Maharashtra

Nagpur

CC/502/2020

CHIRANJIVI MODALLA - Complainant(s)

Versus

CHOLAMANDALAM GENERAL M.S. GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV. A.T. SAWAL

19 Oct 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/502/2020
( Date of Filing : 27 Nov 2020 )
 
1. CHIRANJIVI MODALLA
R/O. KUSUMBI, UMRED ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. CHOLAMANDALAM GENERAL M.S. GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH BRANCH MANAGER
R/O. PLOT NO.71, 1ST FLOOR, PRAYAG INCLUVE, SHANKAR NAGAR, NEAR BANK OF MAHARASHTRA, NAGPUR-10
NAGPUR
MAHARASHTRA
2. CHOLAMANDALAM GENERAL M.S. GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH CHIEF MANAGER
R/O. DARE HOUSE, 2ND FLOOR NO.2, NETAJI SUBHASHCHANDRA, BOSE ROAD, CHENNAI-600001
CHENNAI
TAMILNADU
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. A.T. SAWAL, Advocate for the Complainant 1
 ADV. SACHIN JAISWAL, Advocate for the Opp. Party 1
Dated : 19 Oct 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35(1) अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून वाहन क्रं. MH 34 AM7569 टाटा मोटर्स चेस्‍ट या चारचाकी वाहनाचा दि. 13.05.2020 ते 12.05.2021 या कालावधीकरिता विमा पॉलिसी क्रं. 2C3362000000906 ही विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 4,06,973/- करिता विमाकृत केले होती.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, दि. 15.05.2020 रोजी उमरगांव फाटा उमरेड रोड, नागपूर येथे वाहनाचे ब्रेक न लागल्‍यामुळे अपघात झाला. याबाबतची माहिती तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष कंपनीकडे  वाहनाचा अपघात झाल्‍याबरोबर कळविले व ऑनलाईन द्वारे  क्‍लेमकरिता व सव्‍हेअरकरिता अर्ज केला होता. परंतु विरुध्‍द पक्षाच्‍या कस्‍टमर केअर क्रमांका वर संपर्क केला असता तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची पॉलिसी काढली असल्‍याचे दिसत नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा सदरचा क्‍लेम रजिस्‍टर्ड करु शकत नाही असे सांगितले. त्‍यानंतर दि. 20.05.2020 ला व दि. 24.05.2020 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या गाडीची विमा पॉलिसी मिळाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा दि. 29.05.2020 ला नोंदविला व त्‍याला क्‍लेम क्रं. 3362464894 हा देण्‍यात आला व विरुध्‍द पक्ष कंपनीकडून आशिष वंजारी याची सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली व सर्व्‍हेअर अपघातग्रस्‍त ठिकाणी वाहनाची तपासणी करण्‍याकरिता भेट दिली असता वाहन दुरुस्‍तीकरिता गॅरेज मध्‍ये ठेवले होते. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचे 30 टक्‍के दुरुस्‍तीचे काम झाले होते. तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍द पक्षाच्‍या सर्वेअरला वाहन अपघाताचे फोटो व त्‍यासोबत वाहनाचे सर्व आवश्‍यक दस्‍तावेज, इस्‍टीमेट व अन्‍य दस्‍तावेज दिले होते. सर्वेअरने अपघातग्रस्‍त वाहनाची तपासणी केल्‍यानंतर वाहनाच्‍या इस्‍टीमेटप्रमाणे वाहनाचा क्‍लेम हा रुपये 1,49,000/- इतक्‍या रक्‍कमेचा होता व सर्वेअर ने सदरचा क्‍लेम 15 दिवसात देण्‍यात येईल असे सांगितले होते, परंतु विरुध्‍द पक्षाने  15 दिवसानंतर तक्रारकर्त्‍याला विमा दावाबाबत काहीही न कळविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने व त्‍याच्‍या मुलाने वारंवांर ई-मेल द्वारे पत्र पाठवून विमा दावा निकाली काढण्‍याची विनंती केली. त्‍यानंतर ही तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर याबाबत काहीही कळविलेले नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  दि. 27.07.2020 ला विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली होती. विरुध्‍द पक्षाला सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला इस्‍टीमेटप्रमाणे विमा दावा  रक्‍कम रुपये 1,49,000/- , दि. 13.05.2020 पासून द.सा.द.शे. 24  टक्‍के दराने व्‍याजासह प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत देण्‍याचा आदेश द्यावा.  तसेच विरुध्‍द पक्षाने मानसिक, शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई  व  तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा.
  3.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून तक्रारीतील परिच्‍छेद निहाय कथन अमान्‍य केलेले असून तक्रारकर्त्‍याने  वाहन क्रं. MH 34 AM7569 टाटा मोटर्स चेस्‍ट या चारचाकी वाहनाकरिता विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 4,06,973/- एवढया रक्‍कमेची विमा पॉलिसी क्रं. 2C3362000000906 ही  दि. 13.05.2020 ते 12.05.2021 या कालावधीकरिता काढली होती ही बाब मान्‍य केलेली आहे. परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचे ब्रेक न लागल्‍यामुळे दि. 15.05.2020 ला उमरगांव फाटा उमरेड रोड, नागपूर येथे अपघात झाल्‍याबाबतची माहिती नसल्‍याचे नमूद केले आहे.
  4.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, त्‍याला तक्रारकर्त्‍याचा विमा दावा प्रस्‍ताव प्राप्‍त  झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाच्‍या सर्वेअरने अपघात ग्रस्‍त वाहनाची पाहणी केली असता वाहनाचे 30 टक्‍के दुरुस्‍तीचे काम झाले होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला अपघातग्रस्‍त वाहनाचे फोटो व आवश्‍यक दस्‍तावेज न पुरविल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाच्‍या सर्वेअरला वाहनाच्‍या अपघाताचे कारण शोधून नुकसान काढण्‍याची संधी मिळाली नाही. विरुध्‍द पक्षाला अपघात ग्रस्‍त वाहनाचे अपघातानंतरचे फोटो पुरविण्‍यात आलेले नाही. सर्वेअरने वाहनाचे रुपये 1,49,000/- एवढया नुकसानीचे मुल्‍यांकित केले असल्‍याचे कथन नाकारलेले आहे. तसेच वि.प.ने त.क.चा विमा दावा 15 दिवसात देण्‍याची बाब सुध्‍दा नाकारलेली आहे. त्‍याचप्रमाणे वाहन दुरुस्‍तीनंतरचे अंतिम बिल तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले नाही. तसेच अपघातग्रस्‍त वाहनाची तपासणी करण्‍याची संधी न दिल्‍याच्‍या कारणावरुन विमा दावा नाकारण्‍यात येत असल्‍याबाबतचे पत्र   दि. 24.06.2020 ला तक्रारकर्त्‍याला पाठविले होते.  तसेच वाहन दुरुस्‍तीनंतरचे अंतिम बिल तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  5.      उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवजाचे अवलोकन केल्‍यावर आयोगाने प्रकरण निकाली कामी काढण्‍याकरिता खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

1    तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?                  होय

2    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?          होय

3.    काय आदेश ?                                   अंतिम आदेशानुसार

 

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून वाहन क्रं. MH 34 AM7569 टाटा मोटर्स चेस्‍ट या चारचाकी वाहनाकरिता विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 4,06,973/- एवढया रक्‍कमेची विमा पॉलिसी क्रं. 2C3362000000906 ही  दि. 13.05.2020 ते 12.05.2021 या कालावधीकरिता काढली होती याबाबत वाद नाही. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍याचा विमा दावा प्रस्‍ताव दि. 29.05.2020 ला प्राप्‍त झाल्‍यानंतर  विरुध्‍द पक्षाच्‍या सर्वेअरने अपघातग्रस्‍त वाहनाला भेट दिली. परंतु तक्रारकर्त्‍याने सर्वेअरला  अपघातग्रस्‍त वाहनाचे फोटो व दस्‍तावेज न पुरविल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाच्‍या सर्वेअरला अपघातग्रस्‍त वाहनाची तपासणी करणे व त्‍याची नुकसानाची विमा मुल्‍य काढण्‍याची संधी दिली नाही या कारणावरुन तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारला असल्‍याबाबतचे लेखी जबाबात नमूद केले आहे.  परंतु विरुध्‍द पक्षाने आपले कथनाच्‍या समर्थनार्थ  तक्रारकर्त्‍याला वाहनाचे दस्‍तावेज सादर करण्‍याबाबतचे पत्र दिले असल्‍याचे दस्‍तावेज तसेच विमा दावा नाकारला असल्‍याबाबतचे दि. 24.06.2020 चे पत्र अभिलेखावर दाखल केलेले नाही. तसेच सर्वेअरने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची तपासणी केली आय.आर.डी.ए. यांचे दि. 22.06.2017 चे नोटीफिकेशन नुसार 15 (2) 15(3) 15(4)  मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद आहे की, ........
    1.  

15(3) The surveyor shall start the survey immediately unless there is a contingency that delays immediate survey, in any case within 48 hours of his appointment. Interim report of the physical details of the loss shall be recorded and uploaded/forwarded to the insurer within the shortest time but not later than 15 days from the date of first visit of the surveyor. A copy of the interim report shall be furnished by the insurer to the insured/claimant, if he so desires.

15(4) Where the insured is unable to furnish all the particulars required by the surveyor or where the surveyor does not receive the full cooperation of the insured, the insurer or the surveyor, as the case may be, shall inform in writing to the insured under information to the insurer about the consequent delay that may result int he assessment of the claim. It shall be the duty equally of the insurer and the surveyor to follow up with the insured for pending information/documents guiding the insured with regard to submissions to be made. The insurer and /or surveyor shall not call for any information document that is not relevant for the claim.

  1. सदर प्रकरणी आय.आर.डी.ए. नोटीफिकेशनुसार सर्वेअरला तक्रारकर्त्‍याकडून वाहनाचे फोटो व दस्‍तावेज प्राप्‍त न झाल्‍यास सर्वेअरने तक्रारकर्त्‍याला संबंधित दस्‍तावेज मागणीचे पत्र देणे आवश्‍यक होते. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला अपघातग्रस्‍त वाहनाचे दस्‍तावेज पुरविण्‍याकरिता पत्र दिले असल्‍याबाबतचा कुठलाही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा योग्‍य व वाजवी असलेला विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली असल्‍याचे स्‍पष्‍ट पणे दिसून येते. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या अपघाग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्‍तीकरिता लागलेल्‍या खर्चाचे बिल अभिलेखावर दाखल न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला इस्‍टीमेट बिलाच्‍या रक्‍कमे पैकी 60 टक्‍के रक्‍कम ( non standards norms ) अदा करावी असे आयोगाचे मत आहे.

             सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याला वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या विमा दावा  रक्‍कम रुपये 89,400/- आणि त्‍यावर दि. 29.05.2020 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 08 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याला वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आत करावी.

 

  1.    उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.

 

  1.    तक्रारकर्त्याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.