(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 01.11.2011) 1. अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कयदा 1986 चे कलम 12 व 14 अन्वये गैरअर्जदाराविरुध्द दाखल केले आहे. 2. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन दि.10.10.2011 ला प्राथमिक सुनावणी करीता ठेवण्यात आले. नि.क्र.1 वर पोलीस पोलीस पेपर, प्रथम सुचना रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा अस्पष्ट असल्याने अर्जदाराने वाचनीय दस्ताऐवज सादर करावे, असा आदेश दि.10.10.2011 ला पारीत करण्यांत आला. प्रकरण दि.1.11.2011 ला अर्जदाराला वाचनीय दस्ताऐवज दाखल करण्याकरीता असतांना, अर्जदार यांनी हजर होऊन नि.6 नुसार सदर दस्ताऐवजाचे प्रमाणीत प्रत मिळण्यास अजून 15 दिवस लागतील म्हणून अर्जदार हे सदरहू प्रकरण काढून पुन्हा नव्याने दाखल करु इच्छित आहे, करीता प्रकरण काढण्यात यावे, असा अर्ज दाखल केला. 3. अर्जदारास नि.6 मधील मजकुराबाबत विचारणा केली असता, बरोबर असल्याचे मान्य केले. आज रोजी, अर्जदार यांनी नि.क्र.6 नुसार तक्रार परत घेतल्याने, अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे निकाली काढण्यात येत आहे. (Complainant Disposed off by way of withdrawal) (2) अर्जदारास मुळ दस्ताऐवज असल्यास झेरॉक्स रेकॉर्डवर ठेऊन परत करण्यांत यावे, तसेच सदस्य संच परत करण्यांत यावे. (3) अर्जदारास आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 01/11/2011. |