Maharashtra

Sangli

CC/10/527

Sau.Rajakka Pandurang Hasabe etc.4 - Complainant(s)

Versus

Chintamani Nag.Sah.Pat.Mar.Sangli etc. 14 - Opp.Party(s)

08 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/527
 
1. Sau.Rajakka Pandurang Hasabe etc.4
Opp.Industrial Estate, Behind Priya Hotel, Swanand Banglow, Shelar Plot No.17, Panchsheel Nagar, Sangli, Tal.Miraj, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Chintamani Nag.Sah.Pat.Mar.Sangli etc. 14
H.O.Chintamaninagar, Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

                                           नि. नं. २५

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर

 

मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे

मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे

 

ग्राहक तक्रार अर्ज क्र. ५२७/२०१०

----------------------------------------------

तक्रार नोंद तारीख      ३०/०९/२०१०

तक्रार दाखल तारीखः  २९/११/२०१० 

निकाल तारीखः      -  ८/०९/२०११

----------------------------------------------

 

१.  सौ राजाक्‍का पांडुरंग हसबे

   वय वर्षे ६५, धंदा घरकाम

 

२.  श्री रामचंद्र पांडुरंग हसबे

   वय वर्षे ३३, धंदा शेती

 

३.  श्री पांडुरंग महादेव हसबे

   वय वर्षे ६९, धंदा नोकरी

 

४.  सौ अरुणा पांडुरंग हसबे

   वय वर्षे ४०, धंदा घरकाम

   सर्व रा.औद्योगिक वसाहत समोर,

   प्रिया हॉटेल मागे, स्‍वानंद बंगला,

   शेलार प्‍लॉट नं.१७, पंचशिलनगर,

   सांगली ता.मिरज जि. सांगली                       .... तक्रारदार

विरुध्‍द

 

१.  चिंतामणी नागरी सह.पतसंस्‍था मर्या. सांगली

    मुख्‍य शाखा चिंतामणीनगर, सांगली

 

२.  श्री दत्‍तात्रय तुकाराम पवार (चेअरमन)

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. चिंतामणीनगर, सांगली ता.मिरज जि. सांगली

 

३.  श्री संभाजी मारुती पाटील (व्‍हा.चेअरमन)

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. मु.पो.नानीबाई मळा, सांगली ता.मिरज जि. सांगली

 

४. श्री प्रकाश गजानन किर्वे (संचालक)

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. चिंतामणी, सांगली ता.मिरज जि. सांगली

 

५.  श्री प्रसाद निशिकांत रिसवडे

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. मु.पो.टिंबर एरिया, सांगली ता.मिरज जि. सांगली

    (मंचाच्‍या दि. ६/७/११ चे आदेशानुसार वगळले.)

 

६.  श्री अनिल रंगराव थोरात

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. मु.पो. संजयनगर, सांगली ता.मिरज जि. सांगली

 

७.  श्री शहाजी रामचंद्र रणदिवे,   

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. चिंतामणीनगर, सांगली ता.मिरज जि. सांगली

    (मंचाच्‍या दि. ५/९/११ चे आदेशानुसार वगळले.)

 

८.  श्री उमेश वासुदेव महामुनी,

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. सराफकट्टा, सांगली ता.मिरज जि. सांगली

    (मंचाच्‍या दि. ६/७/११ चे आदेशानुसार वगळले.)

 

९.  सौ शारदा विठ्ठल सावंत,

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. मु.पो. नानीबाई मळा, सांगली ता.मिरज जि. सांगली

    (मंचाच्‍या दि. ६/७/११ चे आदेशानुसार वगळले.)

 

१०.  श्री मारुती बाबूराव भोसले,

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. चिंतामणनगर, सांगली ता.मिरज जि. सांगली

 

११.  श्री सोपान बाबुराव कांबळे,

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. चिंतामणनगर, सांगली ता.मिरज जि. सांगली

 

१२.  श्री सचिन वसंतराव पोतदार

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. चिंतामणनगर, सांगली ता.मिरज जि. सांगली

 

१३.  सौ शामलता साहेबराव पाटील

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा. चिंतामणनगर, सांगली ता.मिरज जि. सांगली

 

१४.  श्री प्रकाश रावसो मोकाशी

    व.व. सज्ञान, व्‍यवसाय नोकरी

    रा.लक्ष्‍मीनगर, सांगली ता.मिरज जि. सांगली          ...... जाबदार

 

 

                            तक्रारदार तर्फेः  +ìb÷. श्री एन.एम.कोठावळे

                            जाबदार क्र.१ ते ४, ६ व १० ते १४ एकतर्फा

                            जाबदार क्र.५, ७ ते ९ वगळले.

 

 

नि का ल प त्र

 

द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे

 

१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने मुदत ठेवी व बचत खाते अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार चिंतामणी नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., सांगली (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे मुदत ठेवी व बचत खाते अन्‍वये रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. तक्रारदारांनी  गुंतविलेल्‍या सदर रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.  सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.  तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण १० कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.

 

२.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. १ ते ४, ६ व १० ते १४ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले.  जाबदार क्र.५, ८ व ९ यांना मंचाच्‍या दि.६/७/११ चे आदेशानुसार वगळण्‍यात आले.  तर जाबदार क्र.७ यांना मंचाच्‍या दि.५/९/११ च्‍या आदेशानुसार वगळणेत आले. 

 

३.    प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी नि.२४/१ वर सेव्हिंग्‍ज खात्‍याच्‍या पासबुकातील पानाची सत्‍यप्रत दाखल केली आहे.  तसेच नि.२४/२ ते २४/१० वर ठेवपावत्‍यांच्‍या सत्‍यप्रती दाखल केल्‍या आहेत.  तक्रारदार यांचे मूळ तक्रारअर्जाचे अवलोकन केले असता सरनाम्‍यामध्‍ये तक्रारदार क्र.१ ते ४ यांची नावे नमूद केलेली आहेत, परंतु तक्रारअर्जाचे शेवटी फक्‍त तक्रारदार क्र.१ यांचीच सही आहे.  इतर तक्रारदारांच्‍या सहया दिसून येत नाही. तक्रारदार क्र.२ ते ४ यांनी तक्रारदार क्र.१ यांना प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे कामी अधिकारपत्र दिल्‍याचेही दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही.  सदरची बाब विचारात घेता तक्रारदार क्र.२ ते ४ यांनी गुंतविलेल्‍या नि.२४/८ ते २४/१० वरील ठेवपावत्‍यांचे रकमांबाबत आदेश करणे योग्‍य व न्‍याय्य होणार नाही असे मंचाचे मत आहे.  परंतु सदरचे ठेवपावत्‍यांचे रकमेबाबत स्‍वतंत्र तक्रारअर्ज दाखल करुन दाद मागणेची मुभा तक्रारदार क्र.२ ते ४ यांना राहील.

 

४.  तक्रारदार यांनी नि.२४ अन्‍वये दाखल केलेल्‍या व्‍याजाच्‍या निवेदनात, त्‍यांनी मुदत ठेवींअन्‍वये गुंतविलेल्‍या रकमांवर कोणतेही व्‍याज मिळाले नसल्‍याचे नमूद केलेले आहे.  सबब तक्रारदार क्र. १ यांनी गुंतविलेल्‍या नि.२४/२ ते २४/७ वरील ठेवपावत्‍यांच्‍या रकमा ठेव ठेवल्‍याचे तारखेपासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत ठेवपावतीवर नमूद केलेल्‍या व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत.  खात्‍यावरील शेवटच्‍या तारखेस जमा रक्‍कम ही द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजासह मंजूर करण्‍यात येत आहे. हे व्‍याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्‍या रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्‍याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे. 

 

५.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता, तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने  रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे.  त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  

सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.  ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २ ते ९ व ११ ते १४ यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो.  तसेच जाबदार क्र.१० हे मयत आहेत त्‍यामुळे रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने, ज्‍या पतसंस्‍थेमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो.

 

सबब, मंचाचा आदेश की,

 

दे

 

१.  यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदार क्र.१ यांना मुदत ठेव पावती क्र. २६७३ मधील रक्‍कम रु.१२,०००/- (रुपये बारा हजार फक्‍त) दि.८/८/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.

 

२.  यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदार क्र.१ यांना मुदत ठेव पावती क्र. २६८३ मधील रक्‍कम रु.५,०००/- (रुपये पाच हजार फक्‍त) दि.१८/८/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.

 

३.  यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदार क्र.१ यांना मुदत ठेव पावती क्र. २६८६ मधील रक्‍कम रु.२,४००/- (रुपये दोन हजार चारशे फक्‍त) दि.२१/८/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.

 

४.  यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदार क्र.१ यांना मुदत ठेव पावती क्र. २६७४ मधील रक्‍कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्‍त) दि.८/८/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.

 

५.  यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदार क्र.१ यांना मुदत ठेव पावती क्र. २६७५ मधील रक्‍कम रु.२,३००/- (रुपये दोन हजार तिनशे फक्‍त) दि.८/८/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.

 

६.  यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदार क्र.१ यांना मुदत ठेव पावती क्र. २७३४ मधील रक्‍कम रु.११,०००/- (रुपये अकरा हजार फक्‍त) दि.२२/११/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.

 

७.  यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदार क्र.१ यांना सेव्हिंग्‍ज खाते क्र.३४३ मधील रक्‍कम रु.२,५३८/- (रुपये दोन हजार पाचशे अडतीस फक्‍त) दि.१५/३/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.

 

८.  यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.

 

९.  वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.२३/१०/२०११ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.

 

सांगली

दिनांकò: ८/०९/२०११    

 

                  (गीता सु.घाटगे)                     (अनिल य.गोडसे÷)

                       सदस्‍या                                       अध्‍यक्ष           

                          जिल्‍हा मंच, सांगली                      जिल्‍हा मंच, सांगली.  

 

|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä  Ênù.   /   /२०११

      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä  Ênù.   /    /२०११

 

 

 

 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.