता पाटणकर,          सदस्‍या.
                       मा.श्री.सतीश सामते,                 सदस्‍य.
 
हरपालसिंघ पि. अंतरसिंघ ठेकेदार
वय, 50 वर्षे, धंदा व्‍यापार
रा.पांडूरंग नगर, विमानतळ मार्ग, नांदेड
ता.जि.नांदेड.                                           अर्जदार
विरुध्‍द
1.   चोला मंडलम एम.एस.जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
द्वारा शाखा व्‍यवस्‍थापक
कोठारी कॉम्‍प्‍लेक्‍स, शिवाजी नगर, नांदेड               गैरअर्जदार
                  
2.   चोलामंडलम एम.एस. जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
द्वारा वीभागीय व्‍यवस्‍थापक,
चोला मंडलिम एम.एस.जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
प्‍लॉट क्र.17, पहिला माळा, प्रयाग्र इन्‍क्‍लेव्‍ह,
सन्‍मान लॉस जवळ, शंकर नगर, नागपूर-10.
    
अर्जदारा तर्फे.               - अड.एस.डी.नागापूरकर
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे     - अड.समीर एस. पाटील.
 
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या)
 
              गैरअर्जदार यांनी विमा दाव्‍याची रक्‍कम न देऊन सेवेत ञूटी केली म्‍हणून ही तक्रार अर्जदार यांनी दाखल केली आहे.
              अर्जदाराचे वाहन क्र. एम.एच.-26- यू-0373 मूकूंद डिवटेवाड हे दि.3.10.2008 रोजी चालवित होते. जीप नांदेड हून किनवटकडे जात असताना धानोरा घाटात उतार वळणावर एक नादुरस्‍त ट्रक उभा होता धूक्‍यामूळे नादुरुस्‍त ट्रक न दिसल्‍याने जीप ट्रकच्‍या मागच्‍या भागावर जाऊन आदळून अपघात घडला. त्‍यामध्‍ये जीपचे बरेच नूकसान झाले. सदर जिपचा गैरअर्जदार यांचेकडे विमा होता त्‍यांचा क्र.एम.पी.सी.0135951-000-00 असा असून त्‍यांची मूदत दि.29.03.2008 ते दि.28.3.2009 अशी होती व अपघात हा दि.3.10.2008 रोजी म्‍हणजेच विम्‍याच्‍या कालावधीत झाला होता. वाहन अर्जदाराने नातेवाईकाना आणण्‍यासाठी दिले होते. त्‍यामूळे अर्जदार यांने अपघातग्रस्‍त वाहनास झालेली नूकसान भरपाई मिळावी म्‍हणून गैरअर्जदार कपंनी कडे रितसर अर्ज केला. पण दि.27.11.2008 रोजी गैरअर्जदार कंपनीने अटीचा भंग केला या कारणाने विमा दावा फेटाळला तो चूक आहे. अर्जदार यांना वाहनाची दूरुस्‍तीसाठी व वाहन नांदेड येथे आणण्‍यासाठी रु.82,388/- खर्च आला तो त्‍यांनी अधिकृत दूरुस्‍ती केंद्रातूनच केलेला आहे. अर्जदार यांची मागणी आहे त्‍यांनी पॉलिसीच्‍या कोणत्‍याही अटीचा भंग केलेला नाही. त्‍यामूळे त्‍यांची मागणी आहे की, वाहन दूरुस्‍ती व इतर खर्च रु.82,388/- व शारीरीक व मानसिक ञासापोटी रु.20,000/- व दावा खर्च मंजूर करावा असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपला लेखी जवाब दाखल केला आहे. अर्जदाराची तक्रार ही अधीकार क्षेञात येत नाही त्‍यामूळे ती फेटाळावी. अर्जदार यांनी पॉलिसीच्‍या अटीचे उल्‍लंघन केले आहे. त्‍यांनी स्‍वतःचे वाहन पेपरवाल्‍याना भाडयाने दिले होते त्‍यामूळे पॉलिसीच्‍या नियमानुसार त्‍यांना विमा क्‍लेम देय नाही असे म्‍हटले आहे.तसेच वाहन चालकाजवळ वैध वाहन परवाना नव्‍हता. अर्जदाराची तक्रार ही दि.3.10.2008 रोजी दाखल आहे  व अपघात हा दि.2.10.2008 रोजी झाला आहे. त्‍यामूळे यामध्‍ये तफावत आहे. अर्जदार म्‍हणतात की, त्‍यांनी वाहन दूरुस्‍तीसाठी खर्च केला हे गैरअर्जदार यांना मान्‍य नाही. वास्‍तविक वाहन परवाना निरिक्षक यांचे पाहणीप्रमाणे श्री. तोतला यांनी नूकसान हे रु.37951/- झाल्‍याचा सव्‍हे रिपोर्ट मध्‍ये उल्‍लेख केलेला आहे.अर्जदार म्‍हणतो नातेवाईकास किनवट येथून नांदेड येथे आणल्‍याचे म्‍हणत आहे पण त्‍या बाबत पूरावा म्‍हणून त्‍यांची नांवे पत्‍ता व शपथपञ सादर केलेले नाहीत.वाहन चालकाचे दि.2.10.2008 रोजीच्‍या बयानात स्‍पष्‍ट म्‍हटले आहे की, प्रस्‍तूत वाहन हे लोकमत वर्तमान पञाचे वितरणाकरिता दिले होते. त्‍यामूळे अर्जदार यांनी पॉलिसीच्‍या अटीचा भंग केला असल्‍यामूळे त्‍यांचा विमा दावा फेटाळल्‍याचे म्‍हटले आहे असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. म्‍हणून अर्जदाराची तक्रार ही फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
                अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून कागदपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
     मूददे                                       उत्‍तर
 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय?                         होय.     
2.  गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता
    केली आहे काय?                                                                           नाही.
3.   काय आदेश                          अंतीम आदेशा प्रमाणे.
 
                             कारणे
मूददा क्र.1   -      
          अर्जदार यांनी त्‍यांचे वाहन एम.एच.26 यु-00376 या वाहनाचा विमा गैरअर्जदार यांचेकडे उतरवलेला आहे.   सदरची बाब गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणणे व शपथपत्रामध्‍ये नाकारलेले नाही.   अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे.
मुद्या क्र. 2 - 
         अर्जदार यांच्‍या वाहनाचा दि.03/10/2008 रोजी नांदेडहुन किनवटकडे जात असतांना अर्जदार यांचे वाहन रस्‍त्‍यावर उभ्‍या असलेल्‍या नादुरुस्‍त ट्रकवर जाऊन आदळल्‍यामुळे अपघात झालेला आहे. अर्जदार यांनी त्‍यांच्‍या अर्जामध्‍ये संबंधीत वाहन हे केवळ वैयक्तिक कारणासाठीच किनवटकडे पाठवले होते, असे नमुद केलेले आहे. अर्जदार यांचे वाहन चालवीणारा ड्रायव्‍हर नामे श्री.मुंकूद महादेव दिवटेवाड यांनी पोलिस स्‍टेशनला दिलेल्‍या अर्जामध्‍ये सदर ड्रायव्‍हर यांनी मी अर्जदार यांचे गाडीवर तीन महिन्‍या पासुन नोकरीस आहे व दि.02/10/2008 रोजी मी नांदेड येथुन दैनीक लोकमत पेपर्स घेऊन नांदेड येथुन किनवटकडे येत असतांना सदरचा अपघात घडलेला आहे. माझी जीप उभी असलेल्‍या ट्रकवर जाऊन आदळली, असे नमुद केलेले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जासोबत घटनास्‍थळ पंचनामा दाखल केलेला आहे, त्‍यामध्‍येही अर्जदार यांचे ड्रायव्‍हरने दैनिक लोकमत वर्तमानपत्रे वाटप करणेकामी किनवटकडे येत असताना सदरचा अपघात झाल्‍याचे सांगितले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विमा क्‍लेम पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा भंग केल्‍यामुळे अर्जदार यांचा क्‍लेम नाकारल्‍याचे कळवलेले आहे. त्‍यामुळे अर्जदार प्रस्‍तुतची तक्रार घेऊन या मंचामध्‍ये आलेले आहेत.  अर्जदार यांनी त्‍यांच्‍या वाहनाचा विमा हा खाजगी वाहन विमा अंतर्गत उतरवलेला आहे. परंतु प्रत्‍यक्षात त्‍यांनी सदरचे वाहन लोकमत पेपर्स घेऊन जाण्‍यासाठी त्‍याचा वापर केलेला आहे. अर्जदार यांनी अर्जामध्‍ये त्‍यांच्‍या वाहनाचा अपघात दि.03/10/2008 रोजी झाल्‍याचे अर्जामध्‍ये नमुद केलेले आहे व प्रत्‍यक्षात पोलिस स्‍टेशनला दिलेल्‍या अर्जामध्‍ये व घटनास्‍थळ पंचनामामध्‍ये अपघाताची तारीख दि. 02/10/2008 अशी नोदवलेली आहे. अर्जदार यांनी प्रत्‍यक्षात खाजगी वाहन विमा प्रमाणपत्र घेतलेले आहे. परंतु सदर वाहनाचा वापर व्‍यवसायासाठी म्‍हणजेच दैनीक लोकमत पेपर्स घेऊन जाण्‍यासाठी केलेला आहे, ही बाब स्‍पष्‍ट होत आहे आणि सदरचे काम करत असतांना म्‍हणजे सदर वाहनाचा वापर उत्‍पन्‍न कमविण्‍यासाठी केलेला असतांना अपघात घडलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा क्‍लेम अटी व शर्तीचा भंग केल्‍यामुळे नाकारलेला आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍यामध्‍ये करार अस्तित्‍वात असेल तर त्‍या कराराचा म्‍हणजेच पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा अर्जदार यांचेकडुन भंग झालेला असेल तर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही.
          सदर अर्जाचे कामी   I 2007 C.P.J. 23 (N.C) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI, NATIONL INSURANCE CO. LTD & ANR V/S SURESH BABU & ANR, या निकालपत्राप्रमाणे
           Consumer Protection act, 1996—section 2(1)) (g) and 149 (2)—Insurance—Breach of terms of policy and provisions of law- Carryning more passengers than permitted- Same is offence under Act of 1988- In case of overloading of vehicles beyond licensed capacity, discretion given to insurer to settle claim on non-standard basis- In instant case, there is under declaration of licence carrying capacity in vehicle—Overloading was beyond reasonable limits- Hence , directing insurer to pay non-standard claim would by unjustified- On account of gross violation of policy and legal provisions by insured, insurer not liable.
 
5.                                         No doubt, in case of overloading of vehicles beyond the licence carrying capacity, discretion is given to the Insurance company to settle the same by paying upto 75%. If that discretion is not properly exercised, the Court/ Consumer for a may interfere and direct the Insurance Company to reimburse the insured appropriately. However, it would depend upon facts of each case.
6.                                          In the present case, as far as policy cover is concerned, there is under declaration of the licence carrying capacity in the vehicle. Not only that, the vehicle was overloaded beyond reasonable limits of licence carrying capacity. In such a situation, to direct the Insurance Company to pay as if the claim is non-standard claim- would be unjustified one.
19.                        In this view of the matter : (1)         there is a gross violation of the terms of the policy ;  and (ii) the provisions of the terms of the policy ; and (ii) the provisions of Law. Hence, in such a situation, the Insurance company has no alternative but to repudiate the claim as there is gross violation of the terms of the contract.   या निकालपत्राप्रमाणे अर्जदार यांच्‍या अर्जावर आदेश करणे उचित ठरणार आहे.
 
गैरअर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी या मंचामध्‍ये National Commission and Superm Court on consumer Law 1991- 2008 
 
               Motor Vehicle Insurance –Breach of terms of insurance
 
              Insurance---Motor Vehicle Insurance—Truck Insured—Policy stipulated limitation as to use ot truck as “ only for carriage of goods within mearning of the Motor Vehicles Act, 1988”---Truck carrying Ether Solvent caught fire---Permit granted to vehicle under Motor Vehicles Act only to carry all kinds of unhazardous goods---Ethyl Ether is hazarduous goods---Claim of insured can not be allowed as claim was not covered by terms of Insurance policy.
दाखल केलेले आहेत.
 
          अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र, तसेच अर्जदारातर्फे केलेला वकिलाचा यूक्‍तीवाद, गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपत्र, त्‍यांचे लेखी म्‍हणणे व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद व वरिष्‍ठ कोर्टाचे निकालपञ  याचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                     आदेश.
 
1.   अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजुर करण्‍यात येतो.
2.   दावा खर्च ज्‍यांनी त्‍यांनी आपापला सोसावा.
3.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे          श्रीमती सुजाता पाटणकर      श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                                    सदस्‍या                            सदस्‍य
 
 
 
 
जे.यु.पारवेकर
लघूलेखक.