::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- ०३/१२/२०१५ )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदाराचे अर्जदाराचे मालकीच्या बजाज टेम्पो ट्रक्स असा आहे. अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडून उपरोक्त वाहन करीता विमा काढलेला होता. सदरहु विमा दि. २४.११.२००९ ते २३.११.२०१० या तारखेपर्यात वैध होते. दि. २५.०५.२०१० रोजी राञी उपरोक्त बजाज टेम्पो अपघातग्रस्त झाली. सदर अपघाताची माहीती रामदास वंजारी यांनी पवणी पोलीस स्टेशन येथे दिली. दुस-या दि. २६.०५.२०१० ला सदर अपघाताबाबत गैरअर्जदाराच्या चंद्रपूर कार्यालयात कळविले व नागपूर कार्यालयात सुध्दा कळविले. अर्जदाराचे सुचने नुसार चंद्रपूर येथून गैरअर्जदाराचा परवानाधारक सर्व्हेअर बजाज टेम्पो ट्रक्सची चौकशी व निरिक्षण करण्याकरीता घटनास्थळावर आला. सदरहु घटनास्थळावर बजाज टेम्पो ट्रक्स चे निरिक्षण करुन छायाचिञ काढले वरील कार्यवाही झाल्यावर सर्व्हेअरच्या सुचनेनुसार अर्जदाराने सदर टेम्पो येथे वडसा येथे दुरुस्तीसाठी आणले. उपरोक्त बजाज टेम्पो ट्रक्स दुरुस्त करुन अर्जदाराला एकूण १,३३,६११/- रु. खर्च आले. माहे डिसेंबर २०१० च्या शेवटच्या आठवढयात उपरोक्त बजाज टेम्पो ट्रॅक्सच्या दुरुस्ती नंतर उपरोक्त संपूर्ण मूळ देयके व इतर आवश्यक दस्ताऐवज गैरअर्जदाराच्या सुचनेप्रमाणे त्यांच्या नागपूर कार्यालयात पाठविले. गैरअर्जदाराने अर्जदाराने पाठविलेला विमा प्रस्ताव निणर्या लवकर होईल अशी खाञी अर्जदाराला दिली. त्यानंतर सुमारे ०६ महिण्याच्या कालावधी निघून गेला तरी गैरअर्जदाराने अर्जदाराची देय असलेली रक्कम अदा केली नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे त्यांच्या कार्यालयात क्लेम मंजूरीकरीता विनवण्या केल्या परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराला अधि. मार्फत दि. २७.०६.२०११ रोजी नोटीस पाठविला व त्या व्दारे विमा क्लेमची रक्कम व्याजासह व नोटीसचा खर्चाची मागणी केली. गैरअर्जदाराला नाटीस प्राप्त होवू सुध्दा अर्जदाराची मागणी केली नाही व खोटया मजकुराचे पञ पाठविले. गैरअर्जदाराने अनुचित व्यवहार पध्दती व सेवेत न्युनता दिली त्यामुळे अर्जदाराला मानसिक शारिरीक ञास सहन करावाव लागला म्हणून अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
२. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार याने अर्जदाराला रु. २,६२,८०२.६३/- व्याजासह अर्जदाराला देण्याचा आदेश पारीत करण्यात यावे व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. नोटीसची बजावणी झाली असून गैरअर्जदार मंचासमक्ष हजर झाले नाही म्हणून नि. क्रं. ०१ वर दि. २८.०३.२०१३ रोजी गैरअर्जदाराविरुध्द एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. त्यानंतर गैरअर्जदार प्रकरणात हजर झाले व नि. क्रं. ०१ वर, नि. क्रं. १९ चे आदेशान्वयाने गैरअर्जदाराविरुध्द पारीत केलेल्या एकतर्फा आदेशाचे दि. ०२.०५.२०१३ रोजी रद्द करण्यात आला. गैरअर्जदाराने नि. क्रं. २० वर लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावले आरोप खोटे असून त्यांना नाकबुल आहे. गैरअर्जदाराने त्यांच्या जवाबात विशेष कथनात असे नमुद केले आहे कि, अर्जदारातर्फै अपघाताविषयी माहीती मिळाल्यावर गैरअर्जदाराने तत्परतेने वाहनाचे निरिक्षण करुन घेतले त्यानंतर अर्जदाराने गाडी दुरुस्ती करीता टाकली परंतु अर्जदाराने वाहन दुरुस्ती संबंधी कुठलीही कार्यवाही केली नाही तेव्हा गैरअर्जदार यांनी अर्जदाराला दि. २९.०७.२०१०, ०९.०८.२०१० व १७.०२.२०११ रोजी पञ पाठवून सदरिल वाहनाचे अंतीम देयक व त्यासंबधी त्यांना प्राप्त झालेले रशिद तसेच वाहनाचे शेवटचे निरिक्षण सुचना देण्यासंबंधी त्यांच्या पत्यावर कळविले परंतु अर्जदार हे बाहेर असल्याने अर्जदाराला पाठविलेले पञ गैरअर्जदाराकडे परत आले. त्यानंतरही अर्जदाराने कधीच वाहनाचे बिल व वाहनाचे अंतीम तपासणी करीता कळविले नाही शेवटी अर्जदाराने अधिवक्ता मार्फत खोटे नोटीस बनवून सदर खोटी तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. वास्तविक अर्जदाराने दाखल केलेले संपूर्ण बिल याचे घटनेशी कोणतेही ताळमेळ बसत नाही. अर्जदाराची संपूर्ण मागणी खोटी बनावटी व ती खोटया दस्ताऐवजाच्या आधारे असल्याने सदर तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे. वास्तविक पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे अर्जदाराने वाहनाचे पूर्ण निरिक्षण करुन घेणे बंधनकारक होते. अर्जदाराने या नियमाचे उल्ल्ंघन केल्यामुळे अर्जदाराला नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार नाही. सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करण्याची मागणी केली आहे.
४. गैरअर्जदाराने त्याचे लेखीबयाणात नि. क्रं. ३० वर दि. १८.०३.२०१४ ला झालेल्या आदेशाच्या अन्वयाने दुरुस्ती केली. त्यात गैरअर्जदाराने असे नमुद केलेले आहे कि, अर्जदारातर्फै अपघातरची सुचना मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने कोणताही विलंब न करता त्यांचे नेमलेले सर्व्हेअर नी मौका परिस्थितीची पाहणी केली व त्याप्रमाणे गाडीचे किती नुकसान झाले याचा अहवाल सादर केला. अर्जदाराने दि. २९.०५.२०१० ला इंडिया वेल्डींग वर्क्स अंदाजे नुकसान झालेल्या पार्टची यादी तयार करुन गैरअर्जदाराला दिली त्यानंतर ०५.१०.२०१० पर्यंत वाहनाचे कोणतेही रक्कम करण्यात आले नाही. गैरअर्जदाराने सतत पाठपुरावा केला होता वाहन दुरुस्ती होत असतांना गैरअर्जदाराने वेळोवेळी दुरुस्तीचा अपघातासंबंधी नुकसानीची शहानिशा केली आहे. गैरअर्जदाराचे तंञज्ञ यांनी अर्जदाराने सादर केलेले दस्ताऐवजा प्रमाणे रु. ४१,०००/- देण्यास गैरअर्जदार जबाबदार असल्याचा अहवाल दिलेला आहे. वास्तविक आर. आय. डी. आय. या नियमाप्रमाणे प्लास्टिक/ रबर पार्टस हे ५० टक्के दिले जातात व धातुचे पार्टस वाहनाच्या वयाप्रमाणे घसारा कमी करुन प्रस्तुत प्रकरणात ३५ टक्के दिला जातो. या शिवाय अतिरिक्त पार्टस विमामध्ये समाविष्ट केलेले नाही. अशा परिस्थितीत अपघातामध्ये झालेल्या नुकसानमध्ये वैतिरिक्त वाहन दुरुस्तीचे बिल रक्कम देण्यास गैरअर्जदार जवाबदार नाही. तसेच अर्जदार स्वतः दि. २८०२.२०११ रोजी गैरअर्जदाराला पञ देवून कळविले कि त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना वाहन दुरुस्ती करीता ०८ महिने लागेल यात गैरअर्जदाराची कोणतीही न्युनतम सेवा दिली नाही.
५. अर्जदाराने त्याच्या तक्रारीत दुरुस्तीकरुन गैरअर्जदाराने लावलेले आरोप अर्जदाराने नाकारले.
६. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
२) गैरअर्जदाराने अर्जदराप्रति न्युनतम सेवा दर्शविलेली
आहे काय ? होय.
३) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीची
अववलंबना केली आहे काय ? होय.
४) आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. ०१ बाबत ः-
७. अर्जदाराचे मालकीच्या बजाज टेम्पो ट्रॅक्स असा आहे. अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडून उपरोक्त वाहनाकरीता विमा काढलेला होता. सदरहु विमा दि. २४.११.२००९ ते २३.११.२०१० या तारखेपर्यंत वैध होते. ही बाब दोन्ही पंक्षांना मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक होते असे सिध्द होत आहे सबब मुद्दा क्रं.०१ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ०२ व ०३ बाबत ः-
८ गैरअर्जदाराने अर्जदाराला त्यांचे झालेले वाहनाचे अपघाताबात विमा क्लेम अदयाप पर्यंत दिली नाही ही बाब गैरअर्जदाराला कबुल आहे फक्त गैरअर्जदाराचे त्यांच्या जवाबात असे कथन केले आहे कि, त्यांचे तंञज्ञ विशेतज्ञ यांनी दिलेले अहावालानुसार अर्जदाराचे वाहनाची नुकसान भरपाई रु. ४१,००००/- पर्यंत झाली आहे. गैरअर्जदाराने नि. क्रं. ३२ वर दाखल दस्त क्रं. ब- १० ची पडताळणी करतांना असे दिसले कि, गैरअर्जदारातर्फै नेमलेले तंञज्ञ वाहनाचे नुकसान भरपाई म्हणून अर्जदार रु. ४१,०००/- घेण्यास पाञ आहे परंतु सदर अहवाल छायांकित होते व त्यावर गैरअर्जदाराचे कोणतीही स्वाक्षरी सत्यप्रत म्हणून नव्हती तसेच गैरअर्जदाराने सदर अहवाल सिध्द करण्याकरीता तंञ विशेतंज्ञाचा साक्षि पुरावा या मंचासमक्ष दाखल केलेला नाही. म्हणून गैरअर्जदाराने दाखल तंञ विशेतंज्ञाचा अहवाल ग्राहय धरण्यासारखे नाही. गैरअर्जदाराने त्यांच्या लेखीउत्तरात अर्जदाराने गैरअर्जदाराला पाठविलेले पञ दि. २८.०२.२०११ चे नमुद केला त्याबाबत गैरअर्जदाराने कोणतीही पञ दस्ताऐवज म्हणून या प्रकरणात दाखल केलेले नाही. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराला दि. २८.०२.२०११ रोजी पञ लिहून त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना वाहन दुरुस्ती करीता ०८ महिने लागेल हे म्हणणे ग्राहय धरण्यासारखे नाही याउलट अर्जदाराने नि. क्रं. ०५ वर दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द झाले आहे कि, अर्जदाराचे वाहन अपघातग्रस्त झालेले होते व अर्जदाराने त्यांच्या वकीलामार्फत गैरअर्जदाराला वेळेवर त्यांचे अपघात झालेले वाहनाचे विमा क्लेम नाही मिळाल्याबाबत नोटीस पाठविलेली होती. अर्जदाराने दाखल नि. क्रं. ०५ वर दस्त क्रं. अ- १६ ची पडताळणी करतांना असे दिसले कि, गैरअर्जदाराने अर्जदाराला नोटीसच्या जवाबाबत असे कथन केले आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदारास पञाव्दारे दस्ताऐवज व वाहनाला दुरुस्ती करीता झालेले देयकाचे पुर्तता करणे बाब आहे कळविलेले होते व अर्जदाराने ती पुर्तता केली नसल्यास अर्जदाराचा विमा क्लेम दावा नो क्लेम म्हणून बंद करण्यात आले. परंतु गैरअर्जदाराने त्याच्या बयाणात बचाव पक्षात ठेवलेले कथन व गैरअर्जदाराने अर्जदारास नोटीसात दिलेले उत्तर साम्य नसल्याने हे सिध्द झाले आहे कि, गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे अपघाती वाहनाचे विमा क्लेम वेळेवर नियमाप्रमाणे अर्जदाराला दिले नाही व अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दती देवून न्युनतम सेवा दर्शविली आहे सबब मुद्दा क्रं. ०२ व ०३ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ०४ बाबत ः-
९. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
१. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. गैरअर्जदाराने अर्जदाराला रु. १,१३,१११/- आदेशाची प्रत
मिळाल्यापासून ४५ दिवचसाचे आत दयावे.
३. गैरअर्जदाराने अर्जदाराला रु. ५,०००/- तक्रारीचा खर्च
आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवचसाचे आत दयावे
४. उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
५. सदर निकालपञाची प्रत संकेत स्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - ०३/१२/२०१५