नि.1 खालील आदेश
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. तक्रारदार यांचा आटा चक्की व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदी व विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत. जाबदार यांची आयकॉन कंपनीची सातारा जिल्हयाची एजन्सी तक्रारदार यांचेकडे असल्याने जाबदार हे आयकॉन कंपनीचे एल.ई.डी. खरेदी तक्रारदारांना देत असत व त्याची वॉरंटी जाबदार हे देत असत. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून आयकॉन कंपनीचे एल.ई.डी. खरेदी घेतलेले आहेत. त्याचा सविस्तर तपशील तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केला आहे. सदरचा माल तक्रारदारांनी सन 2021 मध्ये खरेदी केलेनंतर टप्प्याटप्प्याने त्या वस्तू तक्रारदारांनी विकल्या. परंतु काही दिवसात खरेदी करणा-या व्यक्तींची वस्तूंची तक्रार तक्रारदारांकडे येवू लागली. यातील काही वस्तू बंद पडल्या तसेच काही वस्तूंचे पार्ट गेले, त्या नादुरुस्त झाल्या. म्हणून तक्रारदारांनी जाबदार यांचेकडून वारंवार संपर्क करुन जाबदारांनी दिलेल्या वस्तू या वॉरंटी असल्याने नवीन द्याव्यात किंवा ग्राहकांना सेवा द्यावी अशी मागणी केली. परंतु जाबदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारदारांचे ग्राहक तुटले व तक्रारदारांचे कोटयावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. अशा प्रकारे जाबदारांनी सेवा देण्यात त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदारांनी जाबदारांना दि. 5/4/2013 रोजी नोटीस पाठविली. परंतु तरीसुध्दा जाबदारांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांनी जाबदारांकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.11,67,660/- व्याजासह मिळावेत, तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदारांनी तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ शपथपत्र, कागद यादीसोबत माल खरेदी केलेल्या बिलांच्या पावत्या, तक्रारदारांनी जाबदारांना पाठविलेली नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. सदरकामी तक्रारदारतर्फे ॲड पी.सी.भोसले यांचा दाखलपूर्व युक्तिवाद ऐकला. तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले.
4. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथन पाहता तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या माल खरेदीच्या बिलांच्या पावत्या पाहता तक्रारदार यांचा आटा चक्की व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदी व विक्रीचा व्यवसाय असल्याचे दिसून येते. जाबदार यांची आयकॉन कंपनीची सातारा जिल्हयाची एजन्सी तक्रारदार यांचेकडे आहे. जाबदार हे आयकॉन कंपनीचे एल.ई.डी. खरेदी तक्रारदारांना देत असत व त्याची वॉरंटी जाबदार हे देत असत. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून आयकॉन कंपनीचे एल.ई.डी. खरेदी घेतलेले आहेत हे तक्रारदाराने दाखल केलेल्या बिलांच्या पावत्यांवरुन दिसून येते. सदरच्या सर्व बाबी विचारात घेता तक्रारदार यांचा व्यवसाय असून सदरचे व्यवसायासाठी ते जाबदारांकडून माल खरेदी करतात व तो माल ग्राहकांना विकतात हे दिसून येते. सबब, तक्रारदार जाबदार यांचेबरोबर करत असलेले व्यवहार हे व्यापारी हेतूसाठी किंवा नफा कमविण्यासाठी (Commercial purpose) करीत असल्याने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील कलम 2(7) नुसार ग्राहक होत नाही असे या आयोगाचे मत आहे.
Section 2(7) : "Consumer" means any person who-
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
(ii) hires or avails of any service for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such service other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person, but does not include a person who avails of such service for any commercial purpose.
Explanation. -For the purposes of this clause, -
(a) the expression "commercial purpose " does not include use by a person of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self-employment;
(b) the expressions "buys any goods " and "hires or avails any services " includes offline or online transactions through electronic means or by teleshopping or direct selling or multi-level marketing;
वर नमूद ग्राहक या संज्ञेच्या व्याख्येमध्ये एखादी व्यक्ती पुनविक्री करणेसाठी कोणत्याही वस्तू किंवा मालाची खरेदी करीत असेल किंवा व्यापारी कारणास्तव मालाची खरेदी करीत असले तर ती ग्राहक होत नाही असे स्पष्ट नमूद केले आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी जाबदारांकडून खरेदी केलेला माल हा त्याचे ग्राहकांना विकला आहे. सबब, तक्रारदारांनी जाबदारांकडून खरेदी केलेला माल हा व्यापारी कारणास्तव/नफा कमविण्यासाठी खरेदी केला होता ही बाब स्पष्टपणे दिसून येते. सबब, ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेत येत नाही.
6. सबब, तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक होत नसलेने प्रस्तुतची तक्रार या आयोगासमोर चालणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक होत नसलेने, प्रस्तुत वादविषयाबाबत योग्य त्या न्यायालयात दाद मागणेचा तक्रारदाराचा हक्क अबाधित ठेवून, प्रस्तुतची तक्रार दाखल करुन घेण्यापूर्वीच फेटाळण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाहीत.