Complaint Case No. CC/21/89 | ( Date of Filing : 02 Jul 2021 ) |
| | 1. Smt.Pornima Raju Shende | Somnath road ward no 2,Mul,Tah.Mul,Dist.Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Chola Mandalam Home Finance Through Branch Manager | Udan Pulachya khali,warora naka,Chandraur,Tah.Dist.Chandrapur | Chandrapur | Maharashtra | 2. The Chola Mandalam General Insurance Company Ltd Through Branch Manager | Graund floor,flat no 22,Tilak nagar,Nagpur,Tah.Dist.Nagpur | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | :::नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक ०३/०५/२०२३) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ती ही मौजा मुल, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून विरुध्द पक्ष क्रमांक १ ही फायनान्स कंपनी आणि विरुध्द पक्ष क्रमांक २ ही फायनान्स कंपनीची जनरल इंन्शुरन्स कंपनी आहे. तक्रारकर्तीचे पती श्री राजेश शेंडे यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ कडून अर्थसहाय्य घेऊन टाटा कंपनीचे सहा चाकी ट्रक HEX2 क्रमांक एम.एच.४०/एन५७५१ खरेदी केले होते. त्यावर विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी सदर वाहनाचा तसेच तक्रारकर्तीचे मयत पती राजु शेंडे यांचा सुध्दा वैयक्तिक विमा काढला होता तसेच एच.डी.एफ.सी. जिवन विमा पॉलिसी सुध्दा काढली होती. पॉलिसी काढतेवेळी विरुध्द पक्ष क्रमांक १ आणि २ यांनी तक्रारकर्तीच्या पतीला वाहनाव्दारे किंवा अपघाती मृत्यु झाल्यास नुकसान भरपाई दाखल रुपये ४,५०,०००/- तसेच रुपये १,६७,३८४/- असे दोन्ही पॉलिसी मिळून रक्कम मिळेल असे सांगितले होते. तक्रारकर्तीच्या पतीने तसेच पतीच्या मृत्युपश्चात तक्रारकर्तीने सुध्दा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे किस्तीचा भरणा केला होता. तक्रारकर्तीचे मयत पती राजु शेंडे हे दिनांक १०/०९/२०२० रोजी मोटरसायकल क्रमांक एम.एच. ३४/ऐ.क्यु. ४६०७ ने मुल सिंदेवाही मार्गाने जात असतांना त्यांचा मौजा सरडपार तहसील सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर येथील ढाब्यासमोर मोटरसायकल अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याचा मृत्यु झाला. अपघाताची नोंद सिंदेवाही पोलीस स्टेशन यांनी घेतली आणि अपघात गुन्ह्याची नोंद केली. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना मयत पती राजु यांचा वाहन अपघाताने मृत्यु झाल्याने विमा रक्कम मिळण्याकरिता विमा दावा सादर केला. परंतु विरुध्द पक्ष यांनी दिनांक ८/४/२०२१ चे पञान्वये तक्रारकर्तीचे पती वाहन चालवित असतांना त्यांचेकडे अधिकृत वाहन परवाना नव्हता या कारणास्तव तक्रारकर्तीचा रक्कम रुपये ४,४५,०००/- चा विमा दावा नाकारला. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी एच.डी.एफ.सी. विमा पॉलिसी रक्कम रुपये १,६७,३८४/-, दिनांक ११/१२/२०२० रोजी मिळवून दिला, तो तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्या कडून घेतलेल्या कर्ज खात्यात जमा केला. विरुध्द पक्ष यांनी तक्राकरर्तीच्या पतीची वैयक्तिक विमा पॉलिसी नुसार तिला एकूण लॉस नुसार नुकसान भरपाई रक्कम रुपये ४,४५,०००/- देण्याचे कबूल केल्यावरही न देऊन तक्रारकर्तीप्रति न्युनतापूर्ण सेवा दिल्याने तिने आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस वाहन अपघात विमा पॉलिसी अंतर्गत देय विमा रक्कम रुपये ४,४५,०००/- द्यावे. तसेच त्यावर दिनांक ९/४/२०२१ पासुन रक्कम पूर्ण मिळेपर्यंत १२ टक्के व्याज आणि शारीरिक व मानसिक ञासापोटी विरुध्द पक्ष यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्या ५०,०००/- आणि तक्रार खर्च रुपये १०,०००/- द्यावे अशी प्रार्थना केली.
- तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन आयोगामार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी हजर होऊन आपले लेखी उत्तर दाखल करुन त्यामध्ये विरुध्द पक्ष क्रमांक १ ही फायनान्स कंपनी असल्याचे आणि त्यांचेकडून मयत राजु शेंडे यांनी ट्रक विकत घेण्याकरिता कर्ज घेतल्याचे तसेच त्यांचे दिनांक १०/०९/२०२० रोजी अपघाती मृत्यु झाल्याची बाब मान्य केली असून आपल्या विशेष कथनामध्ये नमूद केले की, तक्रारकर्तीच्या मयत पतीने विरुध्द पक्ष क्रमांक १ कडून ट्रक क्रमांक एम.एच. ४० एन. ५७५१ खरेदी करण्याकरिता ४,००,०००/- चे कर्ज घेतले होते आणि कर्ज घेतेवेळी मयत राजुने विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्याकडून वैयक्तिक विमा पॉलिसी घेतली होती. मयत राजु हा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता नियमीतपणे भरणा करीत नव्हता आणि त्याचे मृत्यु वेळी त्याचे कडून रुपये २,७५,९४९/- थकबाकी घेणे होती, याबाबत विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी त्याला नोटीसव्दारे मागणी सुध्दा केली होती. तक्रारकर्तीला नोटीस प्राप्त झाल्यानंतर तिने प्रथमच तिच्या पतीचे मृत्यु झाल्याचे सांगितले आणि त्यानंतर तिने कर्जा संदर्भात दिनांक २४/०५/२०२१ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे रुपये ३३,५००/- चा भरणा केला. तक्रारकर्तीने पतीच्या मृत्युनंतर विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडे विमा दावा दाखल केला. परंतु त्यांनी मयत राजु यांचेकडे वाहन चालवितांना परवाना नव्हता या कारणास्तव विमा दावा नाकारला. विरुध्द पक्ष क्रमांक १ ही विमा कंपनी नाही. विरुध्द पक्ष क्रमांक २ ही विमा कंपनी आहे त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्राकरर्तीच्या पतीचा वैयक्तिक विमा दावा नाकारला नाही. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेविरुध्द तक्रार दाखल करण्याकरिता तक्रारकर्तीला कोणतेही कारण नाही. तक्रारकर्तीला विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून कोणतीही विमा दावा रक्कम मागण्याचा अधिकार नाही तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ हे कोणतीही नुकसान भरपाई देण्यास जबाबादारही नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार खर्चासहीत खारीज करण्यात यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले की, मयत राजु यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून सहा चाकी वाहनाचा तक्रारकर्तीचे पती यांचा वैयक्तिक अपघात विमा काढला होता. तसेच एच.डी.एफ.सी. जिवन विमा पॉलिसी सुध्दा काढली होती. तक्रारकर्तीच्या मयत पतीचा मोटरसायकल क्रमांक एम.एच. ३४/ऐ.क्यु. ४६०७ ने मुल सिंदेवाही मार्गाने जात असतांना चंद्रपूर येथील ढाब्याजवळ अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा दिनांक १०/०९/२०२० रोजी मृत्यु झाला. अपघाताचे वेळी मयत वाहन चालवित होता, या बाबी मान्य केल्या असून आपल्या विशेष कथनामध्ये नमूद केले की, अपघाताच्यावेळी मृतक उपरोक्त वाहन चालवित होता व त्याचा तोल जाऊन मृत्यु झाला. अपघाताच्यावेळी मृतकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. मृतक हा वाहन चालविण्याचा परवाना नसतांना सुध्दा बेकायदेशीररित्या वाहन चालवित होता आणि स्वतःच्या मृत्युस कारणीभुत ठरला. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी तक्राकरर्तीस वाहन चालविण्याचा परवान्याची मागणी केली होती परंतु ते सादर न केल्याने विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. सबब तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद, लेखी युक्तिवाद हाच तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसीस, विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे लेखी उत्तर, लेखी युक्तिवाद विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे लेखी उत्तर,लेखी उत्तरातील मजकुरालाच शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसीस तसेच तक्रारकर्ती व विरुध्द पक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. प्रस्तुत तक्रार चालविण्याचे आयोगास अधिकारक्षेञ आहे कायॽ नाही २. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक 1 बाबतः- - तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्द पक्षांचे लेखी कथन तसेच तक्रारीत दाखल दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, विरुध्द पक्ष क्रमांक १ ही फायनान्स कंपनी आहे व विरुध्द पक्ष क्रमांक २ ही विमा कंपनी आहे. तक्रारकर्तीचे मयत पती राजु शेंडे यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून अर्थसहाय्य घेवून टाटा कंपनीचा सहा चाकी ट्रक HEX2 क्रमांक एम.एच. ४०/एन ५७५१ खरेदी केला होता व तो विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडून विमाकृत केला होता. मयत राजु शेंडे यांनी वाहन व वैयक्तिक विमा पॉलिसी क्रमांक २८८४/०००१४६१२/००८७०२/०००/०० काढली होती. मयत राजुने विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडून वाहन व वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेतली होती याबाबत वाद नाही. तक्रारकर्तीचे पती मयत राजु शेंडे हे दिनांक १०/०९/२०२० रोजी स्वतःचे मोटर सायकल क्रमांक एम.एच.३४/ए.क्यु.४६०७ ने मुल, सिंदेवाही मार्गाने जात असतांना मौजा सरडपार, तहसील सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथील धाब्यासमोर मोटर सायकल अपघात होऊन त्यांचा अपघाती मृत्यु झाला. तक्रारकर्तीने पतीचे मृत्युनंतर विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे उपरोक्त वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी अंतर्गत विमा दावा रक्कम मिळण्याकरिता विमा दावा अर्ज केला परंतु सदर विमा दावा विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी दिनांक ०८/०२/२०२१ रोजी मृतक राजु यांचेकडेवाहन चालविण्याचा परवाना नव्हता, या कारणास्तव उपरोक्त पॉलिसीची विमा रक्कम रुपये ४,५०,०००/- नाकारल्याचे तक्रारकर्तीस पञान्वये कळविले. तक्रारकर्ती ही मयत राजु यांची वारस असल्याने व त्यांच्या अपघाती मृत्युनंतर तक्रारकर्तीने लाभार्थी म्हणून उपरोक्त पॉलिसी अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल केली परंतु मयत राजु हा सदर वाहनाचा मालक होता व विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी सदर विमा पॉलिसी अंतर्गत वैयक्तिक अपघाताचे प्रिमीयम घेतले असून सदर विमा पॉलिसी ही वैयक्तिक अपघात विमा दाव्यासंदर्भात आहे. तक्रारकर्तीने मयत पती श्री राजु यांच्या अपघाती मृत्युनंतर सदर पॉलिसी अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता मागणी केली आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा मोटर वाहन अपघातामध्ये झाला व वाहन अपघातामधील विमा नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार हा कायद्याने मोटार अपघात विमा दावा प्राधिकरण यांना दिलेला आहे. सदर विवादाच्या निवारणाकरिता वेगळे प्राधिकरण न्यायासन आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार ही आयोगाच्या अधिकारक्षेञात येत नाही या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्तीस योग्य त्या प्राधिकरण वा न्यायासनासमोर तक्रार दाखल करण्याची मुभा देऊन प्रस्तुत तक्रार अधिकारक्षेञा अभावी खारीजकरण्यात येते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ च्या विवेचनावरुन आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार क्र. ८९/२०२१ अधिकारक्षेञ अभावी खारीज करण्यात येते, असे असले तरी प्रस्तुत विवाद योग्य अधिकारक्षेञ असलेल्या न्यायासनासमोर दाखल करण्याची मुभा राहील.
- उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |