Maharashtra

Ahmednagar

CC/17/293

Dattatray Vasant Bhong - Complainant(s)

Versus

Chirman, PAN Card Club Ltd. Shri Sudhir Moravikar - Opp.Party(s)

Adv Raut

15 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/293
( Date of Filing : 27 Oct 2017 )
 
1. Dattatray Vasant Bhong
R/at Brahman Galli, Chas, Tal Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Jayashri Dattatray Bhong
R/at Brahman Galli, Chas, Tal Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
3. Ganesh Dattatray Bhong
R/at Brahman Galli, Chas, Tal Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chirman, PAN Card Club Ltd. Shri Sudhir Moravikar
R/at Kaliandas udyog Bhavan, Near Century Bajar, Prabhadevi, Mumbai 400025
Mumbai
Maharashtra
2. Branch Manager, PAN Card Club Ltd. Shri. Shrikant Phophale
1st floor, Dreamland Building, Opp Karjatkar Finance, Manmad Road Savedi Ahmednagar 414003
Ahmednagar
Maharashtra
3. Sou. Anita Gajanan Narsale Agent of PAN Card Club Ltd.
R/at flat no. 1, Sahyadri Towers, Near Dinesh Hotel, Aadarsh Nagar, Nagar-Kalyan Road, Ahmednagar 414001.
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Adv Raut, Advocate
For the Opp. Party: एम.के.नरगाळे, Advocate
Dated : 15 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.   तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.

2.   तक्रारदार क्र.1 ते 4 यांची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणेः-

     तक्रारदार क्र.1 ते 4 हे रा.चास ता.जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. सामनेवाले नं.1 ही गुंतवणुक व विमा संरक्षण कंपनी आहे. सामनेवाला नं.1 कंपनीने गुंतवणुक करणा-यासाठी गुंतवणुकीबरोबरच विमा संरक्षण स्किम अंमलात आणली होती. व त्‍याप्रमाणे गुंतवणुकदाराने रुपये 1,220/- भरल्‍यास नऊ वर्षापर्यंत रु.1,00,000/- चे विमा संरक्षण व रु.3,400/- अशी गुंतवणुकदारास मिळणार होते. त्‍याप्रमाणे सामनेवाला नं.1 कंपनीने स्किम जाहीर केली होती. त्‍या अनुषंगाने सामनेवाले नं.3 सौ.अनिता गजानन नरसाळे व त्‍यांचे पती श्री.गजानन नरसाळे यांनी तक्रारदारास सदर स्किमबाबत माहिती सांगितली. तक्रारदाराने सामनेवाले नं.3 यांचे पतीवर विश्‍वास ठेवून दिनांक 07.11.2016 रोजी प्रत्‍येकी रक्‍कम रुपये 1,220/- अशी एकूण रक्‍कम रुपये 4,880/- सामनेवाले नं.1 कंपनीचे एजंट सामनेवाले नं.3 यांचेमार्फत सामनेवाले नं.2 चे अहमदनगर शाखेत भरले. सदरहु रकमेची मुदत संपल्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवाला नं.1 कंपनीकडे संपर्क केला असता सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदाराकडून सर्व अस्‍सल कागदपत्रे जमा करुन घेऊन सर्व अस्‍सल कागदपत्रे मिळाल्‍याची पोहोच तक्रारदाराना दिनांक 09.05.2016 रोजी देण्‍यात आली व लवकरात लवकर संपुर्ण देय रक्‍कम रु.13,600/- तुम्‍हाला देण्‍यात येईल असा विश्वास दिला. त्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी माहिती व विचारणा केली असता रक्‍कम माहे जुलै 2016 चे अखेरीस देतो म्‍हणून सांगितले. दिनांक 30.05.2016 च्‍या पत्राने तसे कळविले. सामनेवाला नं.1 ते 3 यांनी तक्रारदारांची फसवणूक केली आहे. तक्रारदार यांना सदरची रक्‍कम प्राप्‍त झाली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी दिनांक 01.06.2016 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतू सामनेवाला यांनी नोटीस स्विकारली नाही. त्‍यामुळे तक्रारदारास सामनेवाला यांनी दुषीत सेवा दिली. त्‍यामुळे तक्रारदार यांनी मंचात तक्रार दाखल करुन परच्छिेद क्र.9 प्रमाणे मागणी केली केली आहे.      

3.   सामनेवाला नं.1 व 2 यांचेविरुध्‍द नोटीस बजावणी होऊनही ते मंचात हजर झाले नाही. सामनेवाला नं.1 व 2 यांचे विरुध्‍द सदरची तक्रार एकतर्फा चालविण्‍याचा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्‍यात आला.

4.   सामनेवाला नं.3 यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी क्र.13 वर दाखल केली आहे. सामनेवाला नं.3 यांनी असे कथन केले आहे की, सामनेवाले नं.3 या महिला असून सामनेवाले नं.3 अनेक वर्षापासून पॅनकार्ड क्‍लब लि. या कंपनीचे मान्‍यताप्राप्‍त परवाना धारक अधिकृत एजंट आहेत. पॅनोरमिक या ग्रुप कंपनीची पॅन कार्ड क्‍लब लि. ही कंपनी कायद्याप्रमाणे रजिस्‍टर्ड आहे. सदर कंपनीमार्फत हॉटेल्‍स, मोटेल्‍स, प्रवाशांना अथवा ग्राहकांना रुम्‍स भाडयाने देणे, त्‍याच प्रमाणे सदर कंपनीने सर्व ग्राहकांसाठी विविध योजना रा‍बवित आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला नं.1 यांचे योजनेबाबत माहिती मिळाली आहे. सामनेवाला नं.3 यांचेकडूनही त्‍यांनी सदरच्‍या योजनेविषयी माहिती सांगितली व त्‍यानुसार तक्रारदाराने स्‍वतःहून या कंपनीमध्‍ये रक्‍कम गुंतवली आहे. तक्रारदार यांनी सदरची रक्‍कम गुंतवणूकीबाबत  सामनेवाला यांना सर्व पावत्‍या दिलेल्‍या आहेत. व संपुर्ण रेकॉर्ड सामनेवाले नं.1 कंपनीच्‍या अहमदनगर शाखेमध्‍ये उपलब्‍ध आहे. सामनेवाले नं.3 यांनी तक्रारदाराच्‍या हितासाठी नियमानुसार योग्‍य ती कार्यवाही प्रामाणिकपणे केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी सदर सामनवाले कंपनीकडून घेतलेल्‍या योजनेतील नियमानुसार रक्‍कम घेण्‍याचा पुर्ण अधिकार तक्रारदार यांना सामनेवाले नं.1 पॅन कार्ड क्‍लब लि या कंपनीकडूनच आहे. सामनेवाला नं.3 या प्रामाणिकपणे भूमीका बजावलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनी यांचेकडे दस्‍त व कागदपत्रासह रकमेचा परतावा मिळवणे  तक्रारदाराची जबाबदारी आहे. अशा प्रकारे सामनेवाला नं.3 हे कोणत्‍याही रकमेचे देणे लागत नाही. तक्रारदाराने सामनेवाला नं.3 यांना बेकायदेशिर नोटीस दिलेली आहे. समानेवाला नं.3 यांनी कोणतीही फसवणूक केलेली नाही. तक्रारदाराला रक्‍कम देण्‍याची सामनेवाला नं.1 व 2 यांची जबाबदारी आहे. सदरची तक्रार सामनेवाला नं.3 यांचे विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी अशी मंचाला विनंती केली आहे.

5.   तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, शपथपत्र व त्‍यांचे वकील श्री.राऊत यांनी केलेला युक्‍तीवाद तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेली कैफियत यावरुन न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.  

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार क्र.1 ते 4 हे सामनेवाला नं.1 व 2 यांचे ग्राहक आहेत काय.?                                                         

 

... होय.

2.

तक्रारदार क्र.1 ते 4 हे सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय.?                                                         

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडे सामनेवाला नं.3 यांचे मार्फत प्रत्‍येकी रक्‍कम रुपये 1,220/- प्रमाणे अशी एकुण रक्‍कम रु.4,880/- दिनांक 07.11.2006 रोजी त्‍यांचे अहमदनगर येथील शाखेमध्‍ये तक्रारदाराने भरले. ही बाब सामेनवाला क्र.3 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये मान्‍य केलेली आहे. तक्रारदाराने त्‍यांचे तक्रारीमध्‍ये कथन केलेले आहे की, विमा संरक्षण स्किम सामनेवाला यांनी अंतर्गत आणली आहे. सामनेवाला नं.1 कंपनीने गुंतवणुक करणा-यासाठी गुंतवणुकीबरोबरच विमा संरक्षण स्किम अंमलात आणली होती. व त्‍याप्रमाणे गुंतवणुकदाराने रुपये 1,220/- भरल्‍यास नऊ वर्षापर्यंत रु.1,00,000/- चे विमा संरक्षण व रु.3,400/- अशी गुंतवणुकदारास मिळणार होते. अशी सामनेवाला नं.1 यांनी स्‍कीम जाहीर केली होती. परंतू तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रामध्‍ये कोणते विमा संरक्षण विमा देण्‍यात आला होता ही बाब नमुद नाही. किंवा त्‍याबाबतचे दस्‍त प्रकरणात दाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे तक्रारदाराचे पॅनकार्ड क्‍लब लि कंपनी यांचेकडे कोणते विमा संरक्षण उतरविले ही बाब मंचासमक्ष स्‍पष्‍ट झाले नाही. मात्र तक्रारदाराने रक्‍कम रु.4,880/- गुंतविले होते ही बाब सामनेवाला नं.3 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये मान्‍य केले असल्‍याने सामनेवाला नं.1 व नं.2 चा ग्राहक आहे.  सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2   तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी 1,220/- प्रमाणे रक्‍कम रु.4,880/- एवढी रक्‍कम सामनेवाला नं.1 या कंपनीची सामनेवाले नं.2 या शाखेमध्‍ये सामनेवाला 3 मार्फत भरलेली आहे. मात्र सदरहू रक्‍कम भरले नंतर त्‍यांना नऊ वर्षापर्यंत रु.1,00,000/- चे विमा संरक्षण व रु.3,400/- मिळणार होते ही बाब तक्रारीत नमुद केलेली आहे. मात्र त्‍यासाठी कोणतेही कागदपत्रे प्रकरणात दाखल केलेले नाहीत. सामनेवालाकडे विमा संरक्षण तक्रारदार यांना देण्‍यात आला आहे ही बाब मंचासमक्ष स्‍पष्‍ट झालेली नाही. सामनेवालो नं.1 व 2 हे प्रकरणात नोटीस बजावणी होऊनही हजर झाले नाही. त्‍यामुळे त्‍यांचे म्‍हणणे मंचासमोर आलेले नाही. मात्र सामनेवाला नं.3 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये सामनेवालाने रक्‍कम सामनेवाला नं.2 या शाखेमध्‍ये तक्रारदाराने भरलेली आहे. त्‍याबाबतची पावती त्‍यांना देण्‍यात आली असे कथन केलेले आहे. मात्र प्रकरणामध्‍ये कोणतीही पावती दाखल केलेली नाही. सामनेवाला नं.3 यांनी रक्‍कम भरल्‍याबाबत मान्‍य केले. यामुळे तक्रारदाराने केलेले कथन योग्‍य आहे असे मंचाचे मत आहे. मात्र विमा संरक्षण व रु.3,400/- गुंतवणूक मिळणार होती. या कथनावर कागदोपत्री पुरावा नाही व कोणतीही पावती उतरविली आहे ही बाब मंचासमक्ष स्‍पष्‍ट झालेली नाही कोणत्‍या पावतीमध्‍ये विमा संरक्षण देण्‍यात आले आहे व त्‍या योग्‍य कोणतीही कागदपत्रे प्रकरणात दाखल झालेली नाहीत. त्‍यामुळे तक्रारदाराने केलेली मागणी ही कागदोपत्री पुरावा नसल्‍यामुळे मंचासमोर स्‍पष्‍ट झालेले नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेली मागणी अमान्‍य करण्‍यात येते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

8.   मुद्दा क्र.3   मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्‍तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदार क्र.1 ते 4 यांची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

4.   तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.