Maharashtra

Kolhapur

CC/11/148

Smt. Rukmini Krushna Patil - Complainant(s)

Versus

Cholamandalam MS General Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

R.G.Khavre

19 Jul 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/148
1. Smt. Rukmini Krushna PatilHouse no.6/1/88, Mhalewadi, Post. Ghulewadi, Tal. ChandgadKolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Cholamandalam MS General Insurance Co. LtdPlot no.6, First floor, Pusa Road,New Delhi-1000052. Bhartiy Dur Sanchar Nigam Ltd.Field Office,Chandgad. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :R.G.Khavre, Advocate for Complainant
A.R.Kadam, Advocate for Opp.Party

Dated : 19 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.19/07/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला. 
 
           सदरची तक्रार तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्‍यामुळे दाखल करणेत आला आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार ही वयोवृध्‍द महिला असून तक्रारीत नमुद पत्‍तयावर कायमपणे रहात आहे. सामनेवाला क्र.2 बी.एस.एन.एल. या दुरसंचार कंपनीने आपल्‍या टेलिफोन ग्राहकांचा अपघाती विमा एकत्रितरित्‍या सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे उतरविलेला होता. सदर विमा धारक ग्राहकाचा मृत्‍यू झालेस रु.50,000/- नुकसान भरपाई निश्चित केलेली होती. त्‍याप्रमाणे कृष्‍णा यलाप्‍पा पाटील यांचा टेलिफोन क्र.239605 होता. त्‍यामुळे त्‍यांचा विमा प्रस्‍तुत सामनेवालांकडे सदर योजनेअतंर्गत विमा उतरविलेला होता. नमुद विमाधारकाचा दि.16/4/2009 रोजी चंदगड पोलीस ठाणेच्‍या हद्दीत झालेल्‍या ट्रक अपघातात मृत्‍यू झाला. सदर अपघाती मृत्‍यूमुळे तक्रारदारास जबरदस्‍त मानसिक धक्‍का बसला आहे. वृध्‍दापकाळातील सोबत व आधार गेलेने मानसिक अवस्‍थेतून बाहेर पडणेस त्‍यांना बराच अवधी लागला.
 
           तक्रारदार राहत असलेला चंदगड हा भाग अविकसीत भाग आहे. दळणवळणाची साधने व जगाचा संपर्क फार थोडया प्रमाणावर आहे. प्रस्‍तुत तक्रारदारांना विमा योजनेची कोणतीही माहिती नव्‍हती. सदर विमा पॉलीसीची माहिती त्‍यांना उशिरा मिळाली. सदर पॉलीसीच्‍या लाभाचे तक्रारदाराने क्‍लेम फॉर्मसोबत आवश्‍यक पोलीस कागदपत्रांसह ऑगस्‍ट-09 मध्‍ये क्‍लेमची मागणी केली. सदर क्‍लेम फॉर्म दि.20/08/2009 रोजी सामनेवाला यांना प्राप्‍त झालेला आहे. सामनेवाला यांनी प्रस्‍तुत क्‍लेम हा अपघात झालेपासून 60 दिवसांचे आत दाखल होणे आवश्‍यक होते. सदर क्‍लेम मुदतीत नसलेने दि.26/08/2009 चे पत्रानुसार क्‍लेम नाकारलेला आहे. वस्‍तुत: क्‍लेम दाखल करणेस केवळ 2 महिन्‍याचा विलंब झालेला आहे. तक्रारदाराचे पतीचे मृत्‍यू नंतर असणारी मानसिक अवस्‍था, तक्रारदाराचे वय वर्षे, अज्ञान, आर्थिक परिस्थिती, तक्रारदार राहत असलेला डोंगराळ भाग, क्‍लेम फॉर्मसाठी सोबत आवश्‍यक असणा-या कागदपत्रांच्‍या पुर्ततेसाठी लागणारा कालावधी इत्‍यादी वस्‍तुस्थितीचा विचार करता सदर विलंब माफ होणेस पात्र आहे. सदर वस्‍तुस्थितीकडे विमा कंपनीला कायदयाने दुर्लक्ष करता येणार नाही. केवळ तांत्रिक मुद्दयाचे आधारे तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सेवात्रुटी ठेवलेने प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन विमा रक्‍कम रु.50,000/- द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याजासह, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.3,000/- सामनेवालांकडून तक्रारदारास देणेबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ क्‍लेम नाकारलेचे पत्राची सत्‍यप्रत दाखल केली आहे.
 
(4)        सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार  तक्रारीतील कलम 1,2, 4, 5, 7 ते 12 मधील मजकूराबाबत काही म्‍हणावयाचे नसलेचे नमुद केले आहे. कलम 3 मधील मजकूराबाबत मयत श्री कृष्‍णा यलाप्‍पा पाटील यांचे नांवे टेलिफोन नं.जीएलडब्‍ल्‍यु 239605 चालू स्थितीत होता ही माहिती बरोबर असलेचे मान्‍य केले आहे. तसेच कलम 6 मधील मजकूराबाबत तक्रारदाराने दि.31/07/2009 रोजी सामनेवाला क्र.2 यांचे कार्यालयामधून सामनेवाला क्र.1 कडे पाठवणेसाठी क्‍लेम फॉर्म घेतलेला आहे.दि.04/08/2009 रोजी सदरचा क्‍लेम फॉर्म सामनेवाला क्र.1 यांना पाठवून दिलेला आहे व त्‍यांना दि.20/08/2009 रोजी मिळाला असलेचे नमुद केले आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.2 यांनी आपले लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ दि.06/03/09 चे सामनेवाला क्र.1 चे पत्र, दि.09/01/09 चे सामनेवाला क.2 चे सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेले पत्र, दि.31/07/09 चे सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना क्‍लेम बाबतचे पत्र व सोबत क्‍लेम फॉर्म, खबरी जबाब, वर्दी जबाब, मरणोत्‍तर पंचनामा, शवविच्‍छेदनाचा फॉर्म 2-बी वैद्यकीय अधिकाराचे प्रमाणपत्र, गुन्‍हा घडलेचा प्राथमिक अहवाल, खरेदी करारपत्र, वैद्यकीय अधिकारी यांचे अॅडव्‍हान्‍स सर्टीफिकेट, शवविच्‍छेदन अहवाल, पंचनामा, मृत्‍यू नोंद दाखला, कोल्‍हापूर दुरसंचारचे टेलिफोन बील, कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोरील प्रतिज्ञापत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(07)       सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्‍य केले कथनाखेरीज नाकारलेली आहे. सामेनवाला यांनी सेवात्रुटी केली नसलेने प्रस्‍तुत तक्रार चालविणेचे अधिकार क्षेत्र मे. मंचास नाही. तक्रारदाराचा पती हा सामनेवाला क्र.2 यांचा ग्राहक होता त्‍याचे नांवे दुरध्‍वनी क्र.239605 होता हे मान्‍य आहे. तसेच पॉलीसी मान्‍य केलेली आहे. सामनेवालांचे उत्‍तरदायित्‍व हे पॉलीसीच्‍या अटी व शर्तीनुसार राहील. बी.एस.एन.एल. ग्राहकाचा अपघाती मृत्‍यू झालेस सामनेवाला रु.50,000/- देणेचे बांधील असलेचे मान्‍य केले आहे. तक्रार अर्ज कलम 7 मधील अपघाती मृत्‍यूचा दावा 60 दिवसांचे आत दाखल करणेचा होता हे मान्‍य केलेले आहे. सामनेवाला यांनी दि.26/08/09 चे पत्राने दावा नाकारलेचे मान्‍य केलेले आहे. विलंब माफीसाठी उठवलेले मुद्दे‍ योग्‍य नाहीत. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदारास मानसिक त्रास झालेला नाही. तक्रारदाराने केलेला विमा दावा मुदतीत नसलेने योग्‍य कारणास्‍तव नाकारला असलेने सामनेवाला यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केली आहे.
 
(08)       सामनेवाला क्र.1 यांनी आपले म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेली नाहीत.
 
(7)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षाच्‍या वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                 --- होय.
2) काय आदेश ?                                      --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचा पती मयत कृष्‍णा यलाप्‍पा पाटील याचे नांवे टेलिफोन क्र.239605 आहे. तक्रारदाराचा पती हा सामनेवाला क्र.2 यांचा ग्राहक आहे. सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांचे ग्राहकांसाठी अपघाती विमा एकत्रितरित्‍या सामनेवाला क.1 कडे उतरविलेला होता ही बाब सामनेवाला क्र.1 यांनी मान्‍य केली आहे. सबब पॉलीसीबाबत वाद नाही.
 
           दि.26/08/2009 चे पत्राने सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा क्‍लेम हा विहीत केलेल्‍या मुदतीत म्‍हणजेच 60 दिवसांचे आत आलेला नाही. क्‍लेम दावा दि.16/4/09 रोजी पाठवला तरी तो दि.20/08/2009 रोजी सामनेवाला क्र.1 यांना प्राप्‍त झालेला आहे. त्‍यामुळे दावा विचारात घेणेस असमर्थ असलेचे कळवले आहे. सदर क्‍लेम नाकारलेचे कारण हाच वादाचा मुद्दा आहे. सामनेवाला क्र.2 यांनी आपल्‍या ग्राहकाच्‍या अपघाती मृत्‍यूसाठी विमा उतरिवलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी आपल्‍या म्‍हणणेसोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांनुसार विमा धारकाचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास रु.50,000/- इतकी विमा रक्‍कम त्‍यांचे लाभार्थींना मिळणेस पात्र असलेचे दिसून येते. तसेच विमा दावा योग्‍य त्‍या कागदपत्रांसह 30 ते 60 दिवसांमध्‍ये दाखल करावा. सदरचा जास्‍तीत जास्‍त कालावधी हा 60दिवसापर्यंत तसेच विशेष व योग्‍य कारणास्‍तव 75 दिवसांपर्यंतचा दिसून येतो.
 
           तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा दि.16/04/2009 रोजी चंदगड पोलीस ठाणेच्‍या हद्दीत ट्रक अपघातामध्‍ये झालेला आहे. हे दाखल क्‍लेम फॉर्म दि.20/04/09 चा खबरी जबाब, दि.16/04/09 चा वर्दी जबाब, मरणोत्‍तर पंचनामा, वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र, गुन्‍हा घडलेचा प्राथमिक अहवाल, पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यूचा नोंद दाखला इत्‍यादीवरुन निर्विवाद आहे. प्रस्‍तुत विमाधारकाचा मृत्‍यू हा तो शेतातून घरी येत असताना त्‍यास पाठीमागून ट्रक नं.MH-09-L-838 या ट्रकने ठोकरुन अपघात करुन अपघातात गंभीर जखमी करुन दवाखानेस औषध उपचाराकरिता आणत असता कोवाड गावी मयत झाला आहे. शवविच्‍छेदन अहवालातही Cause of death is acute cardioraspiratory failure due to shock due to haemothorax due to # ribs  नमुद केले आहे. यावरुन तसेच पोलीस पेपर्सवरुन तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू अपघाती झालेला आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे याबाबत सामनेवाला यांचे दुमत नाही. याबाबत सामनेवाला क्र.1 यांना क्‍लेम मंजूर करणेसाठी आवश्‍यक कागदपत्रे विमा दाव्‍यासोबत सामनेवाला क्र.2 मार्फत पाठविलेली आहेत. ती त्‍यांना दि.20/08/2009 रोजी प्राप्‍त झाली असलेचे सामनेवाला क्र.1 यांनी मान्‍य केले आहे.
 
           तक्रारदार ही एक विधवा, वयस्‍कर महिला असून ती चंदगड सारख्‍या डोंगराळी भागात राहते. ती अडाणी असल्‍याने तसेच पॉलीसीबाबत अनभिज्ञ असलेने ज्‍यावेळी तीला पॉलीसीची माहिती झाली त्‍यावेळी तिने तातडीने पूर्तता केलेचे दिसून येते. सदर परिस्थिती विशेषत्‍वाने विचार करणेसारखी आहे. सामनेवाला क्र.1 यांच्‍या पॉलीसीप्रमाणे विशेष परिस्थितीमध्‍ये अपघात झालेपासून 75 दिवसांपर्यंत विमा दावा दाखल करता येत होता. तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा दि.16/04/2009 रोजी झालेला आहे; येथून 75 दिवसांचा कालावधी विचारात घेता 30 जुन-09 अखेर विमा दावा सामनेवाला क्र.1 यांचे कार्यालयात जावयास हवा होता. तो‍ दि.20/08/09 रोजी प्राप्‍त झालेला आहे. सबब 50 दिवसांचा विलंब झालेला आहे. सदरचा विलंब हा वरील परिस्थितीचा विचार करता माफीस योग्‍य आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यासाठी खालील पूर्वाधार हे मंच विचारात घेत आहे.  
 
          लक्ष्‍मी आणि इतर विरुध्‍द डेप्‍युटी कमिशनर ऑफ लेबर – 1998 सी.एल.आर. 663 मद्रास उच्‍च न्‍यायालय. सदर पूर्वाधारातील महत्‍वाचा मुद्दा पुढीलप्रमाणे
     “ Workmen’s Compensation Act, 1923-Dismissal of claim petition solely on ground of delay. Claim petition of appellant petitioners was dismissed solely on ground of delay-Appellant petitioners were a poor class IV employees’s widow and minor children – It could not be expected of them to seek appropriate remedy within period of limitation – Denying remedy solely on ground of limitation without construing condonation liberally would by itself be frustrating object of the Act- Delay condoned- Appeal allowed and matter remitted to workmen’s Compensation Authority to decide on merits.” 
 
           पॉलीसीचा मूळ हेतू विचारात घेता प्रस्‍तुत विमा दावा हा जास्‍तीत जास्‍त 60 दिवसाचे आत विशेष परिस्थितीत 75 दिवसांचे आत दाखल करावा ही निर्णायक अट नसून दिशादर्शक अट आहे. सबब सामनेवाला विमा कंपनीने प्रस्‍तुत विमा योजना ही सामनेवाला क्र.2 यांचे ग्राहकांचे अपघाती मृत्‍यू तसेच अपंगत्‍वासाठी होती. सबब सदर पॉलीसीचा मूळ हेतू विचारात घेता तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा अपघाती आहे. तसेच वरील तक्रारदाराची परिस्थिती विचारात घेता तक्रारदाराचा क्लेम मंजूर करावयास हवा होता. तसे न करता तांत्रिक कारणास्‍तव सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्‍हणून दि न्‍यू इंडिया एशोरन्‍स कंपनी विरुध्‍द श्री नानासाहेब हणमंत जाधव आणि इतर-2005II सी.पी.आर.24 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारमध्‍ये महत्‍वाचा मुद्दा खालीलप्रमाणे-
                        Clause regarding intimation of claim within one month is directory, insurance claim intimated late cannot be rejected on its violation alone.
          
           सामनेवाला क्र.1 यांनी आपले लेखी म्‍हणणेमध्‍ये कलम 5 मध्‍ये सामनेवाला क्र.2 यांचे ग्राहकाचा अपघाती मृत्‍यू झालेस रु.50,000/- नुकसानीपोटी विमा रक्‍कम देणेस कंपनी जबाबदार असलेचे मान्‍य केले आहे. युक्‍तीवादाच्‍या वेळेस सामनेवाला क्र.2 यांचे प्रतिनिधी सौ.के.व्‍ही.कुलकर्णी यांनी ही बाब मान्‍य केली आहे. तसेच पॉलीसीच्‍या  क्‍लॉज 5.1 प्रमाणे रु.50,000/- विमा रक्‍कम निर्धारीत केलेली आहे.             
 
           सबब वरील संपूर्ण विवेचन व पूर्वाधार विचारात घेता तक्रारदार क्‍लेम रक्‍कम रु.50,000/- क्‍लेम नाकारलेपासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 :- सामनेवाला यांचे सेवात्रुटीमुळे झालेल्‍या मानसिक त्रासापोटी तक्रारदार रक्‍कम मिळणेस पात्र आहेत;    
 
                                आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु.50,000/-(रु.पन्‍नास हजार फक्‍त) मिळणेस पात्र आहेत. सदर रक्‍कमेवर दि.26/08/2009 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज मिळणेस पात्र आहेत.
 
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) दयावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT