Maharashtra

Nanded

CC/15/312

Harpreet Kaur Saravansingh Ghuman - Complainant(s)

Versus

Cholamandalam Investment and Finance Co.Ltd & 1 - Opp.Party(s)

Adv. Jaspalsingh Sukhmani

07 Aug 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/15/312
 
1. Harpreet Kaur Saravansingh Ghuman
Sadnika 204 Kanakyya Apartment Nanded
NANDED
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Cholamandalam Investment and Finance Co.Ltd & 1
Abhudog Bank Annabhau Sathe Chowk Nanded
NANDED
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'BLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

                                 निकालपत्र

(दि.07.08.2015)

(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्‍यक्ष)

 

1.           अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली  असून गैरअर्जदार यांचेकडून अर्जदाराचा ट्रक क्रमांक एमएच 26/एच 6957ची विमा रक्‍कम रु.9,50,000/- दिलेली नाही व अर्जदाराचा ट्रक जप्‍त केलेला असल्‍याने गैरअर्जदार यांनी रक्‍कम रु.10,00,000/-  तसेच दावा खर्चपोटी रक्‍कम रु.5,000/- व मानसिक,आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु. 10,000/- इत्‍यादी रक्‍कम गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावे यासाठी सदरील तक्रार गैरअर्जदार यांचेविरुध्‍द दाखल केलेली आहे.

            अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.          अर्जदाराचे ट्रकचा अपघात दिनांक 09.05.2008 रोजी

पुणे येथे झालेला आहे.  अपघात झाल्‍यासंबधीच्‍या सुचना अर्जदाराने गैरअर्जदार यांना दिनांक 22.07.2008 रोजी दिलेल्‍या आहेत.  त्‍यानंतरही अर्जदारास विमा रक्‍कम दिलेली नाही.  म्‍हणून अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. दरम्‍यानच्‍या कालावधीत गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक जप्‍तही केलेला आहे.  अर्जदाराला तक्रार दाखल करणेसाठी अर्जदारास कारण हे अपघात दिनांक 09.05.2008 असे असतांनाही अर्जदाराने तक्रार मुदत दाखल केलेली नाही.  म्‍हणून तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्ज  दिलेला आहे. विलंब माफीचा अर्जावरील अर्जदाराचे म्‍हणणे ऐकले, अर्जदाराने तक्रार दाखल करणेकरीता अर्जदारास झालेल्‍या विलंबाची कारण खालीलप्रमाणे दिलेले आहेः-

            अर्जदाराचे मुळ गांव पंजाब  येथे आहे.  अर्जदाराची शेती पंजाब  येथे आहे.  अर्जदारास शेतीच्‍या कामानिमित्‍त पंजाब  येथे राहणे भाग पडले म्‍हणून अर्जदाराने सदरील प्रकरण मुदतीत दाखल केलेले नाही.  त्‍यामुळे अर्जदारास तक्रार दाखल करणेस झालेला विलंब माफ करावा अशी विनंती तक्रारीसोबत केलेली आहे.  विलंब माफीचा अर्जासोबत अर्जदाराचे पंजाबमधील नेमके गांव कोणते, पंजाबमध्‍ये अर्जदाराच्‍या असलेल्‍या शेतीची कागदपत्रे विलंब माफीचा अर्जासोबत जोडलेली नाहीत. अत्‍यंत मोघम असे कारण विलंब माफीचा अर्जामध्‍ये अर्जदाराने दिलेले आहे.  त्‍याच्‍या पृष्‍टयर्थ कुठलाही कागदोपत्री पुरावा दिलेला नसल्‍याने अर्जदाराचा विलंब माफीचा अर्ज नामंजूर करण्‍यात येतो.  पर्यायाने अर्जदार यांची तक्रार फेटाळण्‍यात येते. 

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.