Maharashtra

Raigad

CC/08/68

Mohan Vasant Dombale - Complainant(s)

Versus

Choa Mandalam M.S.Genral Insurance - Opp.Party(s)

Adv.Jitendra D.Mhatre

17 Nov 2008

ORDER


District Forum Raigad, Alibag
District Consumer Disputes Redressal Forum, Block No 6 and 8,Patil Sadan,New by pass road,Chendhare, Alibag
consumer case(CC) No. CC/08/68

Mohan Vasant Dombale
...........Appellant(s)

Vs.

Choa Mandalam M.S.Genral Insurance
...........Respondent(s)


BEFORE:
1. Hon'ble Shri R.D.Mhetras 2. Post vacant 3. Shri B.M.Kanitkar

Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

      रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.

                                                  तक्रार क्रमांक 68/2008.

                                                  तक्रार दाखल दि. 1/9/08

                                                  निकालपत्र दि. 17/11/08

 

 

श्री. मोहन वसंत डोबाळे,

रा. शिवाजी नगर झोपडपट्टी,

आं‍बेडकर मार्ग, ता. पनवेल,

जि. रायगड.                                          ...... तक्रारदार

विरुध्‍द

चोला मंडलम एम,एस,

जनरल इन्‍शुरन्‍स तर्फे,

कार्या- 204-205, दुसरा माळा,

संजय अप्‍पा चेंबर, प्‍लॉट नं. 82,

न्‍यू चकाला लिंक रोड, अंधेरी (ईस्‍ट)

मुंबई 400093.                                      ...... विरुध्‍दपक्ष

 

 

                उपस्थिती मा. श्री.आर.डी.म्‍हेत्रस, अध्‍यक्ष

                          मा. श्री. बी.एम.कानिटकर, सदस्‍य

 

                तक्रारदारांतर्फे अँड. जितेंद्र म्‍हात्रे व अँड.एम.बी.पाटील

                विरुध्‍दपक्षातर्फे गैरहजर.

 

-: नि का ल प त्र :-

 

द्वारा, मा. अध्‍यक्ष, श्री.आर.डी.म्‍हेत्रस.

 

         तक्रारदारांनी ही तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदींतर्गत दाखल केली असून त्‍यांचे कथन खालीलप्रमाणे आहे.

 2.      तक्रारदार हे पनवेल येथील रहिवासी असून ते व्‍यवसायाने ठेकेदार आहेत.  आपल्‍या व्‍यवसायासाठी त्‍यांनी दि. 19/9/07 रोजी रियलव्‍हॅल्‍यू ऑटो शॉप, पनवेल यांचेकडून रु. 3,96,000/- या रकमेस टाटा इंडिका कार विकत घेतली.  सदर कार खरेदी करण्‍यासाठी तक्रारदारांनी मे. महिंद्रा फायनान्‍स कंपनी, पनवेल यांचेकडून रक्‍कम रु. 2,90,000/- चे कर्ज घेतले होते.  या कर्जाचा हप्‍ता रक्‍कम रु. 7,090/- असून असे एकूण 59 हप्‍ते भरावयाचे होते.  तक्रारदारांच्‍या गाडीचा नंबर एम.एच.06/ए एन 1421 असा होता व सदर गाडीचा विरुध्‍दपक्षाकडे विमा उतरविलेला होता व विम्‍याची मुदत दि. 19/9/07 पासून ते दि. 18/9/08 च्‍या मध्‍यरात्रीपर्यंत अशी होती तसेच विमा पॉलिसी क्रमांक एम.पी.सी. 00071977-000-00 असा आहे.

 

3.       दि. 28/10/07 रोजी तक्रारदार हे त्‍यांच्‍या मित्राची आई व बहीण यांना सातारा येथून घेऊन मुंबईकडे येत होते.  दि. 29/10/07 रोजी पुणे मुंबई द्रुतगती मार्गाने येत असता तक्रारदारांच्‍या कारच्‍या पुढे एक ट्रक चालला होता.  हा ट्रक चढावावर अचानक पाठीमागे येऊ लागल्‍यामुळे त्‍यांनी आपली गाडी बाजूला घेतली त्‍या प्रयत्नात तक्रारदारांच्‍या गाडीला ट्रकची धडक बसून अपघात झाला व त्‍यांच्‍या कारचे नुकसान झाले.  सदर अपघाताची खबर ट्रक ड्रायव्‍हरने लोणावळा शहर पोलिस स्‍टेशन येथे दिली.  ही खबर मो.अ. रजि नं 163/07 अन्‍वये लोणावळा पोलिस स्‍टेशन मध्‍ये दाखल आहे.  यानंतर संबंधित पोलिसांनी घटनास्‍थळाचा पंचनामा केला आहे.  सदर अपघाताबाबत अर्जदार यांच्‍या विरुध्‍द मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्‍हा दाखल असून ती केस चालू आहे. 

 

4.       तक्रारदारांच्‍या गाडीचे या अपघातामुळे अतिशय नुकसान झाले त्‍यामुळे त्‍यांनी विरुध्‍दपक्षाला याबाबत कळविले.  त्‍याप्रमाणे विमा कंपनीचे अधिकृत सर्व्‍हेअर श्री. मोहित भटनागर यांनी अपघातग्रस्‍त भागाची पाहणी करुन सदरची कार अधिकृत गॅरेज किंवा शोरुम मध्‍ये नेण्‍यास तक्रारदारांना सांगितले.  तक्रारदारांनी आपल्‍या गाडीला टोव्हिंग करुन गाडी गॅरेजमध्‍ये नेली व तेथे गेल्‍यानंतर त्‍यांनी आपल्‍या कारच्‍या दुरुस्‍ती करीता मे.विजय ऑटो गॅरेज पनवेल येथे नेली तेथे त्‍यांना रक्‍कम रु. 1,92,000/- एवढा खर्च येणार असल्‍याचे सांगितले व त्‍याप्रमाणे त्‍यांचेकडून विमा कंपनीला कोटेशन देण्‍यात आले तसेच टोविंग करीता आलेला खर्च रु. 13,500/- गॅरेजचा खर्च रु. 1,92,000/- असे एकूण रु. 2,05,500/- ची मागणी केली.  तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाकडून त्‍यांचा खर्च मंजूर होईल म्‍हणून वाट पाहिली.  मे विजय ऑटो गॅरेजचे कोटेशन देऊनही विरुध्‍दपक्षाने त्‍यांचा दावा मंजूर केला नाही तसेच तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाच्‍या कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली असता त्‍यांना नीट उत्‍तर मिळत नव्‍हते म्‍हणून त्‍यांनी दि. 22/1/08 रोजी विमा कंपनीला स्‍वतः पत्र पाठवून  क्‍लेम न देण्‍याबाबत विचारणा केली परंतु विरुध्‍दपक्षाने त्‍यांना सविस्‍तर लेखी उत्‍तर दिले नाही.  त्‍यानंतर दि. 18/5/08 रोजीच्‍या पत्राने विरुध्‍दपक्षाने सदर इंडिका कार Hire & Reward चे कारण व Limitation to use चे कारण सांगून विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला म्‍हणून तक्रारदारांचा क्‍लेम नाकारण्‍यात आल्‍याचे कळवले.  परंतु सदरचा क्‍लेम का नाकारण्‍यात आला याचे कोणतेही सविस्‍तर कारण विरुध्‍दपक्षाने वरील पत्रामध्‍ये नमूद न केल्‍यामुळे तक्रारदारांनी समक्ष विरुध्‍दपक्षाच्‍या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्‍यांना कळले की, तुम्‍ही गाडी भाडयाने वापरता असे कळविले म्‍हणून तुमचा क्‍लेम नाकारण्‍यात आला असे सांगितले. 

 

5.       सबब, तक्रारदारांची विनंती की, त्‍यांनी त्‍यांची गाडी भाडयाने कधीही वापरली नव्‍हती.  तसेच विरुध्‍दपक्षाकडे विमा पॉलिसी उतरवूनही त्‍यांनी त्‍यांचा क्‍लेम नामंजूर केला.  त्‍यांच्‍या गाडीचे जे नुकसान झाले त्‍याचा खर्च तक्रारदारांनी केलेला आहे त्‍यासाठी त्‍यांनी इतरांकडून कर्ज घेतले आहे ती रक्‍कम त्‍यांना फेडावी लागत आहे  तसेच सदर गाडी खरेदी करण्‍यासाठी त्‍यांनी मे. महिंद्रा फायनान्‍स कंपनी यांचेकडून कर्ज घेतले आहे त्‍यामुळे कंपनीला कर्जाचे हप्‍ते भरावे लागत आहेत.  त्‍यामुळे गाडी दुरुस्‍ती करीता झालेला खर्च रु. 1,92,000/- टोव्‍हींगचा खर्च रु. 13,500/- आर्थिक नुकसान रु. 25,000/- मानसिक त्रासापोटी रु. 20,000/- असे एकूण रु. 2,50,500/- ही रक्‍कम दर साल दर शेकडा 16 टक्‍के दराने व्‍याजासह मिळावी.

 

6.       नि. 1 वर तक्रारदारांचा तक्रार अर्ज आहे.  नि. 2 अन्‍वये अँड. जितेंद्र म्‍हात्रे यांनी तक्रारदारांतर्फे आपले वकीलपत्र दाखल केले आहे.  नि. 3 वर तक्रारदारांचा पत्‍ता पुरसीस दाखल आहे.  नि. 4 अन्‍वये तक्रारदारांनी कागदपत्रांची यादी दाखल केली आहे.  त्‍यात मुख्‍यतः अपघाताची खबर (सत्‍यप्रत), अपघात स्‍थळाचा पंचनामा (सत्‍यप्रत) एन.सी.ची.प्रत, टॅंकरच्‍या चालकाचे ड्रायविंग लायसन्‍स झेरॉक्‍स, ऑकरंस रिपोर्ट, गाडीस येणा-या खर्चाचे कोटेशन पावत्‍या, सामनेवाले यांस दिलेले पत्र व त्‍याची पोचपावती, सामनेवाले कंपनीने अर्जदारास क्‍लेम नाकारल्‍याचे पत्र, इंडिका कारची इन्‍शुरन्‍स पॉलिसी, अर्जदाराचे ड्रायव्हिंग लायसन्‍स झेरॉक्‍स यांचा समावेश आहे. 

 

7.       नि. 5 वर तक्रारदारांनी तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.  तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्‍यावर नि.6 अन्‍वये मंचाने विरुध्‍दपक्षाला नोटीस जारी करुन आपला लेखी जबाब दाखल करण्‍याचा निर्देश दिला.  त्‍या नोटीसीची पोच नि. 7 अन्‍वये अभिलेखात उपलब्‍ध आहे.   विरुध्‍दपक्षाला मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही ते नेमलेल्‍या तारखेस मंचात हजर राहिले नाहीत.  परंतु त्‍यांना आपले म्‍हणणे मांडण्‍यासाठी योग्‍य संधी देण्‍यात आली.  परंतु त्‍यांनी आपले म्‍हणणे मंचामध्‍ये दाखल केले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द  मंचाने दि. 17/10/08 रोजी एकतर्फा चौकशीचा आदेश पारीत केला.

 

8.       दि. 17/11/08 रोजी सदर तक्रार अंतिम सुनावणीस मंचासमोर आली असता तक्रारदारांचे वकील हजर होते.  विरुध्‍दपक्ष गैरहजर होते.  तक्रारदारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद मंचाने ऐकून घेतला.  तक्रारदारांनी दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांचे वकीलांनी केलेला युक्‍तीवाद विचारात घेऊन सदर तक्रारीच्‍या अंतिम निराकरणार्थ मंचाने खालील प्रमुख मुद्दे विचारात घेतले.

 

मुद्दा क्रमांक  1  -         तक्रारदार यांना विरुध्‍दपक्षाकडून दोषपूर्ण सेवा

                        मिळाली आहे काय ?

उत्‍तर         -          होय.

 

मुद्दा क्रमांक  2 -          तक्रारदारांचा तक्रार अर्ज त्‍यांचे मागणीप्रमाणे मंजूर

                        करता येईल काय ?

उत्‍तर         -          अंतिम आदेशाप्रमाणे.

 

स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक  1  -       याकामी विरुध्‍दपक्ष हे गैरहजर आहेत.  त्‍यांनी आपले म्‍हणणेही दाखल केलेले नाही.  तक्रारदारांची तक्रार त्‍यांनी नाकारलेली नाही.  तक्रारदारांच्‍या दसतऐवजांवरुन अपघात झाल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येत आहे.  ड्रायव्‍हरचे लायसन्‍स तक्रारदारांनी दाखल केले आहे.  मंचाने त्‍याचे अवलोकन केले.  तक्रारदारांनी आपले वाहन विजय ऑटो गॅरेज मध्‍ये नेले होते तेथील सर्व बिले त्‍यांनी दाखल केली आहेत त्‍याचेही मंचाने अवलोकन केले.  त्‍यावर विरुध्‍दपक्षाच्‍या सर्व्‍हेअरने आपली सही केली आहे व दोन वेळा प्रत्‍यक्ष भेट देऊन कागदपत्रांची पाहणी करुन ती योग्‍य असल्‍याचे नमूद केले आहे.  विरुध्‍दपक्षाने ज्‍या कारणासाठी तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केला ते पत्र याकामी दाखल असून ते मंचाने पाहिले असता त्‍यात विरुध्‍दपक्षाने क्‍लेम का नाकारला याची खालीलप्रमाणे कारणे नमूद केली आहेत.

GENERAL EXCEPTIONS

( Applicable to all Sections of the Policy )

The Company shall not be liable under this Policy in respect of

...

3. any accidental loss damage and / or liability  caused sustained or incurred whilst

   the vehicle insured herein is

   (a) being used otherwise than in accordance with the Limitations as to Use

In view of the serious violations of policy conditions as to use of the vehicle, we express our inability to consider the claim.

 

         या वरील गोष्‍टींचा विचार करता कंपनीने दिलेले कारण योग्‍य आहे अथवा नाही  हे पाहणे आवश्‍यक आहे. त्‍यांनी Limitation to use चे कारणाखाली तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केला आहे.   परंतु विरुध्‍दपक्षाने Limitation to use याबाबत कोणताही सविस्‍तर खुलासा सादर केलेला नाही.  तसेच याकामी विरुध्‍दपक्षाने आपले म्‍हणणेही दाखल केलेले नाही.  ज्‍या कारणासाठी त्‍यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केला आहे ते कारण मंचाला योग्‍य वाटत नाही.  त्‍याबाबत त्‍यांनी काहीही पुरावा दाखल केलेला नाही.  अशा परिस्थितीत तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर करता येण्‍यासारखा नाही असे मंचाचे मत आहे.  विमा पॉलिसी घेण्‍यामागील तक्रारदारांचा किंवा अन्‍य कोणाचाही आपले झालेले नुकसान भरुन निघावे असाच हेतू असतो.  संबंधीत पॉलिसी ही विरुध्‍दपक्षाने त्‍यांच्‍या वाशी नवी मुंबई येथील शाखेमधून इश्‍यु केलेली होती व ती संपूर्ण मुदतीत इश्‍यु केलेली होती.  ज्‍यावेळी तक्रारदारांच्‍या गाडीचा अपघात झाला त्‍यावेळी सं‍बंधीत पॉलिसी अस्तित्‍वात होती.  त्‍याचप्रमाणे विरुध्‍दपक्षाच्‍या अधिकृत सर्व्‍हेअरने अपघातग्रस्‍त जागेची पाहणी करुन झालेल्‍या डॅमेजच्‍या दुरुस्‍तीसाठी तक्रारदारांना त्‍यांची गाडी अधिकृत गॅरेजमध्‍ये किंवा शोरुम मध्‍ये नेण्‍यास सांगितले होते.  त्‍याप्रमाणे तक्रारदारांनी आपली गाडी मे. विजय गॅरेजमध्‍ये नेऊन संबंधित बिले विरुध्‍दपक्षाकडे सादर करुनही त्‍यांनी त्‍यांचा क्‍लेम नामंजूर केला व त्‍यांनी क्‍लेम नाकारण्‍याचे जे कारण दाखविले ते कारण मंचाला अयोग्‍य वाटते.  मंचाचे मते, विरुध्‍दपक्षाची हीच कृती दोषपूर्ण सेवा आहे.  सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर होय असे आहे.

 

स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक  2  -        विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर तक्रारदारांची तक्रार त्‍यांनी मागणी केल्‍याप्रमाणे मंजूर करता येईल असे मंचाचे मत आहे.  याकामी तक्रारदारांच्‍या गाडीचे नुकसान होऊनही त्‍यांना त्‍याची नुकसान भरपाई विरुध्‍दपक्षाकडून मिळाली नाही.  तक्रारदारांनी गाडी खरेदी करण्‍यासाठी मे. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्‍स यांचेकडून कर्ज घेतले होते.  विरुध्‍दपक्षाने त्‍यांचा क्‍लेम मुदतीत मंजूर केला असता तर त्‍यांना त्‍यांचे कर्जाचे हप्‍ते मुदतीत फेडता आले असते याची जाणीव विरुध्‍दपक्षाला आहे.  परंतु असे असूनही काहीतरी कारण दाखवायचे व क्‍लेम नामंजूर करावयाचा या त्‍यांच्‍या कृतीचा तक्रारदारांना मोठया प्रमाणात मानसिक व शारिरिक त्रास होणे स्‍वाभाविक आहे.  त्‍याचप्रमाणे तक्रारदारांना आपल्‍या गाडीच्‍या झालेल्‍या नुकसानी पोटी रु. 1,92,000/- इतका खर्च आला आहे.  त्‍यांची पॉलिसीची एकूण रक्‍कम रु. 3,37,155/- इतकी होती त्‍यापोटी तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाकडे प्रीमियमही भरला आहे. 

         तक्रारदारांच्‍या दस्‍तऐवजांवरुन ते त्‍यांचे जे नुकसान झाले आहे त्‍याचीच मागणी करीत आहेत असे दिसून येते.  त्‍याचप्रमाणे त्‍यांनी रु. 13,500/- हा टोव्‍हींगचाही खर्च मागितला आहे.  त्‍याची सर्व बीलेही त्‍यांनी दाखल केली आहेत.  तक्रारदारांनी त्‍यांच्‍या झालेल्‍या आर्थिक नुकसानासाठी रु. 25,000/- व  मानसिक त्रासापोटी रु. 20,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.  मंचाचे मते, त्‍यांना वेळेत त्‍यांची क्‍लेमची रक्‍कम न मिळाल्‍याने त्‍यांचे जे आर्थिक नुकसान झाले ते त्‍यांना दयावे तसेच तक्रारदारांनी आपले म्‍हणणे तसेच त्‍यांचे जे नुकसान झाले आहे ते पुराव्‍यासहित मंचामध्‍ये दाखल केले आहे.  म्‍हणून त्‍यांची मागणी मंजूर करणे योग्‍य आहे असे मंचाचे मत आहे.

         परंतु त्‍यांची मानसिक त्रासापोटीची रु. 20,000/- ची मागणी ही मंचाला जादा वाटते.  ती तेवढी न देता ती रु. 5,000/- द्यावी असे मंचाचे मत आहे.  कारण व्‍याजाच्‍या (आर्थिक) नुकसानी साठी त्‍यांना रक्‍कम रु. 25,000/- देणे योग्‍य असल्‍याचे मंचाचे मत असल्‍याने मानसिक त्रासाची रक्‍कम जादा देणे योग्‍य होणार नाही.

         सबब, आदेश पारीत करण्‍यात येतो की,

                            -  अंतिम आदेश  -

         आदेश पारीत तारखेच्‍या 45 दिवसांचे आत विरुध्‍दपक्षाने खाली नमूद केलेल्‍या

आदेशाचे पालन करावे.

1.       तक्रारदार यांना गाडीच्‍या दुरुस्‍ती साठी झालेल्‍या खर्चाची रक्‍कम रु. 1,92,000/- 

        (रु. एक लाख ब्‍याण्‍णव हजार मात्र) , टोविंगचा खर्च रु. 13,500/- (रु.तेरा हजार   

        पाचशे मात्र) , आर्थिक नुकसानी पोटी रु. 25,000/- (रु.पंचविस हजार मात्र) तसेच

        मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- (रु. पाच हजार मात्र) असे एकूण रक्‍कम रुपये

        2,35,500/- (रु. दोन लाख पस्‍तीस हजार पाचशे मात्र) द्यावेत.

2.       या प्रमाणे वरील रक्‍कम विरुध्‍दपक्षाने विहीत मुदतीत तक्रारदारांना न दिल्‍यास

         वरील रक्‍कम आदेश पारीत तारखेपासून दर साल दर शेकडा 8% दराने व्‍याजासह

         विरुध्‍दपक्षाकडून वसूल करण्‍याचा अधिकार तक्रारदार यांना राहील.

 

3.       विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना न्‍यायिक खर्चापोटी रु. 2,000/- (रु. दोन हजार मात्र)

         द्यावेत.

4.       या आदेशाच्‍या प्रती नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्‍यात याव्‍यात.

 

दिनांक 17/11/2008.

ठिकाण रायगड अलिबाग.

 

 

                  (बी.एम.कानिटकर)      (आर.डी.म्‍हेत्रस) 

                    सदस्‍य               अध्‍यक्ष

          रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.   

 




......................Hon'ble Shri R.D.Mhetras
......................Post vacant
......................Shri B.M.Kanitkar