Maharashtra

Kolhapur

CC/11/380

Smt. Sushila Ananda Lokare - Complainant(s)

Versus

Cholamandalam M S General Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Shital Potdar

06 Mar 2012

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/380
1. Smt. Sushila Ananda LokareAanur Tal. Kagal Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Cholamandalam M S General Insurance Co. Ltd. Local Br. Manager, Mouni Vihar Shop No. 13,14,15 E Ward Takala Chowk Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Shital Potdar, Advocate for Complainant
A.R.Kadam , Advocate for Opp.Party

Dated : 06 Mar 2012
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

                       

निकालपत्र :- (दि.06/03/2012) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार यांचे पती मयत आनंदा महादेव लोकरे यांची B.S.N.L.  मार्फत सामनेवाला यांचेकडे व्‍यक्तिगत अपघात विमा पॉलीसी उतरविलेली असून सदर पॉलीसीकरिताचा रजिस्‍टर्ड टेलिफोन नं.2325280531/ 280531 असा आहे. सदर पॉलीसी कालावधीतच दि.02/02/2009 रोजी तक्रारदाराचे पती आनंदा महादेव लोकरे यांचा विहिरीचे पाण्‍यात बुडून मृत्‍यू झालेला आहे. तदनंतर आवश्‍यक तया सर्व कागदपत्रांसहीत सामनेवालांकडे न्‍याययोग्‍य क्‍लेम दाखल केला असता सामनेवाला यांनी दि.16/07/2009 रोजीचे पत्राने ‘ क्‍लेम वेळेत जमा केला नाही ‘ म्‍हणून नाकारत असलयाचे कळवले आहे. वास्‍तविक तक्रारदार ही अडाणी व अशिक्षीत महिला असून पतीच्‍या आकस्मिक मृत्‍यूमुळे पूर्णपणे निराधार झालेल्‍या आहेत. तक्रारदार अडाणी असल्‍याने त्‍यांना पॉलीसीच्‍या अटी व शर्तींची कल्‍पना दिलेली नाही. सामनेवाला यांनी अत्‍यंत किरकोळ अशा तांत्रिक कारणाचा आधार घेऊन तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेने प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन विमा क्‍लेमची रक्‍कम रु.50,000/-दि.02/05/09 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी‍ विनंती तक्रारदार यांनी सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांचे दि.16/07/2009 चे क्‍लेम नाकारलेचे पत्र, टेलिफोन बील इत्‍यादी कागदपत्र दाखल केली आहेत.
 
(4)        सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार मान्‍य केले कथनाखेरीज अन्‍य तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदाराचे पतीचे नांवे 2325-231531 अन्‍वये बीएसएनएलचे कनेक्‍शन होते. तो त्‍यांचा ग्राहक होता. प्रस्‍तुत ग्राहकांसाठी विमा नमुद बीएसएनएल मार्फत सामनेवालांकडे उतरविलेला होता. सदर पॉलीसीकरितेचा रजिस्‍टर्ड क्र.2325280531/280531 असलेचे सामनेवाला यांनी मान्‍य केलेले आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे दि.01/7/2009 रोजी क्‍लेम दाखल केलेला आहे. तर अपघाताची तारीख दि.02/02/2009 अशी आहे. प्रस्‍तुतचा क्‍लेम हा 60 दिवसानंतर दाखल केलेला आहे. नमुद बीएसएनएल पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार 60 दिवसांचे आत अपघाताबाबतचा क्‍लेम दाखल करणे आवश्‍यक होते. प्रस्‍तुतचा क्‍लेम मुदतीनंतर आलेने सामनेवाला विमा कंपनीने क्‍लेम नाकारलेला आहे. सबब सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केलेले नाहीत.
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षाच्‍या वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                 --- होय.
2) काय आदेश ?                                      --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे पती बीएसएनएलचे टेलिफोन क्र.2325280531/280531 अन्‍वये टेलिफोनधारक ग्राहक आहेत. तक्रारदारचे पती आनंदा महादेव लोकरे यांचा दि.02/02/2009 रोजी विहीत बुडून मृत्‍यू झालेला आहे. तक्रारदाराने क्‍लेम मागणी केलेनंतर दि.16/07/2009 चे पत्राने सामनेवाला यांनी बीएसएनएल पॉलीसीच्‍या अटीनुसार 60 दिवसांचे आत क्‍लेम दाखल करणे आवश्‍यक होते. सबब सदरचा क्‍लेम मुदतीबाहय असलेने नाकारलेला आहे. दि.02/02/09 रोजी तक्रारदारचे पतीचा तथाकथीत अपघात झालेला आहे व दि.01/7/2009 रोजी सामनेवाला यांना माहिती झालेला आहे. सबब प्रस्‍तुत कारणास्‍तव क्‍लेम नाकारलेला आहे व सबब सदर वादाचा मुद्दा आहे. सामनेवाला यांचे वकीलांनी युक्‍तीवादाच्‍या वेळेस प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराचे पतीचे अपघाताचे अनुषंगीक कोणतेही कागदपत्रे दाखल केलेले नाहीत या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधलेले आहे. तक्रारदाराचे वकीलांनी दि.27/02/2012 रोजीचे अर्जाने सदर मे. मंचासमोर दाखल असलेले ग्राहक तक्रार क्र.96/2011 मध्‍ये दि.19/7/011 रोजी निकाल झालेला असून सदर निकालानुसार नमुद प्रकरणातील विमा कंपनीस विमा रक्‍कम देणेबाबत आदेश पारीत केलेला आहे. प्रस्‍तुत प्रकरणी दाखल असणारी कागदपत्रे या कामी समावेश करुन घेणेबाबत अर्ज दिलेला आहे. सबब प्रस्‍तुत ग्राहक तक्रार क्र;96/2011 मधील कागदपत्रे प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये वाचणेत यावीत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           प्रस्‍तुत कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे पतीचा विहीरीत बुडून अपघाती मृत्‍यू झालेची वस्‍तुस्थिती दाखल वर्दी, घटनास्‍थळीचा पंचनामा, जाबजबाब, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, मृत्‍यूच्‍या कारणाचे प्रमाणपत्र, मरणोत्‍तर पंचनामा यावरुन निर्विवाद आहे. सामनेवाला यांनी अपघाती मृत्‍यूबाबत वाद उपस्थित केलेला नाही. केवळ क्‍लेम विलंबाने म्‍हणजे 60 दिवसांनी दाखल केलेने नाकारलेला आहे. प्रस्‍तुत अपघात हा दि.02/02/2009 रोजी घडलेला आहे व सामनेवालांकडे दि.01/07/2009 रोजी क्‍लेम दाखल झालेला आहे. केवळ 5 महिन्‍याचा विलंब झालेला आहे. तक्रारदार हे अशिक्षीत अडाणी विधवा महिला आहे. तिचे पतिचे मृत्‍यूनंतर तिच्‍यावर झालेला मानसिक आघात तसेच मानसिक आधार व कर्ता पुरुष गेलेने तिच्‍यावर आलेली जबाबदारी इत्‍यादीचा विचार करता प्रस्‍तुत विलंब हा हेतूपूर्वक केलेचा दिसून येत नाही. सबब सदरचा विलंब माफ करण्‍यास पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. पॉलीसीचा मूळ हेतू विचारात न घेता केवळ तांत्रिक कारणास्‍तव सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यासाठी हे मंच पुढील पूर्वाधार विचारात घेत आहे.     
 
I(2009) CPJ 264 JHARKHAND STAET CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION RANCHI – GOLDEN TRUST FINANCIAL SERVICES & ANR. Vs. MALWA DEVI – First Appeal No.75 of 2008 with First Appeal No.79 of 2006-Decided on 27.11.2008
( i ) Consumer Protection Act, 1986-Section 2(1)(g) –Insurance-Accident Claim-Policy taken through Golden Trust Financial Services-Insured died in accident-Claim not settled- Forum held insurer and G.T.F.S. jointly and severally liable under policy-Hence appeal-Insurance contract entered between insurer and deceased-Certificate of insurance issued by insurer- G.T.F.S. not liable to make payment-Forum erred imposing joint and several liability on G.T.F.S.-Order modified in appeal-Insurer held liable to make payment under policy.
( ii ) Insurance –Terms and Conditions Violated-Intimation and submission of claim delayed-Claimant being illiterate not aware of insurance policy and terms and conditions of policy-Delay in giving intimation and submission of claim genuine-Claim cannot be denied due to violation of terms and conditions-Claim neither settled. Nor repudiated-Condition of policy not applicable-Deficiency in service, in not settling claim, proved-Insurer held liable under policy.
 
           तसेच मा. राज्‍य आयोग, मुंबई पहिले अपील क्र.1009/2007 व कि.अर्ज क्र.1350/2007(मूळ ग्राहक तक्रार क्र.125/2007) मध्‍ये दि.07/01/2008 रोजी पारीत केलेला काही भाग पुढील प्रमाणे- time limit for submission of the claim is prescribed. Provision with regard to time limit made in this behalf cannot be used to defeat the genuine claim. In this particular case, claim submitted by the Tahsildar was very much genuine. The insurance company should have acted promptly and should have credited the insurance amount in the bank account of the widow. The Government declares various benevolent schemes for Agriculturists and person coming from lower strata of society. For effective implementation of the claim, Govt. prescribed simple procedure. Taking into consideration, the illiteracy in the rural areas, the liability is imposed on the Village Revenue Officer and Tahsildar for purpose of collection of necessary documents and submission of the claim to the insurance company. The success of benevolent scheme depends as to how and in what manner such schemes are implemented. Unfortunately, because of lukewarm and obstructive attitude of insurance company, genuine and honest claim of widow is defeated for no fault of her. The insurance company cannot hike its profit by rejecting genuine and honest insurance claim. या आदेशाचा आधार हे मंच घेत आहे. तसेच पुढील पूर्वाधार हे मंच विचारात घेत आहे.
 
2010 (1) CPR 219 MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MUMBAI- Kamalabai Prakash Chavan Vs. The Authorised Signatory ICICI Lombard Insurance Co. Ltd. and Anr. F.A.NO.1052 of 2007 Decided on 5.10.2009- Consumer Protection Act, 1986-Sections 12 and 17-Group Personal Accident Insurance Policy Claim-Policy was obtained by State Government for farmers-Insured husband of complainant was a farmer and died in road accident-Claim was repudiated on ground of delayed intimation-District Forum accepted defence contention and dismissed complaint-Appeal-Claim was preferred after 106 days from death of deceased-Respondent ought not to have repudiated claim only because it was delayed by 106 days-Appellant held entitled to policy amount of Rs. 1,00,000/- with interest at 9% p.a. and cost Rs.2,000. 
 
 
           वरील पूर्वाधाराचा विचार करता तक्रारदार या अडाणी व अशिक्षीत महिला असून घरातील कर्त्‍या पुरुषाचा असा अपघाती मृत्‍यू झालेनंतर घरातील स्‍त्रीवर त्‍याचे कुटूंबावर ओढवलेल्‍या आघाताचा विचार करता प्रस्‍तुत क्‍लेम तक्रारदारास वेळेत मिळणे न्‍याययोग्‍य होते. त्‍यामुळे पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु.50,000/-व्‍याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. त्‍यासाठी तक्रारदारास सदर मंचाचा दरवाजा ठोठवावा लागलेमुळे तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.  
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु.50,000/-(रु.पन्‍नास हजार फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.16/07/2009 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्‍त) अदा करावेत 
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT