जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे
तक्रार क्र.२३०/११ रजि.तारीखः-०३/१२/११
निकाल तारीखः-२५/०६/२०१२
श्री.सुभाषचंद्र अमुलख शाह,
रा.मार्केट रोड, ता.शिरपूर, जि.धुळे. .......तक्रारदार
विरुध्द
१. चिंतामणी नागरी सह.पतसंस्था (म.), धुळे,
मॅनेजर,
मुख्य कार्यालय – रेल्वे स्टेशन जवळ, ८० फुटी रोड, धुळे.
२. श्री.राधेश्याम बाबुलाल अग्रवाल – चेअरमन,
रा.कर्तव्य, रेल्वे स्टेशन जवळ, ८० फुटी रोड, धुळे.
३. श्री.राजेंद्र हिरामण बागुल – व्हा.चेअरमन,
रा.बागुल सायकल मार्ट, हॉटेल शेरे पेजाबच्या बाजुला,
आग्रा रोड, धुळे. .......विरुध्द पक्ष
कोरम - श्री.डी.डी.मडके, अध्यक्ष
सौ.सुधा जैन, सदस्या
तक्रारदार तर्फेः-अॅड.के.आर.लोहार
विरुध्द पक्ष – एकतर्फा
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष चिंतामणी नागरी सह.पतसंस्था (म.), धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खात्यात रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
मुदत ठेव पावती क्रमांक |
ठेव रक्कम |
ठेव दिनांक |
देय रक्कम |
देय दिनांक |
१४३७८ |
२०००/- |
२९/०९/०५ |
२७२१/- |
२९/०९/०८ |
तक्रार क्र.२३०/११
१२३१३ |
१०००/- |
२८/०३/०६ |
१३,३०३/- |
२८/०३/०९ |
१०१ |
२५,०००/- |
१५/०४/०६ |
३३,५००/- |
१५/०४/०९ |
१३२७२ |
१५,०००/- |
०२/०९/०६ |
१७,२४८/- |
०२/०३/०८ |
बचत खाते क्रमांक |
जमा रक्कम |
जमा दिनांक |
३८ |
५०९/- |
०२/११/०७ |
३. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खात्यातील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
४. विरुध्द पक्ष क्र.१ ते ३ यांना नोटीसची बजावणी झाली आहे. परंतू ते हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आले.
५. तक्रारदार यांची तक्रार याचा विचार होता तक्रारीच्या न्यायनर्णियासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.५/१ ते ५/३ वर मुदत ठेव पावती बचत खात्याची झेरॉक्स प्रत सादर केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावती व बचत खात्याची रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावती व बचत खाते तसेच त्यातील रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
तक्रार क्र.२३०/११
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खात्यात रकमा गुंतवल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावती व बचत खात्यात गुंतवलेली रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती व बचत खात्यातील व्याजासह होणारी रक्कम चिंतामणी नागरी सह.पतसंस्था व विरुध्द पक्ष क्र.२ व ३ यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू विरुध्द पक्ष क्र.२ व ३ यांचे विरुध्द कलम ८८ अन्वये कार्यवाही केल्याबद्दल पुरावा दिलेला नाही. तसेच मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.५२२३/०९ सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has beenrecorded above, I am of the view that asociety registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision ofConsumer Protection Act is entertain able against the society, the Directors ormembers of the managing committee cannot be held responsible in view of thescheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members ofthe managing committee of the societies responsible, without observing theprocedure proscribed under the Act, would also be against the principles ofco-operation,which is the very foundation of establishment of the co-operativesocieties.
९. वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तीकरित्या रक्कम देण्यास जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.१ चिंतामणी नागरी सह.पतसंस्था यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खात्यामधील व्याजासह होणारी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना चिंतामणी नागरी सह.पतसंस्था यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे चिंतामणी नागरी सह.पतसंस्था यांच्या कडून अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.१०००/- व मानसिक त्रासापोटी रु.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
तक्रार क्र.२३०/११
१०. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. चिंतामणी नागरी सह.पतसंस्था यांनी तक्रारदर यांना मुदत ठेव खालील तपशीलात नमुद असलेल्या पावतीमधील मुदतअंती देय रक्कम व त्यावर देय तारखेपासून द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज व बचत खात्यामधील जमा रक्कम व त्यावर जमा तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. मुदत ठेव पावती व बचत खात्याचा तपशील खालील प्रमाणे.
मुदत ठेव पावती क्रमांक |
ठेव रक्कम |
ठेव दिनांक |
देय रक्कम |
देय दिनांक |
१४३७८ |
२०००/- |
२९/०९/०५ |
२७२१/- |
२९/०९/०८ |
१२३१३ |
१०००/- |
२८/०३/०६ |
१३,३०३/- |
२८/०३/०९ |
१०१ |
२५,०००/- |
१५/०४/०६ |
३३,५००/- |
१५/०४/०९ |
१३२७२ |
१५,०००/- |
०२/०९/०६ |
१७,२४८/- |
०२/०३/०८ |
बचत खाते क्रमांक |
जमा रक्कम |
जमा दिनांक |
३८ |
५०९/- |
०२/११/०७ |
३. चिंतामणी नागरी सह.पतसंस्था यांनी तक्रारदर यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
४. वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.सुधा जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे