Maharashtra

Nagpur

CC/272/2021

SUBHASH SHANKAR SHINGANE - Complainant(s)

Versus

CHOLAMANDALAM MS GENERAL INSURANCE CO. LTD. - Opp.Party(s)

ADV. MRS. KALPANA RAUT

13 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/272/2021
( Date of Filing : 09 Jun 2021 )
 
1. SUBHASH SHANKAR SHINGANE
R/O. 13, GONDEGAON, SAPURNA BAGH, NEAR WARTER TANK, KANHAN, PARSHIVANI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. CHOLAMANDALAM MS GENERAL INSURANCE CO. LTD.
PRAYAG ENCLAVE, PLOT NO.17, 1ST FLOOR, NEAR SAMMAN LAWN, SHANKAR NAGAR, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MRS. KALPANA RAUT, Advocate for the Complainant 1
 
Dated : 13 Jan 2022
Final Order / Judgement

                                 आदेश

                                

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्याचे वडील शंकर यादवराव शिंगणे यांनी AU Small Finance Bank यांच्‍याकडून महिंद्र वाहन ज्याचा नोंदणी क्रमांक MH40/BJ-2953 विकत घेतले होते आणि त्‍यांच्‍याकडून Group Personal Accident Insurance Policy विकत घेतली होती. सदरची पॉलिसी विकत घेताना तक्रारकर्त्‍याच्या वडिलांनी त्‍याकरिता रुपये 4067/- चा विमा हप्ता अदा केला होता आणि सदरच्‍या पॉलिसीत तक्रारकर्त्‍याचे नांव नॉमिनी म्‍हणून नमूद आहे.
  2.      तक्रारकर्त्याच्‍या वडिलांनी ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी ही पाच वर्षाकरता विमाकृत केली होती. विरुद्ध पक्षाने दरवर्षी खालील प्रमाणे विमा पॉलिसी निर्गमित केलेली आहे.

 

Policy numbers

Valid for the period

a

2860/00198076/0005/000/00

24/01/2019 to 23/01/2020

b

2860/00198319/0005/000/00

24/01/2020 to 23/01/2021

c

2860/00198342/0004/000/00

24/01/2021 to 23/01/2022

d

2860/00198364/0004/000/00

24/01/2022 to 23/01/2023

e

2860/00198382/0002/000/00

24/01/2023 to 23/01/2024

 

        तक्रारकर्त्‍याच्या वडिलांचा दिनांक 22.08.2020 ला अंदाजे 13.30 ते 14.00 दरम्यान  मोटार अपघात झाला आणि त्‍यांना कामठी येथील Sub District Hospital कामठी , जिल्हा नागपूर येथे उपचाराकरिता दाखल केले होते आणि त्‍यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला व त्यांचे हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. तसेच कामठी पोलीस स्टेशन मध्ये प्रथम खबरी अहवाल क्रमांक 411 दिनांक 22.08.2020 अन्वये मारुती कार क्रमांक MH31/BB-5706 चे वाहन चालक यांच्‍या विरुध्‍द अपघाताबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा नोंदविला. पॉलिसी क्रमांक 2860/00198319/0005/000/00 ही दिनांक 24.01.2020 ते 23.01.2021 या कालावधीकरिता वैध होती व तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा अपघाती मृत्यू हा पॉलिसी कालावधी दरम्‍यान झालेला आहे. तक्रारकर्ता हा शंकर यादवराव शिंगणे यांचा कायदेशीर वारस असल्याने लाभार्थी या नात्‍याने तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाकडे सदरचा विमा दावा सादर केला होता आणि सदरचा दावा हा क्‍लेम नंबर2860001262 अन्वये नोंदविला. तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याच्‍या वडिलांजवळ वाहन चालवीत असताना वैध परवाना होता, परंतु अपघाता दरम्यान तक्रारकर्त्याच्‍या वडिलांजवळ असलेला वैध वाहन परवाना गहाळ झाला व तो शोधून   ही मिळाला नाही. विरुद्ध पक्षाने विमा पॉलिसी सोबत पॉलिसीच्या शर्ती व अटी असलेले दस्‍तावेज पाठविले आणि सदरच्‍या पॉलिसीत Exclusions Clause  मध्‍ये  फक्‍त 6 शर्ती व अटी नमूद होत्‍या, परंतु विरुध्‍द पक्षाने Exclusions Clause चे  शर्त क्रं. 7 अन्‍वये तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्यात आला ज्याचा पॉलिसीत समावेश नसून विमा पॉलिसी च्या Exclusions Clause मध्ये नमूद नाही. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेकरिता तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की,

1    विरुद्ध पक्षाला निर्देश देण्यात यावे की, विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला विमा     

      दावा रक्कम रुपये 8,50,520/- 12 टक्के व्याजासह तक्रार दाखल    दिनांकापासून अदा करावे.

2   मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही अदा करावा.

 

  1.      विरुद्ध पक्षाला आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस दिनांक 19.07.2021 ला प्राप्त होऊनही विरुद्ध पक्ष आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुद्ध प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 20.09.2021 ला पारित करण्यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

 

1     तक्रारकर्ता विरुद्ध पक्षाचा ग्राहक आहे काय ?                 होय

2     विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय?  नाही

3     आदेश?                                        अंतिम आदेशानुसार

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत तक्रारकर्त्याच्‍या वडिलांना विरुद्ध पक्ष विमा कंपनीने  विमा पॉलिसी क्रमांक 2860 /00/198319/005/000/00 अन्‍वये Group Personal Accident Insurance Policy अंतर्गत विमा मूल्य रक्‍कम रुपये 7,57,000/- करिता दिनांक 24.01.2020 ते दिनांक 23.01.2021 या कालावधीत करिता विमाकृत केले होते हे दाखल दस्तावेजावरून दिसून येते आणि सदर पॉलिसीमध्ये तक्रारकर्त्‍याचे नांव हे नॉमिनी म्‍हणून नामनिर्देशित असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा लाभार्थी असल्‍याने विरुद्ध पक्षाचा ग्राहक असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा दिनांक 22.08.2020 ला अंदाजे 13.30 ते 14.00 वा. दरम्यान मोटार अपघात झाला आणि कामठी येथील Sub District Hospital Kamptee, जि. नागपूर येथे उपचारा दरम्यान निधन झाल्याचे निशाणी क्रमांक 2 वर दाखल प्रथम खबरी अहवाल, घटनास्थळी पंचनामा. Sub District Hospital कामठी, जिल्हा नागपूर यांचा शवविच्छेदन अहवाल व मृत्यु प्रमाणपत्राचे अवलोकन केल्‍यावर निदर्शनास येते. तसेच तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या वडिलांच्‍या वाहनाचा वैध वाहन परवाना अभिलेखावर दाखल केलेला नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्‍या वडिलांचा विमा दावा हा तक्रारकर्त्‍याचे वडील अपघाताचे दिवशी वाहन चालवीत असतांना  त्यांच्‍या जवळ वैध वाहन चालविण्‍याचा परवाना नव्हता या कारणास्तव नाकारण्‍यात आला होता. यावरुन विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारुन कुठलीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.         

             सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.
  2. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.
  3. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.